|
Zakki
| |
| Tuesday, April 10, 2007 - 1:03 pm: |
| 
|
लोकहो, धन्यवाद. पण माझे एक दूरचे मामा म्हणत, अरे मी मोठा आहे वयाने म्हणजे लगेच आदराला पात्र होत नाही. वय आपो आपच वाढते, त्यात काय आदरणीय? फार तर माझ्या आई वडिलांना त्याचे क्रेडिट द्या!

|
Kashi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:10 pm: |
| 
|
धन्यवाद झकासराव.....तुमचे फ़ेस रीडीग फ़ारच चांगले आहे.९०% बरोबर... पण तुमचा फ़ोटु मात्र बघण्याचा योग आला नाही...
|
Savani
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:35 pm: |
| 
|
आई ग.. कसला जबरी बीबी आहे हा. आज अक्खा बीबी वाचून काढला. तुफ़ान धमाल आहे. च्यायला, तू म्हण्जे तर लैच इनोदी हायेस.
|
Gobu
| |
| Tuesday, April 10, 2007 - 6:35 pm: |
| 
|
नन्दिनी २९११, कन्येच्या नावातच एक नव्हे तर दोन ९ बाय ११(नाइन इलेवन) आहेत याचा अर्थ कडकलक्ष्मी!!! झाशीची राणी!!! तडकाफ़ड!!! चन्द्रमुखी आणि ज्वालामुखी!!! (अशी लोक मनाने फ़ार चान्गली असतात हो!) ओठात एक आणि पोटात एक हे बिल्कुल चालत नाही इसके साथ जो पन्गा लेगा, पछतायेगा जरुर!!! नन्दिनी भगिनी, दिवे घे ग!
) कुठे लपु मी आता? (आता नशीबात असेल तरच पुन्हा मायबोलिवर येइल ह!!!  )
|
>>अहो, फ़ुलपाखरु मनावर घेणार नाही याची खात्री होती मला, म्हणुनच लिहीले, अरे गोबू तू ओळखतोस की काय मला? ;) की हा पण माझ्या ID वरून बान्धलेला अन्दाज दिवे घे हो झकासराव >>बर आज फ़ुलपाखरु विषयी......... एखाद लहान मुल आहे बाल वाडीतल आणि ते रंगीबेरंगी ड्रेस घालुन दोन्ही हात वर खाली हलवत गाण म्हणतय " फ़ुलपाखरु छान कीती दीसते फ़ुलपाखरु " ह्याच्या पेक्षा माझ्या मनात दुसर काहीच येत नाहीये. अहो इतकी काही लहान नाही हो मी अजुन एखाद दोन वर्शान्नी माझं पिल्लू म्हणेल हे गाणं )
|
Chyayla
| |
| Tuesday, April 10, 2007 - 11:02 pm: |
| 
|
अरे हा BB अजुनही वहातच आहे, दरम्यान मायबोलीकरान्ना सावधानतेचा ईशारा देउनही बरेच डोकावुन गेलेले दीसतात. आता तुमची प्रतिमा बिघडली तर... आता तुम्ही काही करु शकत नाही.. भोगाSS भोगा आपल्या कर्माची फ़ळ. पहिले इन्धन व सावनीला धन्स देतो. जयमहाराष्ट्र म्हटले की डोळ्यासमोर येतो तो ढाण्या वाघ, शिवसेना, जाज्वल्य देशाभिमान, अन्यायाची चीड, झुन्जार व्यक्तिमत्व... असे वाटते की मागल्या जन्मी शिवरायान्सोबत कायम गड बिड जिन्कण्यात वस्त असाव्यात, त्या अल्टीमा ला विचारल पहिजे. की ह्या पण ऑनलाईन असायच्या का? यान्ची पोस्ट आक्रमकपणे समोरच्याच्या चिन्धड्या उडवणार्या, पण चुक लक्षात आली की तितक्याच प्रान्जळपणे कबुल करणार्या व त्यापासुन बोध घेणार्या. आपल्याला हा स्वभाव जाम पटेश... तरी हे सगळे मेष राशीचे लक्षण दीसताहेत. एक कुतुहल नक्कीच आहे.. तुमची मुल तुम्हाला मॉसाहेब म्हणतात का हो? जयावी रसिक मनाच्या कायम गुलमोहोर मधे रमणार्या ईकडे कदाचित वाट चुकली म्हणुन आल्या की काय, कायम दाद्ची घेव देव करत असतात. प्रपन्चाच्या चार गोष्टी करुन हसत खिदळत मैत्री जमवणार्या ग्रुहीणी. काशी आता हा आयडी वाचुन पावित्र्य, मान्गल्याची भावना आपसुकच निर्माण होते, यान्चे पतिराज कधीच तिर्थयात्रेला जाणार नाहीत आणी या जाउ पण देणार नाहीत. असे त्या झकास च्या पोस्ट वरुन वाटते. त्या म्हणतील.. "स्वामी.. नका हो जाउ तिर्थयात्रेला तुमचे चरण हेच माझे तिर्थस्थान आहे.. " पतिराज- "हो आता तुच माझी काशी.. तुला सोडुन कुठे जाणार आहे? आपण ईथेच थाम्बु.. रिजर्वेशन रद्द..." प्रिन्सेस या बसल्या असतील हातावर हनुवटी टेकवुन वाट पहात काही टपटप आवाज आला की "घोडा आलाSS.. घोडा आलाSSS " असे आनन्दाने ओरडत. अर्थात कोणाची वाट पहात आहे हे लक्षात आलेच असेल. फ़ुलपाखरु हसले खेळले फ़ुलपाखरु झाले... छान आहे हा आयडी पण सगळ्यान्नी पार वाट लावुन दीली होती. इन्द्रधनुश्य तु ईथेही आलास... अरे वा.. तुझ स्वागत आहे, आणी आल्या आल्या मस्तच रन्ग उधळलेत की, या व्यक्तिचे व्यक्तिमत्व पण रन्गी-बेरन्गी असावे. या आयडी ला मी सतत विनोदाच्या BB वर हसवताना पाहिले आहे, छान करमणुक आहे अरे तु तर आधी पासुनच मायबोलीकराना हसवत आहेस मी पण तुला शामिल बर का. योगी०५०१८१ बापरे ईकडे मायबोलीवर तर BB उघडावा तसा एक ना एक योगी सापडतोच. त्यामुळे सगळ्या योगी लोकानबद्दल बोलण म्हणजे महाघोटाळाच व्हायचा. चला आधी पाठ करा योगम. योगी.. योगीही:.. प्रथमा... किशोर तुझी लिम्बुटीम्बुची प्रतिमा ह. ह. पु. वा. सध्या तुझ्याबद्दल आणी सावनीबद्दल लिहिणे थोडे कठीण आहे पण ईब्लिसाचार्यान्ची प्रेरणा मिळाली तर लिहीनही.
|
Bsk
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:25 am: |
| 
|
हा बीबी फारच अफलातून आहे! बरेच दिवस वाचतीय, पण काही लिहीण्याचे धाडस होत नव्हते! पण Id आणि नावावरून प्रतिमेचा विचार करायची कल्पनाच भारी आहे! माझ्या Id वरून कुणाला काही सुचलं तर मानलं! (इतका अरसिक आणि अर्थहीन id मायबोलीवर माझाच असेल बहुतेक!)
|
ए गोबू... निर्धास्तपणे ये.. तुझ्यासाठी खास बेसनाचे लाडू आणले आहेत. घाबरू नकोस..
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 11, 2007 - 8:21 am: |
| 
|
च्यायला ( नाव) तुझी पोस्ट वाचली की तोंडातुन च्यायला व पाठोपाठ हसु अगदी फ़सफ़सुन बाहेर येत जस की बाटलीतुन सोडा. ( ज्याना सोडा नको त्यानी शॆंपेन घ्या) जयमहाराष्ट्र बाबतीत तुला १०० % अनुमोदन. ए गोबू... निर्धास्तपणे ये.. >>> वाटल्यास ती तुला उकडीचे मोदकसुधा देइल. प्रिन्सेस या बसल्या असतील हातावर हनुवटी टेकवुन वाट पहात काही टपटप आवाज आला की "घोडा आलाSS.. घोडा आलाSSS>>>>> अरे च्यायला त्या प्रिन्सेस चा घोडा आला आणि त्याना घेवुन गेला (राजकुमार रे तुझ्या मनात नसत्या शंका) ह्या प्रिन्सेस ऑफ़ कान्दा वाटतात. (जसे कि आन्टी नं. १ मधे गोविन्दा महाराणी ऑफ़ कान्दा.)
|
Gobu
| |
| Wednesday, April 11, 2007 - 11:30 am: |
| 
|
फ़ुलपाखरु आणि नन्दिनी २९११,
  धन्यवाद!
  बेसनाचे लाडु की धम्मक लाडु? (शाळेत असताना काही चुक केली की मास्तर पाठीत धम्मक लाडु (मार) द्यायचे, अजुनही आठवते!!! ) आता झक्की याच्या बद्दल्: नावावरुन तर ही व्यक्ती जर वेगळा विचार करणारी अतिशय सडेतोड नास्तिक अतिशय बुद्धीमान कलाप्रधान आणि प्रचन्ड वास्तववादी वाटते (आणि हो प्रचन्ड मुडी देखील!!!) ... बस बुवा कसा वाटला माझा अन्दाज
  दिवे घ्या झक्की!!! माझा अन्दाज़ कितपत बरोबर? 
|
Chaffa
| |
| Wednesday, April 11, 2007 - 3:33 pm: |
| 
|
(आणि हो प्रचन्ड मुडी देखील!!!) प्रचंड मुडी???????? गोबु आता मात्र तु मेलास बहुतेक अरे मूडी हा एक ID आहे. आणी फ़ाऽऽर फ़ाऽऽर जुना आहे. काशी: कुणास ठाउक पण हे नाव वाचल्यावत काष्टीसाडी नेसलेली काकुबाई डोळ्यासमोर आली.ती प्रत्यक्ष फ़ोटो पाहीला तरी जातच नाहीये जरा शोधाशोध करा की काही खतरनाक ID आहेत आजुन बाकी जुने ID आठवा! काय रे च्यायला? भाई लाल होशील रे त्यांच्या वाटेला जाशील तर.
|
Princess
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:12 pm: |
| 
|
च्यायला, माझा घोडा आलाय रे कधीच. आता माझा लेक घोडा घोडा खेळतो झकास- प्रिन्सेस ऑफ कांदा... हाहाहाहीहीही-हहपुवा
|
Deshi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 6:33 pm: |
| 
|
नावावरुन तर ही व्यक्ती जर वेगळा विचार करणारी अतिशय सडेतोड नास्तिक अतिशय बुद्धीमान कलाप्रधान आणि प्रचन्ड वास्तववादी वाटते (आणि हो प्रचन्ड मुडी देखील!!!) ... बस बुवा >>>>>>>>> अरे गोबु कोणी तुझे कान बिन धरले होते का झक्की बद्दल सांग म्हणुन. (पुढे बस बुवा असे लिहले म्हणुन) बाकी झक्की हे आस्तीक, भारताच्या प्रेमामुळे भारतीयांवर कंटाळलेले एक मिश्कील व्यक्तीमत्व आहे. त्यांना अमेरिका सोडन होत नाही त्यामुळे ते भारतीयांवर रागात येतात.
|
Deshi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 6:45 pm: |
| 
|
च्यायला : हा उजव्या विचारसरणीचा आहे हे तर सर्वांना माहीती आहे. पण तो आधी तो कमी विचार करुन भावनेच्या भरात लिहीनारा व्य्क्ती वाटला पण आता खुप प्रगती आहे. मिश्कील तर तो आहेच पण त्याही पेशा खोडकर जास्त वाटला. बरेचदा कदाचित डे ड्रिमीग करत असावा. एकदंरीत मस्त व्यक्तीमत्व. नंदिनी : जर मुल करु शकत असतील तर मी का करु नये? या विचाराची वाटली. एकदम बिन्धास्त मुलगी. लिखानावरुन तर कुठेतरी टाका भिडलेला वाटतोय.
|
Nanya
| |
| Wednesday, April 11, 2007 - 6:54 pm: |
| 
|
>>लिखानावरुन तर कुठेतरी टाका भिडलेला वाटतोय.
आयला* हे लिखाणावरुन कसे कळते बुवा?
|
Storvi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:02 pm: |
| 
|
>>. त्यांना अमेरिका सोडन होत नाही त्यामुळे ते भारतीयांवर रागात येतात. >>आता देशी चे लवकरच परदेश गमन होणार बहुतेक 
|
Deshi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 9:51 pm: |
| 
|
नाही हो आम्ही इथच आहोत अजुन तरी. पण जाउ एक दोन वर्षाने.
|
Chyayla
| |
| Thursday, April 12, 2007 - 12:33 am: |
| 
|
च्यायला, माझा घोडा आलाय रे कधीच. आता माझा लेक घोडा घोडा खेळतो प्रिन्सेस व झकास अरे मी तेच म्हणत होतो राजपुत्र (लेक प्रिन्सेस) घोडा खेळायला गेला होता आणी त्या त्याचीच वाट पहात होत्या.. काय पण यार तुम्ही चुकिचा गैरसमज करतात हो.. शो. ना. हो. पण Princes of Kanda .... तुझ्या पोस्ट पाहुन एकच उद्गार "झक्कास" भारताच्या प्रेमामुळे भारतीयांवर कंटाळलेले एक मिश्कील व्यक्तीमत्व आहे. त्यांना अमेरिका सोडन होत नाही त्यामुळे ते भारतीयांवर रागात येतात देशी आपल पण १००% अनुमोदन.. मानल बुवा तुम्हाला. पहिल्याच बॉल वर विकेट घेतली की. भावनेच्या भरात लिहीनारा व्य्क्ती वाटला पण आता खुप प्रगती आहे याचे श्रेय मी समस्त मायबोलिकर व मायबोलीला देतो बाकी तुमच्या अभिप्रायाबद्दल तुम्हालाही धन्स देतो आणी चाफ़्फ़ा लालभाई हे फ़क्त कोणत्याही प्रकारच्या V&C मधेच आढळणारे व ईतर ठिकाणी अतिशय दुर्मिळ अशी व्यक्ति आहे, त्यामुळे ते काही ईकडे येत नाहीत आले तरी, स्वागतच आहे. BSK या आयडी चा विविध ढन्गी उच्चारानमधे केवढा आशय आहे हो जसे.. बसके: यान्चे नाक थोडेसे बसके असावे, त्या शिनेमामधली भाग्यश्रीचे नाक तर भयन्कर होते त्यामुळे क्यामेरामन तीचा सरळ समोरचा चेहर्याचे चित्रिकरण टाळायचा व चेहर्याचा बाजुचा भाग जास्त चित्रित करायचा. बसका: बस का? आम्हीच भेटलो का? ईथे येउनच कोणी रसिकपणा दाखवला आहे? बसकी: आता आलीच आहेस तर बस की. थोड्या गप्पागोष्टी करा की.. तुमचा हिमालय कसा आहे हो आता? (आठवत का?)
|
Zakasrao
| |
| Thursday, April 12, 2007 - 4:35 am: |
| 
|
बरेचदा कदाचित डे ड्रिमीग करत असावा>>>>>. अगदी १०० % बरोबर. तो रात्री भुतासारखा काम करतो आणि दिवसा झोपतो. माझा घोडा आलाय रे कधीच. आता माझा लेक घोडा घोडा खेळतो>>>> अरे रे बिचा-या घोड्याला नव-याला किती काम ना. BSK बसका यार?
|
Bsk
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:50 am: |
| 
|
बापरे! BSK वरून कुणाला बसका,बसकी,बसके आठवेल अस वाटलं नव्हतं ह! माझ पण नाक भयंकर आहे रे च्यायला.. आणि हिमालय पण नाहीय कुणी (thank god!! कसला बोर आहे तो!! )
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|