Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

वसंतगड आणि जंगली जयगड ...

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » वसंतगड आणि जंगली जयगड « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 12, 200720 04-12-07  9:34 am

Cool
Thursday, April 12, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जी. एस. छान लिहिलेस, लिहित रहा..

खुपच सुंदर झाला हा ट्रेक. 'घनदाट' जंगल हे या ट्रेक चे वैशिष्ठ्य. प्रत्येक बाण्याच्या खुणेपाशी नजर पुढच्या खुणेचा शोध घेण्यासाठी भिरभिरत होती आणि त्याचवेळी मन त्या अनामिक गिरीप्रेमींना धन्यवाद देत होते. आणि GS ने वर्णिलेल्या 'त्या' माचीवरुन दिसणारे दृश्य तर केवळ अप्रतीम, खाली दिसणारे गच्च जंगल, त्यामधुन धावणारी नागमोडी घाटातली वाट, या सगळ्यांचे शब्दात वर्णन करणे अशक्य. इतर ट्रेक मधे कुठेतरी रस्त्याने मानवी अस्तित्वाच्या काही तरी खुणा जाणवत राहतात पण या जंगलात शिरल्यानंतर अशा काहीही खुणा दिसत नव्हत्या. काही क्षण स्तब्ध बसल्यानंतर पक्ष्यांच्या विविध आवाज मन प्रसन्न करुन टाकते. स्वतः चे अस्तित्व विसरायला लावण्याचे कसब या परिसरात नक्कीच आहे.

वसंतगडावरचे पक्षीदर्शन, चाफळच्या राममंदीरातील प्रसन्न वातावरण, तिकडे मनसोक्त अनुभवलेल्या पक्ष्यांच्या लीला, आणि रात्रीच्या जेवणातला 'शेंगदाण्याचा महाद्या' , किती किती लिहावे काय काय आठवावे. हे सगळे सगळे दिर्घकाळ स्मरणात राहणार यात शंका नाही..

जयगडाच्या संदर्भातील एक लिन्क

http://www.wikimapia.org/#y=17454951&x=73698939&z=17&l=0&m=a&v=2

उजविकडे दुरवर पसरलेले जंगल सगळे काही सांगुन जाईल

.. सुभाष(कुल)


Dineshvs
Thursday, April 12, 2007 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS1 एकवेळ प्रेम म्हण, पण सौजन्य म्हणुन नक्कीच नाही लिहिले. तुझ्या लेखनातुन अगदी आताचे सदर्भ मिळतात ते महत्वाचे. आज नेमक्या काय सोयी आहेत, गाडी मिळेल का, पाणी मिळेल का हे सगळे कळते.
पण आपल्याकडे असलेल्या वास्तु आणि सुविधा नष्ट होतात. आधी पाहिलेले नंतरच्या भेटीत दिसत नाही.
आता या दिशेने काहि प्रयत्न होताहेत. सगळ्याच वास्तु मूळ रुपात पाहता आल्या तर किती छान होईल ना ?


Robeenhood
Thursday, April 12, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहितो पण काय लिहायचे ते तरी सांगा ना!
>>>>त्यापेक्षा खरे तर तू काय लिहायचे ते लिहूनच द्याना असे आवाहन करायला पाहिजे होते!!

आमच्याकडे एक म्हण आहे

पाटील बायको बघा, नसेल मिळत तर तुम्हीच व्हा!!


Robeenhood
Thursday, April 12, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्रीच्या जेवणातला 'शेंगदाण्याचा महाद्या' >>>>
याला दाण्यांची आमटी असे शिष्ट आणि भद्र नाव आहे ना
ए. स. पे. प्र...


Indradhanushya
Friday, April 13, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS सुंदर वर्णन, पन्नासाव्या गडासाठी अभिनंदन!!!
प्रत्येक week end ला केलेल्या ट्रेकचे वर्णन वाचुन पुणेकरांचा हेवा वाटतो... :-)
गिरी सध्या आहेस कुठे?
आरती, फ़दी, कूल तुम्हालाही शुभेच्छा :-)


Dhumketu
Friday, April 13, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=34&;post=938612#POST938612 जीपीएस (ग्प्स) वापरून छान नकाशे बनवले आहेत.


Cool
Monday, April 16, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयगडाहुन दिसणारी घाटतली वाट,... मोबाईल च्या साह्याने
ghatatali vaat

Gs1
Monday, April 16, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकीचे पण कुठेतरी अपलोड कर रे जमल तर.

Cool
Monday, April 16, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


काही
आठवणी

.. .. ..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions