Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through April 04, 2007 « Previous Next »

Divya
Thursday, March 22, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Please थोड अजुन detail मधे सांगाल का काय story आहे.
दिनेश गाणी तर सगळीच छान आहेत या चित्रपटातली.


Sashal
Thursday, March 22, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला 'घर' बघून बरेच दिवस झाले त्यामुळे सगळं detailed कथानक नीट सांगू शकणार नाहि पण थोडक्यात सांगायचं तर,( white tag मध्ये लिहितेय ..

Spoiler warning ..

रेखा, विनोद मेहरा ह्यांचं लग्न झाल्यावर एक दिवस रात्री movie हून परत येत असताना रेखा वर rape होतो आणि मग त्यानंतर या घटनेचा त्यांच्या relationship वर कसा परिणाम होतो ते दाखवलंय ..


Sashal
Thursday, March 22, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ, traffic signal चांगलाच आहे .. मी आताच black friday बघितला आणि त्यानंतर हा .. दोन्ही movies बघून ते आवडले पण त्याहीपेक्षा मुंबईबद्दल खूप जास्त वाईट वाटलं .. मुंबईची परिस्थिती कधी बदलणार?

Divya
Thursday, March 22, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Oh... Thanks Sashal for prompt reply.
मला वाटल त्यपेक्षा फ़ारच वेगळी आहे कि story. Again thanks .

Zakki
Thursday, March 22, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आवारा, चित्रलेखा, जागते रहो, अनाडी, श्री ४२०, लाखाची गोष्ट, ब्रम्हचारी (मराठी), संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, रामजोशी, अवघाचि संसार, पेडगावचे शहाणे, असे सिनेमे आवडतात. नव्या सिनेमांमधे, अगदी अलीकडचे म्हणजे, संगम, पडोसन, हम दोनो, राम और श्याम, मुघले आझम, साहिब, बीबी और गुलाम, तीसरी कसम हे.

Arch
Thursday, March 22, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर मधूर भांडारकरचे सगळेच सिनेमा आवडले.
१. चांदनी बार, २. Page 3 ३. Corporate ४. Traffic Signal
विषयही छान असतात आणि हाताळणीही छान आहे.

निःशब्द चांगला वाटला. अस होण्याची शक्यता असू शकते. पण अमिताभला त्या role मध्ये पाहून कससच वाटल. in fact घाणच वाटली. पण अमिताभ मला black मध्येपण एवढा खास वाटला नाही. हल्ली अमिताभ म्हटल की त्याला awards दिलीच पाहिजेत असा नियम आहे की काय कोण जाणे!

झक्की तुम्हा हे मधूर भांडारकरचे movies जरूर पहा. मी खात्री देते की तुम्हाला ते आवडतील.


Farend
Thursday, March 22, 2007 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, अगदी अलीकडचे 'संगम, पडोसन...'? मागच्या ४० वर्षांत एकही आवडला नाही?

Deepanjali
Friday, March 23, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च ,
मधुर भांडारकर चा " सत्ता " कसा विसरलीस ?


Bee
Friday, March 23, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'घर' सिनेमा मी अलिकडेच बघितला. मला त्याची VCD/DVD अगदी सहज मिळाली. त्यातील गाणी छान आहे. 'आपकी आखोने कुछ महेके हुयेसे ख्वाब है' हे आणखी एक गाणे त्यातलेच आहे.

कथा अशी आहे की, विनोद मेहरा आणि रेखाचे लग्न झालेले असते. एके दिवशी रात्री सिनेमा बघून ही दोघे परत येत असतात. वाटेत त्यांना गुंड भेटतात आणि रेखाला गाडीत कोंबून नेतात. तिचा विनयभंग करतात. विनोद मेहराला जखमी करुन वाटतेच सोडून देतात. परत दोघेही बरे होतात. पण रेखाच्या मनावर पुरुष अत्याचाराचा तीव्र परिणाम होऊन जातो आणि ती विनोद मेहरासोबत कसलेच वैवाहीक संबंध ठेवत नाही. एक 'घर' उध्वस्त होते. पण शेवटी मात्र चांगले मित्र, Doctors ह्यांच्यामुळे रेखा परत पुर्वीच्या स्थितित येते आणि पुन्हा एकदा 'घराला' घरपण येते.


Giriraj
Friday, March 23, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनयभंग?? अरे बलात्कार करतात! मुळात वडिलांच्या विरोधाला न जुमानता विनोद मेहराने लग्न केलेले असते.. त्यमुळे संकटात घरचाही आधार नाही. वडिलांचा angle खूप अर्थ देतो या कथानकाला. विरोध तत्विक असला तरी ते मुलाच्या खंबीरपणाला साथ देतात.
इतका नाजूक विषय गुलजारने कुठेही भडकपणा येऊ न देता तितक्याच सहजतेने आणि संवेदनशिलतेने हाताळला आहे.
(जरा DJ मूड ) यातल्या रेखाच्या साड्या आणि एकूणच रेखा खूप आवडते. संकटानंतर तिने साकारलेली भूमिका आपल्यालाही अस्वस्थ बनवते. विनोद मेहराची तगमग,चिडचिड सगळंच आपल्याला अस्वस्थ बनवतं.

गाण्यांबद्दल तर काही बोलायलाच नको. RD ,गुलज़ार सुवर्णयुअगातला हा चित्रपट आहे. 'तेरे बिना जिया जाये ना' या गाण्यात शब्दांची जागा बदलून अर्थाच बदलून टाकायची गुलज़ारची हातोटी चकितही करते आणि तितकाच आनंदही देते. 'आजकल पांव जमीं पर नही पडते मेरे'.. हेही माझं ख्हुप आवडतं गीत. मुळात गुलज़ार गीत किंवा गाणी लोहीतच नाही.. कविताच असतात सगळ्या! प्रेमात आणि त्यनंतरच्या आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन वावरणार्‍या मुलीचं हे गीत.. आपल्याला विचारते.. 'बोलो देखा है कभि तुमने मुझे उडते हुए'..

ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी ज़रूर पहावा असा हा चित्रपट. कथानकासाठी बघा,दिग्दर्शनासाठी बघा,अभिनयासाठी पहा की गाण्यांसाठी... सारखाच अप्रतिम!
मि प्रत्येक वेळी बघतो तेव्हा गुलज़ारसाठीच बघतो!


Bee
Friday, March 23, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनयभंग म्हणजेच बलाक्तार असे मला तरी वाटते. बलाक्तार म्हणताना थोडा बिभत्सपणा वाटतो म्हणून मुद्दाम तो शब्द लिहिताना टाळला :-)

गुलजारचा विषय निघाला म्हणून त्यांच्या 'कोशिश' ह्या चित्रपटाची आठवण झाली. अलिकडेच मी हा चित्रपट पाहिला. गाणी काही खास नाही पण चित्रपट छान आहे. टोटली वेगळी कथा आहे. संजीव कुमार आणि जया भादुरी दोघेही बहिरे आणि मुके असतात. पण ही दोघे आपला संसार कसा निभावतात ह्याचे कमालीचे हृदयद्रावक चित्रण गुलजार साहेबांनी केलेले आहे. काही काही प्रसंग तर बघवत नाही इतके विदारक दाखविले आहे. म्हणजे घरात असरानी चोर म्हणून शिरतो. मुलगा आवाजने झोपेतुन उठतो आणि रडायला लागतो. तर चोर त्याला खाली ढकलून देतो. बाहेर मुसळधार पाऊस सुरु असतो. ह्या दोघांनाही काहीच ऐकायला येत नाही. शेवटी चोर चोरी करुन फ़रार तर होतोच पण मुलगा उंबरठा ओलांडून खाली कोसळून पडतो. त्याला दुधाची बाटली दिसते नि तो ती घ्यायला रांगत जातो नि घरसतो. दुसर्‍या दिवशी तो पाण्यावर वहात असतो.. हे चित्रण इतके हृदयद्रावक आहे की मी एक डोळा उघडून पहाण्याचा प्रयास केला पण तरीही मला ते बघवले गेले नाही. ह्या प्रसंगाने दोघेही जण व्यस्थित होतात. परत त्यांना मुलगा होतो. तो बहिरा आणि मुका आहे अशी त्यांची समजूत होते. एक खुळखुळा ते विकत आणतात. तो वाजवतात पण मुलगा आवाजाला प्रतिसाद देत नाही. नंतर त्यांच्या लक्षात येते की खुळखुळ्यात रेती नाही.


Zakki
Friday, March 23, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

farend, मागील चाळीस वर्षात फार थोडे सिनेमे बघीतले. श्वास, Mr. & Mrs. Iyer , विवाह, डोर, सातच्या आत घरात, नि तो कुठलासा, ज्यात सगळ्या मुलीच आहेत, नि पोलीस इन्स्पेक्टर बाईच खून करते, तो, वगैरे. चांगले आहेत! आवडले नाहीत असे नाहि. पण तितकेच. सिनेमा बघणे (इंग्रजी असो, हिंदी असो वा मराठी असो) हे सर्वात शेवटचे काम! अगदी इतर काही शक्यच नसेल तर बघायचा झाले!

Robeenhood
Saturday, March 24, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना, चांगले सिनेमे पाहण्याच्या सत्कृत्यात वेळ घालवला तर इथे येऊन 'पिंका' कोण टाकील?

Saavat
Saturday, March 24, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


भूतंकाळात कशांला शिरतों आहेंस! अरे शिंच्या! उज्ज्वल भविष्यांकडें बघ म्हणतों मीं.. कसें!! दिवा...


Deshi
Tuesday, March 27, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनयभंग म्हणजेच बलाक्तार असे मला तरी वाटते>>>>
बी राव विनयभंग म्हणजे बलात्कार नाही.
सहजपणे एखाद्या व्यक्तीच्या पार्श्वभागावर जर टपली हाणली व ती त्या व्यक्ती ला आवडली नाही तर त्याला विनयभंग केला म्हणतात. ( ईथे उदा दाखल पार्श्वभाग लिहिले दुसर्याही जागा असु शकतात).


Zakasrao
Saturday, March 31, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार्ली चा Great detector पाहीला.
दुसर महायुद्ध हिटलर आणि त्याचा ज्युद्वेष ह्याची भरपुर खिल्ली उडवली आहे.
ह्यात चार्ली चाप्लीन ने दोन भुमिका केल्या आहेत. एक हिटलर आणि दुसरी एक ज्यु न्हावी. अर्थातच त्याने कुठेही तसा उल्लेख केला नाही कि हिटलर असा पण जो सैन्य प्रमुख आहे तो तसाच दाखवला आहे. त्याचे सैन्य, त्याचा भाषण करताना आवेश त्याच्या सैन्याच चिन्ह ह्यातुन आपल्याला कळतच की त्याला काय म्हणायच आहे.
एक जो ज्यु आहे तो योगायोगाने हिटलर सारखाच दिसतोय. त्याने पहिल्या महायुद्धामधे त्याने त्याच्यापरिने सैनिकाचे काम केले आहे. नंतर एक केश कर्तनालय चालवतोय.
दुसरा सैन्यप्रमुख.
अगदी मस्ट सी पिक्चर आहे.
त्यात शेवटचे त्याने केलेले भाषण तर उच्च.
त्याचा अभिनय तर एक नं.
हा पिक्चर मी CD आणून पाहिला आहे. असच एका गिफ़्टच्या दुकानात गेलो तिथे काही लहान मुलांसाठी CD दिसल्या त्यात चार्लीच्या होत्या. फ़क्त ४२ रु. मधे ही CD मिळाली. original आणि आपल्या आवडिची अशी CD इतक्या कमी किमतीत मिळण्याचा आनंद काहि वेगळाच. तुम्हीही शोधा आणि मिळवा. त्याच्या ब-याच CD ४२ रु. मिळतात.


Maitreyee
Saturday, March 31, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नहले पे दहला : संजय दत्त, सैफ़, बिपाशा.. आणि कोण ती युवराज ची gf .. वाटलं काहीतरी बरा निदान tp असेल! पण छे! बहुधा जुना कुठलातरी रखडलेला चित्रपट असणार! अत्यन्त भिकार, टुकार इ.इ. महा रटाळ 'इनोदि' चित्रपट! मुळीच याच्या वाटेला जाऊ नका

Bsk
Saturday, March 31, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! झकासराव.. तुम्ही फारच छान माहीती सांगितली! ४२ रु. ला सीडी?? कुठे मिळाली? आणि मला वाटतं त्या पिक्चरचं नाव, Great Dictator आहे..मी फक्त ते भाषण पाहीलं युट्युबवर.. फार सही आहे.. योगायोगानी मी परवाच चार्ली चॅपलीनचे आत्मचरीत्र वाचलं.. त्याचे सगळे पिक्चर्स मिळाले(आणि ते पण ४२ रु.ला..)तर फारच छान! दुकानाचं नाव कळवा..plz..

Zakasrao
Monday, April 02, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bsk नाव लिहिताना स्लिप ऒफ़ कीबोर्ड झाल सॊरी.


Sas
Wednesday, April 04, 2007 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते लंडन पाहीला ठिक आहे, नाही पाहिला तरि चालेल.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators