|
Sakhi_d
| |
| Thursday, March 15, 2007 - 7:11 am: |
| 
|
उल्टिमा, धन्स.... प्रेमळ आणि जिवाभावाची मैत्रिण म्हंटल्याबद्दल. पण तुझ्या ID वरुन काहीच डोळ्यासमोर येत नाही.....
|
Suvikask
| |
| Thursday, March 15, 2007 - 7:56 am: |
| 
|
ऊल्टिमा माझ्या डोळ्यासमोर येते... उल्टी करणारी मा... बाकी लाजो म्हणजे.. एक बंजारन... हातात कोपरपर्यंत हस्तीदन्ताच्या बांगड्या.. कानात, नाकात, गळ्यात मोठ्मोठे कवड्यांचे दागिने... भला मोठा चमचमणारा घागरा.. अशी व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर येते.. चायला, चाफ़ा एकाच जातकुळातले वाटतात.. शक्य तेवढी, शक्य तेवढ्यांची खेचणे.. रॉबिन्हूड, झकासराव, बी काहितरी पिल्लु सोडुन धुम ठोकणारे... आज्जूका, सखी, psg, supermom चुकले की लगलीच कान पकडनार्या.. शेषनाग काहीतरी गूढ आहे अस भासवणारे बाकिचे नंतर...
|
Ultima
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:12 am: |
| 
|
}आरे आरे... हे उल्टिमा काय आहे.."हा आय डी बहुदा उल्तिमते चा शॉर्ट फ़ॉर्म म्हणुन घेतला असावा असे मला वाटते." रुनि एकदम बरोबर ओळखलस. च्यायला मला आता शिर्षासन करुन जाम कंटाळा अलाय.....आणि मा व्ह्यायला अजुन खुSSप वर्ष आहेत......सो प्लिज मला अल्टिमा च ठेवा. हे शेंगा प्रकरण काय आहे....काही मदत हवीये का....शेंगा ओळ्खायला?? तसही अत्ता माझा लाजो ला म्हशी आवरायला मदत करायचा विचार आहे... तुही ये.... शी सुवी उलटी काय???....करु का....
|
Sakhi_d
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:21 am: |
| 
|
>>आज्जूका, सखी, psg, supermom चुकले की लगलीच कान पकडनार्या.. >> कोणाचे?? .... (विचारमग्न चेहरा...)
|
Mahesh
| |
| Thursday, March 15, 2007 - 8:36 am: |
| 
|
ओ आमचा पण हात ( ID ) बघा ना (रस्त्यावरच्या ज्योतिषीबाबा समोर दोन पायावर बसून हात पुढे करण्याच्या स्टाईलमधे) 
|
Sheshhnag
| |
| Thursday, March 15, 2007 - 10:47 am: |
| 
|
तुमच्या कपाळावर १० चा आकडा आहे का हो... मायबोलिवर मुषक, उन्दीरराज, बेडुकराव, मन्डुक असले आयडी दीसत नाहीत कदाचित या सगळ्याना हा शेषनागच जबाबदार असावा... क्या बात हैं| ह. ह. पु. वा.
|
Sheshhnag
| |
| Thursday, March 15, 2007 - 11:17 am: |
| 
|
शेषनाग हे टोपणनाव खूप वर्षांपासून लेखन करण्यासाठी वापरतो आहे. आमच्या ऑफिसमध्ये दुसर्या काही सहकारी माझ्यावर कायम खुन्नस ठेवून वागायचे. एक दिवस एकदा त्या विभागातून आलेल्या पेपर्समध्ये खूप चुका होत्या, त्या मी दुरूस्त करून पेपर्स परत पाठवले. ते पाहून त्या सहकार्याने चिडून त्या पेपरवर Black cobra आणि पुढे माझे नाव लिहून पेपर परत माझ्याकडे पाठवला. ते नाव वाचून माझी ह. ह. पु. वा. झाली. आणि त्याक्षणी ते नाव टोपणनाव म्हणून मी धारण केले.
|
Nkashi
| |
| Thursday, March 15, 2007 - 1:22 pm: |
| 
|
हो, मला पण अज्जुका "कान पकडनार्या पैकी वाटते..." staright forword, logical ठामपणे स्वत्: ची मते मांडणारी (कदाचित मेष राशी ची) च्यायला, चाफ़्फ़ा एका category तले सगळ्याना टपला मारत फ़िरणारे, उचापती... (संधी मिळाली तर यांना एखादी टपली मारेन म्हणते... ) supermom म्हणजे टिव्हीतली आई, सगळ्या आघाड्या एकदम सांभाळणारी बाकी पुन्हा केव्हातरी...
|
Chyayla
| |
| Thursday, March 15, 2007 - 11:59 pm: |
| 
|
अरे हो अल्टिमा च उल्टिमा झाल खर म्हणजे तो माझा वेन्धळेपणा होता (प्रामाणिकपणे) पण जेन्व्हा रुनीची पोस्ट वाचली तेन्व्हा घोटाळा लक्षात आला म्हटल चालु द्या... हा सगळा माझ्या लहान बहिणीचा प्रभाव ती ना लहान असताना अभ्यासात हुषारच होती फ़क्त तीच इन्गजी स्पेलिन्गचे जबरदस्त उच्चार सोडुन. Mother ला "मॉथर" तर Ultimately ला "उल्टीमाटली" असे वाचुन आम्हाला अर्थ विचारुन बुचकाळ्यात टाकायची व शेवटी खुप विचार केल्यावर कप्पाळावर हात मारायची पाळी यायची. आज ती खुप दुर भारतात आहे, पण या किस्स्यामुळे तिची खुप खुप आठवण आली. दुसरे म्हणजे हा आयडी वाचुन मनात एक गाण आपसुकच आल "हे आदीमा हे अन्तीमा..." त्याच धर्तीवर... हे अल्टिमा हे उल्टिमा तु एकच आहेस, माझ्या कडुन काही अनवधानाने प्रमाद घडल्यास माफ़ कर. तसेही मी त्या पोस्ट मधे लिहिले होते की विकेट घेणार नाही पण अदी म्हणतो त्याप्रमाणे ती चुकुन आधीच घेतल्या गेली . तसेच अजुन एक मित्रासोबत Nissan च्या Showroom मधे कार घेण्यासाठी गेलो होतो तेन्व्हा Ultima घ्यावी की Maxima घ्यावी हा प्रश्न पडला होता तेन्व्हा ही हे गाण त्याला ऐकवले होते..." ही अल्टिमा ही म्याक्जिमा..." म्हणुन. असो तुज्या आयडी नी बरीच धमाल केली. तर आता शेन्गा निवडन्याबद्दल हो रे बा अदी आणी झकासराव चवळीच्याच शेन्गा निवडण्याची खबरदारी घेइल. लाजो शेन्गा निवडणे आणी तेही अमेरिकेत.. कठीण काम आहे त्यापेक्षा आपल्या गावरान शेन्गा (देशी) चान्गल्या त्यासाठी भारतात जाउनच करावे लागणार, निवडुन झाल्या की कळवतो, तो पर्यन्त तु म्हशीन्ची नोन्दणी चालु ठेव. यात मायबोलीवरील बायकांचा समावेश करायचा का? (मागे वळून देखील न पाहता दुसर्या बीबी वर धूम ठोकतो!) रॉबीनहुडचे मार खायचे लक्षण दीसताहेत धुम ठोकली म्हणुन वाचलास पुढे मागे शिन्गावर घेतले जाउ शकता तेन्व्हा याची खबरदारी ठेवा....
|
Chyayla
| |
| Friday, March 16, 2007 - 12:32 am: |
| 
|
ओ आमचा पण हात ( ID ) बघा ना (रस्त्यावरच्या ज्योतिषीबाबा समोर दोन पायावर बसून हात पुढे करण्याच्या स्टाईलमधे) एका BB चे दहा पोस्ट पडतील.. (भला मोठा फ़ेटा बान्धुन.. डोळ्यावर जाडसर भिन्ग लावुन थोड खाकरुन आणी हातात हात धरुन) महेष ही व्यक्ति थोडीशी भारदस्त (जाडसर म्हणणे असभ्य वाटत म्हणुन), हुषार, थट्टा मस्करी करणारी, आवाजात जरब व Glamourous गोष्टीन्ची जसे शिनेमान्ची आवड असणारी अशी वाटते. आमच्या शाळेत एकदा Dog Show सुरु होता एका कुत्र्याला विचारले होते की कोणता विद्यार्थी सगळ्यात जास्त सिनेमे पहातो त्यानी माझ्या ओळखीच्या महेशला पकडले आणी सगळी शाळा हसत असताना त्यानी तिथेच घराकडे धुम ठोकली होती. एक महेश माझ्या पहाण्यात आला तो अगदी सिधा, सादा विनम्र असा होता. च्यायला, चाफ़्फ़ा एका category तले सगळ्याना टपला मारत फ़िरणारे, उचापती... (संधी मिळाली तर यांना एखादी टपली मारेन म्हणते...) निलाम्बरी कराव तस भराव ह्याची जाणीव आहे त्यामुळे माझी टपल्या खायची पुर्ण तयारी आहे supermom म्हणजे टिव्हीतली आई, सगळ्या आघाड्या एकदम सांभाळणारी पुर्ण सहमत सिरियल मधल्या तुलसीची आठवण येते ना? यान्च लिखाण प्रगल्भ, विचार ह्रुदयाला भिडणारे, मार्गदर्शक व स्पष्ट असतात असेच छान छान लिहित रहा... याना टीव्हीवरुन शिनेमातल्या मा मधे ठेवायला हरकत नाही जसे रीमा लागु आणी ती कोण ती नेहमी अमिताभची मा व्हायची?
|
Supermom
| |
| Friday, March 16, 2007 - 2:16 am: |
| 
|
सुचेता, मी कोणाचे कान पकडत नाही ग बाई. माझे स्वत चेच पकडते. च्यायला, स्तुतीबद्दल धन्यवाद. अमिताभची मा म्हणजे कोण? निरुपा रॉय की काय? तिला आम्ही केअरलेस मॉम म्हणतो. तिची मुलं लहानपणी कायम बिछडत असतात सिनेमात. या दोन्ही मॉम मी होऊ शकणार नाही. माझं वय इतकं जास्त नाही हो. अन ही तुलसी कोण? कोणती सिरियल? छे, काही खरं नाही. भारतात जाऊन सार्या मालिका बघायलाच हव्यात आता. कोणी मालिकांचा उल्लेख केला की काही प्रकाश पडत नाही डोक्यात..
|
Lajo
| |
| Friday, March 16, 2007 - 2:49 am: |
| 
|
माझ्या नावा वरून इतक्या रंगीबेरंगी प्रतिमा दिसतील अस वाटलं नव्हत. पण खर सांगू का यातले एकही वर्णन काडीभर सुद्धा जुळत नाही हो... त्यातल्या त्यात च्यायला म्हणतात तशी मी 'बेशरम नाही', पण अगदी लाजाळूचं झाड ही नाही. पण वाचायला मजा येतेय. तेव्हा चालु द्यात... च्यायला, अहो म्हशींची नोंदणी सुरू केली आहे, पण अजुन यादी काही खूप पुढे गेली नाहिये. थोडे कन्व्हासिंग आवश्यक आहे. तेव्हा बसल्या बसल्या तेव्हढ काम करा की प्लीज. अल्टिमा तु पण ये गं जरा मदतीला... रॉबीनहूड, म्हशींशी मस्ती महागात पडेल हां तेव्हा बचके रहेना...
|
Ultima
| |
| Friday, March 16, 2007 - 6:49 am: |
| 
|
होहो मी सुपरमॉम शी एकदम सहमत आहे. निरुपा रॉय ची मुलं बहुतेक सिनेमात बिघडलेली असतात. आणि अगदी शेवटी सिनेमा संपताना किंवा हिरॉईन भेट्ली की अचानक सुधरु लागतात. च्यायला हो ना...लहानपणी ही एक सही मजा असते. आम्ही पण असच नेचर आणि फ़्युचर चे नटुरे आणि फ़ुटुरे केलं होतं. इतकी धमाल आली होती. रॉबिन खरच का बरं तु म्हशींच्या मागे लागतोयस? ओ आमचा पण हात ( ईड ) बघा ना (रस्त्यावरच्या ज्योतिषीबाबा समोर दोन पायावर बसून हात पुढे करण्याच्या स्टाईलमधे) ........... पोझ आठवुनच ह. ह. पु. वा.
|
Ultima, तुमचा मेसेज इथुन विनोद च्या बी बी वर हलवला आहे. कृपया तुमचे मेसेज योग्य त्या बी बी वर टाकावेत हि विनंती.
|
Supermom
| |
| Friday, March 16, 2007 - 2:05 pm: |
| 
|
अल्टिमा, मी 'बिघडतात' नाही, 'बिछडतात' म्हटले ग. म्हणजे 'ताटातूट' म्हणायचं होतं मला.
|
Deshi
| |
| Friday, March 16, 2007 - 9:03 pm: |
| 
|
देशीला २१ मोदक. देशी तुझ नाव राया आहे का? नाय रे देशीच आहे. बाकी त्वा नाव मात्र चांगले घेतले झक्कासराव. एक्दम मराठी पिक्चर मधल्या कुलदिप पवार सारख. ~ड
|
Adi787
| |
| Friday, March 16, 2007 - 10:36 pm: |
| 
|
रॉबीनहूड, म्हशींशी मस्ती महागात पडेल हां तेव्हा बचके रहेना... >>> रॉबिन खरच का बरं तु म्हशींच्या मागे लागतोयस? >>>> रॉबीनहुड, वाह.. तुझी मोहीम फत्ते झालेली दिसतेय..
त.सु. आता मी धूम ठोकतो.... happy weekend.. प्रिय मायबोलीकर's
|
Suvikask
| |
| Friday, March 30, 2007 - 7:55 am: |
| 
|
अरे वा!!! संपल्या का सग़ळ्यांच्या प्रतिमा ऊजळुन?? बरेच मायबोलीकर राहिलेत अजुन.. त्यांच्या प्रतिमा जाणुन घ्यायचे... चला लवकर लागा कामाला...
|
तो हमारे बारे मे आप सबका क्या खयाल है ?? 
|
Disha013
| |
| Friday, March 30, 2007 - 6:55 pm: |
| 
|
टि.बि.,नावरुनच कळतयं, भरपुर फ़ावला वेळ असणार तुमच्याकडे. नावाला जागणारे असालच. झक्कीकाकांना विसरुन कसे चालेल? वादविवाद स्पर्धेत पहिले येतील ते. "अरे ला का रे" करणारे व्यक्तीमत्त्व! पण भारी मिश्किल! यांच्या प्रत्येक posts वाचताना मी खुदुखुदू हसत असते. राॅबिनहुड म्हटले की नेम धरुन उभा असलेला धनुर्धारी दिसतो.आणि समोर झकीकाका उभे दिसतात.पण एक कार्यमग्न व्यक्तिमत्व असणार. चायला--उनाडक्या करणारा मुलगा येतो समोर. मात्र हॅप्पी गो लकी,चळवळ्या असणार. posts मात्र सखोल असतात हं रोहित आणि राहुल आनि गौरव हे मला नहमी ' mamma's boy ' categary तील वाटतात. झकास्राव्--बाकीच्याना वाटले तेच. झुपकेदार मिशी,धोतर, सदरा डोक्याला फ़ेटा आणि फ़टफ़टीवर फ़िरणारे गावचे पाटील. लोपमुद्रा--छाप पाडणारे व्यक्तीमत्व आणि मानी असणार. मिलिन्द्--मध्यम्वयीन संसारी ग्रुहस्थ. पूनम्--या नावाच्या मुली सुन्दरच भेटल्यात मला. सगळ्यांनी दिवे घ्या हं!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|