|
Tawaal
| |
| Friday, March 09, 2007 - 7:44 am: |
| 
|
(इथे कुणाला दुखवण्याचा उद्देष नाही. just एक गंम्मत...) हे बरं आहे, म्हणजे नावं ठेवायची ती ठेवायची आणि मग जरा गम्मत केली म्हणायचे. फॉर युवर काईंड इन्फोर्मेशन, जगातल्या सर्व यशस्वी व्यक्ती या ५ फुट ४ ईंचापेक्षा कमीच होत्या व (मी धरुन) आहेत. आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे समजलात काय?
|
वामन नाव ऐकून काय वाटते? नजरेसमोर एक गबाळा शेंबडा मुलगा उभा राहातो. मळलेली चड्डी आणि नाडी बाहेर लोंबत आहे. नाडीचे टोक तोंडात धरुन बावळटसारखे इकडे तिकडे बघणे.
|
Princess
| |
| Friday, March 09, 2007 - 2:58 pm: |
| 
|
अय्या काय सॉलिड मजा चाललीय इथे. कितीतरी वेळ एकटीच हसले. लिहित राहा. खुप मज्जा येतेय एकेकाचे अंदाज वाचताना.
|
Chaffa
| |
| Friday, March 09, 2007 - 6:27 pm: |
| 
|
आयला, बरेच दिवस नव्हतो.!! एकंदरीत मस्त विषय निवडलाय BB साठी फ़ुल टू धम्माल चाललेय. हा BB उघडणार्या व्यक्तीला हजारो दंडवत.
|
Bee
| |
| Saturday, March 10, 2007 - 3:44 am: |
| 
|
चाफ़्फ़्या आधी एक पाटी टाकून ये नमून्याच्या बीबीवर
|
Sakhi_d
| |
| Monday, March 12, 2007 - 11:02 am: |
| 
|
मस्तच BB चालु केलाय....
|
अहो चाफ़्फ़ा, दन्डवत घालण्याची गरज नाही. एक दिवस सहज मनात विचार आला की एखादे नाव ऐकून जी प्रतीमा डोळ्यांसमोर उभी राहते आणि बरयाच वेळेला पूर्णपणे भिन्न व्यक्ती प्रत्यक्ष समोर उभी राहते. हा एक असा अनुभव जो जवळपास प्रत्येकाला येतोच. मग विचार केला की जसे आपल्याला वाटते तसे मायबोलीकरांना काय वाटत असेल? म्हणून हा छोटास प्रयत्न. हा माझा पहिला आहे. आणि सर्व मायबोलीकरांनी दिलेला इतका छान प्रतीसाद पाहून, मला अतिशय आनन्द झाला. सर्वा मायबोलीकरांचे आणि मायबोली अडमीन चे मनापासून आभार. ज़यंत दि. कुलकर्णी
|
प्रिन्सेस हे नाव वाचून या युवराजला त्याची युवराज्ञी भेटल्यासारखं वाटतं 
|
Disha013
| |
| Monday, March 12, 2007 - 10:44 pm: |
| 
|
दिनेश नावावरुन माझी वेगळी समजुत होती. पण येथील दिनेशदा अगदी वेगळे. post वरुन्न ते अग्दी प्रेमळ, समजुतदार आहेत असे समजते. नंदिनी तर सदा घाईघाईत येते नी जाते,असे वाटते.कल्पनाविश्वात रमणारी. एकुण,चुळ्बुळी असनार. सुपरमाॅम नावावरुन एक आधुनिक पण प्रेमळ आणि दोन हाताला दोन बछडी बोट धरुन उभि असलेली असे चित्र उभे रहाते माझ्यासमोर. मनुस्विनी --- एक खटपटी मुलगी असणार. अतिउस्ताही असणार. चिनु -- बारिक चणीची मुलगी येते समोर. मूडी-सगळ्यांशी पटापट मैत्री करणारी मूडी. केव्हा येतेय ती परत? आता एवढेच बास. बाकीच्यांची खबर नंतर घेईन.
|
Runi
| |
| Monday, March 12, 2007 - 11:35 pm: |
| 
|
दिशा मला पण दिनेशदा त्यांच्या लिखानावरुन हे एकदम चौफेर तसेच शांत, समजुतदार व्यक्तिमत्व वाटते. त्यांना सगळ्याच विषयात वाखाणण्याजोगी गती आहे, ते मला नेहमी Master of all trades वाटतात. रुनि
|
Meenu
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:33 am: |
| 
|
मला असं वाटतं : प्रबोध : हुशार, सगळ्या बाबतीत उत्साही, खुप मित्रमैत्रिणी असणारे, वेगळ्या वाटेने जाणारे समीर : खुप बडबडे, दिखाव्याची आवड असणारे, तोंडात तीळ भिजत नाही यांच्या .. सविता : प्रेमळ, सरळ, प्रामाणिक वाटतात मंजिरी : dominating, हट्टी अपर्णा : गरीब, चाकोरीत राहणार्या .. कधी कधी खाली मुंडी पाताळ धुंडी असा अनुभव येऊ शकतो. मनिषा : व्यवहारी, स्वार्थी .. राहुल, योगेश : happy go lucky, दिखाव्याची आवड असणारे चैत्राली : सुंदरच दिसतात, सरळ, मितभाषी असतात .. विजु : हे नाव नेहेमी आत्यांचं असतं शकु : आत्या, मावशी अमित : सधन कुटंबातले असतात शिल्पा : व्यवहारी अरुण : व्यवहारी, महत्वाकांक्षी प्राची : चाकोरीत रमणार्या, दिसण्याला खुप महत्व देणार्या, बहुतकरुन गोर्या असतात उमेश : हुशार आणि वेगळेच असतात .. अतिशय सरळमार्गी मधुराणी : हे नाव फक्त लहान मुलीचच असु शकतं शर्मीष्ठा : अजिबात चाकोरीत न राहणार्या, सर्वस्वी वेगळ्या वाटेने जाणार्या, हुशार, आत्मनिर्भर सुधीर, विनायक : परंपरागत चाकोरीप्रिय, शांत, कुणाच्या अध्यात न मध्यात निशा, सावनी : सावळ्या, तरतरीत, उत्साही, ध्येयवादी प्रज्ञा : हुशार असं आपलं नावावरुन वाटतं .. बाकी दिवे घ्यालच
|
Chyayla
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:19 am: |
| 
|
मीनु हे खर म्हणजे एका लहान मुलीच नाव वाटत, त्यातल्या त्यात मिना म्हणजे एखादी खुप बडबडी व्यक्ति असावी... पण तु ईथे ज्या नावान्ची चर्चा केली ते सगळे मला नाही वाटत मायबोलीवरचे आहेत किन्वा आयडी घेउन आहेत. स्वाती हे नाव मला खुप आवडत मला ज्या स्वात्या भेटल्या त्या थोडाश्या बुटक्या, गोल चेहर्याच्या, हुषार व उच्चशिक्षित, मनमिळावु, विनोदप्रिय आणी हो हसमुखराय होत्या. दिनेश सरळ साध व्यक्तिमत्व ईथले दोन्ही दिनेश Dineshvs हे जास्त भावनाशील शिवाय दुसर्यान्च्या भावना जपणारे व सम्वेदन्शील वाटतात, तसेच दुसरे दीनेश७ हे पण मोकळ्या आणी स्पष्ट विचारान्चे दीसतात. सखी मी हा आयडी जेन्व्हा जेन्व्हा वाचतो ना आपसुकच माझ्या मनात... सखी शेजारीणी तु हसत रहा हसत रहा हास्यात पळे गुन्फ़ीत रहा... आईशप्पथ हेच गाण आठवत. तसेही ही सखी पण खळखळुन हसणारी वाटते.. मस्त आयडी घेतलास.. अभिनन्दन. चाफ़्फ़ा फ़ारच लोकप्रिय व्यक्ति काही जणाना वेगळ्याच कारणानी प्रिय आता जाउ द्या चाफ़्फ़ी आली आहे त्यामुळे तो नम्बर कटला. ईब्लिसपणाच्या BB चे कर्ते धर्ते नेहमी डोक्यात एक ईर्साल किडा वळवळतच असतो, जरा साम्भाळुन राहिलेल बर. कधी याच्या सोबत रहाणार्यान्ची विकेट पडेल सान्गता येत नाही, बर हे महाराज ईतके साळसुद की समोरच्याला कळायच पण नाही की सगळ्या करामती याच्याच म्हणुन. बिचारी चाफ़्फ़ी आता असला ईब्लिस नवरा कशी साम्भाळते पाहु. बाकिच्यानबद्दल लिहायला कधीही टपकेलच.. मी पण जयन्त कुळकर्णीन्च्या या BB चा कल्पनेबद्दल दाद देतो.
|
धमाल चालली आहे की इकडे. सार्वजनीक बारसे चालू आहे. (नावे ठेवणे.) 
|
Giriraj
| |
| Tuesday, March 13, 2007 - 7:58 am: |
| 
|
सिमरन... गोरी गोरी,उंच,परफ़ेक्ट फ़िगर ,डोळे अगदी आमंत्रित करतिल असे असलेली मुलगी असते नेहेमी... हाऽय!दीर्घ सुस्कारा!
|
Mahesh
| |
| Tuesday, March 13, 2007 - 9:32 am: |
| 
|
तुम्ही बहुतेक नेहेमी सिमरनचा सुमिरन (जप) करत असाल. 
|
माझ्या वर्गातली सिमरन कौर सोहल. नव्वद किलोची आणि पाच फ़ूट आठ इंचाची पहेलवान होती. आवाज बराचसा पुरुषी होता आणी डोळे,,, कसे होते कधी कळलं नाही.. (जाड भिंगाचा चष्मा असल्यामुळे)
|
गिरिराज..... सिमरन... गोरी गोरी,उंच,परफ़ेक्ट फ़िगर नन्दिनी२९११ माझ्या वर्गातली सिमरन कौर सोहल. नव्वद किलोची .... आणी डोळे,,, कसे होते कधी कळलं नाही.. (जाड भिंगाचा चष्मा असल्यामुळे).... हा हा हा हा
|
Chyayla
| |
| Tuesday, March 13, 2007 - 3:56 pm: |
| 
|
तो जाड भिन्गाचा चष्मा तुला होता की सिमरनला होता? तु हे गाण तुझ्या त्या सिमरनसाठी म्हणु शकतेस... तर प्रस्तुत आहे... "जाने जिगर जाने मन ९० किलो तेरा वजन तु अगर मुझपे गिरी तो मर जाउन्गा मै सनम"
|
सिमरनला जाड भिंगाचा चष्मा होता. आणि एकदा कॉलेजमधे जॉन अब्राहम आला होता तेव्हा त्यला मिठी मारली होती. तो बहुतेक हे गाणं म्हणाला असेल.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:56 pm: |
| 
|
सगळ्यांचे माझ्याबाबत एकमत होतेय तर. आपला GS1 आहे ना, तो मला सानेगुरुजींईतका प्रेमळ आणि ( सिनेमातल्या ) निळु फुले ईतका बेरकी म्हणतो. असो माझा बेरकीपणा, फक्त काहि जणानीच आणि काहि वेळाच अनुभवलाय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|