|
Farend
| |
| Friday, February 02, 2007 - 6:44 pm: |
| 
|
दिनेश बरोबर आहे. विमान कम्पन्यांनी सुद्धा "खाली" काय आहे त्याची माहिती देणारा एक धावता बोर्ड किंवा व्हिडीओ त्या स्क्रीन वर दाखवला तर मजा येईल... जसा आता इंटरनॅशनल प्रवासात नकाशा असतो. त्या नकाशात आजूबाजूची ठळक ठिकाणेही दाखवलेली असतात. सिंगापूर हून मुंबईला जाणारे विमान मला वाटते पुण्या "वरूनच" जाते, आणि मला नेहमी असे वाटते की जरा इथेच दोन मिनिटे थांबवून उतरता येणार नाही का? मी साधारण १० वर्षांपूर्वी पुण्याहून बंगलोरला गेलो होतो तेव्हा ते विमान खूपच कमी उंचीवरून गेले होते त्यामुळे खाली सर्व जवळून दिसत होते (त्यामानाने). ते बहुधा "जेट" विमान नव्हते, काहीतरी " propeller " टाईपचे होते असे मला कोणीतरी सांगितले.
|
Mandard
| |
| Saturday, February 03, 2007 - 6:26 am: |
| 
|
Yes Farend Jet Airways uses these type of air craft ATR type. But now they are using on secondary route. (Delhi-Jammu etc.). Rest Dineshji is 100% right. I travelled last week from Delhi-Chennai. Both cities looks beautiful while take off & landing. Also I seen Bhopal, Hydrabad on the way.
|
Dineshvs
| |
| Saturday, February 03, 2007 - 8:10 am: |
| 
|
Farend मी कॅथे पॅसिफ़िकने प्रवास केला त्यावेळी तर विमानाच्या नाकावर आणि पोटाखाली, कॅमेरा बसवला होता, आणि त्याचे प्रक्षेपण टिव्हीवर करत होते. पण त्यावेळी भारतात अश्या चित्रीकरणाला बंदी होती. आता मात्र हे निर्बंध नाहीत. विमानात व विमानतळावर देखील फोटो काढता येतात. फक्त टेक ऑफ़ आणि लॅंडींगच्या वेळी, ईलेक्ट्रॉनिक कॅमेरा असेल तर बंद ठेवावा लागतो. छोट्या विमानाच्या बाबतीत ती सोय करता येत नाही. एखादा उत्साहि पायलट असेल तर माहिती देतो. एअर डेक्कनला कायम फ़्री सीटिंग असते, म्हणुन धावत पळत खिडकि पकडावी लागते. आणि या बाबतीत सगळेच बालिशपणा करतात. अगदी बसमधे सुद्धा दारातच घोळका करुन उभे राहतात आणि विमानाजवळ बस आली कि धावत सुटतात. गो एअर मात्र बुक करतानाच सीट नंबर देते.
|
Dhulekar
| |
| Sunday, February 25, 2007 - 7:09 pm: |
| 
|
मी इन्डोनेशियात असतांना गम्मतच झली. एका ठिकणी मला प्रिया लिहिलेले दिसले अनि मि बरोबरच्या माणसाला विचारले कि इकडे काय आहे म्हणुन. उत्तर ऐकयचेय? प्रिया म्हनजे टॉयलेट (इन्डोनेशियात) )
|
अहो धुळेकर, मला वाटते प्रियाचा अर्थ पुरुष आहे त्या भाषेत. पूर्वरंग मधे या बहासा इंडोनेशिआ च्या गमती दिल्यात. त्यात आहे ना. वनिता(स्त्री) आणि प्रिया(पुरुष) अशा पाट्या असतात सगळीकडे असे.
|
Sayuri
| |
| Monday, February 26, 2007 - 6:00 pm: |
| 
|
संघमित्रा, मलाही पूर्वरंगच आठवलं. आणि 'प्रियाराधन'ची कोटीही 
|
Dhulekar
| |
| Tuesday, February 27, 2007 - 2:17 am: |
| 
|
संघमित्रा अनि सयुरि मी त्याला जिकडे विचारले, तिकडे टॉयलेट्स होती त्यामुळे कनफ़्युज झाले असेल.
|
Mahesh
| |
| Tuesday, February 27, 2007 - 3:27 am: |
| 
|
मलेशियामधे शौचालयाच्या बाहेर टंडास अशी पाटी वाचली. 
|
Chyayla
| |
| Tuesday, February 27, 2007 - 8:10 pm: |
| 
|
अरे बाबान्नो.. आणी बाबीन्नो... आता त्या शौचालयातुन बाहेर या की.... आई-बाबान्ना भारतातुन US मधे आणायचे आहे त्यान्चा पहिलाच विमान प्रवास माझ्याकडे फ़िनिक्स मधे यायला एकच म्हणजे ब्रिटिश एयरवेज आहे, कुणाला अनुभव आहे का या एयर लाइन्सचा? म्हणजे नवीन प्रवासी साठी ठीक असेल का माझा एजन्ट म्हणतो ईन्डियन एयरलाईन्स ही ठीक आहे पण या BB वरचे किस्से वाचुन मन धजत नाहीये. त्याच म्हणण असे की त्रास ईतर एयरलाईन्स मधे पण होतो पण आपण आपली एयरलाईन्स म्हणुन जास्तच नाव ठेवतो मात्र ईतर ठिकाणी मुकाट्याने सहन करतो. शिवाय मागे ToI मधे ईन्डियन एयरलाइन्स च्या कर्मचार्यानी मत प्रगट केले की काही भारतिय प्रवाश्यान्ची पण वागणुक आपल्याच देशाच्या लोकान्शी, कर्मचार्यान्शी उर्मट असते, त्याना असे वाटते की आपण पैसे भरुन प्रवास करतोय तर त्याला पुर्णपणे वसुल केल्याच पाहिजे मग त्यासाठी हसु ना उगाच त्रास देणारेही असतात. ही नाण्याची दुसरी बाजु असु शकते ना. तरी तुमची मत कळतील तर मला उपयोग होइल... पुर्वाभारी आहे.
|
Sunidhee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 10:02 pm: |
| 
|
chyala BA नी यायला हरकत नाही, फक्त १-१ च डाग हातात असु दे त्यांच्या.. ते phx ला थेट येते म्हणुन नक्किच आणि खुपच सोयीचे आहे. बर का, मी पण तुझ्याच गावातली आहे
|
Chyayla
| |
| Wednesday, February 28, 2007 - 4:56 pm: |
| 
|
राम राम गावकरी... धन्यवाद सुनिधी... सगळा विचार करुन मी शेवटी BA चाच निर्णय घेतोय. थोडे महागडे आहे, एयर ईन्डिया च्या मानानी पण सोयिचे आहे. नाही तर लॉस एन्जिल्स ला जा तिथुन आणा त्यापेक्षा ही सोय चान्गली आहे.
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 28, 2007 - 7:33 pm: |
| 
|
काही भारतिय प्रवाश्यान्ची पण वागणुक आपल्याच देशाच्या लोकान्शी, कर्मचार्यान्शी उर्मट असते..... च्यायला, यातला 'काही' हा शब्द सांगणारे लक्षात घेत नाहीत, हाच तर वांधा आहे... पण विमानातल्या सर्विस पेक्षा, वेळ विलंब, Cancellation , Ground Staff help अश्या बर्याच ठिकाणी त्रास होऊ शकतो..
|
Chyayla
| |
| Thursday, March 01, 2007 - 8:35 pm: |
| 
|
विनय, बरोबर आहे तुमच, टाळी दोन्हीकडुन वाजत असते कदाचित काही हसु सुद्धा आपल्याच लोकान्शी नीट नसतील वागत. मी आन्तरजालात ( Internet ) वर बरीच मते ऐकली काही जणाना चान्गले आणी काहीना वाईट अनुभव आलेत व शेवटी या निष्कर्षावर पोहोचलो की एयर्-ईन्डिया खुप चान्गली पण नाही आणी एकदम वाईट पण नाही, बरी आहे. त्यातल्या त्यात विलम्ब झाला, तर एयर्-ईन्डिया जबाबदारी घेते बाकी हात झटकुन मोकळे होतात. असेही ऐकले आहे.
|
Mbhure
| |
| Thursday, March 01, 2007 - 9:17 pm: |
| 
|
UK मध्ये विमान थंबणार असेल तर Transit Visa भारतातुन घ्यावा लागेल. Check with Agent
|
Shonoo
| |
| Friday, March 02, 2007 - 2:24 am: |
| 
|
आजकाल एअर इंडिया ची सेवा खूप सुधारलीये मुम्बै-परिस Newark in NJ अशी जी फ़्लाईट आहे त्यात पॅरिस ला विमानातून उतरावं पण लागत नाही आणि हॉल्ट पण अगदी छोटा आहे. ज्यांना भाषेचा प्रॉब्लेम येउ शकतो आणि जेवणा खाणाची अडचण होऊ शकते त्यांना अगदी सोयीस्कर आहे. पण BA मधे पण आजकाल Asian किंवा Hindu vegetarian जेवण देतात आणि ते बहुतकरून भारतीय पदार्थच असतात. लंडन हीथ्रो वर विमान बदलणे हे नवख्या प्रवाशांना जरा कठीण पडते. पण विमानात बहुसंख्य भारतीय असतात. कोणाला विनंती केली तर खुशीने मदत करतील. Wheel Chair assistance मागणे हाही एक पर्याय आहे. पण यात विमानातून उतरवायला खूप उशीर लावतात. शिवाय जर हा पर्याय वापरणार असाल तर टिप्स करता हातात सुटे परकीय चलन असायला हवे. पहिल्यांदाच आईवडील येणार असतील तर त्यांच्या हातातील बॅगा अगदी कमी वजनाच्या असाव्यात. हातात परकीय चलनाती सुटे असावेत १-१ डॉलर आणि पाच डॉलरच्या नोटा. रोजची लागणारी औषधे ४-५ दिवसांची तरी हातात असावीत. सर्व औषधांचे व चष्म्याच्या नम्बराचे prescription बरोबर असावे. आजकाल INS च्या साइटवरून immigration forms डाउनलोड करता येतात. असा डाउनलोड करून भरून त्याच्या copies आई वडिल्लंना अगोदर पाठवून द्याव्यात. दशम्या पराठे लाडू असं थोडसं खाणं जवळ असावं. काही कारनाने वाटेत एखाद दिवस रहावं लागलं तर आई बाबा लंडन्/ पॅरिस मधली रेस्टॉरंट्स शोधणार आहेत का?. एअरपोर्टवर थंडी वाजू शकते- शाल स्वेटर हाताशी असावेत. Hope they have a good trip
|
Dineshvs
| |
| Friday, March 02, 2007 - 3:30 am: |
| 
|
आज गो एअर चे फ़्लाईट मुंबईहुन तब्बल एक तास उशीरा सुटले. आम्ही विमानातच बसुन होतो. दरवाजे बंद झाले होते, पण तरिही काहीतरी टेक्निकल स्नॅग झाल्यामुळे दरवाजा उघडला आणि बराचवेळ तो फ़ॉल्ट दुर करणे चालु होते. सांगायचे नवल म्हणजे, फ़्लाईट टाईम नेहमीपेअक्षा दहा मिनिटे कमी होता. शॉर्टकट मारला बहुतेक.
|
@Mbhure, Check very cautiously about transit visa. You do not need transit visa under MANY circumstances, like if you have Schengen or US visa but STILL UK Embassy offers one. I had a very heated argument with the female at UK embassy in Stockholm on this issue but she failed to give me clear reason and I refused to take transit visa. I travelled without one and had no issues. Transit visa WILL be needed if you are going to cross immigration. If you dont even go close to immigration then why do you want to pay them for some foolish stamp on your passport? Check http://www.ukvisas.gov.uk/servlet/Front?pagename=OpenMarket/Xcelerate/ShowPage&c=Page&cid=1006977149962 or http://tinyurl.com/jn3e for more details.
|
Milindaa
| |
| Friday, March 02, 2007 - 2:12 pm: |
| 
|
Transit visa WILL be needed if you are going to cross immigration <<< Prasad, I guess, Bhushan is talking about DATV - Direct Air side Transit Visa. the following link will be more useful UK visas
|
Chyayla
| |
| Friday, March 02, 2007 - 10:14 pm: |
| 
|
सुनिधी, दीनेश, शोनू, प्रसाद, भुषण, मिलीन्दा तुम्ही खुपच उपयुक्त माहिती दीली. तुमचे मनापासुन आभार... तर माझ्या आई-वडीलान्जवळ B2 US Visitor Visa असल्यामुळे त्याना ट्रान्जिट विसा ची गरज पडणार नाही असे त्या लिन्क वरुन वाटत आहे.
|
Zakasrao
| |
| Saturday, March 03, 2007 - 4:12 am: |
| 
|
काल आजतक वर एक बातमी पाहिली कि go air चे प्रवासी बंगलोर air port वर १७ तास अडकले होते. अस होवु शकत का? हे खर आहे का? हे अस झाल तर मग होणार्या नुकसानीला कोण जबाबदार?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|