|
युवराजराव मे कलावंत तर नक्कीच नाही. आणि तसा मी गंभीर व्यक्तिमत्वाचा आहे. विनोदी चित्रपट, नाटक, पुस्तक मला आवडतात. आणि हो, मी आत्तापर्यन्त गंभीर भूमीकाच केल्या आहेत (शालेय जीवनात आणि कॉलेज लाईफ़ मध्ये). तसे तुमच्या नावात युवराज रुबाब वाढवतात पण शेखर दुध कम पानी ज्यादा चा फ़ील देतो. माझ्या एका मित्राचे नाव स्नेहल आहे. आणि तो स्वभावाने खूप चांगला आहे. ओवराऑल स्नेहल नावाच्या व्यक्ती प्रेमळ असतात असा माझा अनुभव. ह्यात आमच्या भूमिती च्या म्याडम सुद्धा आल्या. मनुस्विनी, गोल आणि शान्त चेहेरा, थोडे आपल्यामध्ये मग्ना असणारे व्यक्तीत्व. हुशारी चेहेर्यावर दिसून येते. दीपांजली, हुशार पण निधडे व्यक्तित्व. ------------------------------- जयंत कुलकर्णी
|
बाप रे नावावरून बरंच काही चालू आहे. माझी काही आवडती नावं..समीर, अमित, तेजस, अनिकेत, अभिषेक आणि रित्विक. या नावाची माणसे खूप Friendly असतात. योगेश नाव मला आवडत नाही. कारण मलाही माहित नाही पण माझ्या धाकट्या भावाचे तेच नाव ठेवल्यामुळे मी त्यला कधीच धड नावाने हाक मारत नाही. गौरव या नावाची मुलं फ़ार गोंडस असतात. काही काही नावं फ़क्त लहान मुलानाच शोभून दिसतात. जसे की आर्यन. आयुष्मन. ईशान, वगैरे मुलीइमधे वेदिका, अंजली, माही, आणि जिया मला आवडतात (प्रिया राहिलंच)
|
Tawaal
| |
| Tuesday, March 06, 2007 - 11:53 am: |
| 
|
लिम्बुटिम्बु= मकरंद अनासपुरे बहुतेक
|
नावांवरून चाललेला हा BB शेक्सपियरने वाचला असता तर त्याने ``नावात काय आहे'' असे म्हणायचे धाडस केले नसते. पण अफसोस! त्यावेळी `मायबोली' नव्हती!! बहुतांशी नावावरून व्यक्तीसंबंधी सर्वसाधारणत प्रत्येकाच्या मनात एकच आकृतीबंध तयार होतो, असे सर्व BB वाचल्यावर वाटते.
|
इथे ही गंम्मत वाचुन मजा आली. तसे इथे नावावरुन काहीच लिहु शकत नाही. कारण इथील नावे खरे,खोटी, alias आहेत. point तो नाही. पण बहुतेक माझे observation is based on their writing skills psg , तु बरोबर आहेस, तुझ्या बाबतीत(तुझ्या लिखाणावरुन) एक समजदार व्यक्तीमत्व वाटते. observation तुझे खुप चांगले असणार. तुझे लिखाण खुप काळाला धरुन( click गोष्ट नी 'अंतर' ) वाटते. म्हणुन मला आवडते. आता हा माझा personal अनुभव, लेखक हा स्वःताच्या दृष्टीतुन लिहितो पण कधी कधी प्रत्येकक्षात त्याची external प्रतीमा खुप वेगळी ही असु शकते. it means, he might be writing funny stories but in real he could be serious to talk as well, I dont now what I wrote makes any sesne. जयंत कुलकर्णी, हो ते आपल्या मनाची राणी वगैरे बरोबर आहे. चेहरा शांत वगैरे अजीबात नाही. .
|
Adi787
| |
| Tuesday, March 06, 2007 - 4:42 pm: |
| 
|
deepanjali... काय सविस्तर विश्लेशण केलेसं.. "भाऊ" category मस्तंच !!! माझी आवडती नावे : पूजा, पिंकी, पूनम, अदिती, आहना, श्रुती, स्नेहल, स्म्रुती ( ती इराण्यांची स्म्रुती सोडुन) दीपाली... या नावांच्या मुली म्हणजे खुप हुशार, स्मार्ट आणी उल्हासीत असतात. सचिन, रमेश, अमेय ही मुले शांत तर अभिजित,अभिषेक, जयदिप म्हणजे थोडिसी अहं असलेली.. पहिल्यास पाटी कोरिच असते.
|
Chyayla
| |
| Tuesday, March 06, 2007 - 11:12 pm: |
| 
|
च्यायला: खूप डांबरट व्यक्तिमत्व.. लाजो मला डाम्बरट म्हणताना थोडी लाजली असती तर बर झाल असत आSS.. आSS.. ऊSS.. ऊSS.. पण ठीक आहे मित्रानो तुम्ही मला ज्या काही प्रतिमा प्रेमाने दील्यात त्याचा सहर्ष स्वीकार करतो. लाजो.. नावावरुनच अस वाटत ही व्यक्ती बेशरम नाही... लाजाळुच झाडच असाव. अय्या... ईश्श.. काही तरीच गडे.. आम्ही नाही जा असे नेहमी बोलत असेल. एवढच काय कोणाला रागवताना पण जसे... अहो गधडे आशे काशे हो करता तुम्ही... किन्वा सासरच्या कुत्र्याला ही हाकलायचे असेल तर अहो कुतरडे... हाSS डाSS... लाजो वाईट नको वाटुन घेउस तु खोटी पडु नये म्हणुन थोडासा डाम्बरटपणा करावा लागला .. आता ग बया... बाकी दीवा घेणे आलेच. झकासराव मला या व्यक्तिबद्दल नेहमीच कुतुहल वाटत. भारदस्त मिशीवर ताव मारुन, फ़टफ़टीवर बसुन गावात नवीन पाखरु शोधतात की काय? पण ही व्यक्ति खर सान्गु यान्च्या विचारान्वरुन आणी लिखाणावरुन एखाद्या घरन्दाज व कुलीन घराण्यातली वाटते. मराठी शिनेमा मधे गावचा पाटील म्हणुन नक्कीच अभिनय करु शकतील. कस काय पाटील बर हाये का? ईथला गोन्धळ बरा हाय का?
|
Lajo
| |
| Wednesday, March 07, 2007 - 3:13 am: |
| 
|
अहो झकासराव, दुस्वास नाही हो पुरुषांचा, दिनेशदां बद्दल चांगलच लिहीलय की मी... ईश्य च्यायला, तुम्ही खरोखरच किती हो डांबरट! मला लाजाळूचे झाड म्हणालात... गालावर अगदी हिरवी छटा आली की हो... काहीतरीच काय तुमच... अजुन काही नावांच्या प्रतिमा... गजानन देसाई: गोरे, टक्कल पडलेले, डोल्यावर सोनेरी काडीचा चष्मा, पोट सुटलेले, मधय्म वयीन... बॅंक मॅनेजर बी: शेंडेफ़ळ, एकुलते एक पुत्र रत्न, हरहुन्नरी, jack of all trades , सगळ्यात भाग घेण्याची ईच्छा, एकंदर गुड timepaass व्यक्तीमत्व पेन्ढ्या: उंच, गव्हाळ वर्ण, डोळ्यावर चष्मा, हातात laptop , शेअर्स ई च्या बाबतीत एकदम बाप माणूस... आता ह्या प्रतिमा मला नावांवरुन वाटल्या तश्या लिहील्या... दीवे तर आपण घेऊन फिरतोच...
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 07, 2007 - 4:21 am: |
| 
|
फ़टफ़टीवर बसुन गावात नवीन पाखरु शोधतात>>>>>>>>> गेले ते दिवस आता. लग्न होउन आता एक वर्ष होइल ह्या मे मधे. आता फ़टफ़टीवर फ़क्त ड्रायवरकी करायचे दिवस. खाली उतरलो की हमाली करायचे दिवस. न आवडणार्या पिशव्या उचलुन आणायचे दिवस आले आहेत हो. मिशा आहेत पण तेव्हढ्या भारदस्त नाहीत. घरचे सर्वजण आपल्याला चांगलीच शिकवण देतात आपणच बिघडत असतो पण मी अजुन फारसा बिघडलो नाही इतकच.
|
Tawaal
| |
| Thursday, March 08, 2007 - 8:10 am: |
| 
|
अन सांगा राया, सांगा मी कसा दिसतो?
|
Deshi
| |
| Thursday, March 08, 2007 - 2:54 pm: |
| 
|
सोप्प्ये टवाळ जसे दिसतात तसाच.
|
Lalu
| |
| Thursday, March 08, 2007 - 3:22 pm: |
| 
|
>>गजानन देसाई: गोरे, टक्कल पडलेले, डोल्यावर सोनेरी काडीचा चष्मा, पोट सुटलेले, मधय्म वयीन... बॅंक मॅनेजर लाजो, गंमत वाटली बीबी वाचून. फक्त नावावरुन म्हणत असलो तरी, त्या नावाच्या आपल्या ओळखीच्या किंवा माहितीच्या व्यक्ती कशा आहेत यावरुन पण ती प्रतिमा तयार होते.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 08, 2007 - 5:09 pm: |
| 
|
सगळ्यात मजा वाटते, मी ज्या मायबोलीकराना भेटलोय त्यांच्या प्रत्यक्ष रुपात आणि प्रतिमेत किती विरोधाभास आहे, ते वाचताना. चालु द्या.
|
Shyamli
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:09 pm: |
| 
|
धम्मालच चालु आहे इथे मजा वाटली चालु द्या
|
Dinesh77
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:23 pm: |
| 
|
दिनेशदा, प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असे नाही ना??
|
Bee
| |
| Friday, March 09, 2007 - 5:29 am: |
| 
|
माझा एक रुमी त्याला सरळ जाणार्या रस्त्याचे वावडे होते की काय भारतात तर तो मला गल्लीतून फ़िरवत असेच पण इथे सिंगापोरमधे आल्यानंतरही त्यांनी गल्ल्यांचा शोध लावला. त्यानी शोधून काढलेल्या गल्लीतून मला एकट्यानी वाट शोधायला कधीच जमत नसे. तो स्वभावानी देखील असाच complicated/mysterious होता. त्यामुळे मला त्याचे फ़ार अप्रुप वाटे. पण कधीकधी त्याचे वागणे, विचार करणे अगदी डोक्यात जात असे. मग मी त्याला म्हणत असे की बाबा रे माझ्यासोबत तु सरळ रस्त्यानी चालायला शिक म्हणजे तुला सरळ वागणे जमेल. आता त्याचे दोनाचे चार हात झाले, त्याची बायको माझ्या मताशी १०० प्रतिशत सहमत आहे. तसेच कपडे घालण्यावरुनही माणूस / बाई लक्षात येते. ढगळ कपडे घालणारे हे दिसखुलासपणे वागणारे असतात. त्यांच्या मनात किल्मिष नसते
|
Zakasrao
| |
| Friday, March 09, 2007 - 6:09 am: |
| 
|
देशीला २१ मोदक. देशी तुझ नाव राया आहे का? नुसतच चालु द्या काय अरे थोड लिहा काहितरी म्हणजे आणखी धमाल येइल.
|
Lajo
| |
| Friday, March 09, 2007 - 6:20 am: |
| 
|
जरा विषयांतर... माझ्या एका बंगाली मैत्रीणीचा फंडा... ५ फूट ४ ईँचा पेक्षा कमी ऊंची असणारे पुरूष बेरकी, आपमतलबी, अप्पलपोटे, आगाऊ ई. ई. ई असतात. हा फंडा मी काही माहितीतल्या ५'-४'' पेक्षा बुटक्या पुरूषांच्या बाबतीत पडताळून पाहिला आणि खरोखरच त्यातले ९०% अगदी तसेच निघाले. तुम्ही पण पडताळून पहा. (इथे कुणाला दुखवण्याचा उद्देष नाही. just एक गंम्मत...)
|
अगदी बरोबर. माझाही तसाच अनुभव आहे. अस म्हणतात की, अशी माणसे जितकी जमिनीवर असतात, तेवढीच जमिनीच्या खाली असतात. दिवे घ्या रे बाबानो, जे असे असतील त्यानी.
|
Mahesh
| |
| Friday, March 09, 2007 - 7:09 am: |
| 
|
मागे खुप काळापुर्वी म्हणजे जेव्हा मायबोलीवर भाउगर्दी नसे तेव्हा मनोज नावाचे एक सद् गृहस्थ मायबोलीवर अभंग वगैरे लिहायचे. त्यांच्या ID मधे कसलेसे आकडे पण होते. मी जेव्हा देशात गेलो तेव्हा मुंबईमधे त्यांना भेटण्याचा योग आला. माझ्या कल्पनेपेक्षा ते खुपच वेगळे होते असे दिसले. असो लोकांच्या कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळतो आहे आणी नंतर अपेक्षाभंगाला देखील. 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|