Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 01, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through March 01, 2007 « Previous Next »

Maku
Wednesday, February 28, 2007 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा BB कशासाठी आहे. नाव आणि प्रतिमा कळाले पण ज़रा कोणितरी लिहा मग कळेल ना.

Suvikask
Wednesday, February 28, 2007 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यक्तीच्या नावावरुन तिची काय प्रतिमा डोळ्यासमोर येते.. ह्याबाबत असेल कदाचित..

Limbutimbu
Wednesday, February 28, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> व्यक्तीच्या नावावरुन तिची काय प्रतिमा डोळ्यासमोर येते.. ह्याबाबत असेल कदाचित..
बरोबरे! पण मग नाव म्हने मायबोलीच्या आयडी पण विचारात घ्यायच्या का?????????

Suvikask
Wednesday, February 28, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालेल.. बहुदा.. कारण केवळ करमणुक म्हणुन जर BB सुरु केला असेल तर धमालच येईल.
जस लिंबुटिंबु म्हटल्यावर एक बुटका, अल्लड, निरागस मुलाची प्रतिमा डोळ्यासमोर ऊभी राह्तेच................... अस नाही....


Limbutimbu
Wednesday, February 28, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> जस लिंबुटिंबु म्हटल्यावर एक बुटका, अल्लड, निरागस मुलाची प्रतिमा
अशी????????
माझ्या डोळ्यासमोर तर एका काटकुळ्या, सदा रड्या, शर्टाच्या हाताच्या बाहीने नाक पुसणार्या, अर्ध्या खाकी चड्डीतल्या, पायाचे गुढगे फोडुन घेतलेल्या, उत्सुक डोळ्यान्नी सगळीकडे सन्शयाने बघणार्या, थोड्याफार लाडावलेल्या डाम्बरट लहान मुलाची प्रतिमा उभी रहाते.....!

आता बाकी नाव घ्या!.... तुझच घेतल तर नाकात चमकी घातलेल्या फुले वेचणार्या परकरी पोरीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी रहाते :-)

Jdkulkarni
Wednesday, February 28, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा त्याचसाठी आहे आणि निव्वळ करमणूकी साठी सुद्धा. म्हणजे व. पु. काळे ची भदे ही कथा ("भदे हे एक्ज़ाट्ली भद्यांसारखेच दिसत होते"). माझ्या बाबतीत म्हणाल तर विशाल नाव ऐकले की एक व्रात्य मुलगा डोळ्यासमोर उभा राहतो. कारण शालेत असताना विशाल नावाच वात्रट मुलगा आमच्या शालेत प्रसिद्ध होता.

Maku
Wednesday, February 28, 2007 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी वाटते की मायबोलि वरची जे काही ID आहेत ते तुमच्या प्रमाणे कसे असतील दिसायला. ह्याचे वर्णन करा.

लिबु ने सुरुवात केली आहे

Maku
Wednesday, February 28, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय ते जे काही मायबोली वर सुचना etc
देतात ते कसे असतिल दिसयला.

Maku
Wednesday, February 28, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki पुर्ण ट्क्कल पडलेले चेहरा रागीट रंग सावळा बुट्के पोट सुट्लेले असतिल असे वाटते.


Jdkulkarni
Wednesday, February 28, 2007 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बूटिम्बू मध्ये व्रात्य पणा अगदी पुर्ण भरला आहे असे वाटते. एकदम खोडकर लहान मुलं.
जयंत कुलकर्णी


Robeenhood
Wednesday, February 28, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki पुर्ण ट्क्कल पडलेले चेहरा रागीट रंग सावळा बुट्के पोट सुट्लेले असतिल असे वाटते. >>>>
आँ???
पूर्ण टक्कल पडलेले चेहरा?
रागीट रंग?
सावळा बुटके पोट?
अशा वर्णानाचा प्राणी परग्रहावरचाच असणे शक्य आहे...


Limbutimbu
Wednesday, February 28, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> अशा वर्णानाचा प्राणी परग्रहावरचाच असणे शक्य आहे...
किन्वा पुण्यात खड्ड्यात पडुन एन.जे.त उगवलेला असण शक्य हे DDD

Zakki
Wednesday, February 28, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की नावात काही गंमत नाही. माझे अनेक फोटो मायबोलीवर ठिकठिकाणि प्रसिद्ध झाले आहेत. पुणे, मुंबई, NJ , ऑस्ट्रेलिया इ. अनेक ठिकाणच्या ए. वे. ए. ठि. ला मी उपस्थित होतो..
आता रंग सावळा नाही, नि सुटलेले पोट पण बरेच आत गेले आहे. बाकी चोक्कस वर्णन, न बघता सुद्धा!

रॉबिनहूड, त्या इथे नवीन आहेत, शिकताहेत मराठीत लिहायला. जरा विरामचिन्हे इकडे तिकडे द्यायची राह्यली तर अशी कुचकट टीका करू नका. सरळ सांगा कसे लिहायचे ते. त्या ऐवजी दुसर्‍या कुठल्या तरी BB वर तुम्ही येऊन 'सांध्यपरी वैष्णवी' याचा अर्थ सांगाल याची लोक वाट पहात आहेत, तिथे जा.


Maitreyee
Wednesday, February 28, 2007 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्त, सुनील आणि संजय ही नावं मी तरी आतपर्यन्त बहुधा अतिशय मवाली, उनाड आणि टवाळ मुलांची पाहिली आहेत :-) त्यामुळे त्या नावांवरून अशीच प्रतिमा उभी रहाते:-O (समस्त non मवाली प्र सु आणि सं ची माफ़ी मागून;-) )

तसंच केदार नावाची सगळी मुले गोरी आणि अतिशय शांत समंजस वाटतात :-)
राहुल, सचिन हे पण नेहमीच young , गोरे आणि क्युट, शिवाय स्वभावाने पण छान आढळलेत मला! राहुल हे वय ५० च्या माणसचे नाव कधी असू शकत नाही माझ्या कल्पनेत तरी!
तसाच 'मनिष' नावाचा मुलगा कायम काळा सावळा असेल असे वातते :-)
अशी माझी तर खूप लिस्ट आहे.. नन्तर पोस्टीन..


Sandu
Wednesday, February 28, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल हे वय ५० च्या माणसचे नाव कधी असू शकत नाही माझ्या कल्पनेत तरी!

बजाजचा राहुल काय २० वर्षाचा आहे का?


Vinaydesai
Wednesday, February 28, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्या कल्पनेत तो येत नसेल... द्रविड, वैद्य येत असतील.. :-)


Kedarjoshi
Wednesday, February 28, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसंच केदार नावाची सगळी मुले शांत समंजस वाटतात >>>

Sunidhee
Wednesday, February 28, 2007 - 9:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोबिन्हूड, अहो, तिथे विनोदाच्या बीबी वर जाऊन हसवा की, इथे काय हसवताय.. :-) बाकी मकु आणि तुम्ही, दोघान्चे शेरे मजेशीर...

Chyayla
Thursday, March 01, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सज्जनान्नो या BB चा मुळ विषय आहे "नाव आणी प्रतिमा" या मुळ विषयाला धरुन माझे मत मान्डत आहे. तुम्ही काही बाही लिहिता आणी सगळा घोटाळा होतो. नुसत्या एक दुसर्याच्या तन्गड्या खेचणे एवढेच दिसतय ईथे.

तर नाव ही पाण्यातच असते, आता हे पाणी समुद्राचे किन्वा नदीचे किन्वा सरोवराचे असे ढोबळ मानाने असते.
१) जर नाव समुद्रात असेल तर त्याची खळाळत्या लाटान्मधे प्रतिमा दिसणे कठीणच. त्यामुळे ईथे विचार सोडुन द्यावा.

२) नदीमधे नावेची प्रतिमा दिसायला हरकत नाही पण तरी ईथेही वान्धा पाणी नितळ स्वछ्: असेल तरच ते दिसेल शिवाय पाणी सन्थ असेल तरच जास्त शक्यता आहे.

३) सरोवर - सरोवर साधारणता स्थिर, नितळ, स्वछ असु शकत माझ्या मते ईथे प्रतिमा दिसायला हरकत नाही.

४) प्रतिमा नावाची मुलगी जर नावे मधे प्रवास करत असेल तर मग हमखास नाव आणी प्रतिमा हा योग जुळुन येतो.

तर असो माझी पोस्टची ईथुन सुरुवात झाली, काही स्फ़ुरले तर नक्की लिहिल व तुमच्याकडुनही विषयाला धरुन लिहिण्याची अपेक्षा करतो.


Manishalimaye
Thursday, March 01, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सहज आले तर, च्या..... काय हे अगदीच ह. ह. पु. वा.!!!नाव आणि प्रतिमा!! chyayala नावाची व्यकी कशी असेल बर???

पण हे मात्र होतं खरं, की बर्‍याचदा नावावरुन आपण एक प्रतिमा निर्माण करतो आणी प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बघीतल्यावर मात्र भ्रमनिरास!!!!विशेषत लग्नाच्या वेळी मुलं बघताना......ऽर्थात मुलांनाही मुली बघतानाहा अनुभव येतच असेल म्हणा!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators