Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 27, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through January 27, 2007 « Previous Next »

Farend
Wednesday, December 20, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोरियन मधे पूर्वी Indian Veg जेवण मिळत असे ते आता Asian Veg असे मिळते, मला फार फरक वाटला नाही, पण काहीजणांना आवडणार नाही.

कोरियन बाकी चांगली आहे, फक्त एक risk SFO वरून जाताना जर विमान लेट झाले आणि मुम्बई ची फ्लाईट हुकली तर सेऊल मधे १-२ दिवस वाट पाहात बसावे लागेल कारण सेऊल मुम्बई फ्लाईट रोज नाही. माझ्या एका मित्राला हा अनुभव आला होता, त्यांना मग सिंगापूर एअर लाईन च्या विमानाने भारतात जाण्याची व्यवस्था कोरियन तर्फेच केली गेली, पण त्यांचा आणखी वेळ त्यात गेला. मुम्बई हून परत येताना हा प्रॉब्लेम नाही. ही फ्लाईट मुम्बईलाच जात असल्याने मराठी लोक खूप असतात, आत्तापर्यंत कोणी ओळखीचे भेटले नाही असे कधीच झाले नाही.

नेहमी सिंगापूरने जाणार्‍यांना आणखी एक फरक दिसेल तो म्हणजे प्रत्येक सीटवर TV नाही. ते आता चालू करत आहेत, पण SFO पासून ती सोय अजून नाही.

हे चालत असेल तर अतिशय उत्तम फ्लाईट आहे... जाताना २१ तासात आणि येताना तर १९ तासात आणते ( SFO to Mumbai airport ) जे सिंगापूरची ती ८ तास वाली फ्लाईट साधारण २९ तास लावते.



Mita
Thursday, December 21, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks,farend.. .. . ... .. ..



Mahaguru
Friday, December 22, 2006 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डीजे, ATN काय त्यात. farend ने लिहिल्याप्रमाणे वेळ असेल तर ८ तास काय २ दिवस पाय मोकळे केले तरी हरकत नाही. बहुतेक जण नोकरीवाले सुट्या घेतात त्यावेळी साधरण ३ आठवडे सुट्टी मिळते त्यातुन विमानप्रवास आणि विमानतळावरचा पाय लांब करण्यातला वेळ गृहीत धरला तर साधारण ४ दिवस जातात.
माझा एक बे ऎरीया मधला मित्र दिवाळी निमित्त सिंगापुर मार्गे भारतात गेला. त्याला १२ तास जाताना आणि जवळपास तितकाच वेळ येताना विमानतळावर लटकवले. त्याचे ५ दिवस वाया गेले. ह्या अर्धाने 'डांबुन' असे म्हणालो होतो.
बाकी सिंगापुर एअरलाईन चांगलीच आहे.

हा कालच्या रविवारचा किस्सा. एक मायबोलीकर सिंगापुर मार्गे येत होता. सिंगापुर विमानतळावर ८ तास आराम करुन इथे आला त्यावेळी विमानतळावरच त्याला भयंकर त्रास होत होता, सारख्या उलट्या. आणि तो एकटाच नाही अनेकजणांना त्रास होत होता असे कळाले. त्याला लगेच दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की विमानातल्या खाण्याने झाले आहे. (gastro somthing म्हणजे पोटाचा फ्लु टाईप काहीतरी.)

अर्थात अशा घटना रोज होत नाहीत. पण एक अनुभव.

Sunidhee
Monday, January 22, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी डिसेंबर मधे भारतात गेले तेव्हा लंडनहुन जावे लागले. कोणी जाणार असेल आणि त्याना माहित नसेल त्यांच्यासाठी.
सिक्युरिटी मधुन फक्त एकच वस्तु नेता येते. अगदि छोटी पर्स पण चालत नाही. जे काय हातात आहे ते एकाच ब्यागेमधे कोंबावेच लागते आणि ब्यागेची झिप बंदच करावी लागते. नाहीतर फेकुन द्या सांगतात चक्क.
आमची वाट लागली. लंडन ला उतरलो तेव्हा आधीच दमलो होतो. तसेच terminal 3 ला गेलो. भरपुर चालावे लागले हे सांगायला नकोच. मी,नवरा आणि मुलगी तिघे होतो. सिक्युरिटी ची लाइन अजगरासारखी लां SSSS ब होती. भिंतीवर कुठेकुठे liquid कसे न्यावे ह्याच्या सुचना लिहिल्या होत्या पण १च ब्याग पाहिजे असे कुठे वाचले नाही.
विमान ३ तासानी होते. त्या पैकी दीड तास रांगेत उभे राहिल्यावर आमचा नंबर आला तेव्हा त्या बाई ने थंडपणे सांगितले कि तुमच्याकडे ५ डाग आहेत आणि तुम्ही ३ तेव्हा २ टाकुन द्या
आता आमच्या कडे २ एकदम लहान carry on , एक बाळाची छोटी ब्याग, कमेरा आणि माझी खान्द्याला लावलेली पर्स. कमेरा आणि पर्स बाकिच्या ब्यागेत मावेना कारण मुळात त्या पण लहानच होत्या आणि त्यात फक्त १-२ शो पिसेस होते.
मग ती म्हणाली ह्यातले २ डाग check in करा. पण ते इथे नाही. immigrations/customs पास करुन arrivals ला जा. तिथे करा!!! आता हे म्हणजे टर्मिनल बदलणे आले, आख्खा airport पार करणे आले. आणि दीड तासच राहिला होता.
मग सुरु झाली प्रचंड धावाधाव. तोंडाला फ़ेस आणत immegrations ला तर आलो. पण ते पास कसे करणार?? कारण आमच्याकडे transit visa नाही. आम्ही US citizens नाही आहोत.
custom officer नी विचारले, तुमच्या कडे visa का नाही? मग सर्व कर्मकथा सांगितली तिला. तिने ह्याच्याशी त्याच्याशी बोलत शेवटी visa चा शिक्का मारला पासपोर्टवर. ह्यात पाउण तास गेला.
मग धावलो arrivals शोधत, तर कुठे बोर्ड दिसेना. पुन्हा विचारले तेव्हा एकानी सांगितले काहीतरि. असे सरळ जा, खाली जा, उजवीकडे जा, मग असा असा एक बोर्ड लागेल, तिथुन जा. मग रस्ता लागेल, तो पार करुन दुसर्‍या बिल्डिन्ग मधे जा तिथे checkin counters असतील!!! मग सरळ, उभे, आडवे उजवीकडे-डावीकडे जाऊन एका हाॅल मधे आलो.
तर त्याची ती so called पाटी एका खांबामागे लपुन राहीली होती, ती शोधण्यात पुन्हा वेळ गेला. इतका विचित्र हाॅल होता तो कि बास. एकीकडे दुकानं, एकीकडे कुठुनतरी arrivals ला जायला रस्ता, आणि एकीकडे चक्क रेल्वे स्टेशन सारखे काहीतरी.
शेवटी ती लपलेली पाटी दिसलि आणि त्या दिशेने चालत गेलो तर एकदम बिल्डिन्ग च्या बाहेरच आलो. आयुष्यात प्रथम UK च्या रस्त्याला पाय लागले, हे त्याही स्थितीत मला जाणवले. मग चालत २ बिल्डिंग्स पार करुन, हव्या त्या बिल्डिंग मधे शिरलो आणि काय.... तिथे जत्राच भरली होती. १-२००० लोक आत होते आणि त्यातले कित्येक जण counter शोधत होते. १०० counters दिसले पण आमचे जेट चे कुठे दिसेना.
मग भिंतीवर jet साठी बाण दिसला, त्या दिशेने तिथे गेलो तरी सापडेना. पुन्हा विचारले, तर उत्तर मिळाले, जेट इथे नाही, उलट्या (बाण दाखवला त्याच्या विरुध्ध दिशेला) आहे!!! मग पुन्हा पळालो. तर तिथे २-३ वेड्यावाकड्या पसरलेल्य, एकमेकात मिसळलेल्या लोकांच्या लाईनी..... आता ह्यात ली जेट ची कोणती असावी तर कोणतीच नव्ह्ती.
मग कुठेतरी एक counter दिसला, लोकांमागे लपलेला, ज्यावर JET AIRWAYS लिहिले होते. तिथे ४ जणी गप्पा मारत उभ्या होत्या. तिथे गेलो. त्याना आमची रामकहाणी कथन केली, शेवटी सांगितले, आमचे विमान अजुन ३० मिनिटानी सुटणार आहे आणि आम्हाला ते पकडायचे आहे.
तितक्यात अजुन २ जोडपी आली, आमच्यासारखीच स्थिति असलेलि.
मग त्या बायकांनी धावपळ सुरु केली. पट्पट १० मिनिटात सर्वांच्या बगा checkin केल्या. आता gate पाशी जायला पुन्हा security (निदान ५०० माणसांची लाईन) आणि terminal बदलायचे होते, ते पण टोकाचे gate .
आम्ही विनंती केली की, कोणीतरी त्यांच्या पैकी आमच्या बरोबर यावे. तर एकजण तयार झाली.
नंतर ची १५ मिनिटे सतत पळत होतो (चालत नव्हतो), इतके ते gate लांब होते. तिनेच secutity वाल्यना सांगुन आम्हाला रांगेत प्रथम नेले, सर्व पळतच. ते झाल्यावर, पुन्हा पळत गेट गाठले. stroller आत घातला. आणि विमानात जाऊन बसलो.
वाटेत कोणाला धडकलो, काही आठवत नाही.
फक्त घटाघटा पाणी प्यालो आत गेल्यावर. आणि त्यात जेट च्या खुर्च्या लहान मग आणीच अवघडलो. पण निदान विमान मिळले.
इतक करुन, त्या २ ब्यागा आल्याच नाहीत. १ दिवसानी आल्या, सर्व शो पिस फुटलेले.
आता मला लंडन ह्या शब्दाची भिती वाटते. :-)


Bhagya
Monday, January 22, 2007 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, हा एअरपोर्ट जर हीथ्रो असेल तर हे नविन नाही. पूर्वी आम्ही पण अशाच प्रसंगातून गेलो आहोत.

Anupama
Tuesday, January 23, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे! फ़ारच भयानक अनुभव आहे हा!

Milindaa
Tuesday, January 23, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हांला आलेला अनुभव चांगला नाहीच.. पण इथे airport कोणता आहे हे फार महत्वाचे नाहीये. त्या काळात इंग्लंड मधल्या कोणत्याही airport वर per person एक पेक्षा जास्त hand bag घेतच नव्हते, आणि याची जाहीरात, माहिती सगळीकडे दिली होती त्या लोकांनी. तुम्हांला तुमच्या airline ने ही माहिती देणे अपेक्षित होते..

सांगायचा point हा आहे, कोठेही जाताना थोडी माहिती काढून जावे :-)

लंडन हून जाणार्‍यांनी येथे बघा


http://www.baa.com


Sunidhee
Tuesday, January 23, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही हो, ह्या वेळी पण फोन केला होता जेट ला पण त्यानी पण नाही सांगितले आणि चेक्-इन ची माहीती वगैरे दिली.. पण आता airline कोणतीही असो, जगातला कोणताही airport असो, त्या प्रत्येक airport चे rules माहीत करुनच जाणार आहे मी.

Chioo
Thursday, January 25, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतामधे SpiceJet कशी आहे? वेळेवर सुटते का? किती भरवश्याची आहे? जर ऐन वेळी flight cancel / late झाली तर पैसे परत देतात की, दुसर्‍या flight मधे सोय करतात. आम्हाला ज्या दिवसाचे booking करायचे आहे त्याच दिवशी जाणे आवश्यक आहे. म्हणून हे इतके सारे प्रश्न. :-) कोणी या flight चा अनुभव घेतला आहे का?

Prajaktad
Thursday, January 25, 2007 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाप रे!सुनिधी तुला त्रासदायकच अनुभव आला..पण,तुझ्या अनुभवातुन बरच काही कळल ही..आता मी जातेय तेव्हा काळजि घेईल..मला हिथ्रोलाच थांबुन मग पुढे जायचय..तु मुलीसाठी काही घरचे फ़ुड नेले होते का?मी ब्रिटिश ऐअरवेज ने जाणार आहे.
मिलिंदा तु दिलेली लिंक उपयोगी आहे.


Sunidhee
Thursday, January 25, 2007 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, नाही, मी घरुन काही नेले नाही. दूध नेले मात्र. नेशिल तर जास्त मोठा कप नको नेउ, टाकून देतात. जे त्यांनी दिल तेच खाल्ले तिने, पण हालचाल नसल्याने जास्त काही खाल्ले नाही.

Milindaa
Friday, January 26, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही मुलांसाठी दूध कितीही नेऊ शकता, मी स्वतः नेले आहे. फक्त तुम्हाला त्या लोकांसमोर त्याची चव घ्यावी लागते.

बाकी घरुन मुलांचे नेहमीचे खाणे घेऊन जाणे केव्हाही चांगले असते. ते घेऊन जायला काहीही अडचण येत नाही.


Nisha_v
Friday, January 26, 2007 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हा अनुभव आहे बाप रे!!!

Chioo
Friday, January 26, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Please कोणाला SpiceJet चा अनुभव आहे का?

Shonoo
Friday, January 26, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Flying with kids :

On Lufthansa and several other air lines you can order children's meal- you get chicken nuggets, mac& cheese, fries, PB& J sandwich, applesauce, etc.

I have taken PBJ sandwiches in zip lock containers, milk in sippy cups and small tetrapacks of milk and juice ( Frooty, Appy etc.) both on domestic flights in India and flights to and from US to India via Europe.

Other things that are good to have handy - gummy bears- help with the ear pressure, hard candy, oreo cookies, gold fish, pudding cups - don't need refrigeration.

I have also travelled with some favorite DVDs and a laptop/portable DVD player, coloring books, crayons and sticker sheets.

You can carry playing cards for older kids.

Carry a few packs of liquilytes - this is the american cousin of electral, some benadryl, cough medicine and fever-medicine-pain killer of your choice .

Plenty of wipes, spare clothes for the kids and yourself, swipe a few air sickness bags from your first flight and keep them handy, several small plastic bags to wrap/dispose soiled clothes, small roll-on fragrance,

And of course lots of patience !

Milindaa
Friday, January 26, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, आम्ही जेवढं 'एकूण' सामान नेतो तेवढं तू फक्त हातातून नेतेस असं दिसतंय :-)

Storvi
Friday, January 26, 2007 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा अजुन लेकीला घेऊन प्रवासाचा योग आला नाही काय? :-)

Prajaktad
Friday, January 26, 2007 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू! thanks for some good sugestions.
मिलिंदा !


Milindaa
Friday, January 26, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बस का.. आताच जाऊन आलो की भारतात.. सहलेक :-)

Dineshvs
Saturday, January 27, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chioo स्पाईस जेट, एअर डेक्कन, गो एअर या सगळ्या लो कॉस्ट एअरलाईन्स आहेत.
लो कॉस्ट म्हणजे, विमानात काहिही फ़ुकट खायला प्यायला देत नाहीत.
त्यांची टिकेट्स अगदी स्वस्त आणि कधी कधी तर फ़ुकटहि देतात. ( फक्त टॅक्स भरायचा असतो. )
जर तिकीटाची किम्मत ३०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर ती रद्द केली तरी परतावा मिळत नाही.
खाणेपिणे असे सोपस्कार नसल्याने, हि विमाने आल्यावर २० मिनिटाच्या आत उडतात. त्यामुळे बहुदा वेळेवर सुटतात
यापेक्षा जात माहिती हवी असेल, तर त्यांच्या वेबसाईट्स आहेतच, त्यावर पुर्ण माहिती असते.
मी आजवर बर्‍याचवेळा एअर डेक्कनने प्रवास केलाय, मला तरी वावगा अनुभव आला नाही.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators