Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 29, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through January 29, 2007 « Previous Next »

Tanyabedekar
Friday, January 19, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल धूम बघितला. एकच शब्द. भयाण.
मला वाटते की मी फाइट क्लब किंवा पल्प फिक्शन असेच पिक्चर बघणे चांगले.


Dineshvs
Sunday, January 21, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मणिरत्नमचा गुरु बघितला. उत्तम दृष्टिसुख. ऐश्वर्यासकट सगळ्यांचा उत्तम अभिनय. पण सिनेमा कुठेतरी फसल्यासारखा वाटतोय. खुद्द दिग्दर्शकालाच जर नायकाची फिलॉसॉफी पटलेली नसेल, तर तो काय न्याय देणार ?
हा सिनेमा गुरुभाई देसाई नामक एका उद्योगपतिची कथा सांगतो. आता हे नाव, धिरुभाई अंबानी या नावाशी मिळते जुळते आहे, हा आपण निव्वळ योगायोग समजायचा. ( माझ्या ऐकण्यात तरी गुरुभाई हे नाव गुजराथी लोकात नसते. गुरु हा शब्द प्रथम दादा, या अर्थानी, मला वाटते, रमेश पवारानी एका मराठी नाटकासाठी वापरला. बाळ धुरी आणि उषा कलबाग, नंतर नाडकर्णी, या दोघानी या नाटकाद्वारे पदार्पण केले. )
खरे तर तो त्याच्या जीवनावर आधारित आहे, आणि तो तसा अजिबात नाही, असा दोन्ही बाजुने भरपुर प्रचार झाला होता.
मुळात हा सिनेमा सादर करताना अनेक तडजोडी कराव्या लागल्या आहेत.
कथा बरिचशी त्यांच्या जीवनाशी समांतर आहे. पण नायकाच्या फिलॉसॉफीला विरोध करण्यासाठी योजलेली पत्रकारांची योजना, त्यांची कामगिरी अगदीच तकलादु आहे. शिवाय नायकाच्या आणि त्या तिघांच्या नात्यामुळे, तो विरोधहि अगदीच बोथट झालाय.
हि पत्रकारांची कार्यपद्धति, अगदी आजकालच्या चॅनेल्सप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी, मुद्दाम केल्यासारखी आहे. त्या करता ट्रिक फोटोग्राफी वैगरे वापरली जाते. ( प्रत्यक्षात चित्रलेखा, या साप्ताहिकाने, अंबानीविरुद्ध अगदी सडेतोड रिपोर्ट छापला होता. त्यात अगदी थेट आकडेवारी आणि माहिती होती. दिग्दर्शकानी त्या माहितीचा उपयोग करायला हवा होता. ) नायकाचा दुसरा विरोधक, त्याचा मेहुणा, पण त्याला नंतर गायबच केलेय. शिवाय त्याचा विरोध तात्विक कारणांपेक्षा, त्याला विश्वासात न घेता, पब्लिक ईश्यु काढला, म्हणुनच आहे.
जर हुंडा घेतला म्हणुन त्याचा राग म्हणावा, तर त्याला त्याची कल्पना होतीच, शिवाय त्याची बहिणहि गावात बदनाम होती. आणि त्याचे बहिणीच्या घरी राहणे, कसे त्याच्या तत्वात बसले ?
या उद्योगपतिवर झालेले आरोप, हे मुख्यत्वेकरुन चोरटी आयात आणि कर चुकवण्याबाबत होते. त्याची तुलना महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाशी केलेली आहे. आणि ते खुपच हास्यास्पद ठरले आहे.
प्रत्यक्षात रिलायन्सच्या तथाकथित प्रगति मधे, भ्र्ष्टाचारी राजकारणी, हवे तसे वाकवलेले कायदे, यांचा सहभाग मोठा होता. आणि हि बाजु या सिनेमात तितकाश्या प्रकर्षाने जाणवतच नाही.
जेंव्हा रिलायन्सवर आरोप होत होते, तेंव्हाहि त्यांच्या लाखो भागधारकांची बाजु मांडण्यात आली होती. या सिनेमातहि तसेच झालेय. खरे तर हे भागधारक लाखो असले तरी, ते या सिनेमात म्हंटल्याप्रमाणे गरिब वैगरे नव्हते, आणि ती संख्या मोठी असली तरी भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत, प्रातिधिनिक नव्हती.
दिग्दर्शकाला वाटले असते तर जाचक करपद्धति, भ्रष्ट राजकारणी, लायसन्स राज, सरकारी नियमांचे जंजाळ या विषयाना तो स्पर्ष करु शकला असता, पण ते झालेले नाही.

अभिषेकने मन लावुन अभिनय केलाय. अर्थात दिग्दर्शकाची साथ तितकीच मोलाची आहे म्हणा.
त्याच्या पत्नीच्या भुमिकेत ऐश्वर्या आहे. तिची बिचारीची कुणी समीक्षक दखलच घेत नाही. पण तिचे पात्र सिनेमातहि महत्वाचे आहे. एक प्रसंग सोडला तर कायम नवर्‍याच्या मागे ठामपणे उभी राहणारी पत्नी तिने छानच उभी केलीय. अनेक प्रसंगात तर ती केवळ मॉबचा भाग बनुन राहिलीय, तरिही तिचे अस्तित्व जाणवतेच. वय वाढल्यावर आलेली ग्रेस पण तिने छान दाखवलीय.
शेवटी ती ऐश्वर्या असल्याने, सिनेमात तिचे तीन नाच आहेत. परत ती ऐश्वर्या असल्याने, तिच्या स्टेप्स अतिषय ग्रेसफुल आहेत. नृत्यातली चपळाई तर नजर न ठरेल अशी. त्यापैकी दोन नृत्यांचे चित्रीकरणहि लाजबाब झालेय. पण तरिही, त्या भुमिकेला ते नाच पुर्ण विसंगत आहेत.

हली कायदा झाल्याप्रमाणे, मल्लिकाबाईंचे आयटम सॉन्ग आहे. पण बाई गं बेली डान्स असा नसतो, असे नम्रपणे सांगावेसे वाटते. ज्यानी खरोखर बेली डान्स बघितला असेल, तर त्यातली चपळाई आणि वेग, किती वेगळा असते, हे हा नाच बघुन नक्कीच जाणवेल. या आयटम गर्ल्स जर नृत्यनिपुण असत्या तर, सगळीच आयटम सॉंग्ज कजरारे, झाली असती हो. हा नाच तिच्यापेक्षा कॅमेरानेच केलाय असे म्हणावे लागेल.

केवळ पाच सहा प्रसंगात असणारी विद्या बालन, छानच काम करुन जाते. तिसर्‍याच सिनेमात, अशी भुमिका स्वीकारल्याबद्दल, ती कौतुकाला पात्र आहे. पण तिचे पात्र कितीहि मोहक असले तरी, तिच्यामुळे नायकाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या संपादक आणि पत्रकार यांच्या विरोधातली हवाच निघुन गेल्यासारखी झालेय. या दोन भुमिकात मिथुन चक्रवर्ती आणि आर माधवन आहेत. दोघानीहि नीटस कामगिरी केलीय.

ईतर भुमिकात असणार्‍या अनंग देसाई, सरिता जोशी, जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी आदी सगळ्यांची कामगिरी नीटस आहे.
राजीव मेननची फोटोग्राफी तर अत्यंत नेत्रसुखद आहे. गुजराथेतले इदर गाव, तिथला डोंगर, त्यातली लेणी, सरोवर, धबधबा सगळेच देखणे आहे.
कलादिग्दर्शकाची कामगिरी पण छान आहे. वरळी सीफ़ेसला दिलेला त्याकाळचा लुक, विलोभनीय आहे. कपडा बाजार, गुरुचे राहते घर यातुनहि त्याकाळची मुंबई उभी राहिलीय. आपल्या पिढीला बघायला न मिळालेली ट्रामहि यात दिसते. ( पण त्याकाळी ट्राम अशी भरवस्तीतुन जात होती का, याबाबत मला शंका आहे. )

दिग्दर्शकानी टिपलेली मॉब दृषे खुपच सुंदर आहेत. वार्षिक सभेची वैगरे दृश्य तर छानच साकार झालीत.
सिनेमातले संवाद खुपच चुरचुरीत तरीहि नैसर्गिक आहेत. ( प्रादेशिक भान ठेवुन गुरुच्या तोंडी रिजरवेसन आणि नायिकेच्या तोंडी लगेचच रिझरवेशन, हे जरा खटकेल, दोघेहि एकाच गावचे म्हणुन. )

ए आर रहमानचे संगीत नेहमीप्रमाणेच, म्हणज़े ढॅण ढॅण तालातले आणि विषयाशी पुर्णपणे विसंगत. असे संगीत असल्याने, नृत्यदिग्दर्शिकेलाहि प्रादेशिक टच देता आलेला नाही. गाण्यात नैसर्गिकपणा नाहीच, त्यावर मणिरत्नमच्या दाक्षिणात्य शैलीचा बराच प्रभाव आहे. भांगेचे उबग आणणारे गाणे सोडले तर, बाकिची गाणी देखणीहि आहेत.
गुलजारने फारशी मनापासुन गाणी लिहिलीत असे वाटत नाही. अनेक प्रसंगात बॅकग्राऊंडला गाणी वाजतात, पण मुळात विषयालाच गाण्यांची गरज नसल्याने, ती पुर्णपणे विसंगत वाटतात. शिवाय गुलजारचे शब्द नीट पोचवु शकतील, असे गायक गायिकाहि नाहीत.

शेवटी, रोजा, बॉंबे, दिल से ची जादु ईथे नाही, हेच खरे.




Lalu
Monday, January 22, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मी पाहिलेले काही -

-'Casino Royale' बॉन्ड आवडला. :-)
-'Nowhere in Africa' ठीक आहे.
-'Take the Lead' हा ballroom dancing वरचा, ठीक आहे. यात Antonio Banderas चा एक Tango आहे, तेवढ्यासाठी बघितला तरी चालेल.
-'Children of Heaven' याबद्दल वाचले इथेच, मलाही आवडला.
-'All the King's Men' आवडला.
-'Little Miss Sunshine' पहाच! यात Signs मध्ये होती ती लहान मुलगी आहे Abigail Breslin तिने आणि बाकी सगळ्यांनीच काम छान केलंय.
-'The Devil wears Prada' ( DJ, पाहिलास की नाही? :-) ) फॅशन मॅगेझिन साठी काम करणारी आणि तिची खडूस बॉस. यासाठी मेरिल स्ट्रीप ला Golden Globe का दिलं मला कळलं नाही. एमिली ब्लन्ट ने छान काम केलंय.
-'Dreamgirls' अजून पाहिला नाही, पण पहायचा(च) आहे. तुम्हीपण पहा(च). :-)


Mbhure
Monday, January 22, 2007 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल बायकोच्या आग्रहास्तव " गुरु " पाहिला. वरील सर्वांचा आदर ठेऊन सांगावेसे वाटते की एक " युवा " सोडला तर मणीरत्नम् मला कुठचाही चित्रपट खास वाटला नाही. चित्रपटांची सुरुवात छान असते पण नंतर तो ढेपाळतो. मध्ये जरा चित्रपट रंगणार असे वाटते न वाटते तोच परत...(भारतीय क्रिकेट संघाप्रमाणे) मला त्याबद्दल फारसे काही वाटलेही नसते; पण मणीरत्नम्च्या दिग्दर्शनाचा फारच उदोउदो केला जातो ह्याचे वाईट वाटते.

दिनेशने लिहीले खरे आहे. लग्नाच्या बुफेप्रमाणे खुप पकव्वाने आहेत पण मेजवानीला म्हणावी तशी मजा नाही. काहीतरी कमी जाणवते.

अभिषेकने छान काम केले आहे. त्याच्या चाहत्याने अवश्य बघावा. फक्त शेवटच्या प्रसंगात लकवा किंवा त्याचा इफेक्ट अजिबात जाणवत नाही. मला ऐश्वर्या मला कायमच नाटकी वाटते. ती नाचतेही ODD . कदाचित हे माझे One track thinking असेल. तिची डायलॉग डिलीव्हरी कायमच विचीत्र असते. (परत क्षमा...) त्यात इंटेन्सिटीच जाणवत नाही. नविन अभिनेत्रीत विद्या बालन चांगले काम करते.

कुठीही गाणी टाकणे ही तर मणीरत्नम्ची हातोटी आहे. चित्रपट आता वेग पकडेल आणि काहीतरी घडणर असे वाटते तोच बेली डान्स, ते भांग पिऊन गाणे(ह्या नवरात्रीची तोड झाली)

वयांची गफलत बरीच आहे. ज्याप्रमाणात गुरुचे वय वाढते तसे त्याच्या बायकोचे वाढत नाही. दोघेही सुरुवातीला हाल काढतात. पन त्याचा परिणाम फक्त गुरुवरच दिसतो. मिथुनला आपल्या वडिलाप्रमाणे गुरु मानतो पण त्या दोघात फारतर वीस वर्षांचे अंतर असल्याचे नंतर एका संवादात आहे. मिथुनच्या वागण्यात वयाचा काहीही परिणाम दिसत नाही. एकंदरीत चित्रपटात साधारण ४५ - ५० वर्षाचा काळ आहे पण तसे वाटले नाही.

चित्रपटाचा बहुतेक पैसा कलाकारांवर आणि (नको असलेल्या) गाण्यातील भव्य सेटवर खर्च झाल्यामुळे असेल कदाचित(किंवा माझा पुर्व ग्रह म्हणा) जुन्या मुंबईचा देखावा फारच नाटकासारखा वाटला.

मणीरत्नमच्या चित्रपटाचे छायाचित्रण नेहमीच देखणे असते पण ते बर्‍याचदा चित्रपटाला मारक ठरते. सिनेमापेक्षा ते Ad- Film सारखे होते.

वरील सर्व माझी मते आहेत. मणीरत्नम् हल्लीच्या महान दिग्दर्शकात मोडला जातो म्हणुन हे चर्‍हाट.

लग्नाचे जेवण एकदातरी ते जेवावेच लागते.


Deepanjali
Monday, January 22, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण गुरु फ़क्त अभिषेक आणि चक्क ऍश च्या ही अभिनया साठी आवडला .
अभिषेक नी जबरदस्त रंगवलय गुरु चे character!
अर्थात म्हातार्‍या गुरु ची style वर बापाचा जबरदस्त प्रभाव दिसतो , आणि त्या शेवटच्या speech मधे तर वाटते कि अमिताभ च बोलतोय कि काय :-) , पण तरीही अभिषेकला ते माफ़ , कारण Big B चा वारसा फ़क्त हाच एकटा चालवु शकतो याची पुन्हा एकदा खात्री पटते !
अभिषेक ने गुज्जु भाय वाटला पाहिजे म्हणून बरेच वजन वाढवलय त्यामुळे सुरवातीला मात्र जितका तरुण दाखवायचाय तितका तो अज्जिबात दिसत नाही .
वर भूषण नी लिहिलय त्या प्रमाणे सगळ्या characters ची नक्की काय वयं आहेत तरी काय ते समजत च नाही !
एका scene मधे मुद्दाम अभिषेक च्या उघड्या पोटाचा close up घेतलाय ते पाहून अभिषेक च्या तमाम fans ना चिंता वाटली असेल कि हे flat होई परयंत किती महिने जाणार !!
ऍश ने ही गुरुभाईच्या बायको चा role चांगला केलाय .
शिवाय मिथुनदा पण चांगला वाटलाय .
पण वर सगळ्यांनी लिहिलय तसा " गुरु " पटकथे मधे मात्र दणकून मार खातो , शिवाय मणीरत्नम च्या direction मधला काही केल्या न जाणारा south Indian touch यातही जात नही !
गाणी पण typical रेहमान छाप !
कितीही गुजराथ चे खेडे आहे असे ओरडून सांगितले तरी तो रेहमान सारखा सरखा " मंगल मंगल मस्त मस्त " असा गळा काढतो आणि ते एखादे तमिळ गाव वाटायला सुरवात होते !
त्यातून गजरे वाली heroine आणि group dancers अगदी typical घागरा हातात पकडून उड्या मारत मारत south Indian style मधे नाचतात .
त्यातले ' नन्न्ना रे ' गाणे तर अगदीच पकाउ वाटते .. शेम टू शेम दिल है छोटासा style चित्रीत केलय !
शिवाय ते " येमो येमो येमोले " एकदम कुची कुची रख्मा सारखे !
मल्लिका ताई belly dancer अजिबात वाटत नाही , तिथे खरीच एखादी professional belly dancer का नाही आणली मणी रत्नम ने ?
मणीच्या इतर movies प्रमाणे यातही hero ने एखाद्या म्हातर्‍या बाईला उचलून घेउन नाचणे , भर पावसातले mob scenes वगैरे आहेच !
तरीही एकंदरीत गुरु एकदा पहाण्या सारखा नक्कीच आहे .
एक मात्र वाटले कि गुरुभाय ची journey दाखवताना त्याचा सुरवातीचा common man जो संघर्ष करतो तो part अजुन रंगवायला पाहिजे होता !
हा संघर्ष आणि end पण गुंडाळलाआहे मणी रत्नम ने .





Mbhure
Monday, January 22, 2007 - 9:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपांजली, मला हेच म्हणायचे आहे की नुसते वजन वाढवून गुजताथी नाही वाटत. त्यासाठी दिग्दर्शकाने जरा अभ्यास करायला हवा होता.

तो धबधबा मला साऊथकडचा वाटला. बरेचशे हिरवेगार चित्रण दक्षिणेतलेच वाटले.

तसेच नको ती पात्र घुसडवली आहेत पण राजीव गांधीचे पात्र न दाखवून (पाठमोरे) कसला Director's touch साधला आहे कोण जाणे?



Mansmi18
Monday, January 22, 2007 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Friends,

We love Abhishek too much I think:-) I have not seen "Guru" so it will not be appropriate to comment on how the movie is.

However from the promos that I have seen I dont know how he has handled "Old" gurubhai.
His body language from the promos atleast does not seem like that of an old man. In the promo when he says "when someone criticizes you remember that you are making progress" it seems like a young man in the disguise of an old man is talking.

I really want him to be successful.(afterall he is abs baby). However he does not seem to work hard like Hritik does.
His Bunty aur Babli was a royal disaster and so was his role in Yuva.(over the top).

I think I will have to watch Guru to change that opinion.

Does anyone here concur with me that Mani Rathnam is over hyped director and he has been preachy in Dil se, Yuva and Guru and therefore not really successful commercially?

(I know I have written against 2 Daivats of some people Abhishek and Mani Rathnam so I am expecting lot of halla on me:-)

Peace.

Farend
Tuesday, January 23, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalu Little Miss Sunshine मधे त्या मुलीचे हावभाव एकदम छान आहेत, इतरांची कामेही छान, पण त्यातून काय सांगायचे आहे ते जरा डोक्यावरून गेले (चित्रपट. तुमचे इथले लिखाण नाही :-) ). जरा 'ऑस्करी' वाटतो.

Cars बद्दल इथे येऊन गेले आहे का? अगदी जरूर पाहा. अतिशय सुंदर चित्रपट आहे. Disney & Pixar परत एकत्र चित्रपट करणार हे बरे झाले.


Sami
Tuesday, January 23, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मुळात ते मणी रत्नम, a.r.rehman आवडत नाहीत. पण गुरू मात्र बघायला लागणार आहे अभिषेकसाठी.
mansmi18, कोणी हल्ला करणार नाही हो, (भांडतील हवं तर.)


Dineshvs
Tuesday, January 23, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mbhure मला याबाबतीत जाणकारांचे मत जाणुन घ्यायला आवडेल. पण ऐश्वर्याच्या नृत्याबद्दल माझे मत असे आहे.
तिच्या स्टेप्स खुपदा कथ्थकच्या असतात. पण ईतर कथ्थक नर्तकांपेक्षा तिच्या हालचालीत जास्त चपळाई आहे.
अनेक कथ्थक नर्तक, पुढे अंगाने सुटत जातात. चक्कर मारणे, हा एकच प्रकार सोडला, तर कमरेच्या फारश्या हालचाली नसल्याने, आणि जोरजोरात पाय आटपुन तत्कार केल्याने, ते नर्तक अंगाने सुटत जात असावेत.
सितारादेवी, आशा पारेख, लक्ष्मीछाया अशी अनेक उदाहरणे आहेत.
शिवाय त्यांचा चेहराहि उग्र होत जातो. तसे ऐश्वर्याचे झालेले नाही.
त्यामानाने ईतर पद्धतीचे नर्तक मात्र, बांधा राखुन असतात.
हेमामालिनी, वैजयंतीमाला, मिनाक्षि शेशाद्री, हि काहि उदाहरणे.
ऐश्वर्याच्या नाजुक बांध्यामुळे, तिच्या हाताच्या आणि बोटांच्या हालचाली खुप नजरेत भरतात.



Seema_
Tuesday, January 23, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसी काळजी करु नको . होईल सगळ ठिक . ~D
Rumour has It बघितला. Full TP आहे . Jennifer Aniston खास नाही दिसली . Movie मला आवडला .
वरती कुणीतरी लिहलेल म्हणुन Momento बघितला . वेगळा आणि चांगला वाटला . पण मला त्या वेटर बाईच रहस्य जरा कळल नाही .
My cousin Vinny अजुन कुणी बघितला नसेल तर नक्की बघा . मस्त आहे .


Lalu
Tuesday, January 23, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Farend, मला वाटतं त्या छोट्याष्या प्रवासात प्रत्येक पात्राला एका नवीन गोष्टीची जाणीव होते, किंवा धडा मिळतो.

मागे एकदा animated मूव्हीजची चर्चा झाली होती. Wallace and Grommit-The curse of the were-rabbit पाहिला का? मस्त आहे. :-) मागच्या वर्षीचा आहे. मुलांसाठीचे बहुतेक सगळे animated मूव्ही बघून होतात. 'जन्गल बुक' सगळ्यात आवडता असता तरी हल्लीच्या काळातले हे आवडलेले काही.
Toy Story 1 and 2
Bug's Life
Shrek
Incredibles
Finding Nemo
Monster's Inc.
Spirited Away
Ice Age 1 and 2
Wallace and Grommit-The curse of the were-rabbit
Corpse Bride
Madagascar
Happy Feet
Cars



Chandya
Tuesday, January 23, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Brother bear पाहिलाय का कोणी? मला आवडला. Shark tale अजिबात नाही आवडला. Over the hedge देखिल विशेष काही वाटला नाही.

मध्यंतरी Dead man walking हा एक जुना पिक्चर पाहिला. शॉन पेन मस्तच काम करतो पण susan sarandon तितकी प्रभावी वाटली नाही.

नविन डॉन ठिक वाटला. अमिताभचा ठसा मिटवण्याचा शाहरुख बालिश प्रयन्त करतोय ( KBC2 हे आणखी एक उदाहरण). चित्रपटाला वेग चांगला आहे. डॉनचा रिमेक करण्याऐवजी एक वेगळेच कथानक तयार करुन पिक्चर बनवला असता तर कदाचित जास्त आवडला असता.

बहुतांश हिंदी चित्रपट इतके पकाऊ येऊन गेलेत कि त्यांना अनुल्लेखाने मारलेले बरे. :-)

कोठारेंचा 'खबरदार' पण तितका काही विशेष नाही. थोडेफार चांगले विनोद आहेत. बाकी नेहमीचेच तारस्वरात बोलणे आणि फुकाचा गोंधळ आहे. भरत जाधव, नार्वेकर यांच्या अभिनयात नाटकाचा प्रभाव जाणवतो.

'सावरखेड एक गाव' सुरुवातीला पकड घेतो पण नंतर येरे माझ्या मागल्या.

मराठी सिनेमाला चांगले दिग्दर्शक लाभलेत हे एक स्वप्नच म्हणायचे तर :-) (अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता- सुमित्रा भावे, सुरकर, कांचन नायक, जब्बार पटेल).


Zakasrao
Wednesday, January 24, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

४-५ दिवसांपुर्वी उत्तरायण पाहिला. (३र्‍या वेळेला)
खुप छान चित्रपट आहे. गाणी मस्त आहेत. सर्वांचा अभिनय चांगला आहे.
मला आवडलेल्या अलिकडच्या मराठी चित्रपटांपैकी एक.


Mbhure
Thursday, January 25, 2007 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mansmi18 आजच तुझे पोस्ट वाचले. मी अगदी ह्याच मताचा आहे. मणी रत्नम् उगाचच मिडीयाने मोठा केलेला दिग्दर्शक आहे. कौटुंबिक प्रसंग तो चांगले दाखवतो. पण बाकी खास काही नसते; युवा सोडुन.

रोजा चालण्याचे मुख्य कारण त्यावेळी नविन वाटलेले ए. आर. रेहमानचे संगीत आणि अरविंद स्वामी. माझ्या एका मैत्रीणीने केवळ अरविंद स्वामीसाठे रोजा ४ - ५ वेळा बघितला. बॉम्बे हा ABCL ने नेहमीप्रमाणे रिलीजच्या आधी वादंग निर्मान करुन चित्रपट चालवायचा प्रयत्न केला होता. ७ की ८ व्या आठवड्यात मी पाहिला तेंव्हा थिएटर खाली होते. दिल से बद्दल न बोललेलेच बरे.

Anyway तुझ्या मताचे आहेत काहीजण ह्या BB वर. घाबरु नको. :-)




Adi787
Sunday, January 28, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,

चित्रपट तर नाहि पण मी ही link share करु इच्छितो.. सचिन आणी सुप्रिया.. आपली मर्‍हाठी जोडी... छान performance..

http://www.youtube.com/watch?v=qcu1gl96JNc&mode=related&search=

Maitreyee
Sunday, January 28, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Devil wears prada : एक हुषार पण अजिबात फ़ॅशन चा सेन्स नसणारी मुलगी ( ugly duckling types ) जर्नलिस्ट व्हायच्या ऐवजी चुकून फ़ॅशन magazine च्या extremely glamourous चकचकित दुनियेत येते.. एक बिनडोक जॉब घेऊन! यापुढे काय होणार ते पहिल्या १५ मिनिटात लक्षात येते पण तरीही (माझा तरी) चांगला टाईम पास झाला बघतना. fashion प्रेमींनी जरूर पहावा :-) सही कपडे, glamourous formal wear, party wear, coats, shoes, bags..!woww! रेलचेल आहे अगदी:-)
movie चे नाव वाचून ' prada? म्हणजे काय असतं??' असा प्रश्न पडला तर मात्र movie बघण्याची तसदी घेतली नाही तरी चालेल :-O


Asami
Monday, January 29, 2007 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MT सगळे मान्य करूनही प्रचंड irritating होता. प्रत्येक character एकसूरी होते.

आत्ता तू म्हणशील कि तू का chick flick बघितलास ? तर friday/saturday ला बायकोला miami vice नि black dahlia बघायला लावायची शिक्षा काल भोगली . बापड्या shakespear ला वेठीला धरायचे तर hell hath no fury like woman angry

PS : ह्या w/e ला snakes on plan आणायचा म्हणतोय. बचेंगे तो और भी लढेंगे.


Lalu
Monday, January 29, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एमिली ब्लन्ट नाही आवडली कारे? आणि मला वाटतं कधी नव्हे ते Stanley Tucci जरा कमी irritating होता.
DJ ने पाहिला की नाही प्राडा?


Maitreyee
Monday, January 29, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


लालू, मला आवडली एमिली:-)
असाम्या :-)
snakes च प्रोमो पाहिलाय, मलापण त्यातल्या प्रत्येक snake चे character एकसुरी आणि irritating वाटले रे
:-P


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators