विचार करा २ तास त्या मस्तरान्नि त्या टोयलेट मध्ये काय केल आसेल...................
|
Vinya
| |
| Wednesday, January 17, 2007 - 3:18 pm: |
| 
|
नितीन, तुम्ही २ तास देउन जरा चांगले मराठी लिहायला शिकाहो. तुमच्या कडे खूप चांगले सांगायला आहे पण आम्हाला वाचताना त्रास झाला नाही तर अजुनच मजा येइल. देवनागरीत लिहीण्यासाठी मायबोली वर मदत मिळु शकते. बघा जर शोधुन.
|
Zakki
| |
| Wednesday, January 17, 2007 - 3:20 pm: |
| 
|
मेथी कडू असते ना मग बायकोला मेथीची दिनेश, याला Backhanded compliment म्हणतात. 'शेजारच्यांचा गोट्या अभ्यासात हुषार हो, दिसायला असेना का वेडाबिद्रा!' यासारखे एक उदाहरण पु. लं. च्या लिखाणात आहे. महाराष्ट्रातील पूर्वी विद्येचे, मराठीचे, माहेरघर समजल्या जाणार्या शहरात अश्या व्यक्ति अनेऽक होत्या. आताहि असतील, पण त्या हिंदीत किंवा इंग्रजीत बोलत, लिहित असतील!
|
विनायक कुनाच्या चुका काढन खुप सोप्प आसत. असो मि चुकत आहे हे माहित आहे प्रयत्न चालु आहेत थोडा वेळ लागेल. आगदिच न वाचन्या सारख आहे का आपन मय बोलि वर फ़ार जुने दिस्ता तुमचि पहिलि सुर्वात आचुक होति का? आसेल हि मि तुमच्या ईतका ग्रेट नाहिये वो माला वेळ लागेल मानसाला चंद्रा वरचे कळे डाग पटकन दिसतात.
|
Kiru
| |
| Thursday, January 18, 2007 - 6:39 am: |
| 
|
नितिन, चांगलं लिहिताय.. तुमच्या प्रयत्नांत (देवनागरी लिहिण्याच्या) माझी ही खारीची मदत. तुम्ही type केल्यानंतर एकदा ' Preview/Post Message' वर click करुन लिहिलेले तपासून पहा. झालेल्या चुका सुधारता येतात तिथे. आणि विन्या म्हणतोय त्याचा राग मानू नका. मोठ्या posts वाचताना त्या शुद्ध असतील तर अधिक वाचनीय होतात.. लिहिण्यांत तरी वेंधळेपणा करु नका हो.. तेंव्हा fair & lovely लावा (डाग घालवण्याकरता) आणि करा बघू सुरुवात.. (दिवे घे रे.. )
|
आपल्या सगल्यांच्या मार्ग दर्शना चे मनापसुन आभार चुकित नक्किच सुधात होईल. वेळ लगेल
|
ईयात्ता ३ रि ला होतो. लहान पणा पासुनच मस्ति खोर पण मस्ति कधि कधि आंगाशि यायचि शाळा सुटायला १० मि. बाकि होते, मित्र मला म्हनाला हि जि समोर बसलि आहे ना खुप शहाणि आहे हिनेच आपल नाव काल बाईन्ना सांगितल. कि आपनच काल मस्ति केलि मला हे कळल्याने पुधच्या बाका वर बसलेल्या दोन्हि मुलिंचा खुप राग आला लहान होतो कुठे काय कळायच त्या वेळे मुलि ह्या सगल्यात मोठ्या दुशमन आता तस नहिये मग चांगला ढडा शिकवायचा ठरवल. मझा मित्र हुशार त्याने आयदिया दिलि. म्हट्ला ह्या दोघिंच्या फ़्रोक च्या ज्या पट्या आहेत त्या एक मेकाला बान्ध आणि मग मि कय तसच केल हालुच बाकाच्या खालि गेलो आणि दोघिंच्या फ़्रोक च्या पट्ट्या एक मेकात बांधल्या. लहान पनि माहित आहेना शाळेचे गनवेश तसा तो मुलिंचा ड्रेस होता मगे दोन शेप्ट बांधायला आल लकश्यात आल का? हा आणि मग शाला सुट्लि आणि गम्मत सुरु.................. दोघि उठल्या आनि परत धडकन खालि बसल्या आगोदर त्यन्ना कळकच नाहि आस का झाल हि ईकडे ओढते तो तिकडे............. खेचा खेचि चालु सग्ला वर्ग हास्तोय आणि आम्हि दोघे वह्याद पण हसत होतो खुप हसलो (नंतर आम्च काय झाल सांगतो) दोन्हि बजुंना खेचुन गठ खुप पक्कि झालि त्या दोघिंना पण ति गाठ सोडवलि नहि मग त्यांचि रडारड झालि मुलि ह्या नेहामि रड्क्या आस्तात हे तेह्व्हा पहिल्यान्दा कळाल कारन बिचार्या खुप रड्ल्या मग वर्गा च्या बई आल्या कुनि बन्धल आस म्हनत गठ सोडण्याचा मना पासुन प्रयत्न केला पण ति कुठे सुटत होति मग आम्हि ग्यास वर आलो बान्धुन बान्धुन कोन होत गठ बांधनार मागे बसलेले दोन शहाने तिथल्या तिथे जाम फ़टलावल बिचार्या मुलि रडत होत्या आता माम्हि मार खात होतो तेव्हा तरि गप्प बसायचना जरा कमि पड्या आस्त्या पन नहि (मुद्दाम ) मोठ मोठ्याने रडायला लगल्या आनि आम्हि तितकेच फ़ट्के खाल्ले पुढे त्या मुलिंच काय झाल माहित नाहि......... पण आम्च खुप काहि झाल. सांगतो नंतर.
|
१)कंप्यूटर वर बसून कामं करताना 'माऊस' समजून टेबलावरचा मोबाईल किंवा चहाचा वाफाळता कप फिरव फिरव फिरवलाय का? २)चॅट वर मैत्रिणीच्या विंडोत तिच्याच नावाने बोंबा मारल्या आहेत का? ३) TVS Scooty वर पायाच्या ठिकाणी ब्रेक शोधत झाडात गाडी घातली आहे कधी? ४)गरम इस्त्री धसमुसळेपणाने पाडून हाताने ती कच करायची धडाडी तुमच्यात आहे? ५)गप्पांच्या नादात आपलं स्टेशन विसरलाय? ६)८:३० च्या लग्नासाठी ९:०० वाजता उठून शेजारच्या मंगलकार्यालयात जाऊन, आहेर देऊन न जेवता आलाय? ७)आईने मीठ घातलेल्या पदार्थात उत्साहाने जाऊन न विचारता अजून मीठ घालून आलाय? ८) Airport वर ना पाहिलेल्या पाहुण्याला receive करताना placard ची पाठकोरी बाजू बाहेर धरली आहे? ९)झोपेत मोलकरणीसाठी फक्त लाकडी दार उघडून लोखंडी दरवाजा उघडायचा विसरलाय? १०)कधी अख्खी गाडी पार्किंग मध्ये विसरून मित्राबरोबर गप्पा मारत पायीपायी घरी आलाय? हा माझ्या वेंधळेपणाचा टाॅप १० पाढा
|
काय राव, मस्तच आहे तुमचा वेंधळेपणा, तुम्हि फ़ारच शॉटकट मध्ये लिहिले, तडका लावुन मस्त १० पोस्ट झाले असते 
|
हो तर!! मग हा ही एक वेंधळेपणाच झाला! चला! माझे ११ झाले!! : D
|
Chyayla
| |
| Sunday, January 21, 2007 - 7:06 pm: |
| 
|
कालच झालेला हा वेन्धळेपणा, मित्र भारतात जात आहे तर त्याने अपार्टमेन्ट मधे एक ग्यारेज घेतले जेणेकरुन महिनाभर कार आतमधे सुरक्षित ठेवता येइल. काल मी त्याच्या कारनी शॉपिन्गसाठी निघालो. तर ती ग्यारेज चे शटर उघडण्यासाठी म्हणुन रिमोट होते त्याने उघडले व रिमोट कार मधे ठेवले. मी त्याला सहज म्हटल अरे हे रिमोट ईकडे तिकडे ठेवण्यापेक्षा कार मधेच ठेवत जा म्हणजे नेहमी घरातुन आणा परत ठेवा तुझाच त्रास वाचेल व एकाच ठिकाणी राहिल त्यामुळे तुला नेहमी शोधायची गरज नाही... मी आपले मस्त तर्कज्ञान पाजळले. मित्र थोडा वेळ विचार करायला लागला आणी गम्भिर चेहर्याने म्हणाला अरे मी रिमोट गाडीतच ठेवला तर गॅरेज चे शटर कसे उघडणार.... तेन्व्हा कुठे आमच्या दोघान्च्या लक्षात आल की हा काय वेन्धळेपणा सुरु आहे... आणी आम्ही दोघानी एकामेकाकडे चमकुन पाहिले मी आपला कप्पाळावर हात मारत होतो आणी मग आम्ही दोघेही खो खो.. हसायला लागलो.
|
Varshac
| |
| Sunday, January 21, 2007 - 7:14 pm: |
| 
|
एकदा मी घरी फोन करताना चुकून दुसराचा नंबर डायल केला. फोन एका मुलाने उचलला. त्याचा आवाज सेम माझ्या भावासारखा होता. आमच्यातील संवाद पुढीलप्रमाणे- तो:"कोण पाहिजे?". मी: "आईला फोन दे" तो: "कोणाची आई?" मी: "कोणाची काय, आपली आई" तो: "आई नाही आहे." मी: "नाटक बंद कर आणी लवकर आईला फोन दे" तो: "आई गावी गेलिय." मी रागाने फोन ठेऊन दिला. मी परत तोच फोन नंबर रिडायल केला. ह्यावेळी कोणितरी वयस्कर गृहस्थ होते. गृहस्थ: "कोण पाहिजे?" मी: "आई आहे का?" गृहस्थ: "हा wrong number आहे" तेव्हा कोठे माझी ट्युब पेटली की आपण दोनदा चुकीचा नंबर फिरवत होतो.
|
Chyayla
| |
| Sunday, January 21, 2007 - 11:09 pm: |
| 
|
ओहो.... अछा: ती तु होतीस होय? बरी सापडलीस या मायबोलीवर, तरी मी विचार करतच होतो ही कोण नेहमी माझ्या घरी Wrong Number लावुन बोलत असते. आणी नेमकी माझ्या आईला विचारत होती वर मलाच नाटक बन्द कर म्हणत होती.
|
Sakhi_d
| |
| Monday, January 22, 2007 - 5:35 am: |
| 
|
योगेश मस्त मजा आली वाचताना.... पण खरच जर तडका देवून लिहीले असतेस तर अजुन मजा आली असती............
|
Ajjuka
| |
| Monday, January 22, 2007 - 5:53 am: |
| 
|
आत्ताच गंमत झाली.. साखर बिखर आणि इतर गोष्टी आणायला दुकानात गेले. ३ हि वस्तूंची नावं आधी सांगितली मग त्या बाईने साखर वजन करून दिली, ब्रेड काढून दिला आणि तिसरं काय असं मला विचारलं.. किती वेळ मी पण आठवत होते मला दही हवं होतं ते.. ५ मिनिटं मी विचार केल्यावर त्या दुकानातल्या बाईला आठवलं मला दही हवंय ते.
|
खूप दिवसानी घरी गेले होते. रात्री तहान लगल्यावर उठले. झोपेत सगळ्या घराचे लाईट लावले. फ़्रीजमधून पाणी काढलं.. प्यायले आणि लाईट बंद करून झोपले. वेंधळेपणा लक्षात आला?
|
एक 'न्युटन' चा वेंधळे पणा वाचला होता, महाशयांनि एक मांजर ( फ़िमेल) पळल होत. ते मांजर कहि दिवसांनि जनल ( तिला ४ पिल झलि) आणि ति मांजर आणि तिचि पिल्ल फ़ार उड्या मारु लागलि सारखि आत बहेर करायचि ,आणि न्युटनला त्या मुळे सारखा दरवाजा उघडावा- बंद करायला लगायचा त्या मुळे प्रयोगंमध्ये त्याला व्यत्यय यायचा कामात व्यत्यय नको म्हणुन महाशयांनि दरवाजाला दोन होल पाड्ले एक मोठ आणि एक छोट. मोठ पिलांच्या आई सठि आणि लहान पिलांसाठि..... एव्हडा हुशार होता न्युटन.........
|
काय धम्माल येतेय वाचताना. योगेश तू लिहीलेत त्यातले ३-४ तरी जमलेत मला. पण स्कूटीची किल्ली पर्समधे ठेवून ती पर्स स्कूटीच्याच खालचा डिकीत ठेवून पाहिलीय का कधी? आणि कुणीतरी " किल्ली गाडीत ठेवतोय उतरलीस तर किल्ली घेऊन उतर " असं बजाऊन सुधा निगुतीनं दरवाजा लॉक करून बाहेर येण्याचा (किल्ली अर्थाच आत) पराक्रम केलाय का?
|
ते मांजर कहि दिवसांनि जनल ( तिला ४ पिल झलि)>>>>>>>>>>> लई भारी.............. लगे रहो. खुप मजा येत आहे
|
काय हो गनेश गवचि आठवन आलि काय
|