Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » Maitri » Archive through January 19, 2007 « Previous Next »

Radha_gd1
Wednesday, January 17, 2007 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्री.... खरच खूप छन विषय आहे. आधिचे सगल्यांचे वाचता वाचता एकदम खूप सारे मित्र मैत्रिणी आठवून गेले.
लहान असताना १ विक्रम वेताळ चि गोष्ट वाचली होती. त्यात एक मुलिसमोर अस १ प्रश्न असतो की तिला लग्नासाठी २ मुलांच्यात निवड करायची असते.१ मुलाचे नातेवाइक सज्जन असतात पण मित्र वाईट असतात.दुसर्या मुलाचे नातेवाईक वाईट असतात पण मित्र एकदम सज्जन असतात.तर शेवटी वेताळ विचारतो कि तिने कोणाला निवडावे? यावर विक्रम उत्तर देतो की नातेवाईक कसे असावेत हे कोणी निवडू शकत नाही पण मैत्री कोणाशी करावी हे मात्र आपण ठरवू शकतो त्यामुळे ज्याचे मित्र चांगले त्याच्याशि मी लग्न करेन.
हि गोष्ट इतकी मनात बसली की माझा मैत्रिवर पक्का विश्वास आहे.
मी कोल्हापूरची आहे पण आता ते सोडून १८ वर्षे झाली.पण अलीकडेच मला माझे शाळेतले जुने मित्र मैत्रिणी अचानक भेटले आणि काय आनंद झाला म्हणून सांगू!!
अजूनही खूप मित्र मैत्रिणी करायला मला खूप आवडते. अर्थात ते सगळेच काही एकदम fast friends नाही होऊ शकत पण तरी जेंव्हा काही कारणाशिवाय मैत्रि होते ती कायम निखळ राहते.
कधी कधी काही समज गैरसमजांमुळे मैत्रि तुटते आणि मनाला चटका लाऊन जाते.


Chyayla
Wednesday, January 17, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र म्हणजे या मानवी जीवनाला आलेले एक सर्वान्ग सुन्दर असे पुष्प आहे. त्याचा सुगन्ध कधी आपण त्याच्या प्रेमात, सन्कटकाळी केलेल्या मदतीमुळे अनुभवु शकतो.

हा मित्र ना तुम्हाला कुठेही मिळेल अगदी कोणत्याही वयात कोणत्याही वेळी आणी कुठेही मिळेल काही भरोसा नाही. काही मैत्री चिरन्तन टिकतात काही क्षणीक अगदी एका तासाच्या रेल्वे प्रवासातही मिळतात मग कायमचे दुर दुर निघुन जातात, कधीही परत न भेटाण्यासाठी व सोबत सोडुन जातात त्या मधुर आठवणी. तेन्व्हा ह्या गीताच्या ओळी आठवतात "अशी पाखरे येती आणीक स्मृती ठेवुनी जाती... दोन दिसान्ची गम्मत जम्मत दोन दीसान्ची नाती..."

खरच या मैत्रीला एखाद्या नात्यात गोवणे आवश्यक आहे का? आपण तसे आपसुक करतोही एखाद नात पण देतोच. पण समवयस्क असतील तर त्याला मित्रच म्हणतो. नसेल तर एखाद नात देतोच.

वर म्हटल्याप्रमाणे मित्र ही आपली निवड असते तर नातेवाइक हे जन्माने मिळालेले असते. पण जर कधी या नात्यातही मैत्रि असेल तर मग असली नाती कायम आधार असतात.

मुलगा, मुलगी १६ वर्शाचे झाला की आई वडीलान्चा तो / ती मित्र / मत्रिण होते मला वाटत त्या वडीलान्च्या किन्वा आईच्या नात्यापेक्षा एका मित्राच्या नात्यामुळे ती नाती, तो सहवास आणी जीवन सुखी होत. मग मुलगा / मुलगी अगदी हक्कानी स्वताचे मन मोकळे करु शकतात वेळ पडली तर हक्कानी गळ्यात पडुन रडु शकतात. आणी नात्यातही एक निष्काम कर्मयोग आपोआप येतो. त्यान्च्या उज्ज्वल भविश्यासाठी मनावर दगड ठेवुन कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठीवत थाप देवुन लढ म्हणु शकतात. व बाहेरच्या जगात झेप घेण्यास बळ देतात.

अशीच मैत्रिचे नाते आपल्यला कोणत्याही नात्यात मिळु शकतात. अगदी पान्ढरे केस पिकलेल्या आजीला आपण अहो आजी न म्हणत "अग ए आज्जी ये ना ग लवकर" असे प्रेमाने म्हणु शकतो. नवरा बायकोच्या नात्यात मैत्रि असणे यासारखे नशिब नाही. त्याचे सगळे जीवन धन्य होउन जाते.

असेच कितितरी नात्यात आपल्याला मित्र भेटु शकतो, अट एकच तुम्ही स्वता: पण मैत्रीची भावना ठेवायला पाहिजे आपणही एक चान्गले मित्र होता यायला पाहिजे.

मी हा विषय अशा साठी काढला की माझ्या नशिबाने माझे बरेचसे नातेवाइक हे माझे चान्गले मित्र आहेत अगदी लहान भाचे, भाची, बहिणी, आई वडील पासुन तर आजोबान्पर्यन्त शिवाय दुरचे नातेवाइकपण.
एवढच काय समवयस्क मित्र मैत्रिणीन्व्यतिरिक्त लहान मुलान्पासुन ते म्हातार्यान्शी पण माझ चान्गल पटत. एका मित्राच्या ६ वर्शाच्या मुलीनी मला ईतक छान पत्र लिहिले ना मी ते अगदी जपुन ठेवल आहे. काही लहानाचे आज मोठे झाले तेन्व्हा त्यान्ची आईवडील व ते स्वता:ही काही सल्ला हमखास हक्कानी मागतात.
खरच या मैत्रिनी मला अगदी भरभरुन दिले. मी स्वता:बद्दलच थोडे बोललो पण मन मोकळ करायला अजुन कुठे जाणार आपल्या मित्रातच करणार ना.

तुम्ही सगळ्यानी हा खुपच छान विषय निवडलात आणी छान लिहित आहात. लगे रहो यारो...


Chyayla
Wednesday, January 17, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र म्हटले म्हनजे समोरच्याचे चान्गले वाइट गुण समजुन स्वीकारणे. मला तर अध्यात्मात जे उदाहरण देतात की ईश्वर जरी कोपला तरी चालेल कारण गुरु तुम्हाला वाचवतो. तसेच ईथे सारे जग जरी तुमचे शत्रु झाले तरी एक मित्र तुम्हाला आधार देउ शकतो. ईथे मैत्रिची महानता कळते.

ईश्वर भक्तिसाठी सुद्धा जी नवविधा भक्ती सन्गितली आहे त्यात मैत्रीभाव पण अन्तर्भुत आहे म्हणुनच आपण "सखा पान्डुरन्ग" म्हणुन हक्काने मैत्रि जोडु शकतो तसेच सुदाम्याचे पोहे खाणारा, पान्डवान्च्या वनवासात नेहमी मदत करणारा व अर्जुनाला भर युधभुमीवर गीतामृत पाजुन योग्य मार्गदर्शन करणारा सखा श्रीकृष्ण. अशी कितितरी उदाहरणे आहेत. एकप्रकारे मैत्रि पण थेट भगवन्ताला जाउन मिळते म्हणुनच ईतकी सुन्दर आहे. मला वाटत जो या वास्तवीक जीवनात जर मैत्रि करु शकत नाही तो काय भगवन्ताशी मैत्रि करु शकेल?

R_joshi
Thursday, January 18, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी चाफा. मला तुमचे नेमके नाव माहित नव्हते आणि चाफा म्हटल्यावर पटकन अग आले असेल लिखाणात.त्याबद्द्ल पुन्हा एकदा क्षमस्व.
बाकि मैत्रि खरच रंगात येतेय. आणि एक माझ नाव प्रिति आहे.त्यामुळे आपण सर्वांनी जोशी न म्हणता प्रितिच म्हणाव.


R_joshi
Thursday, January 18, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रिची नाव रुप अनेक असतिल आणि प्रत्येक जण आपल्या आवडिनिवडिनुसार त्या मैत्रिला आपल्या जीवनात सामिल करत असतात. मानल तर हे नात असत, मानल तर बंधन आणि मानल तर जिवन असत. अनेक बहुविध अंगानी आणि रंगानी आपलि मैत्रि सजलेलि असते. आणि हे रंगसुध्दा कधीकधि जगताना उपयोगी ठरत असतात.

निखळ आनंद देणारी मैत्रि असते. साथ देणारी मैत्रि असते. डोलणा-या जीवन नौकेला सावरणारि हि मैत्रि असते. अनेक पुष्पांनी बहरलेल्या बागेत मन जसे प्रसन्न होते, त्याप्रमाणेच अनेक मित्र- मैत्रिणिच्या सहवासात जीवन समृद्ध आणि सुखि होते असे म्हणायला हरकत नाहि.


Bhagya
Friday, January 19, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कुठेतरी इतकं सुंदर वाक्य वाचलं होतं:

जन्माने आणि लग्नाने लादली जातात ती नाती, तर मनाप्रमाणे हवी ती मिळते ती मैत्री.


Chaffa
Friday, January 19, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिती,
यार तु या मैत्रीच्या BB वर sorry म्हणतेस.? दोस्तीत no sorry no thank you
च्यायला,
आपल्याल पटले बरं तुझे विचार. खरंच मैत्रीला वय नसतं. माझीही मैत्री कुठल्याही वयाच्या व्यक्तीशी होते.
म्हणा
मना सज्जना मित्र जोडीत जावे,
वयाचे रकाने, नित खोडीत जावे.


Ajjuka
Friday, January 19, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मैत्रीबद्दल असं अलंकारीक बोलता येणार नाही.. थोडं realistic बोलणारे मी..
मुळात मैत्री काय कुठलंच नातं हक्क आणि अपेक्षा यांच्या भोवर्‍यात यायला लागतं तेव्हा ते बंधन होतं. आणि कुणी कुठली बंधनं कितीकाळ ठेवावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. अत्यंत उत्कट मैत्री ही काही काळानंतर कुठलाही वाद, भांडण न होता विरून जाऊ शकते. २ माणसांपैकी एकाला त्या नात्याची गरज नाहीशी होते. आणि lets face it.. गरजेशिवाय आपण काहीही करत नाही.. मैत्री ही नाही. यामधे गरज म्हणजे पैसे, आधार इत्यादी म्हणत नाहीये..
खूप छान मैत्री असते दोघींची.. एकीला प्रियकर मिळतो.. मग मैत्री दुय्यम होऊ लागते तिच्यासाठी.. दुसरीने हे समजून नाही घेतले तर मैत्री ओझे होऊ शकते. हे एक उदाहरण..
मैत्री ही भावना चिरंतन असते पण नातं असेलंच असं नाही.
परिस्थितीनुसार हे पण बदलत जातं आणि ते तितकं नैसर्गिक म्हणून स्वीकारलं तर बरं असतं. अडकून राहू नये अश्या नात्यांवर..
मला पुष्कळ मित्रमैत्रिणी आहेत.. अगदी जीवाभावाचे सुद्धा.. अगदी असे मित्र ज्यांच्याशी माझे एकमेकांचे गळे धरण्यापर्यंत वाद होऊ शकतात पण ती बैठक संपली की परत गळ्यात गळे असतात.. पण हे केव्हा होते.. मैत्री आहे म्हणून आम्ही कुणीच एकमेकांना गृहित धरत नाही तेव्हा.. त्यामुळे एखाद्या क्षणाची गरज म्हणून एखादी व्यक्ती available नसली तरी थोडं खट्टू व्हायला होतं पण दुरावा नाही येत.. असो..


Anushka1
Friday, January 19, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़्या मैत्रीबद्दल तू लिहितो आहेस.? तुला नाति निभावता येतात का.?

Chyayla
Friday, January 19, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीतरीच काय हा वरचा प्रश्न? जरा वैयक्तिक वाटतो निदान हित्गुजवर तरी असले पोस्ट करु नका ही विनन्ती. अनुष्का तु विषयाला धरुन लिहिलेस तर बरे होईल. Admin दखल घ्यावी व सोबत माझी पण पोस्ट उडवावी.

Nitinghorpade
Friday, January 19, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रि आपण कशा सठि करतो कधि विचर केला आहे जरा विचार करुन बघुयात
खर तर एकट रहाता येत नहि हि सायकोलोजिकल निड आहे.कुनाचि तरि गरज आपल्याला आस्ते कुनि तरि हव असत आपल्याला ओरडनार,आपल्यावर प्रेम करनार, आपल्या कडे काहितारि मगनार, आपल्याला हव आसलेल देनार. आनेक निड ओफ़ मईन्ड.,
हे आसन चुकिच आजिबात नहिये इट्स नेचरल मग आपन आशि व्यक्ति शोधतो कि ति आपल्या ह्या ( मनात ) ठरवलेल्या साच्यात बस्ते आणि जि कुणि व्यक्ति हे करु शकत नहि ति व्याक्ति आपलि मित्र बनु शकत नहि
आणि जि बस्ते ति आपलि चांगलि मित्र बनते. आस होन हे सहाजिक आहे पण हे कित पत बरोबर आहे हे विचार करण्या चि गोष्ट आहे.
आज्जुका
आगदि बरोबर बोल्लिस अपेक्श्या ठेउन जर कुठलहि नात बांधल तर ते निरंतर टिकत नाहि.
जो मिळाला तो मित्र ईत्क सोप्याने मित्र मिळत नाहित हे हि तित्कच खर मैत्रि करावि लग्ते मित्र होन सोप पण ति टिकवन फ़ार कठिन


Bhagya
Friday, January 19, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे समीर पण तुझ्याशी मैत्री करणार्‍या जिवांना तुझ्या इब्लिसपणाची शिकार व्हावे लागत असेल त्याचे काय?

R_joshi
Friday, January 19, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण आपल्या मित्र-मैत्रिणिना स्विकारतो ते त्याच्या गुणदोषंसकट. मग कुणि कितिहि इब्बलिस का असेना. मित्रांच्या गुणावर प्रेम करण आणि त्याच्या दोषांबद्दल सांगुन त्याच्या चुका सुधारण्यासाठि जो मदत करतो, तो खरा मित्र किंवा मैत्रिण असते. चुकणा-या मित्राला सावध करणे जसे गरजे असते त्याचप्रमाणे त्याच्या चुकिची त्याला सारखि आठवण करुन देणे हेहि तितकेच चुकिचे आहे.

एक गरज म्हणुन मित्राकडे पाहणे चुकिचे आहे. "गरज सरो आणि वैद्य मरो" असे आपण मित्रासाठि कधिच म्हणत नसतो किंवा अशी भावनाहि आपल्या मनात कधिच येत नाहि.

एक व्यक्ती म्हणुन मी जर नात्यांचा आदर करु शकत नाहि तर माझ्यामते अनेक मित्र माझ्या अवतिभवति असुनहि मी एकटिच असेन.


R_joshi
Friday, January 19, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या बहुतेक जणांचि नाव मला ठाऊक नाहित. त्यामुळे त्यांनी मला त्यांची नाव सांगावित. तस मैत्रिला नावाचे बंधन नसत, त्यामुळे नाव सांगायचे बंधन नाहि.:-)

Nitinghorpade
Friday, January 19, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

priti
khup chan vichar mandtes , khup vichar kartes watta tu......

Ravindrakadam
Friday, January 19, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे असे भान्डता काय? मैत्रि सारख्या विषयावर लिहीताय तुम्हि! विसरलात नाही ना?
काय जोशी!...... अरे माफ करा विसरलोच, प्रिति नाही का! फारच सुन्दर लिहिलत तुम्ही.
खर तर मला असे काव्यात्मक लिहीता येत नाही. मला एवढच वाटते की मैत्रि हि स्वच्छ, निर्मल भावनेतुन करण्यात यावी. मैत्रीत समजुतदारपणा असावा, आणि सर्वात महत्वाचा तो विश्वास!
खरा मित्र नेहमीच आपल्या पाढीशी असतो, सु:खात आणी दु:खात सुध्हा!

च्यायला,
तुमच्या लिखाणाला दाद तरी काय दयावी तेच कळत नाही..... अप्रतिम!




Nitinghorpade
Friday, January 19, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रि ज्या आधाराव्र आस्ते तो आधार म्हनजे विश्वास
हा तितकाच आनि दोघांकडुन पाहिजे एक तर आपण आपल्या मित्राच्या विश्वासाला पात्र ठरल पाहिजे आणि दुसर म्हनजे आपल्याला त्याच्या वर विश्वास ठेवता आला पाहिजे आता
आपण ह्यातल काय कर्तो कि आपण खुप मना पसुन चांगल वागुन ( मनापासुन) आपल्या मित्राचा विश्वास मिळवतो.
पण प्रश्ण येतो आपला.
आपल मन कुना वर विश्वास ठेवायला सहजा सहजि तयार होत नाहि.
कुठे तरि मनाच्या एका कोप्र्यात पाल चुकचुकतेच.
तर मग


Zakki
Friday, January 19, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर माझ्या इथल्या (अमेरिकेतल्या नि मायबोलीवरच्या) मित्रांवर जाम खूष. मित्र असणे यासारखे दुसरे भाग्य नाही.

Ajjuka
Friday, January 19, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि माझ्यासारखे शत्रू?? त्यांच काय हो?

Chyayla
Friday, January 19, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या, आपण मित्रान्सोबत ईब्लिसपणा नाही करणार तर फ़ायदाच काय? त्याना पण असले काही प्रसन्ग घडले तर कायम आठवणीत राहतात.
हो रे बा मी ज्याच्याशी मैत्रि करेल त्याच्याशी कधीही कसाही ईब्लिसपणा घडेल सान्गता येत नाही. तर मग करणार काय आमच्याशी मैत्री?

धन्यवाद रविन्द्र मित्रा... आपल्या दोस्त लोकान्ची मेहेरबानी की त्यान्च्यामुळे लिहायला मिळाले व अशी थाप (चान्गल्या अर्थाने... पाठीवरची बर का) मिळाली. यासाठी धन्यवाद नाही... वर कुणीतरी म्हटले की दोस्तीत धन्यवाद, क्षमा नसावी म्हणुन म्हटले हो.. पण तरिही मी आतुन म्हणजे मनापासुन आभारी आहे.

अज्जुका तुझ्या सारख्या शत्रून्साठी वेगळा BB काढावा. मग झक्की म्हणतील.
"आज तक जमानेने मेरी दोस्ती देखी, अब ये जमाना मेरी दुश्मनी देखेगा.... ढ्याण न्ट्या ण्या ण...."

मग हुडाची एन्ट्री होणार आणी एक विकट हास्य... हाSSS हाSSS हाSSS... "जानी तुम क्या दुश्मनी करोगे... बोवाजी दुश्मनी तो हमसे देखेगा ये जमाना".

क्रमश्:


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators