Chaffa
| |
| Sunday, December 24, 2006 - 5:42 am: |
| 
|
आहो झक्की काका, माझे मामा देखील जुनेच आहेत. कदाचीत म्हणुन................. आणी महागुरु तुम्ही बरोबर लिहीले आहे हो.!!!!
|
>>>पंख्यातुन धुर... मिक्सर मधुन पण धुर... L&T मधे कामाला आहेत तरीच L&T च्या कारखान्यांतून दिवसरात्र धूर निघत असतो.. Chaffa चा हा आवडता बीबी दिसतोय..
|
Rajeshad
| |
| Tuesday, December 26, 2006 - 1:11 am: |
| 
|
चाफ्फा विमान त्यादिवशी ठरल्याप्रमाणे दिल्लीला न उतरता पंढरपुरला उतरलं असावं. आणि झक्की त्याच्या वडलांनी त्याची कॅसेट ऐकली असती तर विमानासारखे उडाले असते व त्याला विमानाच्या खिडकीमधून दिसले असते 
|
Rajeshad
| |
| Tuesday, December 26, 2006 - 1:29 am: |
| 
|
म्हणुनच L&T पंखे, मिक्सर वगैरे बनवण्याच्या भानगडीत पडलं नसावं. चाफ्फा मामा या आधी कोळशाच्या इंजिनाचे ड्राइवर होते का? कुठलीही गोष्ट धुर काढल्याशिवाय चालू शकतच नाही असा त्यांचा विश्वास दिसतोय.
|
आता चाफ्फाचे मामा असा बीबी सुरू करायला हरकत नाही. दिवे घ्या बाबांनो!
|
Dnyanaba
| |
| Wednesday, December 27, 2006 - 3:28 am: |
| 
|
चाफ़्फ़ा आणि च्यायला तुम्ही दोघे विनोदि साहित्यावर का लिहित नाही??? तुमची कल्पनाशक्ती अतिशय उत्तम आहे
|
Chyayla
| |
| Wednesday, December 27, 2006 - 6:30 pm: |
| 
|
ज्ञानबाजी, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, मी तरी कधी याच्या आधी लिहिले नव्हते. केवळ मायबोलीवरच जे काही लिहित आहे तेवढेच. चाफ़्फ़ाची गोष्ट वेगळी आहे तो तर १०१ किस्से झाले की छानस पुस्तक छापणार आहे. वेन्धळेपणे नव्हे ईब्ल्सिपणे. काही म्हणा मामाच्या चाफ़्फ़्यानी (ईथे चाफ़्फ़ाचा मामा म्हटले तरी हरकत नाही) BB त धुर सोडुन खुप मनोरन्जन केले. पण काय रे मामाचे काही गुण भाच्यामधे आले नाहीत काय?
|
Chaffa
| |
| Wednesday, December 27, 2006 - 8:28 pm: |
| 
|
च्यायला, एकंदरीत मामाने बराच धुर काढलेला दिसतोय. राहीला मुद्दा हा कि मी त्याचे कीती गुण घेतलेत. ते तर तुला माहीतीच आहे.! काय.? या मामाचे बरेच किस्से आहेत ते लिहायला गेलं तर एक BB खरच त्याच्या नावाने काढायला लागेल. एक सावळा गोंधळ तो बरेचवेळा घालतो तो म्हणजे त्याची डेन्टोबेक टूथपेस्ट नेहमीच्या जागी न ठेवता बाकी घरातल्या मंडळींच्या रक मधे ठेवणे. आता ज्यांना डेंटोबॅक ही कशी टुथपेस्ट आहे हे माहीताय त्यांना कळेल की सकाळी अर्धवट झोपेत ती लावल्यागेली तर मामाला कीती बोलणी ऐकावी लागत असतील ते.!!!!!
|
Rajeshad
| |
| Sunday, December 31, 2006 - 11:00 pm: |
| 
|
माझ्या काकाला चाफ्फ्याच्या मामाची सर नाही पण कधी कधी गमतीशीर प्रकार करतो. हा बरेच पुर्वी (seventies मधे ) केलेला वेंधळेपणा. तो मुळचा म.प्र. चा त्यामुळे लोकल वगैरेची फारशी सवय नाही. पण त्यावेळी एवढी गर्दी नसल्याने एकदा डोंबिवलीला आला असताना त्याने टिटवाळ्याच्या गणपतीला एकटे जाण्याचे ठरवले. टिटवाळा लोकल मधे बसला व टिटवाळ्याला उतरला. उतरला तसं त्याला लोक धावत धावत स्टेशनच्या बाहेर जाताना दिसले म्हणून हा ही धावत सुटला. त्याला वाटलं की टिटवाळ्याच्या गणपतीला धावत जाण्याची पद्धत आहे. धावणाय्रा लोकांच्या मागे मागे गेला तर दिसलं की ते सगळे लोक एका वाण्याच्या दुकानापाशी थांबले. हा ही तिथे जाऊन थांबला व त्यातल्या एकाला धावण्याचं कारण विचारलं. त्यावेळी तांदुळ टंचाई होती व टिटवाळ्याला तांदुळ स्वस्त मिळायचे म्हणून हे लोक टिटवाळा लोकल ने जाऊन तांदूळ खरेदी करून त्याच लोकलने परतायचे व म्हणून ती धावाधाव होती असं त्याला कळलं तेव्हा तो चुपचाप गणपती मंदिराकडे जाणारी रिक्शा शोधू लागला.
|
मी निशिगंधा मला मायबोलीकर व्हायला आवडेल. तुम्ही सगळे छान लिहिता. माझ्या वेन्धळेपणाचा हा एक किस्सा. काॅलेज ला असताना आम्हाला २ पेपर इतिहासाचे होते-एक प्राचीन भारत आणि जगाचा इतिहास. मी जगाच्या इतिहासाच्या पेपर ला प्रचीन भारतातले सगळे वाचून गेले होते म्हणजे गुप्त मौर्य समुद्र वगैरे!! दोन पेपर च्या मधल्या वेळात माझा मित्र म्हणाला झाली का वर्ल्ड वाॅर्स वाचून? मी चरकलेच! म्हटल ए बाबा मजा करतोयस का माझी? तो नाही म्हणाला. मी अजून एक दोघीना विचारल त्याही तेच म्हणाल्या. मी देवाच नाव घेतल आणि पेपर लिहिला. तसा १०त असतोच आपण केलेला पण ३-४ वर्षानी हिट्लर कैसर विल्यम आठ्वून लिहिल बुवा घरी येऊन आई ला सान्गितल तर ती बसलीच खाली. रिझल्ट ला धाकधूक होती पण शेवटी सान्गण्यास आनन्द होतो की ५०% ने पास झाले. इतर विषयात ७०-ऐशी मिळवल्यामुळे वाचले एवढच. तेव्हा पासून रेल्वे च टाईम- टेबल सुध्धा ४वेळा बघते.
|
Dineshvs
| |
| Monday, January 01, 2007 - 3:53 am: |
| 
|
स्वागत असे निशीगंधा. नव वर्षाच्या शुभेच्छा.
|
Chaffa
| |
| Monday, January 01, 2007 - 11:45 am: |
| 
|
स्वागत निशीगंधा, मायबोलीच्या पुष्पवाटीकेत आणखी एका फ़ुलाची भर ( हे तुझ्या ID ला उद्देशुन लिहीतोय बरं!!!!)
|
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. याच बीबीवर वाचलेला एक प्रयोग करायचं ठरवलं. ३१च्या पार्टीनंतर सोडा उरला होता. म्हटलं कुणी पाणी मागितलं की त्याला देऊ आणि मजा बघू.. रात्री तीन वाजता तहान उठल्यानंतर पाणी पिण्यासाठी अस्मादिकाना दुसरी बाटली मिळाली नाही... प्रयोग अमच्यावरच उलटला.
|
Chaffa
| |
| Friday, January 05, 2007 - 9:56 pm: |
| 
|
नंदिनी, हा च्यायलाने केलेला प्रयोग होता बरोबर.???? त्याच्या उचापती तोच करु जाणे, आपण करायला गेलो की हमखास फ़सतोच. मीही एकदा फ़सलोय त्याची ईब्लीस पेढ्यांची रेसीपी वाचुन मी केला तो प्रयोग आणी नंतर मला बरेच मिठाईचे खोके भेट म्हणुन आले त्यात मिठाई सोडुन बाकी बरंच काही होतं उदा. दगड, गवत, आगदी सुतळीचा गुंडा देखील.
|
Chyayla
| |
| Friday, January 05, 2007 - 11:03 pm: |
| 
|
हा.. हा.. हा.. मजा आ गया... हे बघा गड्यान्नो... मी हे जे दोन्ही ईब्लिस प्रयोग दीले होते ना ते आधी माझ्यावरच झाले होते. तरी एका प्रयोगात Statutary Warning दीली होती की हा प्रयोग तुमच्यावरही उलटु शकतो. वेन्धळेपणा आणी ईब्लिस्पणा यान्च सख्यच असत. अरे वेन्धळेपणाशीवाय ईब्लिसपणा मधे मज्जाच नाही. ज्याला वेन्धळेपणाची मजा घेता येत नाही येत नाही त्याला ईब्लिसपणाची मजा करता येत नाही. असो ईती श्री वेन्धळे एवम इब्लिस महिमा कथनम क्रमश:... असो तर नन्दिनी आणी चाफ़्फ़ा तुम्ही आता ईब्लिसपणा करण्यास समर्थ ( Qualified ) झाला आहात. आता येउ द्या तुमचे किस्से. "आधी वेन्धळलेची पाहिजे"... असे कुणी तरी... कशाला मीच म्हणतो ना. तरीही ते दीवाळीच्या वेळेस दीलेली इर्साल पेढ्यान्च्या Recipe वर मला काहीच प्रतिक्रिया नाही मिळाली. आता हा शहाणा चाफ़्फ़ा सान्गतोय अरे तु हाच अनुभव आधी लिहीला असता ईतर किस्से पण समोर आले असते की. चाफ़्फ़ाचा मामा नन्तर आता राजेशचा काका पण हजेरी लावुन गेला या BB वर.
|
च्यायला, हा वेंधळेपणा इथेच संपत नाही. आमच्याकडे एक जानेवारिला सुट्टी असल्यामुळे आम्ही रत्नागिरीला निघालो. पहाटे निघायच्या आधी ड्रायव्हर म्हणाला थोडा चहा द्या झोप उडवायला. आता पहाटे चार वाजता अंजलीने चहा केला हा तिचा मोठेपणा. त्यातच तो चहा कपात गाळायचा सोडुन बाटलीत ग़ाळला.(कारण अज्ञात) आता गरम चहा गाळल्यावर बाटली वाकडी तिकडी झाली असं ती म्हणाली तेव्हा मी किचन्मधे गेले. बघायला गेल्यावर कळलंकी बाईसाहेबानी सोड्याच्या बाटलीतलं पाणी फ़ेकून चहा ग़ाळलाय. ड्रायव्हरला तीन तीन दा विचारलं.. चहा कसा झालाय? बिचारा चांगला एवढंच म्हणत होता. बहुतेक त्याची तीन दिवसाची झोप उडाली असेल.
|
saglaynna namskar ,mi nitin mlahi 1 majeshir kissa tumahcyashi share karayla awdel, kissa farach majeshir ahe
|
purvi aami chalit rahacho aani chalit li maja vegalich aste, aagdi sagle gahratli mandali asta prattek goshta milun misalun karaychi, aani chalitlimatrimahnje 1dam jiwabhavachi aasach eda me ani aama mitra khelat hot aani eka suklelya gatarit eka kutrine pelle dili hoti ti lahan aastanna khupcha sundar disyachi tyamule tyanchya warcha rem wadla, tyanna gharatun roj aaila sangun bhat , chapati asa aanaycho,1 diwas tyatal 1 pillu jara jastach kaharab diwayla lagala maza mitra mhnala aare tyla tap aala asel to aajari aahe aapan tyala docatr kade gheunjau, pan doc kade gheunjayla paise navte mag kay karaych mi 1 shakkal lawli mitral mhatal aamchya ghrat na 1 uwahshdachi tube ahe ti tyala deuya , prasha asa ki ti tyala kashi dyaychi, maza mitra maya pekhhsa husar aami ti tube 1 ka chapatila lawli ani tyala khayala ghaqtli sandya kalchi vel hoti, dusrya diwshi te pillu kuthe dislach nahi......... kadachit aamcha murkha pana hota he phar ushira kalla pan jewaha hi aawtahwto tewaha mi mitrala sango tu doc ka nahi zalas ani khup hasto
|
Nkashi
| |
| Friday, January 12, 2007 - 10:10 am: |
| 
|
बहुदा एखादा दिवस स्पेशल वेन्धळेपणाचा असतो... माझे लेटेस्ट किस्से, मी नुकतीच मुंबईहुन पुण्याला transfer घेतली. आणि दुर्दैवाने मी इथे office मध्ये फ़ार कोणाला ओळ्खत नव्हते. फ़क्त एक्-दोन लोकांना office मध्ये बघितले होते... (not even "Hi", "Hello") त्यात आमचं पुण्यातलं office म्हणजे कुठल्या जंगलात आहे कि तिथे पोहोचण म्हणजे दिव्य... असो, तर त्या दिवशी मी office मध्ये येण्यासाठी गाडी ची वाट बघत उभी होते. इतक्यात एक bike वाला आला आणि मला म्हणाला do you want me to drop you till chandni chowk? नीट बघितल्यावर लक्षात आल की हा तर माझ्या next bay मध्ये बसतो. मी त्याला म्हटल I'll be happy if u can drop me till office आणि office जवळ मला सोडल्यावर तो परत जाऊ लागला तेव्हा मी म्हणले तु office ला येत नाहीस का? & he said he is on holiday that day... मी इतकी embarrassed झाले आणि वर जरा जास्त शहाणपणा करत परत विचारल कि मग तू मला chandani chowk पर्यन्त कसा सोडणार होतस? तो बिचारा म्हणाला कि त्याच कोथरूड मध्ये काही काम होत आणि तो त्या साठी चलला होता... मग as usual मी त्याला बरयाच वेळ thanks आनि sorry म्हणत होते.. किस्सा २ मी डेस्कवर येऊन बसले बघते तर मला माझ्या id & password ने login करताच येईना? error message , बहुदा Domain मध्ये माझ नाव नव्ह्त... सुदैवने helpdesk चा कोणी एक शेजारी उभा होता (actually he had come for some other reason & was talking to someone else). मी त्याला हाक मारुन (नावाने नाही) माझा problem संगितला. त्या बिचार्याने मुकट्याने तो solve करुन दिला आणि निघुन गेला... त्या नंतर मला माझ्या एका colleague ने संगितल कि तो पुण्याच्या helpdesk चा कोणी मोठा manager आहे.. किस्सा ३ त्या नंतर दिवसभर मे अक्षरश्: कोणाशीच बोलले नाही... (आणखी काही वेन्धळेपणा घडुनये म्हणुण) पन तरी घरी पोहोचल्यावर तो झालाच... office मध्ये प्रत्येक ठिकणी access card ची इतकी सवय झाली आहे कि काही खर नाही. घरी पोहोचले आणी door bell च्या बटणावर access card लावत होते. २-३ वेळा झाल मी विचार करते हे दार उघडत का नाही... finally ट्युब पेटली...
|
हा हा हा मजा आली.. माझा हा वेंधळेपणा बराच गाजलेला आहे अणि हो तद्दन फ़िल्मी आहे. एका मोठ्या दिग्दर्शकाकडे मी असिस्टंटगिरी करत होते. तेव्हाची ही कथा. काय झालं की या डिरेक्टरच्या साल्याने कसलेतरी फ़िल्म वाल्यासाठी प्रदर्शन भरवले. (केमेरा माइक आणि लाईट्स) वगैरे वगैरे तर त्यामधे आमची अख्खी टीम पाठवली.. volunteer म्हणून.. बरं हा खानदानी फ़िल्मवाला माणूस. त्यामुळे बरिचशी star kids तिथे होती. आम्ही पण सगळ्याशी जरा बेतानेच होतो.. उद्याचे अमिताभ शाहरुख ना ते... आम्हाला या लोकानी मस्त टी शर्ट्स पण दिले होते. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे पहिल्यच दिवशी माझी एका star kid बरोबर ओळख झाली.. छान गप्पा सुरू होत्या... दुपारी लंचनंतर मला दिसला तेव्हा मी हाय केलं. त्याने पाहून न पाहिल्यासारखं केलं. मला पण राग आला. असेल मोठ्या बापाचा त्याच्या घरी... दुसर्या दिवशी परत दिसला... आणि हाय नंदिनी कैसे हो? वगैरे सुरू... आयला काल ओळख नाही आणि आज हाय.. जाऊदे आपल्याला कुठे संसार ठाटायचा आहे... मी पण जेवढ्यास तेवढ्या गप्पा मारल्या.. परत संध्याकाळी त्याने ओळख दाखवली नाही... आता मात्र मला राग आला, आणि त्याला मी बोलायला सुरुवात केली.. गेली नोकरी तरी चालेल,छान शिव्या घातल्या. हा तरी शांतच. माझं बोलून झाल्यावर मला म्हणाला.. झालं तुमचं मी बोलू काहीतरी.. म्हटलं काही गरज नाही माझी ऐकायची इच्छा नाही. त्याने कुणाला तरी फ़ोन केला.. बहुतेक पोलिसाना किंवा त्याच्या बापाला... तो हल्ली राजकारणात आहे. बाप रे! हे बोलणं चालु असताना अर्थान आमचा volunteers चा अख्खा ग्रूप जमला होता. शेवटी एकदा याचा भाऊ आला.. जुळा. माझी ओळख एकाबरोबर झाली होती आणि हा दुसरा. दोघं सेमच दिसतात. वर टीशर्ट्स ही सेम... कसं कळणार.. अजूनही कधी फ़ोन केला तर मला म्हणतात ओह नंदिनी.. fire brigade
|