Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through December 11, 2006 « Previous Next »

Dineshvs
Monday, December 04, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, अशी वेगळी फ़िल्म बघितली तर जरा विस्ताराने लिहायचे कि.
DJ काय हे कपड्यांबद्दलची अज्ञान. साधा लेहेंगा माहित नाही, लोकाना ?
मी खुप वर्षांपुर्वी नाशकाला लग्नाला गेलो होतो, त्यावेळी मित्राची लहान बहिण म्हणाली होती, आता तुम्हाला लेंग्याचे वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतील.


Robeenhood
Monday, December 04, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीकानेरकी चुनरी ओढी
लेहेन्गा पहना जयपुरका,
हाथमे चूडी फैजाबादी,
और मेरठका कजरा डालके,
तेरे दिलपे मैं नाचूँ कजरा डालके...


Prady
Monday, December 04, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Happy feet बघायचाय. अलिकडे असाच सुंदर Animated movie पाहिला cars . कुणी पाहिलाय का cars मी पण अशीच जरा पूर्वग्रह दुषीत होते पहायच्या आधी. पण नितांत सुंदर. cars हा रेसिंग कार्स वरचा पिक्चर आहे. आणी सर्व पात्रं कार्सच.

lightning mcqueen ही कार ह्या चित्रपटाचा हिरो. कॅलिफोर्नियाला कार रेस साठी जाताना accidently रूट ६६ वरच्या रेडियेटर स्प्रिंग्स नावाच्या गावात पोचतो. इथे गावातला रस्ता आणी इतर प्रॉपर्टीची त्याच्या कडून नासधूस होते. गावातल्या सगळ्या कार्स ही एक close knit family असते. गावाजवळ झालेल्या नव्या रस्त्यामुळे ह्या गावातले उद्योगधंदे बंद पडलेले असतात. जो पर्यंत त्यांच नुकसान lightening mcqueen दुरुस्त करत नाही तोपर्यंत त्याला गाव सोडायला कोर्टाकडून मनाई करण्यात येते. आधी गावातल्या सर्व कार्सशी स्वार्थी पणे आणी अरेरावीने वागणार्या mcqueen ची पुढे सगळ्यांशी मैत्री होते. त्याचं प्रेम सॅली नावाची कार त्याला तिथे भेटते. डॉक हडसन नावाच्या बुजुर्ग रेस चँपीयन कडून tips मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बक्षीसं प्रसिद्धी हेच सर्वस्व नाही ही शिकवण मिळते. आणी मग सर्व आलबेल झाल्यावर mcqueen ह्या गावाला त्याचा सोनेरी भूतकाळ परत मिळवून देतो.

कथा तशी सरधोपट पण Animated film च्या रुपात पहायला खूप मजा येते.


Maitreyee
Monday, December 04, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाहिलाय तो कार्स, .. माझा पोरगा तर पारयणं करत असतो! सगळी पात्रं कार्स च हे पाहून मजा वाटते! अगदी रेस पहायला आलेले प्रेक्षक पण गाड्याच! उजाड माळरानावरच्या माश्या, किडे पण छोट्या beetle type cars वगैरे!!:-)
शेवटी पण काही कार्स drive in theatre मधे movie बघायला गेलेल्या दाखवल्यात तेही pixar च्या Monster, Bugs Life, Toy Story etc. classics चे "cars" version ! सही केलेय ते!


Ashwini
Monday, December 04, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मस्त आहे cars . तो सॅलीचा आवाज मला आधी वाटलं जुलिया रॉबर्टसचा आहे पण दुसरीच कुणीतरी होती.

Prady
Monday, December 04, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती बॉनी हंट आहे. चीपर बाय दी डझन मधे त्या बारा मुलांच्या आईचं काम केलं होतं तिने.

Psg
Tuesday, December 05, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्स वरून आठवलं.. धूम २ मधे अभिषेक- ऐश ह्रिथिक भेटतात तो सिनेमा 'कार्स'च आहे ना?

btw धूम २ is a visual treat :-) बाकी काहीच नाही त्यात.. नुसते बघऽऽऽऽऽत रहायचे


Savyasachi
Wednesday, December 06, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सिनेमा 'बघायलाच' जातो ना आपण? :-)

casino royale पाहीला. मस्त आहे. नवीन बॉण्ड क्रेग झकास.


Maitreyee
Saturday, December 09, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ice age-II -the Melt down पाहिला.. आम्हाला आर्यक मुळे हे सगळे animated hits बघायलाच लागतात (खर तर आवडतात :-) ).. Ice age-I मधे जग बर्फ़ात गाडले जात असताना सगळे प्राणी south ला जात असतात, त्यात मनुष्याच्या एका छोट्या बाळाला त्याच्या बाबाकडे पोहोचवतानाच्या प्रवासात एक mammoth , एक स्लॉथ, एक saber असे तीन विचित्र प्राण्यांची अनपेक्षित पणे एकमेकाचा तिरस्कार करता करता घट्ट मैत्री होते असं दाखवलं होतं.. आता दुसर्‍या भागात बर्फ़ वितळायला लागलय. आता महापूर, शार्क्स अशी दुसरी संकटं आहेत. त्यात दिऍगो या saber ला पाण्याचा फ़ोबिया आहे! मॅनी mammoth ला चक्क एक(मेव) girlfriend ही मिळते पण तीही identity crisis झालेली!!:-)
तिला लहानपणापासून possums (एक उंदीर्सदृश प्राणीजात!) मधे राहून आपण स्वत ही possum आहोत असा समज आहे!
या सगळ्या missmatch प्राण्यांचा जगावेगळा कळप एकत्रित पणे संकटांचा मुकाबला करत कोरड्या जमिनीवर कसा पोहोचतो त्याची ही cute कथा!! मज्जा आली बघाताना!
animation तर 'काय सांगावे महाराजा..' असं अप्रतिम! ice age , मोठे प्रचंड ग्लेशियर्स, त्याचे meltdown , महापूर वगैरे खरं वाटावं इतकं सुन्दर केलय! आपल्याला लय आवडला!!


Dineshvs
Saturday, December 09, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा सिनेमा, प्रत्येक बाळाने आवर्जुन बघावा असा आहे. त्यातले प्राणी ईतके क्युट आहेत कि ते Animation आहे हे पटतच नाही.

Dineshvs
Sunday, December 10, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ताच धुम २ बघुन आलो. अगदी प्रेक्षणीय सिनेमा.
ट्रेलर आणि ईथल्या प्रतिक्रिया बघुन बघायचाच असे ठरवले होते.
तसा पहिल्या भागाशी तितकासा संबंध नाही. सगळा डोलारा हृतिकच्या रुंद खांद्यावर.

अभिषेक तसा बघायला गेलो तर नायक, पण तो अगदीच निष्प्रभ ठरलाय. साहसदृष्यातहि आणि अभिनयातहि.
सिनेमात पहिल्यांदाच नामीबियामधले हृतिकचे थरारक साहसदृष्य आहे. अशी दृष्ये कशी चित्रीत केली जातात त्याची पुर्ण कल्पना असुनही, हृतिकमुळे ते सर्व विश्वसनीय वाटते. आणि त्यानंतर लगेच येणारे अभिषेकचे, ( बहुतेक केरळमधले ) साहसदृष्य अगदीच केविलवाणे झालेय.
हृतिकचे नाच ईतके जोशपुर्ण आहेत, कि त्यामुळे माझे, पहिल्या आणि शेवटच्याहि श्रेयनामावलीकडे पुर्ण दुर्लक्ष झाले. त्याच्या नाचापुढे जिथे नृत्यनिपुण ऐश्वर्याचे नाच प्रभावहिन ठरलेत, तिथे बिचार्‍या अभिषेक आणि बिपाशाची काय पत्रास.
निव्वळ आचरटपणा करण्यासाठी असलेले उदय चोप्रा नामक वशिल्याचे तट्टु असल्याने, बिपाशा दुहेरी भुमिकेत असुनहि अगदीच ग्लोरीफ़ाईड एक्स्ट्रॉ ठरलीय. मूळ कथानकाशी तिचा काहि संबंधच नाही. ती खुपच फ़ॉर्ममधे दिसलीय, आणि तिचे कपडे तिला शोभुनहि दिसलेत.
ऐश्वर्याची भुमिका, अत्यंत महत्वपुर्ण आहे. तिच्या कुवतीनुसार तिने ती नीटस केली आहे. तिचा आणि हृतिकचा पिस्तुलाचा प्रसंग तर खुपच उत्कंठापुर्वक लिहिला गेलाय, आणि तो तसा सादरहि झालाय.
चित्रीकरण नामीबिया, मुंबई आणि रिओ द जानिरो मधे झालेय. सगळीच लोकेशन्स देखणी आहेत.
यातल्या चोरीच्या युक्त्या तर अभिनवच आहेत. मलातरी त्या कुठल्याहि हॉलीवुडच्या सिनेमात बघितल्यासारख्या वाटल्या नाहीत. CBDG .
हृतिकच्या यशात त्याच्या मेकपचा मोठा हातभार लागलाय. हि कुणाची करामत आहे, ते वर लिहिलेल्या कारणामुळे मला कळले नाही. त्याची प्रत्येक वेशभुषा आणि रंगभुषा त्याला खुपच शोभुन दिसलीय.
यातले गॅजेट्सहि बॉन्डपटाच्या तोडीचे आहेत. पण ते आणि हृतिकच्या रुप बदलण्याच्या करामती, जरा विस्ताराने दाखवायला हव्या होत्या. ( टॉम क्रुजच्या MI-III मधे दाखवलेय तश्या. )
आदित्यचा पत्ता कट करुन बिपाशाला जरा जास्त वाव दिला असता, तर उत्कंठा अधिक वाढली असती.
एकंदर पाहणेबल सिनेमा.



Deepanjali
Sunday, December 10, 2006 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धूम 2 मधे खरच ह्रितिक बाल कलाकाराच्या mode मधून बाहेर आलाय !
फ़िजा नंतर पहिल्यांदाच He looked like a man! :-)
ह्रितिक तसा नेहमीच त्याचे सगळे roles मन लाउन करतो , उत्कृष्ट dance करतो पण गेले काही वर्षं त्याच्या चेहर्‍यात आलेली ती बालीश ( मतिमंद ?) झाक , तेच ते गोड मिट्ट हसणे आणि मुख्य म्हणाजे त्याच्या त्या कंबर हलवून नाछण्याच्या girly dance steps हे सगळे धूम मधे त्याने पूर्ण पणे बदलून टाकलेय !
धूम मचाले मधला त्याच्या dance आणि चोरीचे सगळे stunts ह्रितिक ने जबरदस्त perform केलेत !
ह्रितिक चे गेट अप्स तर खरच केवळ लाजवाब आहेत , सगळ्यात अशक्य म्हणजे त्या museum मधल्या चोरी साठी भींतीवरच्या mural मधे जाउन निर्जीव उभा राहतो तो !!
ज्यानी कोणी make overs केले आहेत hats off to him !
ह्रितिक ला तो अफ़गणी style गेट अप त्याच्या लांब सरळ नाकामुळे आणि त्याच्या built मुळे फ़ार शोभून दिसतो !
( अर्थात मला मात्र जॉन ची फ़ॅन असल्यामुळे त्याला खूप miss केले इथे:-) )
बाकी movie मधे ह्रितिक शिवाय काहीच नाहीये !
ऍश नी body toning साठी बरीच मेहनत घेतलीये , गेल्या फ़िल्मफ़ेअरच्या कजरारे मधे dance करताना होत्या त्या पोटावरच्या वळ्या वगैरे जाउन एकदम concave belly वगैरे शिवाय duksy bronze colored skin foundations पण suit झालेत तिला . :-)
Acting पेक्षा ही ऍश रॅंप वर चालताना जास्त graceful वाटेल !
पण closeups घेतल्यावर मात्र चेहेरा मात्र फ़ारच aged, animic दिसतो ! तिच्या पूर्वीच्या looks ची जादू अजिबात दिसत नाही आणि acting मधेही फ़ारच कमी पडते ..
ह्रितिक आणि ऍश नी चक्क पहिल्यांदाच (?) एक kissing scene दिलाय !
बिपाशा looks HOT with her magical dusky complexion, extra sculpting figure and heavy black eye liner.
अभिषेक बरोबरच्या एका party song मधल्या orange dress मधे बिपाश फ़ारच attractive दिसलीये आणि अर्थात च swim suits, hawain dresses मधे :-)
पण तिच्या दोन्ही roles पैकी कुठलाच role धड लिहिला नाहीये !
अभिषेक short hair cut मधे चांगला दिसतो पण त्याला काहीच scope नाहीये .
उदय चोप्रा अतिशय कळकट्ट , कधीही दात न घासल्या सारखा गलिच्छ दिसतो !
धूम प्रेक्षणीय होण्यात dress designers चा पण वाटा आहे !
ह्रितिक चे सगळे गेट अप्स तर अशक्य केलेत शिवाय ऍश चे micro minis, बिपाशाचे dresses पण सही आहेत !
Cinematographers ची कामगिरी पण incredible!
बाकी धूम चे कथानक वगैरे अगदीच कमजोर आहे , शेवट तर विनोदी !
पण तरीही इतक्या मोठ्या visual treat साठी फ़क्त theatre मधे जाउन च एकदा नक्की पहावा असा !





Dineshvs
Monday, December 11, 2006 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ हे गेटप्स आणि कॉश्च्युम्स कुणी केले आहेत ? मी नावे वाचु शकलो नाही.

Himscool
Monday, December 11, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीही परवाच धूम - २ बघितला...
काही मत्तांबाबत दिनेश आणि दिपांजली शी सहमत...
दिनेश तुम्ही म्हणत आहात त्यानुसार तो म्युझियम मधल्या चोरीचा प्रकार माझ्यामतेही नविनच आहे... त्यात एकच गोष्ट खटकते... लेझर किंवा तत्सम काहीतरी वापरून तो हिरा परत जागेवर दिसणे... त्या सीन मध्ये हृतिकनी खरच सही अभिनय केला आहे... पण ह्या चोरीच शेवट फारच विनोदी केला आहे...
ऐश्वर्या राय नुसतीच बारीक दिसली आहे... चोर म्हणुन अजिबात शोभत नाही...

चित्रपटाच्या संगीताने पूर्ण निराशा केली... धूम पेक्षा चांगल्याची अपेक्षा होती पण ते चांगले करायच्या प्रयत्नात पार वाट लागली आहे...

पूर्ण चित्रपटात हृतिकची वेशभूषा खूपच महत्वाची आहे आणि ती फारच सुरेख केली आहे...

अभिशेक बच्चन फारच कमी पडला हृतिक पुढे...

शेवटची चोरी आणि त्यानंतरचा पाठलाग हास्यासस्पद वाटले...

सगळ्यात कमी रेट मध्ये ज्या थिएटर मध्ये हा चित्रपट बघायला मिळत असेल तिथेच बघावा, तेवढीच लायकी वाटते...


Manuswini
Monday, December 11, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धूम २ ठिक आहे. मला तो तर ज्यास्त लहान मुलांसाठी आहे असे वाटते.

आणे हिरा चोरी scene kind of entrapment picture मधुन उचललाय असे वाटते.
some shorts are quite similar like Entrapment movie




Deepanjali
Monday, December 11, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश ,
Search मारल्यावर Anaita Shroff Adjania हे नाव दिसले costume designer म्हणून .
आणि गंमत म्हणजे google search मारताना ही link सापडली:-)
Inspired or copied??
मनुस्विनी ,
एनट्रॅपमेन्ट मधे वेगळ्या style ची आहे चोरी , त्या beams च्या directions चुकवत जाण्या साठी Sean Connery कॅथरीन ला जे treaning देतो तसा scene बहुदा धर्मेंद्र च्या शालीमार मधे चोरला आहे .


Sami
Monday, December 11, 2006 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

entrapment हा अलिकडचा movie आहे. शालीमारमधे त्यातला scene कसा चोरतील?

Dineshvs
Monday, December 11, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार DJ
नाही, एन्ट्रॅपमेंट मधे बरीच वेगळी चोरी आहे. कॅथीचे लेसर चुकवत जाणे, फारच छान चित्रीत झालेय. पण धुम २ मधे लेसरचा तितकासा अडथळा नाही.
कुणाला आठवत असेल तर मुगले आझममधे मधुबालाचापण पुतळ्यासारखा मेकप आहे. अगदी पहिलाच सीन आहे तो, त्यानंतर मोहे पनघटपे, हे गाणे सुरु होते.


Asmaani
Monday, December 11, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ अगं धूम २ मधे ह्रितिक ने अभिनय केला आहे म्हणे. so that's it ! अभिनयाची गरज होती म्हणूनच जॉन अब्राहम ला न घेता ह्रितिक ला घेतलेय! ही ही ही...(हसरे चेहरे टाकायला शिकवा ना कुणीतरी).
रागवू नकोस ग गम्मत केली. btw DJ तू beautician, fashion designer वगैरे आहेस का? असलीस तर मला तुझी थोडी मदत हवी होती.


Kedarjoshi
Monday, December 11, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुतळा तयार होत नाही म्हणून तिलाच उभे केले जाते. मधुबाला काय दिसते तेव्हां.

शनिवारी डेडलाईन पाहीला. बरा आहे.

रविवारी विवाह पाहीला. बोअर पिक्चर. कंटाळा आला. तिन तास वाया गेले.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators