|
चश्म्यावरून आठवले.. नुकतीच लेन्स घालायला सुरुवात केली होती. चश्म्याची सवय सुटली नव्हतीच.. मध्येच नाकावर चश्मा चढवायची... मग लक्षात यायचे,,,, आणि एकदा तर कॉलेजला जाताना रूमभर चश्मा शोधला,,,, सोबत रूम मेटला पण हेच काम दिले.. सापडल्यावर ट्युब पेटली.... आपण आज लेन्स घातल्यात....
|
Chyayla
| |
| Thursday, November 16, 2006 - 5:11 am: |
| 
|
नन्दिनी... BTW ही पोस्ट तु चष्मा लावुन लिहिलीस की लेन्स लावुन? काही म्हणा पण तुझा BB काही चुकला नाही.
|
आता सवय झालेय रे लेन्सची.. पण सुरुवातीला खूप मजा यायची. त्यातून मी लेन्स घालायला लागल्यावर माझे cousins किवा रूममेटस आई गं दुखत नाही ना.. कोणी सागितलीये ही नसती झंझट सरळ चष्मा बरा.. वगैरे म्हणत बसायचे..
|
याला वेंधळेपणा म्हणावा की काय कोणास ठाउक? माझ लग्न झाल्यांनंतर साधारण तीनचार महीन्यानी आम्ही पुण्याला गेलो होतो. त्यावेळी एका मैत्रिणीकडे गेले होते. तिच्या आजोबानी मला विचारलं " बरं मग काय करतात तुझे यजमान?" मी गडबडले पण मग लगेच बेधडक उत्तर दिल" रिटायर्ड आहेत. सध्या घरीच असतात." बापरे! या अत्तराने आजोबा चक्रावले, आणि मैत्रिण गार. मग लक्षात आलं की ते माझ्या नवर्याबद्दल विचारत होतेआणि मी यजमानचा अर्थ घेतला की ज्यांच्याकडे उतरलो होतो ते!आणि ते निवृत आहेत. आजोबांना वाटल की हीनी एखाद्या म्हातार्याशी लग्नबीग्न केलं की काय. त्यांच्या मते हल्ली काही भरोसा राहीलेला नाही. खुलासा झाल्यावर मात्र ह. ह. पु. वा. झाली. अजुनही आठवलं तरी हसु येतं आज एकाशी बोलताना या प्रसंगाची आठवण झाली म्हणुन आज लिहित्ये नवर्याला यजमान म्हणतात हे माहीत असुनही आयत्या वेळी लक्षातच आलं नाही माझ्या. कारण आजपर्यंतच्या आयुष्यात पाहुणे आणि यजमान हेच समिकरण माहीत होतं ना!
|
Mrinmayee
| |
| Thursday, November 16, 2006 - 3:39 pm: |
| 
|
मनिषा, फारच मस्त! पोटभर हसून घेतलं!
|
Shyamli
| |
| Thursday, November 16, 2006 - 8:13 pm: |
| 
|
मनीषा.......... बर, आता सांग काय करतात तुझे यजमान....... 
|
अजुन फा SSSSSSSS र वर्ष आहेत ग रिटायर्ड व्हायला! 
|
Manyah
| |
| Friday, November 17, 2006 - 5:04 pm: |
| 
|
Namskar, rikshaw che bill 92/- rs zale asatan 100/- rs chi note samjun 500/- note deun keep the change ase mhanun nighun janara esam chukun kadhi adhalala tar lagech haak mara. mazya shivay konihi asanar nahi
|
मन्या.. असे तू कितीवेळा केलं आहेस रे?
|
Chyayla
| |
| Saturday, November 18, 2006 - 1:35 pm: |
| 
|
काय नन्दिनी मन्याच्या घरासमोर रिक्शा घेउन उभे राहण्याचा विचार आहे का?
|
Manyah
| |
| Saturday, November 18, 2006 - 4:09 pm: |
| 
|
अता पर्यन्त मी हे दोन वेला केले आहे.....
|
Zakki
| |
| Saturday, November 18, 2006 - 5:20 pm: |
| 
|
माझ्या मामी १९८० च्या सुमारास नेहेमी सांगत, आमचा प्रकाश इतका वेंधळा की शंभराच्या नोटा त्याच्या धुवायला टाकलेल्या पायजम्याच्या खिशात सापडतात. मग आम्ही म्हणायचो की बरे बुवा तुम्हा श्रीमंताचे, शंभराच्या नोटा म्हणजे त्याला काही वाटत नाही! किंवा नुकतेच कुणातरी पुढार्याच्या मुलानी म्हणे ५०० रु. ची नोट जाळून सिगारेट पेटवली! धन्य धन्य, गरीब देशातले श्रीमंत भारतीय. इतके वर्ष अमेरिकेत सर्व नोटा सारख्याच आकाराच्या नि रंगाच्या असल्या तरी कुणि दहाची समजून शंभरची नोट दिल्याचे ऐकले नाही. आम्ही आपले श्रीमंत देशातले गरीब लोक, पैसे जपून वापरणारे!
|
झक्की मला इथे सेफ़वे मधे एकाने 20$ समजून 100 ची नोट दिली होती. माझ्या बाहेर आल्यावर ते लक्षात आल. मी परत आत जाऊन त्याला ती नोट परत केली तर त्याने धड thanks पण म्हंटल नाही मला
|
मनिषा खुप हसलो आम्ही सगळे.. तुझा किस्सा ऐकुन ....!!!! रचना.. तो indian होता का? ..
|
Zakki
| |
| Monday, November 20, 2006 - 12:53 pm: |
| 
|
रचना, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्हाला रात्री शांत झोप लागो. (जवळच्याला सांगा त्रास देऊ नका!) तुम्ही योग्य तेच केले. तो सेफवे वाला गेला खड्ड्यात्. त्याचा विचार करून मनस्ताप मात्र होईल. फारतर पुन: तिकडे जाऊच नका! इथे आता भारत अमेरिका वाद चालू होऊ नये म्हणून मी तरी इथेच थांबतो. यालाच तर आग लावून पळून जाणे म्हणत नसतील ना?! की यालाच माझा इब्लिसपणा, वेंधळेपणा म्हणायचे?

|
काल रात्री अगात थोडा ताप होता.. रूम मेट म्हणाली क्रोसिन घे.. हातात ती मोठी गोळी घेऊन मी तिला विचारले.. एक घेऊ की अख्खी घेऊ? तिने उत्तर दिले नको सगळी घे.. ताप लवकर उतरेल..
|
Jhuluuk
| |
| Friday, November 24, 2006 - 8:51 am: |
| 
|
एक.. अख्खी... सगळी !! नंदिनी, किती गोळ्या घेतल्या शेवटी?
|
तीच तर पुढची गम्मत आहे.. पार अगदी MD करणार्या मित्राला फ़ोन करून विचारले आणि अर्धी गोळी घेतली...

|
Swa_26
| |
| Saturday, November 25, 2006 - 10:22 am: |
| 
|
ह्याला माझा वेंधळेपणा म्हणता येईल का? माझ्या एका नेट वरील मित्राने मला एक मेल केली, त्यामधे असा प्रकार होता. म्हणजे त्यात आपल्या कोणत्याही ३ क्रशेस ची नावे लिहायची आणि मग त्यातील कोण आपल्याला जास्त suitable आहे ते येणार असे होते. मी एकदम एक्साइट होऊन माझ्या मधील क्रशचे नाव टाकले आणि बाकी २ जागी ABC आणि XYZ टाकून send केलं....... आणि कसचं काय आणि कसचं काय ती मेल त्या सेंडरलाच गेल्याचा मेसेज आला स्क्रीनवर यात मुख्य गोष्ट अशी कि त्या क्रशचे आणि मेल पाठवणाराचे नाव एकच!! दुसर्या दिवशी आमच्या मित्रवर्यांचे फोनवर फोन... तो मीच ना म्हणून... आता काय सांगणार... त्याला समजावता समजावता नाकी नऊ आले मला...
|
Can you beat this one??? I forgot my school bag in the bus...I was in 7th Std..no doubt I was most famous person for that week. The driver was good; he gave the bag to school authorities at his EOD.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|