Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 22, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through November 22, 2006 « Previous Next »

Swaateemumbhai
Saturday, November 18, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवाह खरचं छान आहे...

Shrashreecool
Saturday, November 18, 2006 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही विवाह खूप आवडला.

Dineshvs
Saturday, November 18, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर, मी बहुतेक आज जाणार आहे, कॅसिनो रॉयाल बघायला

Yog
Saturday, November 18, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

New 007: kool.., finally "an authentic bond".
Movie: Starts with WOW ! (Title track/song/animation simply amazing.)After 1st hour gets into "vohh".. becomes "hhmm" ends "ok".
Will wait for lot more and better from this Bond...


Dineshvs
Saturday, November 18, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग, आत्ताच बघुन आलो. ट्रेलरमधे डॅनियल क्रेग आवडला नव्हता, पण सिनेमात बरा वाटला. तरि पियर्सची जादु अजुन उतरली नाही.
कॅसिनो रॉयाल बरा आहे. ईतके स्टंट्स बघुन झाल्यावर आणखी नवे काय द्यायचे, असा दिग्दर्शकाला प्रश्णच पडत असणार. याबाबतीत अगदीच निराशा नाही झाली. युगांडा आणि मदागास्कर मधली साहसदृष्ये अनोखी आहेत. शेवटचे साहसदृष्य पण चांगले आहे. पण मधेच पटकथा रेंगाळल्यासारखी वाटते. कारण त्यापैकी बसाचसा भाग, जुगाराच्या टेबलावर चित्रीत झालाय. ज्याना या खेळात रस आहे त्याना तो आवडेलहि, पण माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाना मात्र तो नक्कीच कंटाळवाणा वाटेल. तसेच हा भाग अगदी एकसुरी पणे चित्रीत झालेय. पटकथेतली अपेक्षित उत्कंठा, चित्रीकरणात जाणवत नाही.
एम च्या भुमिकेत ज्युडी डेंचला नेहमीपेक्षा जास्त दृष्ये आहेत. खलनायक कोण याचे गुढ नेहमीप्रमाणेच शेवटपर्यंत राखले आहे.
लोकेशन्स चांगली असुनहि, चित्रीकरणाचा दर्जा तितकासा चांगला नाही, भारतात पाठवतात त्या प्रिंट्स दुय्यम प्रतीच्या असतात का ?


Kedarjoshi
Monday, November 20, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



भारतात पाठवतात त्या प्रिंट्स दुय्यम प्रतीच्या असतात का ?
काही सिन मला ही फालतु प्रतीचे वाटले. पण भारत हा ईंग्लीश पिक्चर्सची मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे तसे नसेल.

कसीनो रॉयाल. मी पण बघीतला. पहीले २० मिनीट चित्तथरारक. ( मला उगीच किंगकॉंग ची आठवण झाली). नंतरचा विमानाचा सिन मस्त. शेवट हिंदी पिक्चर.

मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. बॉन्ड पहीली गाडी चालवतो ती फोर्ड आहे. नंतर त्याला दुसरी मिळते ति लँडरोव्हर आहे. त्या बाजुला जी थांबली आहे ती जग्वार. नंतर त्याची रेग्युलर गाडी (फक्त तिन सिन मध्ये अस्टॉन मार्टीन). शेवटी परत शेवटच्या सिन मध्ये जग्वार.
असॉन मार्टीन ही नेहमीची गाडी, पण त्यात एकही सिन चित्तथरारक नाही. उलट मला वाटले की नायीकेला पळवुन नेल्यावर तो त्याचा गाडीत बसुन पाठलाग करतो तेव्हा काही सिनस मस्त असतील. नो सरप्राईज. आय एॅम नॉट डुईंग एनीथींग

निट लक्ष दिले की गेम लक्षात येतो. ह्या सगळ्या गाड्या फोर्डच्या आहेत. बहुतेक फोर्ड ने भरपुर पैसे ह्या पिक्चर वर खर्च केले. ( काय की चित्रपट पाहायाचा की काही डिटेल्स लक्षात ठेवावेच लागतात).

डनीयल काही सिन मध्ये मस्त वाटतो. पण ओव्हरऑल हिंदी पिक्चर.


Dineshvs
Monday, November 20, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, मला ब्रोकबॅक माऊंटनच्या वेळी पण असेच वाटले, त्या मानाने मेमोयार्स ऑफ़ अ गैशा, तसा नव्हता. ( म्हणजे फक्त प्रिंट्सच्या बाबतीत ) हाच सिनेमा परदेशात आणि भारतात बघितलेला कुणी भेटेल का आपल्याला ?

Atul
Monday, November 20, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमकारा - hats off to सैफ अली खान. शेवट अती रक्तरन्जीत!

Malavika
Monday, November 20, 2006 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मेमोयार्स ऑफ़ अ गैशा चित्रपट आवडला पण का कोण जाणे त्याचा शेवट तेवढ्या उंचीवरचा नाही वाटला. Any comments from anybody?

Shrashreecool
Tuesday, November 21, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल 'अर्ध सत्य' बघितला. १९८० मधे, गोविंद निहलानी ह्यांनी दिग्दर्शीत केलेला. ओम पुरीला ह्या चित्रपटासाठी National award मिळाला होता आणि सदाशिव अमरापुरकरला best supporting actor साठी. तसेच उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी गोविंद निहलानी ह्यांना. स्मिता पाटिलचे काम खूप कमी आहे पण तरीही तिची उपस्थिती जाणवत राहते.

लोकशाही म्हणजे काय? सरकार म्हणजे काय? आणि ह्या दोघांशी सर्वसामान्य जनतेचा संबंध काय? ह्या ३ प्रश्नाची उत्तरे मला हा चित्रपट बघून मिळाली. ह्या चित्रपटात एक भाषण दाखवले आहे. 'लोकशाही सुरक्षा संघ' ची नेता ही भाषण करते. खूप प्रभावी! जमलेच तर मी इथे लिहून काढते.

दिलिप चित्रेंच्या कविता ह्या चित्रपटात घेतल्या आहेत. 'अर्ध सत्य' ही त्यांचीच कविता.


Himscool
Tuesday, November 21, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री १० वाजता Bridge on the river Kwai हा चित्रपट SETPIX ह्या चॅनलवर दाखवणार आहेत..

Ajjuka
Tuesday, November 21, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात पाठवतात त्या प्रिंट्स दुय्यम प्रतीच्या असतात का ?
काही सिन मला ही फालतु प्रतीचे वाटले. पण भारत हा ईंग्लीश पिक्चर्सची मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे तसे नसेल.

अरे केदार दिनेश ना Print Quality बद्दल म्हणायचेय. सिनेमाच्या नाही.
शक्यता आहे दिनेश की वापरलेल्या, scratched prints इथे येतही असतील कधी काळी पण थोडं तांत्रिक बाजूकडे पाह्यलं तर हे सगळ्याच वेळेला शक्य दिसत नाही. एकतर त्यांचा worldwide release असतो त्यामुळे print ही नवीनच असते. तसेच generally कुठलीही print १०० एक screenings पर्यंत नीट रहावी यासाठी बनवलेली असते ( exact आकडा बघून सांगेन). त्यांच्याकडची तर नक्कीच. आपल्याकडच्या projector rooms ह्या जर जुन्या प्रकारच्या असतील किंवा operators ना नवीन platter च्या यंत्रांचे गणित उलगडले नसेल तर मग घोळ होऊ शकतो.

मी प्लाझा च्या projection room मधे operator ला विडी हातात धरून काम करताना याचि देही याची डोळा पाह्यलय आणि अर्थातच शिव्याही घातल्यात. श्वास च्या निमित्ताने बर्‍याच projection rooms मधे जाऊन आले आहे. multiplexes सोडली तर जुन्या single screens च्या ठिकाणी projection rooms ची दुरावस्था अनेकदा बघण्यासारखी असते. कोणीही कितीही चांगली print दिली तरी या परिस्थितीमधे तुम्ही काय करणार...


Pooh
Tuesday, November 21, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

watch the real story behind the
bridge on the river kwai on wed. night at 8 pm on PBS.

http://www.pbs.org/tvschedules/

Kedarjoshi
Tuesday, November 21, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकशाही म्हणजे काय? सरकार म्हणजे काय? आणि ह्या दोघांशी सर्वसामान्य जनतेचा संबंध काय? ह्या ३ प्रश्नाची उत्तरे मला हा चित्रपट बघून मिळाली.
नो ऑफेन्स पण नागरिक शास्त्रात हे ८ वितच शिकवीतात की.

Dineshvs
Tuesday, November 21, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, हि पडद्यामागची कहाणी सांगितलीस ते बरे झाले. पण तु डोंबिवली फ़ास्ट आणि हा सिनेमा यांची तुलना करुन बघ. साहसदृष्यातली तांत्रिक सफ़ाई, चित्रीकरणात का दिसत नाही.
तुला आणखी बारकाईने सांगायचे तर उमराव जान मधे ऐश्वर्याची त्वचा अगदी नितळ दिसते, त्याचवेळी तिच्या चेहर्‍यावरची बारिक मुरुमे सुद्धा दिसतात, पण या सिनेमात टिपिकल युरोपीयन ओढलेली, निस्तेज त्वचा दिसत राहते. बरं प्रोजेक्टरचे म्हणशील, तर दोन्ही सिनेमे मी एकाच ठिकाणी बघितले.
याच सिनेमात मदागस्कर मधल्या अतिवेगवान साहसदृष्यात, तर पुर्वीच्या काळचे ओर्वो रंग वैगरे वापरलेत कि काय अशी शंका येते ? तु आणखी विस्ताराने लिहिशील का ?


Ajjuka
Tuesday, November 21, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आधी दोन्ही चित्रपट पहाते आणि मग उत्तरं देते.
खरं सांगू का मी वर जे साण्गितलय ना त्याच्यापेक्षा जास्ती मलाही माहित नाहीये. त्यामुळे पाहून झाले की कुठल्यातरी expert शी बोलीन आणि मग सांगीन.


Atul
Tuesday, November 21, 2006 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोसला का घोसला- निखळ मनोरन्जन, जरूर पहावा असा चित्रपट. बोमन इराणी इज ग्रेट!

Disha013
Tuesday, November 21, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जानेमन्: टाइमपास साठी बघायला हरकत नाही.गाणी बरी आहेत.मधेमधे हसु पण येते.
उमराव जान्: काही लिहायची गरज नाही इतके लिहिले गेलेय.... ऐश्वर्याचे डोळे गाळणे अति झालेय....
सुनिल शेट्टी आणि 'उमराव जान' मधे!!!! हाच मोठा जोक आहे....

विवाह्: छान वाटला.जरुर बघावा असा......साधीसुधी कथा,साधी मांडणी.....भपकेपणा नाही.... डोके ठणकवणारी गाणी नाहित... विवाहाचा अर्थ समजुन घेण्यासाठी लग्नाळू मुलांनी तर बघाच.


Robeenhood
Wednesday, November 22, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐश्वर्याची त्वचा अगदी नितळ दिसते, त्याचवेळी तिच्या चेहर्‍यावरची बारिक मुरुमे सुद्धा दिसतात,>>>>>

दिनेश,
३३ व्या वर्षी चेहर्‍यावर मुरुमे?
(ऐ. ते. नवलच!)


Sunidhee
Wednesday, November 22, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवाह मला पण आवडला. सर्व अगदी हळुवार आवाजात बोलले आहेत. त्यातल्या त्यात हिरवीन. twist ची हाताळणी पण हळुवार आहे. आणि उगाचच मोठ्मोठ्या वयान्च्या लोकाना hero-heroin केले नाहिये.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators