Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 13, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कसा वाटला » Archive through November 13, 2006 « Previous Next »

Bee
Monday, November 06, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेखाची उमराव जान फ़क्त माधुरी दिक्षित उभी करू शकेल. इतर कुठल्याच अभिनेत्रीत ती क्षमता नाही. आणि खय्यामचे संगीत आणि आशा भोंसलेचा आवाज ह्यांच्या स्थानी सध्या तरी कुणीच दिसत नाही.

Chioo
Monday, November 06, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, मूळ सिनेमातही अमीरनची तिच्या आईशी भेट आहे. ' ये क्या जगह है दोस्तों' या गाण्यानंतर ती समोरच असलेल्या आपल्या घरात जाते. तिथे तिची आई तिला ओळखते, किती दिवसानी आली, इतके दिवस कुठे हरवली होती असे डायलॉग मारते आणि तेव्हाच तिचा लहान भाऊ येतो आणि म्हणतो की, तू इथून निघून जा. तू घराण्याचे नाव घालवलेस, तू इथे आलिस हे लोकाना कळाले तर ते वाळीत टाकतील(अगदी असे नाही पण या अर्थाचे) असे डायलॉग तो मारतो. मग उमराव जानला कळते की, तिची जागा आता कोठीच आहे आणि ती परत जाते. नविन सिनेमात ही भेट कशी घेतली आहे?

Dineshvs
Monday, November 06, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ, नविन सिनेमात आईहि तिला टाकुन बोलते. जुन्या सिनेमात आई अगदीच म्हातारी दाखवल्याने, तो प्रसंग फारसा उठावदार नाही. ईथे आईच्या भुमिकेत, माया अलग आहे. ये क्या जगह, टाईपचे जे गाणे आहे त्यात ऐश्वर्या, कमालीची सुंदर दिसलीय.

Atul
Monday, November 06, 2006 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मकबूल्- तब्बु, पन्कज कपूर, इरफ़ान आणि ओम पूरी यान्चे अभिनय सुन्दर आहेत. सिनेमा शेवटी जरा ताणला आहे, पण पहिले १-२ तास खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. एकूण सिनेमा आवडला

Prashantkhapane
Tuesday, November 07, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I agree with 'Khayyam and Asha' comment. One thing nobody mentioned: the lyrics. Akhtar sahaab is good, however Gazals here do not have the quality of 'Shaharyaar'.
Anu Malik surprisingly does an ok job. Couple of songs remind me of 'oldies' but thats Anu Malik for you.

Mbhure
Tuesday, November 07, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक " यतिम " सोडुन नुसतेच Media Hype चित्रपट बनवणार्‍या J. P. दत्तांकडुन फार अपेक्षाही नाहीत. Refugee असो किंवा Border असो... नुसतीच बोंबाबोंब आहे. अगदी शेवाटपर्यंत बघायचाच असे ठरवले तरी अजपर्यंत तो बॉर्डर अर्धाच जेमतेम ढकलतो. एक गाणे सोडले तर ऑर्डिनरी चित्रपट आहे. Refugee तर....

जुन्या उमरावजान मधील तिच्या आई आणि भावाबरोबरचा प्रसंग आटोपशिर आणि थोडक्यात पण बरेच काही सांगून जाणारा वाटतो.

हल्लीचे हे Hype चित्रपत बघायला मला तरी भितीच वाटते. खास करून संजय लीला भंसाली, करन जोहर आणि असे अनेक. पण उमरावजान आमच्या घरी नक्की आणला जाणार यात शंका नाही. तेंव्हा बघू कसा वाततो ते.

गेल्या पंधरवड्यात पाहिलेले चित्रपटः

डोरः चांगला चित्रपट. फक्त गुलने जरा आधी सांगितले असते तर दोघींमधील संघर्ष जरा जास्त टेंशन देणारा झाला असता. But still it is a GOOD movie

लगे रहो... : ठीक आहे. चाले छे. खास काही नाहे. बोमन इरानीने जबरदस्त काम केले आहे. काही प्रसंग छान वाटले. जसे सुरुवातीला प्रत्येक प्रश्नासाठी Home Appliance FREE ; तसेच शेवटच्या लग्नाच्या प्रसंगी मुन्नाला गांधीजी दिसत असूनही तो ते ignore करतो. शेवट मात्र मला खटकला. बोमन इरानी गांधीवादाला शरण जात नाही तर त्याच्या मुलीचे लग्न होते (थोदक्यात Everything goes well so ends well ) म्हणुन मुन्नाची मागणी मान्य करतो असे वाटले.

खोसला का घोसलाः परत एकदा Hats off to बोमन इरानी. अनुपम खेरने मध्यंतरी जी गॅप घेतली तिचा ह्या गुणी अभिनेत्याने चांगला फायदा करून घेतला.एकदा नक्कीच बघावा.

बस एक पलः ?????? जुही फारच मोठी आणि वयस्क वाटते. प्रत्येकवेळी " एक पल " कसा सगळे बदलवतो, वगैरे.... Below ऑरडिनरी चित्रपट आहे. सिनेमा ना उपदेश देतो ना करमणुक करतो.


Aaftaab
Wednesday, November 08, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mbhure
In the end when Bapu meets Lucky Singh.. that shows that Lucky Singh has got convinced of Gandhigiri...
I liked another scene where Circuit has to take the invisible Bapu till the Taxi..

Mbhure
Wednesday, November 08, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, तो टॅक्सीचा शॉट पण चांगला आहे.

Deepanjali
Thursday, November 09, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोमन इरानी गांधीवादाला शरण जात नाही तर त्याच्या मुलीचे लग्न होते (थोदक्यात Everything goes well so ends well ) म्हणुन मुन्नाची मागणी मान्य करतो असे वाटले.
mbhure
In the end when Bapu meets Lucky Singh.. that shows that Lucky Singh has got convinced of Gandhigiri...


<<<भूषण , आफ़ताब ,
मला तरी मुन्ना भाई पाहून असे impression झाले , बघा पटतय का ..
त्यांना लकी सिंग गांधी वादाला convince होतो हा शेवट दाखवायचाच नाहीये !
गांधीवादाचा हेतू non violence ने आणि समोरच्याला लाज वाटेल इतके सौजन्य , संयम दाखवून एखादी गोष्ट जिंकणे हे आहे , समोरच्याने गांधीवादी बनालेच पाहिजे असा आग्रह नाही !
इतके सौजन्य दाखवायचे कि त्याची त्याला कधी तरी लाज वाटून तो आपली चूक मान्य करेल हा thought दाखवायचा आहे .
Infact, तो जिन्यात पान खाउन थुंकणारा किंवा पेन्शन खात्यात corruption करणारा अधिकारी हे पण त्यांनी गांधीवादाला शरण गेलेले दाखवले नाहीयेत , पण त्यांना समोरच्याने दिलेली गांधीवादी सौजन्यपूर्वक लढाई पाहून लाज वाटते , त्यामुळे ते चूक कबुल करतात एवढेच दाखवायचे आहे !
थोडक्यात विजय अहिंसा , संयम सत्याचा होतो एवढेच दाखवायचे आहे !
लकी सिंगही असाच ओशाळून घराची किल्ली त्याच्या हवाली करतो .
आणि मग जेंव्हा त्यालाही बदलायची गरज आहे म्हणून मग बापु त्यालाही दिसू लागतात शेवटी ..
थोडक्यात जेंव्हा जेंव्हा समाजातील हिंसा वाढेल , तेंव्हा तेंव्हा ही विचारसरणी बदलण्या साठी एखादा गांधी कुठल्या ना कुठल्या रुपाने जरुर प्रकट होईल असे दाखवायचे आहे ! हाच शेवट !
दिलिप प्रभावळकरच्या शब्दात "
जब भी मेरी जरुरत पडेगी तब तब मै किसी ना किसी के दिमाग मे chemical लोचा करने जरुर वापस आउंगा !" :-)

जसे राजेश खन्नाच्या बावर्ची चा शेवट होता .. कि बावर्ची शेवटी त्या घरातून निघून जातो अशा घराच्या शोधात ज्या घराला शंतिची गरज अहे !! :-)



Dineshvs
Thursday, November 09, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DJ मी दिग्दर्शकाचे स्वातंत्र असा उल्लेख केला होता तो याचमुळे.
जनाची नाही तरी मनाची लाज शिल्लक असलेली माणसे असतात, असे गृहित धरलेय. वास्तव कदाचित वेगळे असेल, नाही का ?
बावर्ची मधे शेवटी तो मुद्दाम चोरी वैगरे करुन, जया भादुरीच्या प्रियकराला खोटेखोटे शुरपण देऊ करतो. पण शेवटी तो प्रियकरहि प्रामाणिकपणे सत्य सांगतो. CBDG


Upashiboka
Thursday, November 09, 2006 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BORAT कोणी बघीतला का? हसुन हसुन पुरेवाट. एकदा बघायला चांगला आहे. पण बरेच adult scenes आहेत जे काही लोकांना आवडणार नाहीत.

Mbhure
Thursday, November 09, 2006 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पष्टिकरणाबद्दल आभार, दिपांजली.

काल इकडे Independence Film Channel, USA वर दोन इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या आशियाईच्या जीवनाशी संबधित दोन सिनेमा दाखव्ले. त्यातील एक माझा आवडता Bend It Like Beckham होता. त्या आधी दाखवलेला My Son the Fanatic कधी ऐकलेला नव्हता. ओम पुरिची त्यात मुख्य भुमिका आहे. तो पाकीस्तानी immigrated टॅक्सी ड्रायव्हर असतो. इतर अनेक पॅसेंजर बरोबरच तो वेश्यांना हॉटेलमध्ये ने - आण करत असतो. त्याचवेळी तो गिर्‍हाईकाबरोबर असताना त्यांना खाणे, दारू पुरवण्याचे काम करत असतो. एका वेश्येशी त्याचे प्रेम जमते, वगैरे. घरात मात्र ओम पुरीचा २० - २२ वर्शाचा मुलगा मात्र त्याची मैत्रीण सोडुन मुस्लीम Fundamentalist बनतो. ओम पुरीला इस्लामवादावर अजिबात विश्वास नसतो. सेक्स, ड्रग्स, वाईट भाषेसाठी हा पुर्ण कुटुंबाबरोबर बघण्याजोगा नसला तरी ओम पुरीच्या अभिनयासाठी एकदा नक्की बघावा. पाकीस्तानी लेखकानेच लिहीलेली ही कथा असल्यामुळे इस्लामवादावर " कडक " भाष्य ऐकाला जरा आश्चर्य वाटत.


Sashal
Thursday, November 09, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण बघितला हा सिनेमा .. पण मला ओम् पुरीचं character नीट कळलं नाहि .. बाकी सगळं छान असलं तरी बायको त्याला स्वार्थी म्हणते तसंच स्वार्थी वाटलं ..

Prashantkhapane
Friday, November 10, 2006 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.rediff.com/movies/2006/nov/10vivah.htm
>>>>

you have to read this. :ROFL:

Kedarjoshi
Sunday, November 12, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिनेमक्स वर काल पासुन स्टार वॉर्स चे सगळे एपीसोड दाखवत आहेत. स्टारवॉर्स ज्याना आवडतो त्यांचासाठी पर्वणीच म्हणायची.

Sayuri
Sunday, November 12, 2006 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी 'विवाह' पाहिला का? कसा आहे? Hoping to be better than 'मैं प्रेम की दिवानी हूं'........

Maitreyee
Monday, November 13, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडजात्याने नेहमीचा सलमान सोडून त्या मानाने एकदम contrast लिपस्टिक वाला हीरो(?) घेतला आहे त्यात :-)

Arati_halbe
Monday, November 13, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांतनी दिलेल्या लिंक वरचा review वाचून "विवाह" बघायची हिम्मत करणे कठीण आहे

Bee
Monday, November 13, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी सांगू शकेल का 'या कुंदेही तुषार धवल' हे गाण कुणी गायल आहे आणि ते मला कुठल्या CD मधे मिळू शकेल? हे गाणे स्पर्शचे title song आहे. परत परत ऐकावेसे वाटते आहे. सुलक्षणा पंडीत नावाची पार्श्वगायिका तिच का जी खांदान मधे नयिका होती? खूपच गोड दर्दभरा आवाज आहे तिचा.

Karadkar
Monday, November 13, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोलमाल मधे सुलक्षणा पंडीत?
गोड दर्दभरा आवाज?
ःऋत्विक घातक???

या कुंदेही तुषार धवल ???

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators