Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through September 28, 2006 « Previous Next »

Milindaa
Wednesday, September 27, 2006 - 10:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येथे प्रश्न वयस्कर किंवा सुंदर असण्याचा नाहीये तर वृत्तीचा आहे. आमची सरकारी नोकरी आहे, आम्हांला धक्का पण लागत नाही, अशी वृत्ती असली की असेच व्हायचे..

Moodi
Wednesday, September 27, 2006 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा बरोबर आहे तुझे पण त्याच वेळी या लोकांनी म्हणजे सदस्यांनी एअर इंडियाच्या सेवेबाबतच जनतेने केलेल्या तक्रारी विषयी चर्चा सुरु केली होती, पण हा वय आणि सुंदरतेचा मुद्दा मध्येच आल्याने चर्चा भरकटली. आता सगळे आमदार परदेश दौर्‍यावर निघालेत( ताजी बातमी : आजचा लोकसत्ता), त्यांना या विमानातुन प्रवास करायला लावावा. अन अशीच वागणूक द्यावी.

Deepanjali
Wednesday, September 27, 2006 - 10:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या कणेकरी मधे Air India च्या air hostess बद्दल एक चावट वजा आचरट joke असतो ..

" अशा बायकांना ' हवाई सुंदरी ' म्हणून कसे ठेवतात जेव जाणे ., नुसते ठेवा हवे तर "

अजुन कोणी कणेकरांच्या या lines वर objection कसं नाही घेतलं काय माहित !
:-)


Raina
Thursday, September 28, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एअर इंडिया चा हा किस्सा १.५ महिन्यापूर्वीचा. माझ्या मैत्रिणीचे विमान जपान-बॅंकाॅक, दिल्ली मुम्बई- असे होते.. तर जाताना- बॅंकाॅक वर त्यांना २ दिवस लटकवलं- काय तर म्हणे कुठलातरी पार्ट खराब झाला होता.. ( एष्टी कशी मध्येच घाटात दुरुस्त करायला घेतात- तशी).. तर जाताना असे अडकले- आणि येताना मुंबई वरुन दिल्लीला विमान न्यायच्या ऐवज़ी- दुबईला नेलं- आणि तिथून दिल्लीला ( ह्याला काय अर्थ आहे का- गाडी वळवून दूरचा थांबा पण घ्यायला ती काय बस आहे का? आणि वळवून दुबईला- उलट्या दिशेला कसे नेऊ शकतात हे लोक?)

Bee
Thursday, September 28, 2006 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक आवाज उठविणारा लेख वाचून मन कसे खंबीर झाल्यासारखे वाटले. सुहानी तुझ्या शब्दाशब्दांमधे दम आहे. तू हा लेख सकाळला पाठवून दे.. देऊ मी पाठवून तुझ्यावतीने :-)

Suhani
Thursday, September 28, 2006 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो पाठवते आहे thanks Bee

Bee
Thursday, September 28, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी पाठवते आहेस तेही सांग.. म्हणजे doc मध्ये की PDF मध्ये की minglish मध्ये?

Bee
Thursday, September 28, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शीर्षक सुचवू का.. ' Air India चा भंकसपणा...'

Rupali_county
Thursday, September 28, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच अस आहे एअर इन्डिया च

बाई बाई.. नशीब मी क्वान्टास ने जातेय भारतात ते...
सुहानी खरच वाइट वाटल वाचून...
खूशाल दे हा लेख सकाळ ला....

माझी एक टर्की ची मैत्रीन एअर इन्डीया ने प्रवास करत होति, तर काही प्रवासी धूम्रपान करायला लागले... तीने मग एअर होस्टेसला सान्गितल..तर उत्तर काय मिळाल माहित आहे... " धीस रो इज फ़ोर स्मोकिन्ग पेसेनजर, धीस वन फ़ोर नोन स्मोकिन्ग पेसेन्जेर"

आता बोला तुम्ही काय बोल्नार या उत्तराला

माझी मैत्रीन म्हनते ना तुमच्या एअर इन्डिया ला अजीबात लाज नाही म्हनून
कानाला खडा लावला नी ठरवल आयुष्यात कधीच एअर इन्डिया ने प्रवास करायचा नाही....

लाज कशी नाही वाटत ह्या एअर इन्डिया च्या स्टाफ़ ला... जर मला कूणी भेटल तर खरच असा सोलुन काढीन ना....


Seema_
Thursday, September 28, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जितका संतापजनक अनुभव सुहानीचा Air India बद्दलचा आहे , तसाचा अनुभव Air France चा ( connecting Flight to Delta ) मी घेतलेला आहे. अतिशय उद्दाम आणि उद्धट लोक आहेत Air France चे ही . तेव्हा या Airline च तिकिट बुक करताना पण जरा विचार करुनच .

Prasadp77
Thursday, September 28, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Why don't you protest? as said before just send letters to as many newspapers as possible. once it will be ignored, twice it will be ignored and then they have to note it. If EVERYONE does it, it will certainly help. In my 'innocent' belief, current civial aviation ministry is doing better than the previous one so why not make use of it.
In such incidences, use your gadgets those lie in your pocket or purse, like mobile phone, take pictures of these people who are involved, record conversation. I know this is illegal in the US (even in Sweden) but there is no rule in India so far, as far as my knowledge goes. This will help to prove your stand.


Bee
Thursday, September 28, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल जेवण देणार्‍या आणि चांगल जेऊ घालणार्‍या flighs ची नावे सांगा बघू... च्यामारी ही लोक एक पाव शिल्लक द्या म्हंटल तर एक तास वाट बघा म्हणून सांगतात..

Lalitas
Thursday, September 28, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, माझा स्वीस, एमीरेट, सिंगापूर एयरलाइनसचा अनुभव चांगला आहे. चांगली वागणूक व जेवणही देतात. लुफ़्तांसा देखील तशी ठिक आहे.

सुहानीला जसे अनुभव आलेत तसेच १९८५मध्ये आम्हीपण घेतले आहेत, त्यानंतर एयर इंडियाने आजपर्यंत प्रवास करणे टाळत आलो आहोत. स्वच्छताग्रुहातील स्वच्छता नसणे, कर्मचार्‍यांचा फक्त भारतीयांशी उद्दामपणा आणि त्याबरोबरच गोर्‍यांचं लांगुलचालन.... सगळं डोक्यांत गेलं..... हेच जर स्वीसने प्रवास करत असाल तर आपल्याला जसे वाईट वागवत नाहीत तसेच त्यांच्या देशबांधवांनाही सापत्न वागणूक देत नाहीत.

एयर इंडियाला प्रोफ़ेशनल व्हायला अजून किती वर्षे लागतील?


Lopamudraa
Thursday, September 28, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी ललिता.. british ailines मध्ये एक भारतीय हवाइ सुंदरी असतेच ती चा हाच अनुभव आला.. पन परदेशातिल airhostes मात्र अस करत नाहीत.

Bee
Thursday, September 28, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण माझा एक अनुभव असा आहे ना.. की काही काही भारतीय जेवताना सयंम पाळत नाही. मी फ़क्त एक शिल्लकचा पाव मागत होतो आणि मला त्याचीही कोण लाज वाटत होती कारण बाकीचे सर्व जण मिटक्या मारत, बीअरचे घोट घेत जेवत होते. त्यांची शैली पाश्चात्त आणि माझी भारतीय शैली. मी आपले आले ताट आणि पाच मिनिटात फ़स्तही केले. एका पावावर भागत नाही म्हणून दुसरा मागितला. तर तासभर बसावे लागावे. पण तिने सर्वात शेवटी अगदी आठवणीने आणून दिला. माझ्या आजूबाजूला मोजकेच भारतीय बसले होते त्यांनी तर हे माग ते माग म्हणून नुसत चक्रावून सोडून दिले होते air hostes ला. मला खरचं इथे भारतीयांचा न आवडणारा वेगळेपणा दिसला. आमचे जेवण शाकाहारी होते आणि तेही जेमतेमच quantity मध्ये होते.

त्यामुळे ह्यानंतर मी एकच करतो घरुन आधी जेवन करुन निघतो म्हणजे कटकटच नाही. मला संध्याकाळी खूप भूक लागते. दुपारी एकदम कमी जेवन असते.

कधीकधी मी first serving च्या वेळेला जे दाणे वगैरे देतात त्याचेच एक दोन शिल्लकचे पाकीटं मागवून घेतो किंवा जवळ snacks बाळगतो.


Bee
Thursday, September 28, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि अजून एक की Indian meal कसे आधी येते ना.. आता प्रवासाचा अनुभव आल्यानंतर कळले की ते जरा शेवटी किंवा सर्वांबरोबर मागवावे. नाहीतर असे होते की आपले जेवन संपते आणि wash besin मध्ये जर जायचे असेल तर बाजूला बसणार्‍या व्यक्तीला उठवता येत नाही.. कारण ती जेवत असते. मग परत तासभर वाट बघा. कधीकधी तर मला odd man out चे जबरदस्त feeling येते.

Milindaa
Thursday, September 28, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी, तुझ्या अनुभवातून तुला नक्की काय सांगायचे आहे ते कळलेच नाही.. :-)
एकदम लिंबू ने पोस्ट टाकल्याचा भास झाला

जर सामान उशीरा पोचणे हा असेल, तर believe me, air india is no different than any other airline . किमान, ते २ लोक तुला घ्यायला आले हे काय थोडे आहे?

आणि जय ला आलेला अनुभव (हवाई सुंदरीला आपल्या भाषा न येणं) अगदीच दुर्मिळ आहे. सर्व आखाती एअरलाईन्स, हिंदी, इंग्लिश आणि त्यांची आखाती अशा भाषा येणार्‍या सुंदर्‍या विमानात ठेवतात, तसेच, veg हा शब्द खूप सर्वसाधारण आहे, तेथे asian veg, vegal veg असे प्रकार असतात आणि ते आपण आधीच सांगितलेले बरे असते. asian/hindu veg मध्ये मासे असू शकतात (बंगाली लोक मासे खातात म्हणून)

बी, गल्फ एअर ने जा. खायला भरपूर मिळेल :-)


Moodi
Thursday, September 28, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी आणि तिच्या अहोंचा अनूभव एकत्र झाला. नलिनी परत एकदा सुरुवातीपासुन वाच ते लिहीलेले.

गल्फ एअर!! खरोखर सुंदर असलेल्या हवाई सुंदर्‍या, नंतर बहारीनहून निघालेले छोटेसे विमान( पडदानशीनगिरी बघायला मिळाली कारण बिझीनेस क्लास आणि इकॉनॉमीत जास्त जागा नव्हती), तिकिट बुक करतांना हिंदू व्हेज मिल सांगीतले होते पण ऐनवेळेवर काऊंटवर ती बाई म्हणाली की त्यांना ट्रॅव्हलवाल्यांनी नाही सांगीतले तसे. पण विमानात मी आधीच ह. सु. ला सांगीतले तेव्हा तिने गोड हसून तसे आणून दिले.

बहारीनहुन भारतीयांची नेहेमीप्रमाणे धावपळ, गोंधळ चालू होताच. हिथ्रोला शिस्तीत उभे राहिलेले बहारीनला ४ रांगा करुन गडबड करायला लागले, आम्ही पहिले होतो रांगेत तर पाऽऽऽर मागे गेलो. आखाती अधिकारी मग वैतागले.

क्रमश (पुढील भागात एअर इंडिया आणि त्यातली धमाल, वात्रटपणा वाचायला सज्ज व्हा)


Nalini
Thursday, September 28, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, मी जयचा अनुभव हा चांगला अनुभव म्हणुन टाकला होता.
माझ्या अनुभावातुन हेच सुचवायचे की, ५ मिनिट मिळाले म्हणुन मी माझी पुढची flight घेऊ शकले.. नाहितर २४ तास तिथेच मुक्काम करावा लागला असता आणि पुढे काय काय अनुभव आले असते ते देव जाणे.
AI स्टाफ कडे सौजन्याशिलता हा प्रकारच नाही.
म्हत्वाचे म्हणजे लोक विमानात बसल्यावर ह्यांना कळते की विमान नादुरुस्त आहे.
AI ऑफिसमध्ये फोनच उचलत नाही कोणी. शिवाय त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन केल्यानंतर कळते की आपल्याकडे आहे तो नंबर चुकीचा आहे.
असे बरेच काही. खुपच घाईत पोस्टले होते म्हणून मुद्देसुद लिहिला आले नाही. परत वेळ मिळाला की पोस्टते.


Moodi
Thursday, September 28, 2006 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मध्यंतरी टाईम्स ऑफ इंडिया की इंडियन एक्सप्रेस मध्ये एअर इंडियाच्या लोकांनी(विमानातला स्टाफ) तक्रार केली होती की भारतीय लोक जगात कुठेही जा, कुणाचेच ऐकत नाहीत. मी ते पूर्ण नाही वाचु शकले, पण हाच किस्सा आठवला.

२ वर्षापूर्वी आमचे एअर इंडियाचेच बुकिंग होते. जाताना मी एकटी गेली आणि येताना आम्ही दोघे बरोबर आलो. विमानात मागच्या साईडला मध्यभागी एक जोडपे बसले होते, त्यांच्या मागे १ माणुस येऊन बसला. त्याची ती सीट नव्हतीच, पण रिकामी जागा पाहुन आला. नेमके काही वेळात विमान सुटायच्या आधी तो दुसरा माणूस आला, ज्याची ती सीट होती. हा आधी बसलेला उठायलाच तयार होईना, आधी त्या माणसाने समजावुन पाहिले, नंतर ह. सु. (हवाई सुंदरी)ला सांगीतले. पण हा उठेना, मग शेवटी पायलट आला त्याला समजवायला. मग उठले हे महाशय. किती वेळ लोक आ वासुन बघत होते की विमानात पण रेल्वे आणि बससारखी परिस्थिती कशी आली म्हणून.

दुसरे म्हणजे विमान उतरतांना किती वेळा सांगीतले जाते की गडबड करु नका, लाईनीत या, नीट सामान काढा. पण विमान जसे हळू हळू खाली येते तसे हे लोक धावपट्टी दिसली की उभे रहातात. जसे यांचे सामान घेऊन विमान आणि कर्मचारी कुठे पळून जाणार आहेत. मला मागे सामान पण काढता येईना कारण मागुन लोक लोटायचे. आता काय बस किंवा रेल्वेत ओरडतो तसे ओरडायचे थांबा रे म्हणून??

सुहानीला आला तो अनूभव नक्कीच विदारक आणि चीड आणणारा होता. पण जगात दुसरीकडे मी वर जसे लिहीलेय तसे पण लोक भेटतात.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators