Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कुंकू

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कथा old classics » कुंकू « Previous Next »

Maudee
Monday, July 31, 2006 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंकू

हा एक प्रभातचा अत्यंत गाजालेल्या चित्रपटांपैकी एक आहे. मला वाटत अजुनही हा चित्रपट प्रभात चित्रपट महोत्सवात दाख़वला जातो.

तर ही एक जरठ कुमारी विवाहाची कथा आहे. जरठ म्हणजे म्हातारा मनुष्य.
ही त्या काळातली कथा आहे जेव्हा समाजातील काही सदस्यांकडून अशा विवाहास बंदी यावी असं चालल होत तरीपण समाजात असे विवाह होत होते.

या कथेची नायिका आहे नीरु. असेल साधारण १८-२० वर्षांची. आई बाबा लहानपणीच गेले असल्यामुळे ती तिच्या मामा मामीकडे रहात असते. पण त्या दोघानास्वतःची इतकी मुले असतात की हिची अडचणच होत असते. हे दोघेही जण नीरुमागे लग्नाचा लकडा लावतात. त्या वेळच्या दृष्टीने तसा तिच्या लग्नाला उशिरच झालेला असतो. आणि मामा मामींच्या कटकटीला कंटाळून गेल्याने तिलाही लवकरात लवकर लग्न व्हावे असे वाटतसते.
एके दिवशी तिला काही जण बघायला येतात. त्यात एक तरूण मुलगा, आणि दोन म्हातारे गृहस्थ असतात. तिला वाटत की त्या तरूण मुलगाच तिला दाख़वला जात आहे. मुलगा तसा चांगलाच असतो दिसायला वगैरे आणि हिलाही लवकरात लवकर लग्न करुन माम मामींच्या इथून बाहेर पडायचे असते त्यामुळे ती हरकत घेत नाही.
ऐन लग्नाच्या वेळी तिला समजते की नवरा त्या म्हातार्‍या गृहस्थांपैकी एक आहे. पण त्यावेळी ती काहीही करु शक्त नाही.शेवटी लग्न होते. लग्नानंतर तिला समजते की तिच्या नवर्‍याने पैसे दिलेले असतात. ती ख़ूप ख़ूप चिडते पण काहीही करु शकत नाही.
लग्न होऊन सासरी येते. तेव्हा तिला कळते की घरात तिची विधवा नणंद आहे. शिवाय तो मुलगा जो आलेला असतो बघायच्या वेळी तो तिच्या नवर्‍याचा मुलगा आहे. या बरोबरच तिच्या नवर्‍याला एक मुलगी देख़ील आहे जी वयाने नीरुपेक्षाही मोठी आहे. पण तिने लग्न नाही केलेले पण समाजकार्याला वाहून घेतलेले आहे. तिच्या या मुलीचे नाव आहे चित्रा. हीच्या बद्दल तिने बरेच ऐकलेले असते लग्नापुर्वी इतकेच नव्हे तर ती तिची आदर्शच असते. ती वडीलांबरोबर रहात नसते. पण तरीही चित्राने हे लग्न कसे होऊ दिले हा तिला प्रश्न पडलेल असतो.

तिचा जो तरुण मुलगा आहे तोही वडीलांबरोबर रहात नसतो. तो शहरात शिक्षणासाठी गेलेला असतो. पण तोही वाया गेलेला असतो. दर महीन्याला पत्र लिहून वडिलाना पैसे मागायचे हा त्याचा उद्योग. त्यानी पैसे दिले नाहीत की हा घरी येत असे. वडीलाना ख़ूप बोलत असे. आणि आता वडीलांची तरूण बायको हाही त्याच्याकडॅ एक विषय होता बोलायला.
त्याची नीरुवरही वाईट नजर आहे. त्यावरून एकदा त्या दोघांच भांडणही होतं.

त्यांच्या लग्नानंतर्च्या पहील्या रात्रीचा प्रसंग तर अंगावर काटा आणतो. तिची नणंद तिला चिडवत रहाते. ख़ोलीत दुध वगैरे आणुन ठेवते. तेव्हा नीरुच्या डोक्यात प्रकाश पडतो की काय चालल आहे. ती दार आतून लावऊन घेते. पण तिचा नवरा आणि नणंअद बाहेरून दार वाजवणे तिला शिव्या देणे हे प्रकार चालू असतात. शेवटी ते दार तुटते. आता मात्र काय करावे ते नीरुला समजत नाही. नीरु आणि तिच्या नवर्‍यात झटापटी होते ती नवर्‍याला कशाने तरी मारते आणि पळून जाते.

या सर्वाचा राग म्हणुन ती घरातलीच एक अडगळीची ख़ोली रिकामी करुन तिथे राहू लागते. घरात अजिबात मदत न करत नाही. पाटावरून ताटावर असं करु लागते. नव्या नवरीला कोणी बघायल आले की त्यांचाही अपमान करयाला सुरुवात करते. यावरुन घरात रोज भांडणे आणि कधी कधी मारामारी पण.

अशातच एक दिवस चित्रा येते घरी. ती घरी आल्यावर तिला समजते की चित्राला ही लग्नाची गोष्टच उशिरा समजते. म्हणाजे तिला पत्रच अशा तर्‍हेने पाठवलेले असते की तिला ते लग्नानंतर मिळेल. चित्रा तिच्या वडीलाना ख़ूप बोलते. पण आता त्याचा ख़रच उपयोग नसतो. कारण काहीही झाल तरी पति हाच परमेश्वर वगैरे असेच संस्कार नीरुवर लहान्पणापासून झालेले असतात.
चित्राआणि तिचे ख़ूप चांगले समंद develop होतात. दोघीही एक्मेकींच्या चांगल्या मैत्रिणी होतात. पण तरीही कामसाठी चित्राल जायचेच असते. ती निघून जाते. आणि नीरु परत एकटि होते.
क्रमशः




हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators