Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 11, 2006

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » सिद्धगड » Archive through July 11, 2006 « Previous Next »

Bee
Friday, July 07, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फ़क्त गड दाखवा.. मग मी शूर मराठा.. मी तुम्हाला मला जमतील ते पदार्थ शिजवून खाऊ घालायला तयार आहे. अगदी आनंदाने... पण काय कर्म माझ, एकतर माझी नोकरी विदेशात आणि सुट्यांमधे मी घरी वर्‍हाडात. कुठे हे गडप्रेमी अन कुठ मी.

Limbutimbu
Friday, July 07, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> सुट्यांमधे मी घरी वर्‍हाडात
हरकत नाही, एक घर पुण्यात थाट!
थोडक्यात, झेपणार असेल तर, पुणेरी सासुरवाडी कर! पुण्याचा जावई व्हायला देखिल हिम्मत लागते!)
DDD

Moodi
Friday, July 07, 2006 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गडाची मोहीम एकदम सही झाली की जी एस. बाकी सविस्तर वर्णन आवडत मला. म्हणजे खाण्या बद्दल लिहीलत ना की अगदी पिकनीक पूर्ण झाली असे जाणवते..

हे बघा.

http://www.esakal.com/esakal/07072006/NT00A89936.htm

Bee
Friday, July 07, 2006 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, मस्त आहे ही लिंक. धन्यवाद!

Moodi
Friday, July 07, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी चिखलदरा पाहिलायस का? नसेल तर बघ. मी नाही गेले, पण फार सुंदर वर्णन अन फोटो बघितलेत त्याचे. पुढे माहिती टाकेन त्याची योग्य ठिकाणी.

Girivihar
Friday, July 07, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेईस फोटो कुठे आहेत वाट बघतोय लवकर टाक

Dineshvs
Friday, July 07, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि, हा चिखलदरा शब्द म्हणजे किचकदरा चा अपभ्रंश आहे, हो ना ?

Ajjuka
Friday, July 07, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपभ्रंश आहे की नाही महित नाही पण जागा फारच मस्त आहे म्हणजे साधारण २० वर्षांपूर्वी तरी होती. लहानपणी गेले होते आईबाबांबरोबर पण अजूनही सगळं आठवतंय.

Kedarrp
Saturday, July 08, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महाभारतातील कथेनुसार, भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. तीच ही कीचकदरी किंवा चिकलदरी. त्याचेच अपभ्रष्टित रूप चिखलदरा.

Dineshvs
Saturday, July 08, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुलै च्या भटकंति मधे आहे चिखलदर्‍याची माहिती.
अर्थात अज्जुकाने लिहिले तर फार छान.


Moodi
Sunday, July 09, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो दिनेश वर केदारने सांगीतल्याप्रमाणे किचकदराच. पुढे अपभ्रंश होऊन चिखलदरा हे नाव पडले. विदर्भातच बहुतेक नाव नक्की आठवत नाही पण एका ठिकाणी मोठी उल्का पडुन जो खड्डा झाला त्यात पाणी भरले गेल्याने जो तलाव निर्माण झाला, त्याला ही एक नाव पडले. ते ही पहाण्यासारखे ठिकाण आहे.

Dineshvs
Sunday, July 09, 2006 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते लोणार ना ? हल्ली बरेच वाचले त्याबद्दल.

Moodi
Sunday, July 09, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो लोणारच ते. थॅंक्स नाव सांगीतल्याबद्दल. जी एस फोटो टाका की.

Kedarrp
Sunday, July 09, 2006 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोणार सरोवराचे विलोभनीय दृश्यः



Dineshvs
Monday, July 10, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार केदार, हे सरोवर खारे असले तरी त्यात आपण वापरतो ते मीठ नाही, त्यामुळे मीठ करण्यासाठी या पाण्याचा उपयोग होत नाही. या सरोवराच्या काठावर अनेक पुरातन मंदीरे आहेत. अगदी अलिकडेच तिथे पर्यटक जाऊ लागले आहेत. आजुबाजुचा ओसाड प्रदेश आणि त्यात हे हिरवेगार सरोवर, अगदी सुंदर दिसतेय.
माझी खुप ईच्छा आहे,तिथे जायची. बघु या कधी जमतेय ते.


Ajjuka
Monday, July 10, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जाऊन आलेय. कदाचित येत्या २-३ महिन्यांत पुन्हा चक्कर होईल.
पन नुसतं खुप सुंदर असेल या अपेक्षेने जाउ नका. निसर्गाचा अजब चमत्कार आहे हा. दृश्य ovewhleming आहे. पाणि खारे म्हणजे अतिच खारे आहे त्यामुळे तिथे काही भागात सजीव सृष्टी अजिबात नाही. एक विचित्र घाण वास भरून राह्यलेला असतो या भागांमधे. तो सगळा प्रकार पाहून काहीतरी विचित्र भिती वातत रहाते. कशाची याचे विश्लेषण मी तेव्हाही करू शकले नाही आणि आजही. देवळे आहेत त्या भागात मात्र बरे वाटते. देवळे छोटी आणि oil paint चा स्पर्श न झालेली आहेत त्यमुळे सुंदर च आहेत. शक्यतो तिथले दगड संग्रह करण्यासाठी घरी आणू नका कारण ते एक वैश्विक इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. तिथे फिरायला जाताना वाटाड्या म्हणून तिथल्या स्थानिक व्यक्तीला नेण्याऐवजी खगोलशास्त्र, भूगोल, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी विषयांचे ज्ञान असलेल्या आणि लोणार परिसराचा अभ्यास असलेल्या व्यक्तीला न्या. उल्का पडणे ही घटना काय असते हे तिथे जाऊन प्रत्यक्ष समजून घेता येणे यासारखे मजा नाही. आमच्या बरोबर निरंजन घाटे होते त्यामुळे फारच मजा आली होती.
इथे जाऊनही मला १० १२ वर्षे झालेली असल्याने सुसंगत लिहिता येणार नाही आणि प्रवासवर्णन लिहायची कला माझ्यात नाही त्यामुळे एवढेच. तसेच हा अजब प्रकार काय आहे हे मि आधी सांगून उपयोग नाही..
सस्पेन्स फिल्म प्रमाणे थोडी उत्कंठा ताणली गेली तुमची तर बरे. पण निसर्गरम्यता या एकाच अपेक्षेने जाऊ नका.


Ajjuka
Monday, July 10, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हा.. काल आम्ही जी एस सरांबरोबर रोहिड्याला जाऊन आलो. आमच्यामते हा ट्रेक होता आणि सरांच्यामते ट्रिप. वृत्तांत जी एस टाकणारे.. :-)

Bee
Monday, July 10, 2006 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिखलदार्‍याला मी दोनला गेलेलो आहे अमरावतीला शिकायला असताना. तिथला घाट इतका वळणांचा आहे की पहिल्यांदा घाटातून प्रवास करताना सगळ्यांना ओकारी झाली होती. तिथला मेळघाट प्रकल्प खूप सुंदर आहे. अस्वल, वाघ पुष्कळदा दिसतात आणि त्यांच्यापासून सावध राहाव लागत. सीमाडोह म्हणून एक डोह आहे तोही बघण्यालायक आहे. एक देवीचे मंदीर आहे जिथे पिंडीवर टपटप पाणी पडते मात्र त्या पाण्याचा उगम कुणाला माहिती नाही. sunset/sun rise points खूप छान आहेत. किचकदरी खूप खोल आहे आणि विदर्भाची माती काळी असूनही इथले पाणी लालसर आहे. कुणी म्हणत किचकाचा वध झाल्यानंतर भीमानी आपले हात ह्या दरीत धुतले होते म्हणून इथले पाणी लालसर आहे. इथेच दरीजवळ एक echo point पण आहे जिथे आम्ही सुतळी atom bomb फ़ोडले होते तेंव्हा काय गडगडात झाला होता! कारण एक आवाज सात वेळा घुमतो. असे बरेच आवाज निर्माण झाले होते. एक मोठ्ठा दगड खालून दरीत फ़ेकला त्यावेळी खूप मज्जा आली होती. बोरीची, संत्र्यांची बरीच झाडे दिसतात. इथे गाविलगड म्हणून एक खूप खूप जुना किल्ला आहे. हा किल्ला आवढव्य, विस्त्रुत आहे, चढायला आणि उतरायला सहज एक दीड दिवस लागतो. किल्ल्यावर बरीच आवळ्यांची झाडे आहे. इथे एक राणीमहाल आहे. वर जिथे राणीची बसायची जागा होती तिथून वरच्या तीन पायर्‍या शाबूत आहेत मात्र खालून वर चडण्याच्या पायर्‍या गहाळ आहेत त्यामुळे वरपर्यंत कुणालाच जाता येत नाही. एक तलाव आहे, किथे गरम पाणी आणि गार पाणी असे दोन घाट आहेत. घाटावर कपडे धुण्यासाठी खूप छान ओटे केलेले आहेत. किल्ल्यांचे तट, दरवाजा अगदी भरभक्कम आहे. कुणी म्हणत अज्ञातवासात द्रौपदीने सैरंध्रीचा वेष घेतला होता तो किल्ला हाच आहे. वसंत ऋतुत जर तुम्ही गेलात तर चिखलदर्‍याचा डोंगरमाथा लालभडक फ़ुलांनी रंगून जातो आणि दुरवरून हे दृष्य मोठे विलोभणीय दिसते!!!!!!!

अकोल्यापासून फ़क्त ४० किलोमीटर अंतरावर काटेपूर्णा म्हणून एक खूप सुंदर sanctury आहे. दिवसेंदिवस ह्या sanctury ला बरेच महत्त्व प्राप्त होत आहे आणि शासन देखील सढळ हाताने मदत करत आहे.

लोणार बद्दल मीही खूप ऐकले आहे. अकोल्यापासून बुलढाणा फ़ार दूर नाही. पण कधी जाणे झाले नाही. पण खरच एकदा तरी जायचे आहे. तिथे गेल्यानंतर केकावलीचा अपूर्व आनंद मिळतो म्हणतात कारण लोणारच्या चहुबाजूला वन्यसृष्टी निर्माण झालेली आहे. इथले पाणी कधीच आटत नाही. अज्जुका म्हणते आहे तसा वास आता तरी नाही.. बरेच चांगले अभिप्राय ऐकलायला मिळाले आहे. ढाना ही एक वाघाची जात आहे. ह्या वाघांचा रंग पांढरा असतो. मात्र आता ही जात नष्ट होत चालली आहे. ही माहिती मला परदेशात कुठल्यातरी एका zoo मधून मिळाली. त्यावेळी बुलढाण्याचे नाव वाचून नवल वाटले होते.


Indradhanushya
Tuesday, July 11, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आले आले सिद्धगडाचे
फ़ोटो
Mobile Camera असल्याने resolution काहि खास नाही...

Dineshvs
Tuesday, July 11, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee छान लिहिले आहेस कि. पाणी वाहते नसल्याने, कुबट वास येत असणार, पण त्या तलावाला, काहि प्रवाह पण येऊन मिळतात ना ?
लोणार शब्दाचे Lunar या शब्दाशी साम्य आहे. आणि हा योगायोग नसावा.

याचे वर्णन मेघदुत काव्यात आले आहे असे वाचले, आणि त्यात ते सरोवर गोलाकार आहे असा उल्लेख आहे (CBDG) अगदी उंचावरुन बघितल्याशिवाय, तो आकार कळत नाही, वैगरे वैगरे आश्चर्याच्या गोष्टी आहेत.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators