Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through June 12, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Tuesday, June 06, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, चम्पक, सिमीन्त, निनावी, दिनेश, केदार, सीमा, म्रिण्मयी....! सर्वान्चे प्रतिक्रियेबद्दल मनःपुर्वक आभार!
सिमीन्त गाडी पलटीचा धोका रात्री जाणवला, रस्त्यावरच्या खोलगटभागाचा अन्दाज न आल्याने वेगात घातलेली गाडी जोरदार हेलकावते, तशात गाडीत वजन नसल्याने आणि तुलनेत जीप उन्च असल्याने हा झोका मोठा बसतो, जरा चूक झाली स्टिअरिन्ग वळविण्यात आणी वेगावर नियन्त्रण मिळविण्यात तर गाडी शम्भर टक्के पलटी! :-) देवदयेने वाचलो!
निनावी, लिम्बी आता बरी हे, हिन्डु फिरु लागली हे! :-) अन आता तुझ्या लक्षात येइल की त्या दिवशी मला खरच वेळ नव्हता, अन वेळ मिळाला तर एक तर मी कीबोर्ड बदडतो नाहीतर असले उपद्व्य्प करतो
दिनेश, खर तर माझ्याबाबतीत, प्रवासाला निघतानाच वाटत रहाते की "आता काय होइल, मग काय होइल, कस्स व्हायच नि काय व्हायच". एकदा का प्रसन्गात उडी मारली की मग धोरण केवळ मात करण्याचेच! आता लिहिताना मात्र मी एन्जॉय करु शकलो जे तेव्हा करता येत नव्हते! मला पुन्हा भटकायला आवडेल, अर्थात निमित्त चान्गले असु दे!
केदार ... अरे मला पण तेव्हा दमच लागला होता! स्टिअरिन्ग साम्भाळत खाली उतरुन एका हाताने दरवाजा उघडा धरीत खेकड्याच्या चालीने जीव खावुन धक्का देताना गाडी रेषेत ठेवणे अन बाजुने रोरावत जाणार्‍या गाड्यान्च्या धक्क्याची भिती मनातुन काढुन टाकणे.... तेही शम्भर मीटर! छ्याऽऽ, वैर्‍यावर देखिल अशी पाळी येवु नये!
मैत्रेयी, सीमा, तुम्हाला अस वाटत का की लिम्बी कटकट करीत नाही? त्यावेळेस ती गुन्गीत होती, अन कटकट करण्यायेवढ साचलेल नव्हत! शेवटी पाचशे रुपयान्च्या अजागळपणाबद्दल टोकलच तिने, मी कशाला सान्गु तुम्हाला?
अन बरका म्रिण्मयी अन मैत्रेयी, वडाला दोरा बान्धुका हे मला आधी तिला विचाराव लागेल! म्हणजे तिला चालणारे का मी सात जन्म!
तरीपण मला वड पावला की काय नाही सान्गता यायचे! पण मी दोन वाक्ये मनाशी खुणगाठीसारखी बान्धुन ठेवली हेत!
१) बापाची चप्पल पोराला यायला लागली की त्याच्याशी मैत्रीचे नाते जोडावे!
२) पत्नी क्षणाचीच पत्नी असते, बाकी काळ ती सहचरी, मैत्रीण या स्वरुपात बघावी! :-)


Shyamli
Tuesday, June 06, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पत्नी क्षणाचीच पत्नी असते, बाकी काळ ती सहचरी, मैत्रीण या स्वरुपात बघावी!>>>>>
वा वा क्या बात कही है...
लिंबु भाउ....

अवघड आहात तुम्हि...




Smi_dod
Tuesday, June 06, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे लिंबु एवढे दिव्य केलेस? वर्णन तर असे केलेस कि बास अगदी आपण च तो प्रवास करतोय असे वाटले.. काय रे पण दुसरी गाडी वगैरे मिळ णारी नव्हती का? अश्यावेळेस जरा दुसर्‍या शक्यतांचा विचार करायचा. एवढे हाल होउन सुखरुप परत आला ही देवाचीच कृपा.. असतात काही काही दिवस असे सगळेच प्रश्न घेउन उगवणारे... कायमचे स्मरणात रहाणारे... पण ईथुनपुढे काळजी घे बाबा
तुझ्या प्रयत्नाला यश आले लिंबी ची तब्येत सुधारली ते बरे झाले. खरोखर अश्यावेख़ेसच माणसाचा कस लागतो...

म्हणजे तिला चालणारे का मी सात जन्म!
>>>>>>>हे मात्र पटले बुवा
आणि हे सगळे लिहायला तुला किती वेळ लागला? ईतके तपशिल वार काय एकटाकी लिहुन काढले का?

Chingutai
Tuesday, June 06, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बू
भारी आहेस बुवा!!
चांगलच टरकवलस ............तुझं पोस्ट वाचून बाहेर पडले आणि नकळत सारखा ब्रेकवर पाय जात होता, वेगही रोजच्यापेक्षा कमी, प्रमणिकपणे लेन चेंज करतानाही सिग्नल देत होते....
लिम्बू परिवार ग्रेट!!!

-चिंगी


Gs1
Tuesday, June 06, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे लिंबू, जपून

Chinnu
Tuesday, June 06, 2006 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT मानल बुवा. तुमचे विचार फार चांगले आहेत. अगदी उच्च!

Dha
Tuesday, June 06, 2006 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT , वाचताना माझाच जीव वर-खाली होत होता. एवढ्या दिव्यातून प्रवास केलात, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना..

Mrinmayee
Tuesday, June 06, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एरवी लेन बदलताना सिग्नल देत नाहीस तर चिंगु!!!!! ये तू फ़्लोरिडाला, इथे पण कुणी देत नाहित सिग्नल! फिट्ट व्यक्ती आहेस तू इथे कार चालवायला

Kedarjoshi
Tuesday, June 06, 2006 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला तर फ्लोरीडाला पण लोक सिंग्नल देत नाहीत, बरे वाटले. आता पर्यंत फक्त texan swip बद्दलच ऐकले होते.

Limbutimbu
Wednesday, June 07, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, स्मिता, चिन्गुताई, जीएस, चिन्नु, ढ, म्रिण्मयी, केदार अभिप्रायान्बद्दल धन्यवाद:-)
स्मिता लपत छपत त्या पोस्ट्स लिहायला प्रत्येकी एकेक तास लागला! :-) मात्र सलग एकटाकीच लिहिल्या जरी मधे मधे डिस्टर्बन्सेस होते!
चिन्गुताई, सिन्ग्नल जरुर द्यावेत! :-)
जीएस, काळजी घेतोच रे! :-)

खर तर एक कमाण्डर जीप हिन्जवडी ते अमुक तमुक गाव जाउन शे दोनशे किलोमीटर फिरुन आली! काही वेळा बन्द पडली! त्यात अस काय विशेष की लगी लगी हिथ एचजीवर येवुन त्यावरची वैखरी लोकान्च्या माथी मारावी? जीपचा प्रवास तो काय, पण त्यावर किती रटाळ, लाम्बलचक आणि काहीतरी मोठा आशय सान्गत असल्याचा आव आणणार्‍या पोस्ट कशासाठी टाकाव्यात? हे म्हणजे आपण किती ग्रेट होत अस लोकान्च्या माथी मारणे तर नव्हे?
दुसर्‍या गाडीच्या सोईबद्दल किन्वा पर्याया बद्दल काही एक न करता एक खटारा घेवुन जावुन, आलेल्या अडचणीन्चा पाढा नि रडगाणे एचजीवर टाकुन इथली जागा वाया जात नाही का?
होय, हे प्रश्ण मलाच पडलेले आहेत! कारण ते माझ्या चान्गलेच सवईचे आहेत!
का बर मी वरच्या पोस्ट्स केल्या? या जगात राहूदे, पुण्यातल्या पुण्यात हजारोनी गाड्या फिरत असतात, बाहेरुन येतजात असतात, बन्द पडत असतात, एकेमेकान्ना धडकत असतात, मग काय अशा हजारो गाड्यान्च्या कहाण्या इथे लिहाव्यात का? उद्या साधी ठेच लागली तरी मग त्याच वर्णन इथे लिहिल जाईल! नखे कापताना नेलकटरमुळे जिवणी कापली तर तेही इथे लिहिल जाईल! त्यातल्या वेदनेच्या जाणिवेवर कविता रचल्या जातील! एचजीवर अस चालेल का?
मग का बरे मी त्या पोस्ट्स लिहिल्या?
मी विचार करतो हे!
आणि माझ्या लक्षात आल की त्या जीपचा इतिहास सान्गायचा राहुनच गेला! अन तो सान्गितला की असा इतिहास माहीत असतानाही ते धूड दामटलच कस अशी उलटतपासणी करायला मी वाव ठेवला नाही हे!
मी आधीच लिहिल हे की मी ती गाडी कधीच वापरीत नाही! गेल्या चार पाच वर्षात तीन चार वेळेसच वापरली हे! पण मी वापरत नसताना या जीपचे घडलेले किस्से मला माहीत असल्यानेच मी तिला न्यायला घाबरत होतो! या जीपचा मधला रॉड पुढच्या बाजुन निखळुन पडला हे, नशिबाने गाडी सिग्नलला उभी असताना निघळला म्हणुन अनवस्था प्रसन्ग टळळा!
तोच रॉड गाडी चालती असताना मागल्या बाजुने निखळला हे!
गाडीत कुटुम्बिय बसवलेले असताना भर कात्रज बायपास वर (जेव्हा तो चौपदरी नव्हता) तिचे मागचे चाक निघाले होते
या जीपचे वायपर चोरीला गेल्यामुळे कधीच जागेवर नसतात, तसेच त्या दिवशीही नव्हते!
ही जीप धावत असताना हीचे पाटे पुर्वी तुटले आहेत, नी अजुनही रस्त्यातल्या खड्यान्शी जरा जास्त माज किन्वा मस्ती केली तर जागेवर तुटू शकतात!
ऐन चौकात किन्वा गर्दीच्या रहदारीच्या ठिकाणी या जीपचा हॉर्न न दाबताच किन्चाळायला लागुन चालवणार्‍याची तसेच पब्लिकची फेफे उडवितो!
अन्य वेळेस हॉर्न सोडुन बाकी सर्व गोष्टी "आवाज" करीत लक्ष वेधुन घेण्याचे कार्य इमानेइतबारे करीत असतात!
या जीपची स्टेफनी पुढ डुगडुगती लटकवलेली हे! आणि ती केव्हा खाली पडेल यावर लक्ष ठेवुन असावे लागते! :-)
या गाडीत असलेला जॅक कारचा हे! सबब जॅक खाली मोठे दगड लावल्या खेरीज जॅक च वरच तोन्ड अन जीपच बुड यान्चा सम्बन्ध येत नाही!
या जीपचा सायलेन्सर किन्वा त्याचे काही अवशेष निखळुन गळुन पडु शकतात, त्यावर देखिल लक्ष ठेवुन असावे लागते!
एकवेळ डोम्बार्‍याची तारेवरची कसरत करणे परवडेल पण स्टिअरिन्गच्या फुटभर प्ले मुळे चान्गल्या दुपदरी रस्त्यावर ही गाडी सरळ रेषेत चालविणे अवघड, जिकीरीचे अन खरे स्कीलचे काम!
ही जीप खर तर सर्कस मधे शोभुन दिसली असती! किन्वा बर्‍याचदा बर्‍याच जणान्ना अशी शन्का येते की ही जीप सर्कस मधुनच आणली असावी!
आणि अर्थातच ही जीप चालविताना, उगाचच, आपण जोकर सारखा पुठ्ठ्याचा लाल त्रिकोणी टोप घालुन जीप चालवित आहोत असे भास होतात!
मात्र या जीपचा एक फार मोठा फायदा असा की रस्त्यावरच तमाम पब्लिक, ट्रॅफिक मधल्या ट्रक, बसेस, कार्स, क्रेन्स यान्चे चालक अन हवालदार यान्च्या दयाद्र अनुकम्पापुर्ण नजरेचा लाभ होऊन आपोआपच "सहानुभुती" निर्माण होते!

आता येवढे सगळे माहीत असतानाही अशी गाडी न्यायचा शहाणपणा (की मुर्खपणा?) केला त्याची भलीथोरली वर्णने लिहिण्याची खरच काहो मायबोली ही जागा हे? :-)
(ही पोस्ट सुधारत सुधारत टाकली हे!
आणी आता हा विषय V&C वर नेण्यायोग्य शिजला हे का?)
DDD

Chingutai
Wednesday, June 07, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुण्मयी
आत्ता असं की मी शक्यतो सिग्नल द्यायचा प्रयत्न करते, पण आपला कोल्हापुरी खाक्या मधे येतो न!!!!

-चिन्गी


Mangeshwagh
Wednesday, June 07, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hey friends , I am new on maayaboli, He limubutimbu khupach great lihat ahet . and specifically evadhe mothe and in marathi , really great , limbutimbu tumhala sastang dandawat.
mangesh

Ek_mulagi
Wednesday, June 07, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचुन दम लागला मला लिंबूभाऊ.
तुम्ही आणि तुमची family ची अडचणीवर मात करण्याची जिद्द बघुन कमाल वाटली.
बायको खरच Patient (धीराची ) आहे तुमची.


Savani
Wednesday, June 07, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, फ़ारच थरारक अनुभव आहे हा. लिंबी वहिनींचे खरेच कौतुक आहे हो.
सीमा :-) मी पण नवयावर इतकी चिडचिड करते जसं काही तोच जबाबदार असतो सगळ्यासाठी.


Sunidhee
Wednesday, June 07, 2006 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु टाकच एक छानसा फोटो 'त्या' जीप चा

Prajaktad
Wednesday, June 07, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुभाउ! अचाट्च आहेस रे बाबा!
टाकच फोटू त्या ' जिप ' चा...


Kedarjoshi
Wednesday, June 07, 2006 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT नाही नाही हे नाव तुला घाटी वाटते ( खासकरुन ती जिप चालविल्यावर) मी तुला यलट्या च म्हनेन,
कुठल्या कंपनीत काम करत आहेस? च्यायला एवढा वेळ तुला लिहायला मिळतो तरी कसा? की HR मधे आहेस.
दिवे धे रे बाबा.


Shonoo
Monday, June 12, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बूटिम्बू

गेल्या १३-१४ वर्षात मी दोनेक लाख मैल गाडी हाणली असेल. भाड्याच्या गाड्यांमधून केलेला प्रवास न धरता. या गोष्टी चा मला जरा अवाजवीच अभिमान वाटत असे. तुमच्या या एकाच प्रवासाचे वर्णन वाचून डोके ठिकाणावर आले. AAA ची वर्गणी नियमित भरुन आणि सतत गाडीत सेलफोन ठेवून केलेल्या प्रवासाचा काय डोम्बल अभिमान? येवढ्या वर्षात एकदा वायपर स्वत: बदलले आणि कधी मधी wind shield fluid भरलय. न्यू जर्सी मधे तर पेट्रोल सुद्धा स्वत: भरावं लागत नसे.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुम्बियांना मानलं बुवा.


Sampada_oke
Monday, June 12, 2006 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा, आमच्या इथे तर स्वतःच भरायला लागते पेट्रोल.मोठे शहर असो अथवा छोटे गांव.:-)

Mrinmayee
Monday, June 12, 2006 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा, ती सोय NJ त! बाकी ठिकाणी स्वत:च भरायला लागतं पेट्रोल. काही पंपावर असते सोय भरून घेण्याची. पण मग भरणार्‍याला टिप द्यावी लागते बरेच ठिकाणी.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators