Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2006

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » प्रवासात घडलेल्या गोष्टी... » Archive through May 23, 2006 « Previous Next »

Vikas_chaudhari
Thursday, May 18, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, एखाद दुसरा नारळ पडणं ठिक हो पण एकामागुन एक डोक्यावर आपटणं म्हणजे कसं अगदी नेम घेउन मारल्यासारखं वाटतं. खर सांगा बरं, विनोदनिर्मितीसाठी जरासं तिखटमीठ लावलत कि नाही? गम्मत बरं का, दीवे घ्या :-)

Vikas_chaudhari
Friday, May 19, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या, तुमचं आणि वहानाचं जरा वाकडंच दीसतयं, तो महाम्रुत्युंजय कि कोणता तो यज्ञ करा आणि त्या निमित्ताने आम्हाला जेवायला बोलवा, दिवा घ्या हो :-)

Zakki
Friday, May 19, 2006 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, देवस्थानातून आलेल्या सगळ्याच लोकांजवळ नारळ असतो! मी घेतला नाही. त्या काळी भारतात अनेक भिकारी असत, त्यांनाच देऊन टाकला. पण ते सगळे नारळ सामान ठेवायच्या जागी, नि बस डावीकडे कलंडल्यावर सगळेच सामान, नारळासकट बदाबदा लोकांच्या डोक्यावर, अंगावर पडले! मी मात्र अगदी पाऽर उजव्या बाजूला असल्याने बचावलो.

आता मात्र वाटते माझ्याही डोक्यावर एक पडला असता, तर माझे डोके एकदम सुधारले असते, नि उथळ, पांचट ऐवजी एकदम गंभीर झालो असतो! थोडी अक्कल पण आली असती. अंबेजोगाईची इच्छा!



Robeenhood
Friday, May 19, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोवाजी, पातोंडे हे का गावाचे नाव झाले? तुमची खैर नाही आता. अहो त्या लोपामुद्राने अजून वाचलेले दिसत नाही. तिची मातृभूमी आहे ती.
ती आता फाडून खाणार तुम्हाला.(नसली तरी फाडून खावे तिने तुम्हाला. एक आतला आवाज!!!!)


Indradhanushya
Friday, May 19, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धाळू झक्की महाराज की जय!!!
अंबेजोगाईची इच्छा म्हणुन की काय नारळ वाचला आणि आम्हाला उथळ, पांचट, चावट, विनोदी झक्की वाचायला मिळाले :-)

अमेयाच्या अनुभवाची पुनरावृत्ती...
२९ डिसेंबरला आरक्षण करताना त्या आरक्षण खिडकीतील मुलीच्या चेहर्‍यावर गुढ हास्य होते...

कारवार हॉलिडे स्पे. CST वरून 1150 hrs ला सुटते... reservation करताना boarding दादरहून केले होते :-(
गाडी दादरला 0005 hrs ला येते... बस या ५ मिनिटांच्या फ़रकाने तोंडाला फ़ेस आणाला होता आणि त्या गुढ हास्याची उकल झाली होती...
त्यावेळी सुशिक्षीत असल्याचा गैरसमज दुर झाला


Moodi
Friday, May 19, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की बास करा की, किती दिवस स्वतला उथळ अन पांचट असे म्हणवुन घेणार आहात?
प्रवास म्हटला की असे होतेच.
आजकाल फार गंमतशीर अनुभव येतात.
मायबोली हा एक प्रचंड मोठा प्रवासी अनुभव आहे. या बीबीवरुन त्या बीबीकडे जाताना जो प्रवास घडतो त्यातच मजा आहे.
असे नाराज नाही व्हायचे.


Maudee
Friday, May 19, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अनुभव माझा स्वतःचा नाही.
माझी मावशी चिंच्वड्ला रहाते.....ती एकदा तिच्या घरी पुण्याहून चालली होती....बसने.
तिच्या पुढच्या सीटवर एक callege ची मुलगी आणि कुठलातरी एक अपंग माणुस बसला होता.
तो तिला फ़ारच रेलून बसला होता.....तिने अपंग आहे म्हणुन प्रथम दुर्लक्ष केले पण नंतर फ़ारच झाले तेव्हा ती बोललि की जरा नीट बसा म्हणुन....तेव्हा तिला समजले की तो माणूस एकटाच नाही त्यच्याबरोबर्चे बरेच स्त्री पुरूष होते.....
ही मुलगी या माणसाला नीट सान्गत होती तरीही सर्व बसमधून तिला litrally शिव्या घालायला सुरुवात केली.
त्या सर्वान्चीच बडबड आणि एकूणच हातवारे वगैरे करून इतकी जोरजोरात बोलणी चालू झाली की ती मुलगी पार भेदरून गेली.....शेवटी प्रकार इतका वाढला की ते सगळे मिळून काही विचित्र प्रकार करणार नाहीत ना असे वाटायला लागले.....शेवटी ती मुलगी तिचा stop येण्या आहीच उतरून गेली.


Maudee
Friday, May 19, 2006 - 10:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रवासात दिसणारी आणख़ी एक वाईट गोष्ट
local trains ज्या नदीवरून जातात.....बायका वगैरे सरळ सरळ नदी आली की वरून निर्माल्य टाकतात.
तेही plastic च्या पिशवी सहीत.
म्हणजे नदी ख़राब करायला अशी मदत करणार स्वतः आणि नंतर सरकारच्या नावानी ओरडणार.... नदी किती अस्वच्छ आहे म्हणुन.....
हा प्रकार मी पुणे आणि मुम्बई दोन्ही local trains मध्ये बघितला


Limbutimbu
Friday, May 19, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माऊडी, आता या अनुभवाबद्दल काय ग बोलणार? :-(
पण असेही लोक असतात यावर माझा विश्वास हे!


Dineshvs
Friday, May 19, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maudee वसईच्या खाडीपुलावरुन तर लोक नाणी टाकतात.
मागे एकदा मुंबईत नाणे टंचाई झाली होती तेंव्हा, त्याचे हे कारण सांगितले जात असे.


Vikas_chaudhari
Friday, May 19, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याच वसईच्या पुलावरचा किस्सा. पुर्वी मुंबईमध्ये ट्रेनच्या खिडक्यान्ना जाळ्या नसत, त्यावेळी ट्रेन फ़लाटावर आली की गर्दीतुन आत चढायला सोपे जावे म्हणुन बरेचजण हातातले सामान खिडकीतुन आत ठेवायला देत असत. तर एकदा माझी बहीण आणि तिची मैत्रिण दहिसरला गाडीत चढल्या आनि चढण्यापुर्वी तीच्या मैत्रिणीने तिच्या हातात असलेला मुलाच्या वाढदिवसासाठी घेतलेला केक गर्दीमध्ये खराब होउ नये म्हणुन आत बसलेल्या दुसर्‍या ख्रिश्चन मैत्रिणिकडे खिडकीतुन दीला. गाडीत भरपुर गर्दी असल्यामुले नायगाव येइपर्यंत तिला दरवाज्याजवळ उभं रहाणं भाग पडलं. नायगावला उतरल्यावर बाहेरुन खिडकीपाशी येउन तीने केकचा बोक्स परत मागितला. तेव्हा आत बसलेल्या मैत्रिणिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. ती म्हणाली कि तिला असं वाटला कि हिंदु लोक खाडिमध्ये काय काय टाकायला देतात तसच तिनेही काही दिल असावं म्हणुन तिने ते खाडीत टाकुन दिलं :-)

Zakki
Friday, May 19, 2006 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदीत, खाडीत प्लास्टिक च्या बॅगेतून निर्माल्य, उरलेले अन्न, souffle, flambe, tirA misu , केक वगैरे टाकणार्‍या बायका वेगळ्या नि पोल्यूशन ची तक्रार करणार्‍या बायका वेगळ्या. जसे सिगारेट पिणारे जळती थोटके वाट्टेल तिथे टाकतात, पण तक्रार करणारे मात्र सिगारेट न पिणारे असतात. मी नि माझे अनेक मित्र, रस्त्यावर कचरा टाकत नाहीत, थुंकत नाहीत. पण इतर काही लोक तसे करतात. तर ते इतर लोक काही म्हणत नाहीत रस्ता घाण झाला तरी. आम्ही मात्र नेहेमीच 'सरकारचे डोळे फुटले की हात मोडले? किती ही घाण रस्त्यावर?' असे लेख सकाळ मधे नि तुतारी मधे लिहितो.

Limbutimbu
Monday, May 22, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येवुन जावुन सगळा रोख शेवटी हिन्दुन्च्या देवपुजेच्या निर्माल्ल्यावर का येतो काय की!
अगदी पुण्याचा विचार करू, गणपती वगैरे सगळे सण उत्सव धरले तरी एकुण किति किलो निर्माल्य रोजच्यारोज नदित पडत? किती किलो वैकुन्ठातली राख नदीत टाकली जाते?
अन त्या तुलनेत रोजी किती लिटर "मैलापाणी" नदीत सोडले जाते?
प्रत्येक शहरातील मानवी विष्ठा अन मलमूत्र नदीत सोडण्याची कल्पना कोणत्या काळात निघाली माहीत नाही, पण पुर्वीच्या काळी खेडेगावातुन हगन्दरी नावाचा एखादा परिसर.. जस टेकडी, माळ वगैरे राखुन ठेवलेला असायचा तेच बर नव्हत का? प्यायच्या पाण्याच्या स्त्रोतात टनावारी मैलापाणी अधिकृत पणे सोडुन देणार्‍या व्यवस्थेत निर्माल्या विरुद्ध ओरड का?
जी गत नदीची तीच समुद्राचि पण! दादरच्या चौपाटीवर उभ रहावत नाही ओहोटीच्या वेळेस!
पुर्वी बस मधुन जाताना एच ए कम्पनीचा घाण वास आला की पिम्परी आली अस ओळखायचो, हल्ली तशा प्रकारे बन्डगार्डन पूल ओळखता येतो!
या बीबी चा विषय नाही, पण एखादी टीका असेल तर त्याचे दुसरे स्वरुप समजावे म्हणुन लिहिले


Robeenhood
Monday, May 22, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या बहोत खूब...

लिम्ब्या, लिम्ब्या लेका बालीस्टर का नाही झालास रे?......


Arch
Monday, May 22, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, दुसर्‍याने घोड चूक केली म्हणून आपण आपली चूक सुधारायची नाही का? रस्त्यात थुंकू नये. पण दुसरा पानाच्या पिचकार्‍या टाकतो म्हणून माझ्या थुंकण्याकडे दुर्लक्ष करा अस म्हणण्यासारख वाटल तुझ वरच posting

Vikas_chaudhari
Monday, May 22, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, अहो झक्की, तुम्ही रागावलात की काय? तुमची चेष्टा करण्याचा माझा बिलकुल इरादा नव्हता हो. तुमच्या लेखनशैलीमुळे म्हणा किंवा माझ्या थीट्या आकलनशक्तीमुळे म्हणा, मला तुमचा प्रवासाचा किस्सा जरा विनोदी वाटला आणि त्यामुळे जिज्ञासा जाग्रुत झाली की अगदी विनोदी चित्रपटात शोभेल असा हा किस्सा खरोखर असाच घडला असेल की तुम्ही तो थोडासा गमतीदार बनवुन सादर केलात. तरीही अजाणतेपणी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफ़ी असावी:-(

लिंबुभाउ,

टाळण्याचा पर्याय असतानाही केलेला प्रदुषण कुणीही केला तरी ते निषेदार्हच आहे. मी वर लिहीलेल्या प्रसंगात खाडीमध्ये केक फ़ेकणार्‍या व्यक्तीचा धर्म नमुद करण्यामागे ति व्यक्ती हिंदु प्रथांबद्दल पुर्णपणे अनभिज्ञ होती हाच निव्वळ हेतु होता.


Kedarjoshi
Monday, May 22, 2006 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आणी प्रज्ञा (माझी बायको) नांदेडहुन मुंबई ला जात होतो. देवगीरी एक्स्प्रेस तेव्हा नांदेडहुन रात्री ७.३० ला निघायची. परभणीला क्रषी विद्यापीठाचे १३-१४ टपोरी गाडीत चढले. गाडीच चढल्याबरोबर धिंगाना घालायला सुरुवात झाली. असे २-३ तास झाले. ओरगांबाद ला येईपर्यंत १२ वाजले तरी पण या लोकांचा शर्ट वैगरे काढुन धिंगाना सुरुच होता. त्यामुळे कोणीही झोपु शकत न्हवते. सकाळी मला ऑफीस होते. आता मलाही खुप त्रास होत होता. आतापर्यंत जाउ द्या असे वाटत होते. १२.३० वाजता एक जण शर्ट काढुन ये वडा पाव वडा पाव, चायवाले असे म्हनत बोग़ीतुन फिरत होता. माझे टाळके सरकले. खिशातुन १०० ची नोट काढली आणी अचानक त्या मुलाचा हात धरुन म्हनालो, २ वडापाव व एक चहा दे. अचानक झालेल्या ह्या हल्यामुळे तो घाबरला. तो मल म्हनाला की त्याचा कडे चहा व वडापाव नाहीये. मी त्याला जोरत बोललो, वो मुझे कुछ मालुम नही मुझे चाय ओर वडापाव चाहीये. ही गडबड ऐकुन त्या टपोरींपैकी काही जन माझ्यावर जोरत धाउन आले. मी ही विचार केला व खिशातुन माझे ID card काढले व जोरात त्यांचावर ओरडलो, साल्यानो एकेकाला जेल मधे टाकेल. एक Inspector शी गाठ आहे. कल्यान येउ द्या माझा area सुरु होईल. मी Inspector म्हन्याल्या बरोबर साब हम तो मजाक कर रहे थे, sorry, sorry असे सुरु झाले. माझा जोर बघुन बाकीचे सहप्रवासी पण त्यांचावर चढले. मी त्यांना विचारले की कुठे जानार तर ते म्हनाले की CST (VT) ला. सकाळी कल्यान आल्यावर पाहीले, सर्व जन खाली उतरत होते.
ह्या सर्व प्रकारत प्रज्ञाला असे वाटत होते की मी आता त्यांचा मार खानार कारण मी काही खरा Inspector नाहीये पण मी तिला सांगीतले की घाबरु नको ते आता काही करनार नाही कारन त्यांना एकदम हल्ला आणी तो ही confidance ने केल्यामुळे मी खरा Inspector वाटत होतो. आणी माझी personality हे थोडी तशी आहे. त्यामुळे हे सर्व जमून गेले.






Limbutimbu
Tuesday, May 23, 2006 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, लय भारी रे भो! :-) मान गये उस्ताद!
विकास, तुम्ही तो उल्लेख केला म्हणुन मी पोस्ट केली नाही हे! आधिच्या दोन तीन पोस्ट मधिल सूऽऽर बघितला अन ते पोस्ट केले!
रॉबिन, तुला थॅन्क्यू! पण ते बालीस्टर म्हन्जे काय असत? शेवटी कोर्टाच्या आवारातल्या पिम्पळाखालचीच वकीलीना?
आर्च, मला तसे वाटत नाही! निर्माल्य नदीत वहावायची प्रथा शेकडो वर्षान्ची हे जेव्हा मैलापाणी नदीत सोडण्याची पद्धत गेल्या शे दिडशे वर्षातली हे! बहुदा इन्ग्रजान्नी आणली अन आपल्या लोकान्नी सगळीकडे जशिच्या तशी वापरली! त्यामुळे दुसरा शेण खातो तर आम्ही खाल्ले तर काय बिघडले अशा अर्थाचा युक्तीवाद नसुन, निर्माल्ल्यापेक्षाही अधिक गम्भिर, आरोग्य अन पर्यावरणाचा नाश करणार कृत्य, सरकारी अधिकृत पातळीवर किन्वा सरकारच्या आशिर्वादाने, या देशातील यच्चयावत नद्याकाठच्या शहरातील मैलापाणी नद्यान्मधे टाकुन होत हे जे अधिक गम्भिर असुनही आम्ही मात्र केवळ वर वर दिसणार्‍या (आणि आमच्या नजरेला खुपत म्हणुन खुपणार्‍या) निर्माल्यावर दोषारोप करीत चर्चा करतो! काही दिवसान्नी आता गणेश मुर्तिन्चा विषय येइल!.... बघाच तुम्ही! तर "निर्माल्य कुठे टाकावे" किन्वा "नद्यान्चे पावित्र्य आणि स्वच्छता कशी जपावी" यावर V&C मधे बीबी उघडायचा का?


Bee
Tuesday, May 23, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरी निर्माल्य तुळशीत किंवा झाडात टाकून दिल्या जाते. तिथे ते कुजते नि त्याचे खत तयार होते. पण flat system मध्ये अशी सोय नसते. परदेशात तर आणखीनच प्रश्न. मी इथे सुरवातीला देवाला अगरबत्ती, फ़ुले वहायचो. तर माझ्याकडे भरपूर मोठे निर्माल्य तयार व्हायचे. पण ते निर्माल्य शेवटी कुठे वहायचे हा एक जटील प्रश्न निर्माण होत असे. शेवटी अगरबत्ती फ़ुले आणायचीच मी बंद केली. एखादवेळी आणले तर आणलेत. पण तरीही पूजा करताना अगरबत्ती नाही, फ़ुले नाही अशी अवस्था मला पहावत नाही. माझा इथला एक मित्र, फ़ुले राख कुठेतरी दूर नेऊन टाकून देतो पण इथले स्वच्छता करणारे लोक शेवटी ते पुळके उचलून आपल्या घाणीत टाकतात. हे सर्व बघितले की असे वाटते निदान भारतात चोरी तरी नाही निर्माल्य नदीत वहायची. काही लोक अति करतात तेही आवडत नाही. परदेशात निर्माल्य आणि कचरा ह्यात अजिबात भेदभाव नाही. मग ते निर्माल्य आपल्या देवाचे असो वा त्यांच्या देवाचे.

असे म्हणतात निर्माल्य हे वाहत्या पाण्यात सोडायला पाहिजे. गेल्या वर्षी ताईच्या लग्नात सत्यनारायण पूजेचे निर्माल्य वाहत्या नदीत सोडायला गेलो तर गावातली नदी ऐन पौष महिन्यात आटलेली.. नव्हे लोकांनी तर प्रवाहच बंद केला, प्रवाहाची दिशा बदलली. हे सगळं बघुन मन खिन्न झालं.


Maudee
Tuesday, May 23, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बूभाऊ आणि ईतर,
माझी वरची post ही निर्माल्या सम्बधित नाही.... निर्माल्य हे वहात्या पाण्यातच टाकायला हवे... माझे असे म्हणणे आहे की
१.त्याच्याबरोबर plastic च्या पिशवितून फ़ेकू नये.....
२. निर्माल्य ही आपल्याला अत्यन्त पवित्र गोष्ट वाटते....मग लोक ते अशी train मधून फ़ेकतात का?.....त्याच properly विसर्जन करायचे असते.... i hope I am right

:-)



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators