Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 06, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through May 06, 2006 « Previous Next »

Ameyadeshpande
Friday, May 05, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>दोन बन्दुकधार्‍यांनी माझी पर्स आणि बॅक्पॅक पूर्ण उचकून उलटी सुलटी करून तपासली

आहो पुणेकर चितळे ते...फ़ार आश्चर्य नाही वाटलं हे वाचून

>>>मला आत येताना पाहूनंच त्या दुकानदारचा चेहरा त्रस्त झाला

चला atleast त्यांनी तुम्हाला notice तरी केलं...


Mumbai12
Friday, May 05, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



shonoo, Dakshina ह. ह.पु.वा.
एका पेक्षा एक सरस अनुभव

Swapnil_khole
Friday, May 05, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात, तुम्हा सर्वानाही माहीतच असेल.

पु.लं. चे वाक्य

महाराष्ट्र व्यापारात मागे का म्हणायला मोकळे.


Robeenhood
Friday, May 05, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चितळ्यांकडे एखादा पदार्थ सम्पल्यावर तिथले कामगार देखील 'सम्पला,ली,ले' हे किन्चितही ओशाळवाणे न होता ज्या अभिमानमिश्रीत निर्वीकारपणे सांगतात ती भावावस्था केवळ उच्च कोटीच्या आध्यात्मिक साधनेच्या स्थितपज्ञालाच साधू जाणे!!!!!!


Kalandar77
Friday, May 05, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL Robeenhood!

Robeenhood
Friday, May 05, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दसर्‍याचा दिवस, मी माझ्या मोरूला घेऊन प्रातसमयी चितळ्यांच्या दुकानी..... 'एक किलो बासुन्दी' येरू वदला.... 'बुकिंग केलेय का?' एक त्रासिक प्रश्न..... 'नाही' ओशाळलेला येरू...... त्यावर त्याच्या चेहर्‍यावर जे अविस्मरणीय भाव उमटत राहिले ते केवळ आकाशाचा कागद,समुद्राची शाई आनि मेरू पर्वताची लेखणी करूनच लिहिता येतील!!!!!!!!!!

येरूचा मोरूदेखत सणाच्या दिवशी सुब्बु सुब्बु फालूदा झाला. तेवढा एकच पदार्थ तिथे बिन बुकिंगचा मिळत होता


Ninavi
Friday, May 05, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड... ... ... ...

Chafa
Friday, May 05, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,

Vinaydesai
Friday, May 05, 2006 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चितळ्यांच्या दुकानात काही वर्षापूर्वी 'Credit Card' घेता का? या प्रश्नाला....

'हे दुबईला गेलात की तिथे वापरा' असं उत्तर मिळत असे....
(तरी लोक तिथेच जातात, त्याअर्थी त्यांनाच हौस असावी असं ऐकायची)


Shyamli
Friday, May 05, 2006 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग!!!!
काय चाललय ईथे....
खल्लास अगदी


Milindaa
Friday, May 05, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, रॉबीनहूड

Manuswini
Friday, May 05, 2006 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एतके उर्मट,उद्ध्ट दुकानदार की सरळ अशी उशी हिसकावुन घेवुन असे म्हणतात शी बाई ..(नाक मुरडवुन)
आमचे मुंबईतले मारवाडी परवडले सर्व piece बघुन बघुन आम्हाला कंटाळा आला तरी "बिजु सु color बेन? करुन विचारतील कापडाच्या दुकानात.
बरे शेजार्‍यांकडून(मुंबईवाल्याकडून) शिका तरी ' ना' ह्या पुणेकरांची
दिवे घ्या समस्त शेजारी aka नाक मुरडे पुणेकर


Manuswini
Friday, May 05, 2006 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शूनू

credit card चा किस्सा सही
कुठ्ल्या काळातील ग हे?

ह. ह. पु. वा.

काय ती तपासणी पण



Zakki
Saturday, May 06, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर असले वाईट अनुभव आले नाहीत बुवा. आता माल संपला त्यात दुकानदाराची काय चूक? अहो quality राखायची तर mass production ने जमत नाही, खाद्यपदार्थात तरी! नि जे अनुभव वर सांगीतले आहेत, त्यात 'पुणेरी' असे खास काहीच नाही. अगदी असलेच अनुभव लोकांना अनेक निरनिराळ्या देशात सुद्धा आल्याचे माझ्या जगप्रवासी मित्रांनी मला सांगीतले, नि मी सुद्धा तसा चारेक देश हिंडलो आहे.

आता भारतातच एकंदरीत अजूनहि लोकसंख्येच्या, नि लोकांच्या गरजेच्या मानाने production होत नाही. प्रदूषण, घाण (पुणेकर) गिर्‍हाईके इ. ने तिथल्याहि लोकांचे डोके उठतेच की, दुकानदार झाले म्हणून काय झाले? आता अमेरिकेतले 'सौजन्य', 'customer service' नावाचा बीबी उघडलात तर कितीतरी किस्से सांगता येतील मला! तर फक्त पुणेकरांनाच नावे ठेवू नका.

शेवटच्या दोन चार वाक्यांसाठी


ते रडतात! ते आणखी तर्हेवाईकासारखे वागू लागतात! सरळ बोलत नाहीत, अपमान करतात, नावे ठेवतात, काही जण तर परकी भाषेतून सुद्धा! आत्ताच वर बघून आलो!


Sahilshah
Saturday, May 06, 2006 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुकानदाराच्या अश्या वागण्याला पुणेकर पण जबाबदार आहेत. उद्या जर चितळे नी walmart style मध्ये जर प्रत्येक customer चे स्वागत केले तर लोक चितळे सोडुन दुसर्‍या दुकनातुन मिठाई घेतिल

Milya
Saturday, May 06, 2006 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलिल लाखात एक बोललात.. पुणेकारांनी एकाद्याला चढवले की ते डोळे झाकुन तिथुनच माल खरेदि करतात.

चितळ्यांची बाकरवडी सोडली तर बाकि सर्व माल काकाकडे जास्त चांगला असतो असे माझे मत आहे.. आणि चितळ्यांचे पेढे... न बोललेलेच बरे. ज्यांनी, वाडी, सातारा किंवा धारवाड चे पेढे खाल्ल्लेत तेच सांगतील...

तीच गोष्ट वैशालीची इतकी गर्दी बापरे... एक 'ग्रीनरी' सोडली तर वैश मध्ये दुसरे काहिही फ़ार चाम्गले नाही


पुण्यातल्या दुकांदारांसारखा अनुभव new York चे दुकानदार सुध्दा देतात बर का?

Deepanjali
Saturday, May 06, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तीच गोष्ट वैशालीची इतकी गर्दी बापरे... एक 'ग्रीनरी' सोडली तर वैश मध्ये दुसरे काहिही फ़ार चाम्गले नाही

<<<अर्थातच !
वैशालीची crowd चांगली असते म्हणून तर जायचं तिथे ....
एवढ्या चांगल्या atmosphere चा आस्वाद घ्यायचा सोडून वडे , डोसे -SPDP हादडायला सुचतच कसं कोणाला


Dineshvs
Saturday, May 06, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, कंदी पेढे, धारवाडचे पेढे आणि भावनगरचे पेढे.
नुसते दुकानात गेले कि सरळ एक पेढा हातात ठेवतात हे लोक. नाहितर चितळे !!!!


Robeenhood
Saturday, May 06, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते अगदी बारा वाजता एखादा माणूस जर आत जाताना चितळ्यांच्या शटरखाली उभा असेल तर खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रदिशी शटर सुद्धा त्याच्या टाळक्यात आपटतील.....

Shyamli
Saturday, May 06, 2006 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रदिशी शटर सुद्धा त्याच्या टाळक्यात आपटतील.....>>
अगदि अगदि.....

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators