Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 07, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » Puneri namune » Archive through April 07, 2006 « Previous Next »

Mepunekar
Monday, March 27, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki, mudde yogya astil tarch vad ghalnyachi himmat hote..Vadvivad ghalaylahi hushari lagte, vo sabke bas ki bat nahi...
Ani ho, aho he marathitch lihilay bhau....tyashivay ka tumhala kalle kay lihile te..
Dive ghya..

Zakki
Monday, March 27, 2006 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्य मुद्दे! जाणून बुजून केलेली टिंगल, म्हणजे काही वादाचा मुद्दा नसतो. ते सोडून देऊन, इतरांसारखे गप बसायचे. मग लोक आपोआपच थांबतात! आणि एव्हढी हुषारी वाया चालली आहे तर देवनागरीत लिहायला शीक ना! इथले शेकडो लोक, अगदी पुणेकरसुद्धा शिकले! मग तुला काय अडचण? आणि for the record , मी मागल्या वर्षी पाच महिने पुण्यात राहिलो होतो, त्यामुळे असली धेडगुजरी मराठी, म्हणजे हिंदी, इंग्रजी चे मिश्रण असलेली भाषा मला आता चांगली समजते, म्हणजे काय आहे, की हुषारी कशासाठी वापरायची ही अक्कल असली कि मग आपली कुणि जास्त वेळ टिंगल करत नाहीत!


Moodi
Monday, March 27, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुमचा पहिला मुद्दा मनापासुन पटला. म्हणजे कुणी कुणाची जाणुन बुजुन केलेली टिंगल.

म्हणजे खरच तुम्ही म्हणताय ते खरे आहे की जिथे तो विषय समजत नसताना देखील जर कुणी कुणावर टीका करीत आहे, तर तिथे वाद न घालणे हाच एकमेव योग्य पर्याय असतो.

मी पुणेकर तुमचे चालू द्या. मी फक्त झक्कींच्या पहिल्या मुद्याला अनुमोदन दिलय. रागवु नकोस. मी तुला तसे म्हणत नाही किंवा म्हणणार सुद्धा नाही. आलेल्या काही कडवट अनुभवांमुळे झक्कींचे पहिले वाक्य अगदी मनापासुन पटले.


Jaaaswand
Monday, March 27, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगपंचमीच्या दिवशी लावलेली पाटी ( फ़ोटो ) पाहून....
मला पूर्वी बादशाहीत लावण्यात येणार्‍या पाटीची आठवण आली..
ही माहिती ऐकीव आहे तेव्हा..खरे खोटे माहीत नाही

बादशाहीत पूर्वी म्हणे अशी पाटी होती....

बशी मधे सिगारेट विझवू नये अन्यथा ash tray मधे चहा देण्यात येईल


हे ऐकून मी गडाबडा लोळलो होतो.. हसून...


Ameyadeshpande
Monday, March 27, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याची भाषा असेल शुद्ध पण ह्याच पुण्यात कुठलेही शब्द कशालाही म्हणले जातात... आता कुणी उदास आहे तर " तुझं असं झुरळ का झालयं " ... हे एक उदाहरण झालं असले कितीतरी शब्द कुठेही वापरले जातात...म्हणणार असाल तर म्हणा त्याचं काही नाही पण मग आमची भाषा चितळेंच्या तुपातली असते असं तरी म्हणू नका.

Ameyadeshpande
Monday, March 27, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद मला आधी वाटलं तू शिवशाही,बादशाही मधल्या बादशाही बद्दल बोलतो आहेस आणि हा प्रकार तेव्हापासून चालू आहे हे वाचून क्षणभर २ फ़ूट उंच उडालो(तेव्हा ही ash tray होता हा प्रकार बघून) :-)

Jaaaswand
Monday, March 27, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अमेय...
तू विषय काढलाच आहेस तर.. अजून काही उदाहरणे..

फ़णस लावणे : कामात खो घालणे
वरणभात मॉडेल : काकूबाई
:-)

अमेय तुला बादशाई म्हणजे काय, पहिल्यांदा झेपले नाही म्हणजे तू पुणेकर नाहीस ही मी ठामपणे सांगू शकतो.. हाय का नाय


Mepunekar
Wednesday, March 29, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki, Mazi post hi saral manasanbaddal hoti, vakdyat shirnaryanbaddal nahi. Mhanje saral manse ugach vad ghalat nahit, mudda yogya asel tarach tyat comment kartat ase mala vatte.
Maza kuthlyahi shaharabaddal, jatibaddal akas dharun bolnyala aakshep ahe.
Mala vinodbuddhi ahe, tyamule me gamtidar patya v tyayoge yanare majedar comments njoy karu shakte. Pan fakt akasapoti keleli tika mala patat nahi.
Aso, ani devnagrit n lihinyache karan vel kiva fartar alashipana asu shakto...pan binhushari nakkich nahi.
Me maze mat sangitle. Ya pudhe ha vad me vadhavnar nahi.(Shahanya mansasarkha!)




Ameyadeshpande
Wednesday, March 29, 2006 - 6:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मीपुणेकर वा! तुम्ही एक समंजस पुणेकर दिसताय. :-)

Zakki
Thursday, March 30, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिपुणेकर खरे आहे. मी आपला उगीचच पुणेकरांवर तोंडसुख घेत असतो, कदाचित् ही मझी मनो विकृति असेल, तेंव्हा माफ करा, दिवा घ्या नि विसरून जा!

Mepunekar
Thursday, March 30, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki, aho mafi kay magtay? Hi apli charcha zali. Charchet matbhed alech. Teva mafi cha prashnach nahi...
Ani varil vichar general hote, tumhi dukhavle jau naka. Dive ghya..

Rahulbaba
Sunday, April 02, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Agadi Magchyach Mahinyatala Anubhav. Railwayne punyala gelo tithun pudhe Kedgaon laa Passenger gaadine jaayecahe hote. Tahan lagali mhanoon Staion Baherchya Dukanat jaun shambarachi note deoon bisleri mhanalo. Barobar sutte nahit mhanoon note parat aani trasik chehara. Mag Hindit suru zhalo "Uncle bahot pyaas lagi hain" Mhanalo ani bisleri milali. Nanatar ticket kadhat astanna gardi thodi asoondekhil mazha number yenyagodar Ticket clerk Paise punha punha mojat basla aani mazhi gadichi vel zhali shewati dhawat jaoon doosrya counterwaroon ticket ghetale ani tasach dhawat bridgewaroon na jaata line olandoon gaadit jaoon baslo. Fakt eka minitacha usheer aani ratra Punyat kadhavi lagali asati. Railwaycha clerk Marathi vatat navhata tyamule punyala dosh denaar nahi pan vaeet mansa kuthehi asoo shaktat. Mala ti nemaki punyat kaa bheatavi yaache vaeet vatale. Karan Mumbai pekhshahi punyawar mazha jaast lobh. Mi Mulacha Nashikcha :-)

Arjun0306
Sunday, April 02, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala ti nemaki punyat kaa bheatavi yaache vaeet vatale.
राहुलबाबा, वाईट म्हणू नको, वेगळी (विक्षिप्त) म्हण.
मला नाही वाटत, तू हिंदीत बोललास म्हणून काम झाले, मला वाटते तू त्याला तुझे ऐकून दया आली, मग तू मराठीत बोलला असतास तरी चालले असते. काही लोकांना उगीचच दुसर्‍याची अडवणूक करायची सवय असते. तू पुण्याला बरेच वेळा जात असशील, तर तुला तिथे ते जास्त वेळा दिसतील. अमेरिकेत सुद्धा वर्षातून एक दोन वेळा असे अनुभव येतात. तेंव्हा भारतीयांनाच नावे ठेवायला नकोत.

शिवाय बर्‍याच भारतीयांच्या मते इंग्लंड अमेरिकेत सुद्धा अस्सेच असते, असे म्हंटले की काही पण माफ. तिथे हा विचार नाही की इकडे कदाचित फार कमी वेळा नियम मोडत असतात, तिकडे मात्र सर्रास!

Rahul16
Friday, April 07, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chan suru aahe wadwiwad.....mi pan thoda welat yeto tel..:-) gheun....punekar khup talalya jat aahe wadyasarkhe...aani gammant mhanaje tyasathi lagnare indhan pan punekarach purawat aahe....

Moodi
Friday, April 07, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती किलो नक्की? ..........

Rahul16
Friday, April 07, 2006 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुने पुने म्हणजे काय,

पुने तेथे कय उने,

खरेचकी,

पुने म्हणजे अती शाहाने,
पुने म्हणजे मी एके मी किंचळाने
पुने म्हणजे टोचुन बोलणे,
पुने म्हणजे कंजुसी करणे,

आनी यालाच संस्क्रुति चे माहेरघर म्हणणे,

पुने म्हणजे,
ईतके चांगले शहर व्रुत्ति ने वाया घालवणे.





Puru
Friday, April 07, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सदोदीत बाहेर खाणे,
दुसर्‍यास मारती टोमणे,
गाणे कळल्याचे रसिक बहाणे,
खड्ड्यातल्या रस्त्यातुन गाडी हाणणे,
तरीही पुण्याचे गोडवे गाणे,
पुणे तेथे काय उणे
ऐसे आता 'पुरु' म्हणे!


Zakki
Friday, April 07, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर सगळेच काही काही लिहिताहेत, म्हणून मी पण लिहितो. अर्थात् शिव्या एकट्या मलाच बसणार. एकदा नाव कानफाट्या झालं आहे ना? हटकेश्वर, हटकेश्वर.

एक चोरलेली गोष्ट. येथिल डॉ. लोथे (नागपूरचे) यांनी लिहिलेली.
यजमान: या मंडळी या. जेवण झालेलच दिसतय!
पाहुणा: (निर्लज्जपणे) नाही, फार भूक लागली आहे.
य.: मग किती पोळ्या खाणार?
पा.: आपल्या दोन तीन.
य.: नक्की सांगा, दोन का तीन? आम्हाला तुमचे शिळे अन्न खाऊन तामस्य यायला नकोय्.
पा.: अडीच.
य.: नि तुमचा मुलगा? दीड नं?
पा.: (निर्लज्जपणे) नाही तो सुद्धा अडीचच.
य.: अन् भात?
पा.: (चातुर्याने) दीडशे ग्रॅम.
य.: अरे बापरे! मग काय जेवल्यानंतर पर्वतीवर फिरायला जाणार वाटते? ..... पण अन्न टाकू नका बरं!!




Mrinmayee
Friday, April 07, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki काका, आपण नागपुरी लोक देखिल जरा ढिल्लेच बघा!! बाहेरुन जेवूनच नाही का जायचं पुणेकरांकडे जाताना? :-) पुणेकरांनो, दिवे घ्या!

Manuswini
Friday, April 07, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शी बाबा काय हा निर्ल्ज्जपणा
( नाक मुरडवुन ) त्यापेक्षा आम्ही मुंबईकर परवडले सगळ्याना(यजमांना सुद्धा) बाहेर घेवुन गेलो असतो हॉटेलात आहे काय नी नाही काय
just kidding
दिवे घ्या हं...


Zakki
Friday, April 07, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनि, तू कुठे रहातेस ग? नुसता पत्ता सांग. याहू मॅप्स, किंवा मॅपक्वेस्ट माझ्याकडे आहे }


Zakki
Friday, April 07, 2006 - 9:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनि, तू कुठे रहातेस ग? नुसता पत्ता सांग. याहू मॅप्स, किंवा मॅपक्वेस्ट माझ्याकडे आहे


Manuswini
Friday, April 07, 2006 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रहाते San Jose, CA ला पण सध्या एथे हवामान खराब आहे सतत पावुस उगाच सर्दी वगैरे होयला नको येत असाल तर :-)

दिवे घ्या


Zakki
Friday, April 07, 2006 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्यू जर्सीतल्या माणसाला सान होजेच्या आल्हाददायक हवेची भिती दाखवतेस काय? पुणेरीच आहेस. 'मी तुम्हाला बोलवायचे म्हणतो, पण आम्ही रहातो जिमखान्यावर नि आजकाल पुलावर काय भयंकर गर्दी असते! आमच्याकडे जेवायला येण्यापेक्षा तुम्हाला बादशाहीतच जेवायला परवडेल हो.'

नि सान होजे म्हणजे काय पुणे वाटले काय? 'अहो मनुस्विनि कुठे रहाते' म्हंटले तर कुणिही सांगेल? कदाचित् भूकंप करणार्‍या बाई कुठे रहातात म्हंटले तर storvi चा पत्ता कळेल, पण तुझी काय खासियत आहे? नि शिवाय मी सान होजेला ऑगस्टमधे येणारच आहे की! तेंव्हा बघूच मुंबईकरांचे आदरातिथ्य!


Storvi
Friday, April 07, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सॅन होजे ला येणार तर मुंबईकरांचं काय जातंय आदरातिथ्य करायला? :-O मी तेंव्हा बहुतेक पुण्यात जाणार आहे :-O

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators