|
Sashal
| |
| Monday, December 04, 2006 - 9:50 pm: |
| 
|
इथे सीमा चं पोस्ट होतं ते काढून टाकलं का? 
|
एकदम बरोबर सशल. गेल्या ८ १० दिवसांपासुन जिकडे तिकडे शांतता फार तर माझे दु:ख नी नवरा बायको हेच विषय. PP पण शांत. कुछ पट्या नही.
|
सशल, हितगुजची दुरावस्था पोष्ट एकदम पटल. मानापमानाचे खेळ फ़ारच रंगतात आता अस वाटत.
|
Tulip
| |
| Tuesday, December 05, 2006 - 5:51 pm: |
| 
|
हो हो. खरचं कंटाळवाणं वाटत हल्ली HG वर. सगळ्यांचे पापड भारी लवकर मोडतात. सशल बरोबर लिहिलं आहेस!
|
Sayonara
| |
| Tuesday, December 05, 2006 - 6:04 pm: |
| 
|
अगदी अगदी. हितगुजचं वर्णन छान केलं आहेस.
|
Peshawa
| |
| Tuesday, December 05, 2006 - 6:23 pm: |
| 
|
काही कळजि करु नका.. कोपरखळ्या मारायला सुरवात करा एक दिवसात HG पुर्वपदावर येइल...
|
Deshi
| |
| Thursday, February 08, 2007 - 7:31 pm: |
| 
|
आपल्या सद्सद्विवेक्बुध्दीला पटेल तसंच वागायचं तर हे सगळं जग किती सुंदर होईल ना? सशल ताई, ते खरच त्यांच्या सदसदविवेक्बुध्दी ला पटत म्हणुन तसेच वागतात ना. मग त्यांची सदसदविवेक्बुध्दी आपन कशी बदलनार? तुम्ही विषय खरच छान निवडलात. पण जर सर्व खरेच बोलु लागले तर world will be worst place to live . एका कुरुप बाईने तिच्या नवर्याला विचारले की मी सुंदर दिसते का? तिचा नवरा म्हणाला दिसन्या वर नाही असन्या वर मी तुझ्याशी लग्न केले तु दिसायला कुरुप आहेस पण विचारांनी छान आहेस. तिने हाच प्रश्न आण्खी काही लोकांना विचारला सर्वाना मन थोडी माहीती होते त्यांनी कुरुप हेच उत्तर दिले. तिने आत्महत्या केली. खरच खर बोलायला लागल तर खुप प्रॉब्लेम नाहीसे होतीलही पण अनेक नविन जन्मतिल. त्यामुळेच अश्वथामा हतायति नरो का कुंजरो हे युध्दीष्टीराला म्हणावे लागले. पण all said and done जेव्हा खरे बोलता येईल (९० टक्के वेळा) तेव्हा खरेच बोलायलाच पाहीजे. मी हे मात्र माझ्या मनातिल खरेच लिहीले आहे.
|
Zakki
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:36 pm: |
| 
|
प्रामाणिकपणा, तसेच सडेतोडपणा, प्रेम, राग न करणे हे सगळे गुण आयुष्याच्या जरा उतरत्या काळात पटायला लागतात. तोपर्यंत सतत भीति की आपण खरे सांगितले तर १. कदाचित् जास्त पैसे द्यावे लागतील, किन्वा २, लोक आपल्याला नावे ठेवतील. किंवा असे वाटते की आपणच दुसर्याला म्हंटले 'तूच फोन केला नाहीस, तर कदाचित् बाकीच्या लोकांना ते खरे वाटेल' नि स्वत:वर आळ येणार नाही! जेंव्हा उतरत्या काळात पटते की ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या, तेंव्हा कोण काय म्हणेल याची फारशी चिंता उरत नाही, नि जेंव्हा खरे बोलल्याने नि नीट वागल्याने आपलाच आनंद खरोखरच वाढतो, तेंव्हा मग लोक खरे बोलतात, रागावत नाहीत, ' Sorry मी फोन घेतला नाही कारण मला बोलावेसे वाटत नव्हते,' किंवा 'फोन केला नाही' असे म्हणायला लाज वाटत नाही!
|
Sashal
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:41 pm: |
| 
|
अहो झक्की, मी अजिबात उतरत्या वयात वगैरे नाहि ..
|
Maitreyee
| |
| Thursday, February 08, 2007 - 9:07 pm: |
| 
|
देशी लोक $$ काटकसरीसाठी कुठल्या extent पर्यन्त जातात याचे किस्से लिहायचे तर तुझे पान भरून वाहील सशल!
|
Farend
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:12 pm: |
| 
|
सशल मुद्दा पटला, पण DVD चे उदाहरण जरा बरोबर नाही असे वाटले...पूर्वी आम्ही आसपासचे २-३ घरे वेगवेगळे पेपर घेत होतो (अगदी ठरवून नाही, पण प्रत्येकाची आवड वेगळी असल्याने), आणि आपला वाचून झाला की अधूनमधून एकमेकांचा वाचत होतो, हे साधारण तसेच आहे. आता हे एखाद्याने ठरवून कायमच तसे केले तर हे उदाहरण मान्य, पण बर्याच वेळा आपोआपच अशी वेळ येते की अगदी आपल्या समोर राहणार्या मित्राकडे आपण न पाहिलेला चित्रपट आहे. मग त्यांचा पाहून झाल्यावर परत करायला अजून एक दिवस असेल तर आपण पाहायला काय हरकत आहे? अशा वेळेस तो परत दुकानात घेऊन जाणे आणि पुन्हा रेंट करून आणणे practical वाटत नाही. जस्ट माझे मत. बाकी उदाहरणे मान्य. सद्ध्या तर San Jose Mercury मधे कारपूल मधे एकटेच जाणार्या cheaters बद्दल बरेच चालू आहे.
|
Sashal
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:18 pm: |
| 
|
Farend , पेपर विकत घेऊन कोणा दुसर्याला वाचायला देणं वेगळं आणि भाड्यावर आणून चार - पाच जणांनी तो वाचणं वेगळं .. आणि बघायचा असेल अगदी तोच movie तर पुन्हा rent करून आणणं का बरं practical वाटत नाहि?
|
Zakki
| |
| Friday, February 09, 2007 - 2:13 am: |
| 
|
अहो सशल, तुम्हाला नाही म्हंटले मी उतरत्या वयाच्या!!! मी नुसते म्हंटले की या गोष्टी समजायला जरा उतरते वयच लागते. तोपर्यंत इतर सर्व गोष्टी आपल्याला महत्वाच्या 'वाटतात'. पण उतारवय झाले की कळते की त्या तश्या नाहीत.
|
Bee
| |
| Friday, February 09, 2007 - 7:42 am: |
| 
|
सशल, माझा बर्माला जाण्याचा बेत सुरू आहे. मी माझ्या एका स्नेहीला बर्माबद्दल माहिती विचारली त्यावेळी त्यांनी मला मेल मधे हे काही वाक्य लिहिलेत. सो.. बर्माला जाऊ ये.. The people are nice and remind you of the Indians during 1940's and 50's. Honesty is still a virtue in that land.
|
Zelam
| |
| Friday, August 17, 2007 - 6:56 pm: |
| 
|
सशल same here . माझी पण सध्या अगदी अशीच मनःस्थिती आहे. कदाचित श्रावणाचा हिरवा रंग मनातून पुसला न गेल्याने असेल. कधीकधी खूप nostalgic होऊन जुने दिवस आठवतात जेव्हा खरच अशा सुट्ट्यांची मजा लुटलीय. आता कधी मिळणार अशी संधी? :-
|
हम ... सशल तुझ मागण म्हणजे वर मागितल्यासारखच आहे इथे उजवीकडे राजमाचीच्या ट्रेकची जाहिरात आहे. पण जाता येणार नाही.
|
Shonoo
| |
| Friday, August 17, 2007 - 8:15 pm: |
| 
|
सशल मला नाही कंटाळा आला. आताच सॅन होजे ला जाउन नवा परिसर पाहून, जुन्या तरिही नव्या ( किंवा नव्या तरिही जुन्या) मित्र मैत्रिणींना, सुहृदांना भेटून आले. त्याची धुंदी अजून उतरली नाहीये;-)
|
Supriyaj
| |
| Friday, August 17, 2007 - 9:46 pm: |
| 
|
सशल, vacation मधला मेनु मोजकाच पण भारी interesting आहे हो..
|
Farend
| |
| Friday, August 17, 2007 - 10:37 pm: |
| 
|
सशल मनालीला जा. मी १० वर्षांपूर्वी गेलो होतो. येथे Lake Tahoe पासून अनेक ठिकाणे पाहिली पण मनाली ची सर कोठेच वाटत नाही. तुझ्या वर्णनातील पहिला अर्धा भाग तेथे मिळेल. येथे कितीही चांगल्या साईट्स असल्या तरी त्या सर्व थंड ठिकाणी फिरल्यावर कोठीही गाडीवर मिळणारा गरम चहा, कणसे वगैरे नसल्यामुळे मजा येत नाही.
|
Maanus
| |
| Friday, August 17, 2007 - 11:14 pm: |
| 
|
अश्विनी, freeways ने जाण्याऐवजी आड मार्गा ने गेलीस तर इथे पन मजा वाटते... एकदा मी असाच albany वरुन 9H ने आलो. एकदम मस्त रस्ता होता. एक लेन, मझ्या दोन्ही बाजुला दुर दुर पर्यंत एक पन गाडी नव्हती. एकदम बारीक पावसाची सर. मधे मधे छोटी छोटी गावे येत होती, त्याच्यात काही लहान लहान bread & breakfast वाली दुकाने आहेत. काही ठिकाणी mozzarella sticks मिळतात... भजी सारख्याच लागतात त्या... आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सरळ रस्ता नव्हता. वळण... चढ उतार सगळे काही. मजा आली. तुझ्या घरच्या इथे पन route 9 दिसतोय बघ जावुन कधितरी. (GPS असल्याने मी कुठेही trun घेवु शकत होतो... google च्या भरवष्यावर नको जावुस असे कुठे )
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|