|
Dineshvs
| |
| Tuesday, June 27, 2006 - 5:14 pm: |
| 
|
Rar या बाबतीत, आपली " जातकुळी " एकच आहे बरं का ?
|
Farend
| |
| Tuesday, June 27, 2006 - 8:29 pm: |
| 
|
rar चित्रपट रसिक आतुरतेने वाट बघत आहेत, तेव्हा खास लोकग्रहास्तव पुढचा पीस लौकर लिही.
|
Bee
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:02 am: |
| 
|
रार, लवकर लिही आता! सुरवात छान झाली आहे.
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:47 am: |
| 
|
रार छान लिहलय. आता मंडी मी नक्कि बघेन. मी शाम बेनेगल यान्चे सुरज का सातवा घोडा पाहिला आहे त्यावेळी मी ७वी ८ वीत असेन काही विशेष कळालच नाही पण ते एक वेगळ्या type चे director आहेत. तु अजुन लिहि. म्हणजे मला अजुन माहिती मिळेल त्यांच्या pictures विषयी CD शोधायला हवी. पुण्यात मिळेल का? तु जैत रे जैत शी कशी निगडीत आहेस? मी पाहिला तो. मला आवडला. गाणी तर खासच आहेत.
|
Bee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:00 am: |
| 
|
रार, मंडीबद्दल इतके काही वाचले आहे तरिही तुझे हे लिखाण भावले, खास करुन शेवट. एक माहिती, मंडीमधे शबाना बरिच लठ्ठ दाखवली. त्यासाठी तिने बरेच वजन वाढविले होते. फ़क्त ४ पानांची कथा चित्रपट होऊ शकली म्हणजे ग्रेटच!
|
Hi Rar, I watch few hindi movies, and looks like Mandi is worth watching. BTW, on the topic of hindi cinema, have you had a look at this website? I found the reviews frank, true and definitely worth reading. Also, a foreigner commenti9ng on Indian Cinema presents a different picture altogether
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:02 pm: |
| 
|
रार, एका चांगल्या सिनेमाच्या आठवणी. विषय असा असला तरिही तो सिनेमा क्लीन होता. उगाचच वास्तवातला ओंगळपणा तिथे नावालाहि नव्हता. अनिता कंवर, ईला अरुण याहि छोट्या भुमिकात होत्या. यातली भाषाहि खास उल्लेखनीय अशी, म्हणजे हैद्राबादी होती. शबानाने तरुणपणीच अशी भुमिका करायचे धाडस दाखवले होते. पण अलिकडच्या उमराव जान मधली तिची अशीच भुमिका, तितकीशी चांगली वठली नव्हती.
|
Bee
| |
| Thursday, March 15, 2007 - 5:43 am: |
| 
|
रार, तुझ्याकडून ही एक छान treat मिळते आहे. भुमिका माझ्या संग्रहात आहे. मला 'चक्र' सर्वाधिक आवडला.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 15, 2007 - 4:19 pm: |
| 
|
अनेकवेळा मनात आणुनहि, भुमिका बघायचा राहुनच गेला. ( त्यात एक घोळ असा झाला होता कि सिनेमात, पहिल्यांदाच दोन पाट्या दाखवल्या जातात, ज्या परस्परांविरुद्ध होत्या. पण हा उल्लेख सहज गंमत म्हणुन ) त्यात प्रीती सागरने गायलेले, तुम्हारे बिन जी ना लगे, हे छान गाणे होते. सिनेमात कुठपर्यंत कथानक आलेय ते माहित नाही, पण हंसाबाईंशी माझे नाते लागते. माझ्या आत्येबहिणींचा संभाळ त्यानी अत्यंत मायेने केला, त्या सावत्र मुली असुनही आणि स्वतःला मुल झाले नसले तरिही. आणि या उल्लेखाशिवाय, त्यांचे चित्र परिपुर्ण होणार नाही.
|
Rar
| |
| Thursday, March 15, 2007 - 5:00 pm: |
| 
|
प्रीती सागर चे 'तुम्हारे बिन जी ना लगे' छान आहे. CBDG पण माझ्या मते तो शुद्ध कल्याण असावा असं वाटतय. वनराज भाटियाचं music म्हणलं की प्रीती सागरचे गाणं असणारच! मला सहसा 'खटकलेल्या' गोष्टी point out करायला आवडत नाही, पण सिनेमाच्या सुरुवातीच्या titles मधेच जी 'हिंदी लावणी' आहे ना ती somwhow माझ्या कानाला फ़ार 'बोचली'. मुळात 'लावणी' हा प्रकार इतका 'मराठी" आहे... की 'हिंदी शब्द आणि लावणी'... बात कुछ जमी नही असं वाटलं. हे writeups वाचणार्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. हे सिनेमे तुम्ही पाहिले नसतील, तर जरूर पाहा. मला आवडले, कदाचित तुम्हाला ते आवडणारही नाहीत. एकदम कबूल! निदान त्या निमित्ताने 'माझ्या बघायच्या राहून गेलेल्या गोष्टी', मला न समजलेल्या गोष्टी कळतात, कळतील.. ये भी क्या कम है क्या! thanks again!
|
Sunidhee
| |
| Thursday, March 15, 2007 - 5:23 pm: |
| 
|
रार मस्त लिहिले आहेस.. आर्ट सिनेमातुन मिळणारा आनन्द वेगळाच असतो. स्मिता पाटील पुन्हा होणार नाही.. मला ती गेली तो काळ कधीच विसरता येत नाही कारण त्या १-२ वर्शात (८५ ते ८७) आपण ३ हिरे गमावले होते. स्मिता, सन्जीवकुमार आणि किशोरकुमार.. कधी न भरुन येणारे नुकसान.. अजुनही हळहळ वाटते आणि कायम वाटत राहील..
|
रार, खूप आवडलं तुझं लिखाण!! बर्याच वर्षांपूर्वी बघीतलेले जुने सिनिमे परत बघावेसे वाटायला लागलेत. .. अगदी मंडी देखील! आई-बाबांबरोबर बघताना खूप ऑक्वर्ड होईल असं वाटंत असतानाच कधी तल्लीनतेनं हा सिनेमा बघीतला ते कळलं नव्हतं! खरं आहे, 'हिंदी लावणी' ही 'हिंदी चिमणरावा' इतकीच खटकणारी गोष्ट!! इतकं सुंदर लिहितेस! जमलं तर पिंजरा सारख्या मराठी चित्रपटांवर पण लिही. मला सहसा'खटकलेल्या'गोष्टी point out करायला आवडत नाही.. हा तुझ्याकडून घेण्यासारखा गुण!
|
Zakasrao
| |
| Friday, March 16, 2007 - 6:20 am: |
| 
|
रार खुप मस्त लिहितेस. आता वाचताना अस वाटतय कि एका शांत तळ्याकाठी बसलोय आणि तु आम्हाला सांगत आहेस. आमच्या डोळ्यासमोर सर्व चित्र उभा रहात आहे. मला तुझी शैली खुप आवडली आहे. अजुन लिही. छान माहिती मिळत आहे.
|
छान लिहील आहेस. मी फ़ारसा मूव्ही बघत नाही. पण आता सहज मिळाला तर नक्की बघेन अस वाटतय.
|
Shonoo
| |
| Friday, March 16, 2007 - 3:34 pm: |
| 
|
रार किती छान लिहिलंयस? दृष्ट काढायची स्मायली माहितेय का कोणाला? सहज, आणि मनापासून लिहिलं आहेस आणि म्हणूनच मनाला भिडतंय थेट. आवडलेल्या सिनेमांबद्दल असं काही वाचलं की परत बघावेसे वाटतात. अशीच लिहीत रहा, गायब होऊ नकोस मधेच.
|
Bee
| |
| Friday, March 16, 2007 - 3:48 pm: |
| 
|
हो ना आज गायब झाली ही.. रार तुरंत बाहेर आवो
|
मस्त लिहीले आहेस रार. खरंच हे चित्रपट आता पुन्हा बघावेसे वाटतायत! BTW , तुला मेल केलंय बघ.
|
Tulip
| |
| Tuesday, March 20, 2007 - 6:46 am: |
| 
|
सुंदर! लिहित रहा रार. अजून असे खूप सिनेमे आहेत जे तुझ्या दृष्टीतून परत एकदा पहावेसे वाटताहेत.
|
Sayonara
| |
| Tuesday, March 20, 2007 - 11:42 am: |
| 
|
मस्त लिहिलं आहेस रार. मंडी पाहिल्याचा आठवत नाहीये मला. आत्तच सर्च मारला नेटफ्लिक्सवर. पण तिथेही नाहीच. 
|
Madhura
| |
| Tuesday, March 20, 2007 - 5:39 pm: |
| 
|
रार मस्त. सायोनारा, public library मधे मिळेल हा movie ...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|