Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
taorNaa...

Hitguj » Culture and Society » इतिहास » दुर्गभ्रमण » taorNaa « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 05, 200620 07-05-06  5:37 pm

Moodi
Wednesday, July 05, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुचाच भाऊ रे तू महेश, अगदी टिप्पीकल वर्णन केलेस अन प्रसंग डोळ्यासमोर उभा केलास. फोटो मस्त आलेत. आता बाकी लिखाणाची वाट बघते.

Limbutimbu
Thursday, July 06, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> गाडिची किमत ही ति ढकाअयला लागते तेव्हाच कळते हेच खरे
हो रे आणि व्यायाम न केल्याची किम्मतही तेव्हाच कळते!
चल लौकर लौकर लिहि पुढचे! छान लिहितो हेस! :-)
फोटो झकाऽऽऽस!
मुडी, अगदी बरोबर... त्याला पण गाडी ढकलायला लागली....


Pujarins
Friday, July 07, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, तुझ्यासारख्या माणसाने एवढे लिहिलेले बघून 'अंतु तानदेवांच्या' वाड्याला गदगदून आलेय...
येउ देत पुढचा भाग....


Mjwatharkar
Friday, July 07, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू मुडी ज्याला कष्ट पडतात त्यालाच कळते हो
पुजारी त्या वाड्यात लहानपणी वाचलेल्या पुस्तकातुन प्रेरणा मिळाली रे
तर आमचा चहा संपतोय ना संपतोय तोच बाजुला एक चारचाकी येउन उभी राहीली त्यातुन एक उच्चभ्रू कुटुंब उतरले आता आcमह्या असे लक्षात आले की सदर कुटुंबातिल सदस्यांच्या आपापसातील चर्चा ही आंग्ल भाषेतुन चालली होती. आमच्यातील काही जण त्याने फार प्रभावित झाले कि अमहारष्ट्रीया लोकही किल्ले बघायला येतात वगैरे.कारण त्या कुटुंबातिल स्त्रीने घातलेल्या पेहेरावावरुन ति चौकटितल्या मराठी कुटुंबातिल तरी वाटत नव्हती.पण ज्यावेळि त्यांच्यातल्या एकाने खाद्यपदर्थांची ऑर्डर देताना "मिसळ" असा असा अस्खलित उल्लेख केला त्यावेळि कळले की हे आपल्याच बिरादरीतले आहेत. फक्त ज्याना मायमराठी वापरायची लाज वटते त्या जमातितिल आहेत.कारण कुठलाही अमराठी माणुस हा "ळ" असाउचार करित नाही तर तो "ल"असे म्हणतो उद. "मिसल". एकंदरीत ते पाहुन खेद वाटला.
आम्ही अखेर आटोपल्यावर गडाच्या दिशेने प्रयाण केले. सुरुवातीला लोकांमदे अस्णारा जोश हा मधे मधे कमी होत जातो आणि जर बसले की दमछक वाढत जाते त्यामुळे चढताना तेकण्याच्या एइवजी १५ मिनिटे चढुन झाले की चायाचित्रे असा प्रकार चालु केला. किल्ल्याची तटबंदी अजुनही ढगानी झाकलेलिच होती. किला अर्धा वगिरे चाढून झाल्यवर मग थोडा सुर्या प्रकटला त्यावेळि तटबंदिचे दर्शन झाले आणी जरा किल्ल्याची उंचीही लक्षात आली. अशीही माहीती मिळाली की हा महाराष्ट्रातिल सल्हेरनंतर्चा दोन नंबरचा उंचा किला आहे.मला कुठलही किला चढताना पडणारा प्रश्ण परत पडला की एcढ्या उंचावर किल्ले बांधायची आणी ते जिंकण्यासाठी लढण्याची लोकाना का हौस होती. पण लगेचा हा नतद्र्ष्ट विचार झटकुन टाकुन आणी जय भवानी अशी घोषणा देउन पुढे चालत होतो.एव्हाना पाउस कमी झाला होता
मधेच एक छोटासा दगडी टपा लगला कसेतरी करुन वरति गेलो आनी मग विचार आला की उतरताना समस्या उद्भवणार आहे.कारण पकडायला जागा फार कमी होती. पण उतरताना हि समस्या आम्ही धबधब्याच्या मर्गाचा वापर करुन सोडवली. पुढे गेल्यावर एक सुंदर धबधबा लागला. मग त्यामधे मनसोक्त भिजणे वगिरे प्रकार झाला. आता थोडेच अंतर राहीले होते. अखेरची मजल मारुन आम्ही शेवटी किल्ल्याच्या दरवाजात पोहोचलो. तिथे परत एक्द जोरदार घोषणाबजी झाली. वर्ती देवळाच्याइथे पोहोचाल्यावर मग थोडी पडी मारण्याचा विचार केला. एव्हान पाउस थंबुन देवळाचा कट्टा थोडा कोरडा झाला होता. त्यावर परत एक्दा श्रमपरिहार झाल. आनि थोडा आडवा हो तो ना होतो तोच पावसाला सुरुवात झाली मग त्या पावसतच बुधला माचीकडे जायचे ठरले. वाटेने चालताना आपापल्या घरातुन बाहेर आलेले खेकडे शक्यतो पायाखाली येउ नयेत याची काळजी घेत पाय टाकत होतो एवढ्यात बारीक खेकड अस्मदिकांच्या पायाखाली आलाच.आणि त्याने एहलोकीची यात्रा संपवली त्याने चिरडला जाताना कदाचीत शाप दिला असावा कारण थोडे पुढे जाताच तोच पाय अतिशय विक्रुत रितिने मुरुगाळला गेला. मग खेकड्याचाच शाप लागला यावर आमच्यात एकमत झाले माफक प्रमाणात खेकडे कुळाचा उधार झाल्यवर आणि थोडा पायाचा व्यायाम झाल्यवर मग पुढिल वाटचाल सुरु झाली. तिथे एका बुरुजाला पुढ्च्या बाजुला संरक्षण म्हणून चिलखती बुरुज बांधला आहे त्याला जायच्या रस्त्याच्या शेवटी एक अतिशय लहान खीडकी आहे पाठीवर सॅक घेउन व शरीर जमेल तितके छोटे करुन जावे लागले. पण तिथुनच परत फिरतान मत्र मग ते कोउशल्य जमायला बरिच खटपट करावी लागली. थोडे अडकुन बसणे वगिरे प्रकार झाले नंतार परत एक छोटा दगडी टप्पा लागला. तो उतरलो आणी उतरताना शेवटी पाउल टेकवणार एव्ढ्यात मगचे पाउल सटकले आणि तोरण्याला साष्टंग नमस्कार घातला गेला. . आता जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. पुढे आणि आजुबाजुला दहाबारा फुटापुढे ढगच ढग होते. आम्ही एका बुरुजावर होतो. परंतु तो अनुभव अवरणनिय होता.त्या बुरुजावर अर्धा तास घाल्वला आणि परतिला लागलो.आत देवळाच्या इथे परत आल्यावर पाउस थांबला होता. थोडा सुर्य ही बाहेर आला होता. आणि दिसला अखेर राजांचा गड आणि गडांचा राजा असा तो देखणा राजगड दिसला त्याची छायाचित्रे काढलि.एव्हना संध्याकाळचे ५ वाजले होते अंधार पडायच्या आता उतरायला हवे म्हणुन मग झपझपा उतरायला सुरुवात केली. पण पडुन गेलेल्या पावसाने यथेछ घसरडे आणि चिखल करुन ठेवला होता. आता थोडा वेळ तोला संभाळत वगिरे पाय ठेवले पण सटकलोच परत एक्दा सटकलो. आता या दोन वेळेला सटकण्यामुळे पावासात उतरताना पाय कसे ठेवावेत हे शिकलो. अखेर खाली येउन पोहोचलो मधे २-३ दाच घसरणे झाले खाली पोहोचल्यावर परत एक्दा उदरभरण झाले. लोकानि चहाबरोबर चैतन्यकांडिही शिलगावली.आणि अग्निहोत्र पुर्ण केले. अखेर स्वराज्याच्या तोरण्याला मुजरा करुन आलो त्याच मार्गे माघारी परत आलो.


Dineshvs
Saturday, July 08, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान वर्णन. खेकडा सहसा पायाखाली येत नाही. जपानी असणार तो बहुदा

Limbutimbu
Saturday, July 08, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, छान लिहिल हेस, पण नन्तर भर भर गुन्डाळ हेस अस वाटतय! साष्टान्ग नमस्काराचा परिणाम असावा!
दिनेश.. जपानी असणार....




Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators