Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 25, 2007

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » रागावर आधारित गाणी » Archive through January 25, 2007 « Previous Next »

Dineshvs
Wednesday, July 26, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रैना तो माज खमाज, त्याच सिनेमातले सावरे सावरे, हे गाणे भैरवीत आणि जाने कैसे सपनोमे खो गयी अखिया, हे तिलंग श्याम मधे हा राग तिलंग कामोद आणि श्याम कल्याण च्या मिश्रणातुन तयार झालाय.

Devdattag
Monday, July 31, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती चारुकेशी रागाचा उल्लेख झाला आहे.. त्यावर आधारीत अजून काही गाणी
एक तु न मिला
अकेले हैं चले आओ
छोड दे सारि दुनिया किसिके लिये
मेघा रे मेघा रे


Srujanatva
Tuesday, August 01, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारुकेशी रागातील आणखी काही गाणी
१)किसी राहमे किसी मोड्पर
२)गेले ते दिन गेले


Gajanan1
Wednesday, August 02, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा रे मेघारे.. मत जा परदेस रे
आज तु प्रेम का सन्देस बरसा रे..
हे गाणे बहुधा अहिर भैरव मध्ये आहे


Girishmusic
Monday, August 07, 2006 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
ते राग तिलंग श्याम व तिलंग कामोद नसून तिलक श्याम व तिलक कामोद असे आहेत.


Devdattag
Monday, August 07, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सृजनत्व मेघा रे मेघा रे माझ्या कानाला तरी चारुकेशीतलं वाटतय.. ध आणि नि कोमल लागतायेत..
दिनेश मी ही तिलंग कामोद असा राग ऐकला नाहिये.. मात्र तिलंग आणि तिलक कामोद असे दोन वेगवेगळे राग ऐकले आहेत..
चु. भू. द्या. घ्या.


Raina
Tuesday, August 08, 2006 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिलक श्याम हया रागाचं नावही कधी ऐकलं नाही. सुरावट- थाट वगैरे सांगणार का please ?
दिनेशांची मला वाटत- Typo error त्यांना शामकल्याण आणि तिलककामोद म्हणायचे असणार.


Gajanan1
Sunday, August 20, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिया तोसे नैना लागे रे..
या गाण्याचा राग कोणता?


Dineshvs
Sunday, August 20, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीप्रमाणे पिया तोसे, खमाज मधे आहेत. पण त्या गाण्यात अनेक प्रदेश आणि तिथले सण ( होळि राजस्थान, दिवाळी महाराष्ट्र, बिहु आसाम ) आल्यामुळे एस्डीनी अनेक राग वापरले असणार. संगीत सरितात कधीही एकाच रागाचे गाणे म्हणुन ते वाजवले नाही.
बर्‍याच दिवसात ईथे आलो नाही, ( रैना माझी टायपोच झाली. मला तिलककामोदच लिहायचे होते ) त्यामुळे उत्तर द्यायचे राहिले. दोस्तानो या बाबतीत माझे ज्ञान केवळ पुस्तकी आहे रे. गुरु नसल्याने तालिम नाही. तरिही
तिलक कामोदचे आरोह अवरोह लिहितोय

आरोह
सा रे ग सा रे म प ध म प नि सां
आणि अवरोह
सां प ध म ग सा रे ग सा नि सा

वादी रे संवादी प

आणि जाने कैसे सपनोमे चा राग आहे तिलकश्याम

त्याचा आरोह
सा रे म प नि सा
आणि अवरोह
सां प ध म ग सा रे म ग सा

वादी ग आणि संवादी प

वेळ रात्रीचा दुसरा प्रहर.

तिलंग नावाचा एक वेगळा राग आहे.

ईतना तो याद है मुझे, तु आये ना आये मगर जानेवाले, सजनसंग काहे नेहा लगाये, अशी काहि गाणी आहेत त्यात.



Kedarjoshi
Tuesday, August 22, 2006 - 10:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेरा यार मिलादे सांईया हे साथीया मधील गाणे रागावर आधारीत आहे का? असेल तर कुठल्या?

Rajesh_polekar
Monday, September 04, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala shastriya sangeetatil gaani khup aavadatat.
mi tashi gaau hi shakato,
pan mala kuthale gaane kuthalya raagatil aahe te mahit nahi.
karan mi sangeet class kelela nahi.
tari mala asi classical gaani khup aavadtat.

naino mein badara chhaye...latadidi
madhuban mein radhika nache re...rafiji
laga chunari mein daag chhupau kaise...mannadeyji
omkar swarupa...suresh wadkarji
data tu ganapati gajanana...latadidi
mage ubha mangesh pudhe ubha mangesh...ashatai

asi khupsari gaani aahet ji mala khup aavadtat

tari mala raganvishayi mahiti denyachi krupa karavi



Dineshvs
Monday, September 04, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार राजेश, रागांवर आधारित गाणी कुणालाहि आवडतात.
वर उल्लेख केलेल्या गाण्यांचे राग

नैनोमे बदरा छाये - भिमपलासी
मधुबनमे राधिका - हमीर
लागा चुनरीमे दाग - भैरवी
ओम्कार स्वरुपा - बैरागी
दाता तु गणपति - हंसध्वनि
मागे उभा मंगेश - उषाने गायलेले यमन रागात आणि आशाने गायलेले भैरवी मधे

खरे तर माझेहि ज्ञान पुस्तकीच. बाजारात अनेक छान पुस्तके उपलब्ध आहेत ( तरिही गुरुला पर्याय नाहीच. ) विविधभारतीवर रोज सकाळी साडेसात वाजता, संगीत सरिता नावाचा छान कार्यक्रम असतो. त्यात बरिच माहिती मिळते.
ईथेहि जाणकार लिहित असतातच ( मी त्यापैकी नाही. ) अलिकडेच आपल्याकडे तात्या, आलेले आहेत. तेहि आपल्यासाठी काहितरी लिहिणार आहेत.


Girishmusic
Saturday, October 07, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागे उभा मंगेश हे गाणे यमन मध्येच आहे. एक रेकॉर्ड आशाच्या आवाजात आहे आणि दुसरी मंगेशकर भगिनीन्च्या स्वरात आहे. पण दोन्ही गाणी यमन मध्येच आहेत, भैरवीत कोणतेच वाटत नाही.

Girishmusic
Saturday, October 07, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हे सुरानो चन्द्र व्हा' हे नाट्यगीत कोणत्या रागावर आहे?

Komalrishabh
Sunday, October 08, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हे सुरान्नो चन्द्र' - राग चारुकेशी

Gajanan1
Friday, October 27, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'आस्तित्व' मधील 'गाना मेरे बस की बात नही' हे गाणे 'मोरी गगरी ना भरन देत रे' या यमन कल्याण मधील चीजे वर आधारीत आहे.

मूळ 'मोरी गगरी ना भरत देत' हे कुठे ऐकायला मिळेल? online, CD


Prashantkhapane
Monday, October 30, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा! छान आहे कि हा.

Vaidyabavadekar
Tuesday, December 19, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोरि गगर ना- माज़ी मुलगी गाते. असेल हिम्मत तर ऐका.(गम्मत रे)
बहुधा किराणा परम्परेतील गायक गातात. कोथे मिळाली तर कळवू.


Gajanan1
Sunday, January 07, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, छानच. मग कधी तरी हिम्मत जरुर करुया गाणे ऐकण्याची... तोपर्यन्त आस्तित्व मधील तब्बू चे गाणे आहेच... हे गाणे
www.raaga.com वर आहे.

Yogeshpar
Thursday, January 25, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello,

Mi Ya discu ofrum madhe navinach join zaloy ..

tumachi ganabaddal chi charcha avadali ...

mi hindustani classical music cha chahata ahe ani kahi varsha vocal shikalo hi ahe ..







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators