|
वृतांत... २००७ मधील पहिल्या GTG चा वारकरी सांप्रदायचा मेळावा आणि त्यात दोन सशस्त्र बंदुकधारी अंगरक्षकांच्या बंदोबस्तात प्रकटलेल्या लिंबूटिंबू आठवलेंच्या उपस्थीतीत कालच्या GTG ची सुरवात झाली... ठरल्या वेळे प्रमाणे मिलिंद ( Bhramar_vihar ) आणि योगी ( YogI050181 ) जमल्याचे कळले... त्यानुसार मी आणि जुईने उद्यान गणेश गाठले... समोर पाहतोय तर काय... चक्क लेकुरवाळा आनंद ( Anandsuju ) कुटुंबासोबत हजर... दुसरा आश्चर्याचा धक्का मनीला ( Manee ) पाहुन झाला... जमणार नाही सांगुन वेळेवर हजर... सोबतीला का कू करायला प्रश्ण्मनिषा ( Manishalimaye ), टाय ( Nilu_n ), नंदिनी ( Nandini2911 ), आणि गुरुकाका ( Gurudasb ) हजर होते. थोड्याच अवधीत आत्ममग्न पुरुष किरूपण ( Kiru ) आले... मागोमाग नीलपण ( Neel_ved ) सपत्नीक आले आणि सोबत गजलकार सारंग ( Sarang ) आल्याने GTG ला एक वेळगाच रंग येऊ लागला. भ्रमण ध्वनीवरुन रुप्स येत नसल्याची खात्री करुन, भ्रमरने कन्यारत्नाची खुषी द्विगुणीत करण्यासाठी काजुलकतलीचा डबा पुढे केला... भ्रमा मनवाला खुप खुप शुभेच्छा गुरु काकांनीही योगीच्या वाढदिवसा निमित्त फ़ारीनची चाकलेटा आणली होती... मनसोक्त गप्पां सोबत खानपान चालु होतं. तेव्ह्ढ्यात मनिषाला आपण लाडूसम्राज्ञी असल्याची आठवण झाली. दातांची पर्वा न करता सगळ्यांनी प्रत्येकी एकाच लाडुवर समाधान मानले. सारंगच्या काव्य प्रतीभेमुळे लाडु खाणे सुसह्य झाले. टायने मायची ( Rupali_rahul )ची वाट पाहुन कंटाळल्यावर चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम उरकून घेतला... धन्स नीलू कट्ट्यावर नंदिनीचे कथापुराण चालू असताना तिकडे आनंद त्याच्या चिमुकल्या मैत्रीणीं सोबत उनाडत होता. तर आनंद मैत्री ( Anand_maitrI ) त्या संधीचा फ़ायदा घेऊन आनंदच्या मैत्रीणींची काळजी घेत होता. ते दृष्य पाहुन भ्रमालाही त्याच्या नवजात मैत्रीणींची आठवण झाली आणि परतीचा सुर लावु लागला. मागील पदपथावरून एक कॉलेज कुमार सारखा येरझार्या मारत होता. (बहुदा तो पराग असावा असा अंदाज बांधण्यात आला पण तोही त्या टांगारूने फ़ोल ठरवला.) नेहमी प्रमाणेच GTG ला येऊ न शकलेल्या आणि GTG बद्दल उत्कंठा बाळगणार्या मायबोलीकरांचा उहापोह झाला... अमी, घारू, GD , सखी, सोनचाफ़ा, विद्या, पराग, भावना, शिवम आणि दिप -Two यांना टांगारू ही पदवि बहाल करण्यात आली... तर कोकणी, Psg , अरुण, वैभव, कांद्या, स्मि, किशोर, हिम्स, मयुरेश, तनया आणि आखाती महिलांच्या नावाने लाडू खडे फ़ोडण्यात आले... योगायोगचे ( Yogayog ) आगमन होताच प्रथेनुसार मायबोलीकरांचा मोर्चा वडेवालीकडे वळला. जयसुर्याच्या कृपेने सर्वांनी गरमागरम भजीवर हात साफ़ केला... योग्या तुम जिओ हाजरो साल कमी तिथे आम्ही... सरते शेवटी रुप्स ( Rupali_rahul ) तिच्या पुर्ण ID सोबत हजर झाली... टायने आठवणिने शिल्लक ठेवलेल्या चॉकलेटांवर मायला समाधान मानावे लागले... उभयंतांवर शुभेच्छांचा वर्षाव करून GTG ची सांगता करण्यात आली...
|
Jayavi
| |
| Wednesday, January 10, 2007 - 10:57 am: |
| 
|
इंद्रा, वृत्तांत छानच लिहिला आहेस रे.... आमचं हे देखील GTG हुकलं म्हणून फ़ार वाईट वाटलं. पण काय रे..... आखातातल्या मायबोलीकरांच्या नावानी कशाला खडे फ़ोडलेत रे..... काय घोडं मारलंय त्यांनी?
|
Kandapohe
| |
| Wednesday, January 10, 2007 - 2:05 pm: |
| 
|
ईंद्रा सहीच मजा केलेली दिसते आहे तुम्ही. पण मेरे नामसे खडे क्युँ फोडे? तो आत्मभग्न (हा शब्द लिहीताना शंभर वेळा लिहीलेले तापासावे लागते) किरू अग्रभागी असेल ना खडे फोडण्यात? 
|
Shyamli
| |
| Wednesday, January 10, 2007 - 2:16 pm: |
| 
|
जया ते माझ्या आणि अंजु साठी आहे..... काय लोक्स बरोबर ना! धमाल करता तुम्ही लोक
|
Arun
| |
| Thursday, January 11, 2007 - 3:48 am: |
| 
|
इंद्र : वृतांत मस्त आहे. हमारे इलाके मे GTG हुआ आणि हमारे नाम पे खडे फोड दिये !!!!!!!!!!!!! जाऊ दे, इतकच हिंदी येतं मला ....... खडे नक्की कशासाठी फोडले ते पण लिहा की .........
|
Giriraj
| |
| Thursday, January 11, 2007 - 5:03 am: |
| 
|
अरेरे.. मला माहीत नवह्ते GTG ला खडे फोडावे लागतात.... मि फक्त जेलबद्दल तसे ऐकून होतो!
|
जयावी तुही आखाती महिला मंडाळाची सभासद आहे? >>>जया ते माझ्या आणि अंजु साठी आहे..... श्यामली बेन अरूण... गिर्या लाडू फ़ोडण्या पेक्षा खडे फ़ोडणे परवडले रे... मग ते कुठे ही असो ना...
|
गिर्या, जावं तिथे तुला जेल दिसतं... काय करणार, जुन्या सवयी... इंद्रा वृतांत छान आहे, खरं तर त्यापेक्षा भजी वड्याची आठवण आवडली... 
|
|
|