Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 21, 2008

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through March 21, 2008 « Previous Next »

Prr
Wednesday, February 20, 2008 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा.. तुम्हाला धन्स Vinaydesai!


Limbutimbu
Thursday, February 21, 2008 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाह्य जगात "तडिपाऽऽर" अशी सन्कल्पना अस्तित्वात अस्ते! तशाच प्रकारे, एखाद्या आयडिला एखाद्या किन्वा काही बीबीन्पुरते, काही काळ किन्वा कायमचे "तड्डीपाऽऽर" करता येणे शक्य होईल काय????! :-)
कुणाला कुठुन करायचे तडिपार यावर हवे तर पोल घेता येइल नविन मायबोलीवर! ही सुविधा प्लिज चालू कराच शक्य असेल तर! :-) पहिला प्रयोग माय सिटीमधे यस्जीरोडवर करा!
अन ते इग्नोर लिस्टच्या सुवेधेचे काय झाल?
एकवेळ फ्रेण्ड्स लिस्ट नसली तरी चालेल पण इग्नोरची लिस्ट द्या बुवा, म्हणजे मला कोण कोण इग्नोर केले ते कळुन त्यान्ना आपोआपच पोस्ट केले जाणार नाही! :-)


Karadkar
Friday, February 22, 2008 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One day search is not working, its giving me blank page.

Prr
Wednesday, February 27, 2008 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वास्तुशास्र वर BB आहे का ?..मला मिळाला नाही.

Ajjuka
Friday, February 29, 2008 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूगलच्या जाहिराती ह्या सभ्य असायला हव्यात ना?
सरळ सरळ call a hottie अश्या प्रकारच्या जाहिराती इथे येणं योग्य नाही.
हितगुज मधे शिरल्या शिरल्याच हि जहिरत दिसतेय. मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला आहे. मेल करते.


Milindaa
Friday, February 29, 2008 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, 'पुरुषांच्या व्यथा' BB वाचून आल्या असतील त्या :-)

Marhatmoli
Thursday, March 06, 2008 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mods,

मी raamsetu project lets wake up च्या BB वर एका blog चि link दिलि होति पण काहि members ना ते योग्य नाहि अस वाटतय. Please ति post delet कराल का?


Jhaloni
Friday, March 07, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin,
I need following song. Pls could you find this for me. Lyrics or audio track if available please send to my mail

Ba nij gade nij gade ladiwala nij nij re mazya bala,bahu divasanchya............

Admin
Saturday, March 08, 2008 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jhaloni,
I regret to say this, but we do not have resources to look at individual request such as this.

Pallavi_pune
Thursday, March 13, 2008 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Admin !

Mala health madhe ek new thread start karayacha ahe..Periods chya weles honara tras.
Karta yeil ka?
karta yet nasel tar rahu det.

Admin
Thursday, March 13, 2008 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ithe ughadala aahe.
/hitguj/messages/103387/138088.html?1205451053


Psg
Thursday, March 20, 2008 - 8:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्याच्या गुलमोहरावरच्या साहित्याचा दर्जा नीचांकी पातळीवर आहे असं नाही वाटत? आपण 'काय' लिहितोय हेही लेखकांना ठाऊक नसतंय. 'कथा' मधे कविता, 'कविता' मधे चारोळ्या! बरं, सीलेक्ट करतांना नसेल लक्षात येत, पण दर्जा? :-( किमान दर्जाही राखला जात नाहीये हे सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल एव्हाना. मायबोलीच्या नवीन रूपामुळे आपल्याला अनेक नवीन सदस्य मिळत आहेत हे मान्य, पण खरंच साहित्याचा दर्जा घसरला आहे. जुन्या मायबोलीत कमी लोक लिहित, पण जे लिहित ते मुद्दाम जाऊन वाचण्यासारखं असे. आत्ताही काही खूप प्रतिभावान लोक लिहित आहेत, पण त्यांची टक्केवारी फ़ारच कमी आहे इतर 'साहित्यिकांच्या' तुलनेने.

आता कोणाचं साहित्य चांगलं आणि कोणाचं वाईट हे कोण ठरवणार हा ही मुद्दा आहेच. पण ते किमान वाचनीय तरी असावे यावर कोणाचं दुमत असेल?

यावर उपाय? 'गुलमोहर मॉडेरेशन समिती' किंवा तत्सम काही उपाय करता येईल का? कृपया याचा गंभीरपणे विचार व्हावा ही विनंति. सध्यातरी गुलमोहराकडे आवर्जून यावं असं वाटत नाहीये :-(


Shraddhak
Thursday, March 20, 2008 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनमला दुजोरा. अगदी हाच मुद्दा मांडायला इथे आले होते.
अशुद्धलेखन, लेखनाचा नसलेला दर्जा हे सोडा एकवेळ पण प्रसिद्ध साहित्यकारांच्या रचना खुशाल उचलून, त्यांचं अशुद्धलेखनाने विद्रूपीकरण करून गुलमोहरात टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ( मंगेश पाडगावकरांच्या कविता, नटसम्राटमधलं ' कुणी घर देता का घर? ' , वगैरे) लोकांच्या लिखाणाला काही किमान निकष तरी लावले जावेत. सध्या हे होताना दिसत नाही.
ऍडमिन आणि नेमस्तक मंडळींनी गुलमोहराकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे का?
:-(

Gajanandesai
Thursday, March 20, 2008 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते अशा प्रकारांना गुलमोहराच्या वाचकांकडून प्रतिसादच मिळाले नाहीत किंवा सडेतोड प्रतिसाद मिळाले तर असे प्रकार कमी होतील. कारण गुलमोहरात गाळणी लावायची, कोणते लिखाण दर्जेदार आणि कोणते खालच्या दर्जाचे हे ठरवण्यासाठी, तर त्यातून पुन्हा वादच उद्भवतील!

Itgirl
Thursday, March 20, 2008 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरोखर हल्ली गुलमोहोराकडे फिरकावेसे वाटत नाही :-( काही अपवाद सोडता अगदी सुमार दर्जाचे लिखाण आढळत आहे.... :-(
श्रद्धा, तुला अनुमोदन


Manjud
Thursday, March 20, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहराचा दर्जा घसरत चाललाय. पूनम, श्रद्धा, गजा, आयटी सर्वांनाच अनुमोदन. खरंच 'गुलमोहर मॉडरेशन समिती'चा गंभीरपणे विचार व्हायला हवाय.

Maasture
Thursday, March 20, 2008 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, अत्यंत फालतू लिखाण गुलमोहरवर टाकले गेले आहे. थोडे मॉडरेशन करणे आवश्यक आहे.

अवांतर : 'एका' ठिकाणि जमून कसे एकगठ्ठा चांगले प्रतिसाद द्यायचे, कुणावर तुटून पडायचे हे ठरवणार्‍यांनी इकडे पण तसेच केले. but, for a change it is for a right cause तरिही दर्जा हा शब्द psg च्या पोस्ट मध्ये वाचून भयंकर खो खो करमणूक झाली.


Moderator_10
Friday, March 21, 2008 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या लेखनाकडे लक्ष द्यायला थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. ते लेखन काढुन टाकण्यात आलेले आहे आणि त्या सभासदाला यासंदर्भात warning दिलेली आहे.

Admin
Friday, March 21, 2008 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात दोन भाग आहेत.
१. नवीन सदस्याना कुठे काय लिहावे, आपली धोरणे काय आहेत हे माहिती नसणे.
- या बाबत मदत पुस्तिका तयार करण्याचे काम चालू आहे.
२. हितगुज / गुलमोहरवरच्या साहित्याचा दर्जा
- मायबोली सुरू झाल्यावर काहीच दिवसात हा प्रश्न निर्माण झाला होता आणि नंतरही वेळोवेळी तो निघाला आहे.

एक चांगले दर्जेदार प्रकाशन काढायचे का दर्जाकडे लक्ष न देता जास्त लोकाना मराठीत लिहिते करायचे.

तेंव्हापासून जाणीवपूर्वक आपण असे धोरण स्वीकारले आहे की लोकांनी मराठीत लिहायला लागणे हे आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहे. आणि त्या साठी दर्जाकडे दुर्लक्ष केले गेले तरी चालेल. त्यामुळेच दिवाळी अंक सोडून आपण मुद्दाम कुठल्याही संपादकीय संस्करणाशिवाय लेखन प्रसिद्ध करतो.

हा मुद्दा वेगवेगळ्या स्वरूपात येत रहातो. आणि त्याबाबतची आतापर्यंतची धोरणे याच्याशी सुसंगत आहेत.

* देवनागरीत लिहीण्याची सक्ती करावी का
मराठी माणसाने एकत्र येऊन संवाद करणे (मग तो रोमन मधे का असेना) हे जास्त महत्वाचे आहे. एकदा त्याला आपल्यात सवय झाली कि हळुहळु इतरांचा आग्रह बघून देवनागरी लिहायला लागेल.

* शुध्द्लेखन तपासण्याची सक्ती करावी का?
शुध्द्लेखन हे तांत्रिक दृष्ट्या आपोआप असावे. ते जोपर्यंत मायबोलीवर उपलब्ध नाही तो पर्यंत तसे करणे योग्य नाही. माझे मराठी खराब आहे किंवा मला मराठीत शुध्द लिहिता येत नाही ही अडचण किंवा त्याचा दबाव कुणाला वाटू नये हा त्यामागचा विचार आहे.

*नुसता टाईमपास (हा हि हु हु) करणारे इतके BB आहेत. ते बंद का करत नाहीत. मायबोलीच्या तुटपुंज्या साधनसामुग्रीचा तो अपव्यय नाही का?
मराठी माणसाने टाईमपाससाठी का होईना एकत्र येणे हे आपल्याला जास्त महत्वाचे आहे. कुठल्या BB ला किती महत्व द्यायचे हे वाचकांनी ठरवायचे आहे.

* कुठल्याही फालतू कवितेला / कथेला कंपूगिरी करून "छान छान" म्हटले जाते. (मी तुझी पाठ खाजवणार तू माझी खाजव) याला आळा घालता येईल का
जर या खोट्या स्तुतीमुळे का होईना, पण एका नव्या लेखक / लेखिकेचा उत्साह वाढून जास्त लेखन होणार असेल तर ते चांगलेच आणि आपल्या धोरणाशी सुसंगत आहेत. गेल्या ११ वर्षांचा अनुभव आहे की हळुहळु हेच नवोदित लेखकलेखिका इतरांचे पाहून जास्त सकस लिहू लागतात. कुणाला जास्त वेळ लागेल कुणाला कमी लागेल.


कुठल्या लेखनाचा दर्जा काय आहे हे वाचकानी ठरवायचे आहे, मायबोली प्रशासनाने नाही.

Admin
Friday, March 21, 2008 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे झाले तर मायबोलीवरच्या लिखाणाचा दर्जा खालावणार नाही का?

गेल्या काही वर्षांचा अनुभव असा आहे की मायबोलीकर हा दर्जा सुधारण्यासाठी वेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात. आणि कुठ्ल्याही प्रशासकीय / संपादकीय धोरणापेक्षा हा परिणाम जास्त टिकणारा असतो.
- नवीन मायबोलीकरांना देवनागरीत लिहिण्याचा आग्रह करणे. नुसता आग्रह नाही तर ते किती सोपे आहे हे दाखवून देणे.
- मधून मधून शुद्धलेखनाच्या चुका दाखवून देणे
-कसे किहिले तर जास्त चांगले वाटते ते सांगणे.

गेल्या ११ वर्षात लिहिते झालेले आणि आता दर्जेदार लिहिणारे खूप मायबोलीकर आहेत. त्यातल्या काही मायबोलिकरानी तर इंग्रजी भाषेत शिक्षण झाल्यामुळे कधीच मराठीत लिहिले नव्हते. या सगळ्यांच्या सुरुवातीच्या लिखाणाचा दर्जा आठवून पहा.

त्यामुळे लेखनाचा दर्जा सुधारायचा असेल तर एक वाचक म्हणून तुम्हा सगळ्याकडे प्रतिक्रिया नावाचे एक उत्तम साधन आहे. ती देऊन (किंवा न देऊन) तो नक्किच सुधारला जातो हा आपला अनुभव आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators