Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विडंबन

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » विनोदी साहित्य » विडंबन « Previous Next »

Nalini
Tuesday, December 06, 2005 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, प्रसाद, मेघा, पमा, गजानन कोणितरी करा रे सुरवात.

Moodi
Tuesday, December 06, 2005 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकडे कथा अन ललित मधले लोक देशात पळाले वाटत.

Pama
Thursday, December 08, 2005 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ गाण: जिवलगा, राहिले दूर घर माझे.. (मला link कशी टाकायची ते जमल नाहे, कुणीतरी टाका)

गाऊ नका, राहिले रे दूर स्वर साती
कानही थकले, छातीमध्ये कळ येऊन जाती

फार झेलते डोके बाई,
कंठ कशाला दाटून येई
ताल सुरांची सरली माया, रिमिक्सच गाती

नाच पाहुनी श्वासही अडला
काय करू बघवेना मजला
त्या धडक्याने फुटे धराही, मिटले डोळे मी

च्यानल्स ती, त्या स्पर्धाना
कला नसे अन बडा दिखावा
इथे ऐकले खूप जाहले, अल्बम नको माथी


Kandapohe
Thursday, December 08, 2005 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा सहीच ग. ..

ही घे लिंक
जिवलगा

Milya
Friday, December 09, 2005 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा : सहीच ह. ह. पु. वा.

Vaibhav_joshi
Friday, December 09, 2005 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा... मस्त आहे एकदम

Vaibhav_joshi
Friday, December 09, 2005 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूळ गाणं - चंद्र आहे साक्षीला ....

सासू बोले , सून बोले , जीव ऐकून गांजला
सूड आहे चांगला , सूड आहे चांगला!
भांडणाला , रंग आला , ऐन उत्तररात्रीला
सूड आहे चांगला , सूड आहे चांगला!

बोलती , दोघीही , का घश्याला ताणूनी
बापही , देतसे , हाय! पाणी आणूनी
नीज ही डोळ्यावरी अन स्वर टिपेचा लागला
सूड आहे चांगला , सूड आहे चांगला!

मॅच ही , चालली , सारी बिल्डिंग जागली
आई ही , सरसावुनी , बॅट आहे थांबली
हा पुन्हा सूनबाईने छान फ़ुलटॉस टाकिला
स्कोर ईक्वल जाहला , स्कोर ईक्वल जाहला!

सूड आहे चांगला , सूड आहे चांगला!


वैभव!!!


Moodi
Friday, December 09, 2005 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव एकदम छान अन टिप्पिकल रे...

Vijaykulkarni
Friday, December 09, 2005 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विड्म्बन कारानो,
तुमचे एक विड्म्बन सकाळी चहा बरोबर मिळाले कि दिवस खुप छान जातो. आभारी आहे.
(हा सारा मजकुर देवनागरी मधे लिहिताना कश्ट पडले. पण प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे असे स. त. कुडचेडकरानी म्हणलेच आहे. हुश्श


Sarang23
Monday, December 12, 2005 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, पमा क्या बात है. सही चालु आहे.
केतकी काळी निळी पडायच्या आत लिही रे बाबा विजय:-)


Sarang23
Monday, December 19, 2005 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री रा रा मिल्या यांना गुरुस्थानी मानुन हा एक पहिलाच प्रयत्न.
अस म्हणतात मुळ कविता महान असेल तरच त्याच विडंबन करायला विडंबनकार धजावतात. या कवीच आणि कवितेच दोघांचही महत्व निर्विवाद आहे.
मुळ कवितेच्या चालीपासुन मात्रांच्या बंधनापर्यंत सगळ काटेकोरपणे पाळल आहे. चुक असल्यास माफ करा. शेवटच्या कडव्यात अन्त्ययमक मुद्दाम बदलले आहे.
मुळ कविता
रात

दारू

केंव्हा तरी पहाटे, निसटुन तार गेली
फुटले चुकुन पेले, उतरुन पार गेली

बोलू तरी कसे मी, मज काय होत आहे
फसवून श्वास माझा, कळ धारदार गेली

कळले मला न केंव्हा, चुकली उडी जराशी
पडताच पालथा मी, अबरू ही पार गेली

उरले उरात काही, आवाज कावळ्यांचे
गुर्गूर सोबतीला, सतवून फार गेली

स्मरला मला न तेंव्हा माझाच पुर्ण पत्ता
मग बायकोच माझी उघडून दार आली

Shubhashish_h
Monday, December 19, 2005 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सारंग मस्तच.... लय झ्याक झालय विडम्बन

Nilyakulkarni
Monday, December 19, 2005 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग एकदम सही....मुळ कविते प्रमाने हे विडम्बनही ग्रेट आहे....

Paragkan
Monday, December 19, 2005 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hehehe .. good one re! :-)

Sarang23
Monday, December 19, 2005 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PK, Shubha, Nilya thanks! जमल की काय?

Kmayuresh2002
Tuesday, December 20, 2005 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,
येकदम झ्याक जमलय बघ गड्या:-)


Milya
Tuesday, December 20, 2005 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग मस्तच जमलेय रे...

Champak
Tuesday, December 20, 2005 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग.... आपण कधी रिस्क घेत नाही:-) ...


Pama
Tuesday, December 20, 2005 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, सहीच जमलय रे!!

Sarang23
Tuesday, December 20, 2005 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुदेव(मील्या), पमा, चंपक, मयुरेश धन्यवाद. चम्प्या लेका गावाकड ये मग सांगतो तुला रिस्क वैगरे...
नुस्त आपण कधी घेत नाही हे देखिल आजकाल रिस्क घेण्यासारख आहे!


Vaibhav_joshi
Friday, December 23, 2005 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग .... लै खास दोस्ता !!!! क्या बात है !!!

Sarang23
Friday, December 23, 2005 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद रे वैभव.   

Milya
Wednesday, December 28, 2005 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो परत आलाय....

चाल :
आई बघ ना कसा हा दादा

आला, बघा ना कसा हा ' दादा'
मागुन घुसायचा हाच ह्याचा धंदा

आला, बघा ना कसा हा ' दादा'

संघातुन काढायचे झाले निमित्त
बेंगाली बाबूंचे खवळले पित्त
गटबाजीला त्यांच्या ह्या निंदा
मागुन घुसायचा हाच ह्याचा धंदा

आला, बघा ना कसा हा ' दादा'

कधी जग्गूच्या पाया तो पडतो
कधी पवारला जाऊनी पिडतो
पण बॅट वर बाॅल बसायचा वांधा
मागुन घुसायचा हाच ह्याचा धंदा

आला, बघा ना कसा हा ' दादा'

लोकसभेतही वाजतोय डंका
चॅपेल पवारला दिला की दणका
घुमजाव मोरे ने केले की तिनदा
मागुन घुसायचा हाच ह्याचा धंदा

आला, बघा ना कसा हा ' दादा'


Sarang23
Wednesday, December 28, 2005 - 3:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा जबरी गुरुदेव!!!

Kandapohe
Wednesday, December 28, 2005 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे मिल्या!! सहीच

Deepstambh
Wednesday, December 28, 2005 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या

सिंहगड रोड बीबीवर जमलेले हे विडंबन श्री कांदू यांचे सागंणेनुसार इथे देत अहे...


श्री कांदू यांनी दिलेले मुळ काव्य....
फडके!!

ते डोळ्यांचे पहिले मिलन
ते पहिले स्मित, ते संवेदन

शब्दाहुन ते गोड मुकेपण
कसे कळीचे फ़ूल उमलले?

तुला न कळले, मला न कळले
कसे प्रीतिचे धागे जुळले!

आणि

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या लाटा
रानफ़ुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी मला जावु दे रे

तिन्ही लोक आनंदाने भरून गाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सुर लावु दे रे


फडके!!

ते कपड्याचे पहिले धुणे
तो पहिला साबण, ते घासणं

एकाच धुलाईत संपले मऊपण
कसे कपड्याचे फडके झाले?

तु धुतले, मीही धुतले
कसे फडक्याचे धागे उसवले!

आणि..

आज सोनिया गांधी लोहगाव विमानतळावर उतरुन येरवड्यावरुन गेली... तेव्हा.. रस्त्यावर दुतर्फा असलेल्या गर्दीवर..

शुभ्र टोप्या माळुन आल्या कॉंग्रेसी लाटा
बॅनर लेवुन सजल्या या खड्डेरी वाटा
लांगुलचालनासाठी मला जावु दे रे

दोन्ही हात मलईने भरुन खाऊ दे रे
तुला मस्का मारण्यासाठी बटर लावु दे रे


Rajkumar
Wednesday, December 28, 2005 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,दीप्या लय भारीच!!! .. .. ..

Vaibhav_joshi
Wednesday, December 28, 2005 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या ... दीप ... मस्त रे

Badbadi
Wednesday, December 28, 2005 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, दीप :-) missing SG Road fun yaar ....

Kmayuresh2002
Thursday, December 29, 2005 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,दिप्या.. जबरी मित्रांओ जियो मेरे यारो..:-)

Manuswini
Thursday, December 29, 2005 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप्या सही रे हसुन पुरेवाट

Krishnag
Thursday, December 29, 2005 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, खासच!!!
त्या गंगुला धाडायला पहिजे हे!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators