Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
सर्पाख्यान

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » ललित » सर्पाख्यान « Previous Next »

Supermom
Wednesday, February 28, 2007 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई सध्या माझ्याकडे आलेली आहे. तिचे वय बहात्तर वर्षांचे आहे. माझे आजोबा म्हणजे तिचे वडील हे त्या काळात ब्रिटिशांच्या राज्यात जेलचे डॉक्टर होते. त्यांचे वास्तव्य गडचिरोली, अहेरी, राखीकोल अशा भागात असायचे. त्यावेळी हे भाग म्हणजे तशी खेडेगावेच होती.तिथे सापविंचू यांचे प्रमाण भरपूर. शिक्षणाची सोय अशा दुर्गम भागात नसल्याने आई नातेवाईकांकडे राहून शिकली. तसेच नोकरीही तिने बाहेरगावीच केली.सुट्टीत ती गावी जात असे. तिथले व नोकरीच्या गावचे अनेक थरारक अनुभव तिने सांगितले. ते तिच्या व माझ्या शब्दात मांडतेय.

" पुण्याला घरी आलेले पाहुणे नुकतेच कात्रजचे सर्पोद्यान पाहून आले होते. त्यांच्या सर्पविषयक गप्पा सुरु होत्या.त्या गप्पा ऐकता ऐकता माझे मन भूतकाळात शिरले. ५०-५५ वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.

मी त्या वेळी अमरावतीला हायस्कूल शिक्षिका म्हणून कार्यरत होते.माझे मेहुणे विदर्भ महाविद्यालयात प्रोफ़ेसर होते. त्यांचे तेथील क्वार्टर खूप मोठे होते.भोवताली मोठे आवार होते. त्या बंगल्यात माझी मोठी बहीण, मेहुणे,त्यांची दोन लहान मुले व मी असे पाच जणांचे वास्तव्य होते.
मी व दोन्ही भाच्यांची शाळा दूर असल्याने सकाळी आम्हाला रिक्शाने जावे लागे. शनिवारी सकाळच्या शाळेच्या वेळी भल्या पहाटे उठून तिघांनीही तयार होण्यात बरीच घाई होत असे.

त्या काळी बाथरूम्स बर्‍याच दूर असत. अशाच एका शनिवारी मी सकाळीच उठले. बाहेर अंधारच होता. मी अंगण ओलांडून टॉयलेटकडे जात होते. अंधार असल्याने हातात कंदील धरलेला होताच. अर्धे अंतर ओलांडताच पक्ष्यांचा भयसूचक चिवचिवाट कानी आला. मी थोडे थांबून कंदिलाचा उजेड सर्वत्र फ़िरवला. पण काहीच दिसले नाही.तशीच निश्चिंतपणे पुढे गेले. टॉयलेटमधे जाऊन कंदील खाली ठेवला. सहज नजर वर गेली अन माझी दातखीळच बसायची पाळी आली.

छतावरील कडीला मनगटाएवढा जाडजूड, लांबलचक पिवळाजर्द नाग हेलकावे घेत होता. कंदिलाच्या प्रकाशात त्याचा पीतवर्ण अक्षरश
लखलखत होता.

पळावे असे मनात असूनही मी भयचकित होऊन बघतच राहिले. मंत्रमुग्ध होणे याचा खरा अर्थ मला त्या दिवशी उमगला.

मी अशी किती वेळ उभी राहिले असते परमेश्वरालाच माहीत. पण पुढच्याच क्षणी तो नाग धपकन माझ्या समोरच आदळला.त्याच्या फ़ण्यावरचा दहाचा आकडा अगदी स्पष्ट दिसला मला. अन भानावर येऊन जोराने ओरडत मी घराकडे धावू लागले. माझ्या किंकाळ्यांनी बहीण व मेहुणे धावतच बाहेर आले.मी बेभान होऊन काहीतरी ओरडत होते. मला सर्वांनी घट्ट धरून ठेवले.(नंतर मला कळले मी ओरडत होते की 'मुलांना जाउ देऊ नका. मोठ्ठा नाग आहे.')
गडीमाणसे काठ्या घेऊन लगेच जमली. पण तो नाग गवतातून सळसळत अदृश्य झाला होता.

या प्रसंगाचा इतका धसका मी घेतला की महिन्याभराने मुलांच्या वसतीगृहाजवळ नाग युगुल डोलताना दिसले, तेव्हा सर्व जण बघायला गेले. मी मात्र ती हिंमत करू शकले नाही.'

अपूर्ण



Kedarjoshi
Wednesday, February 28, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ मलाही एकदम काही प्रसंगांची आठवन आली. आम्ही तेव्हा शेताच्या बाजुला राहात होतो.

एकदा आईने कनिक भिजवायसाठी परात ओढली (भितींला चिटकून ठेवली होती) त्या पाठी मागे भला मोठा साप होता. माझे काका तिथेच होते त्यांनी पटकन त्याला हातीनीच धरले व फेकून दिले. (काका मिलिटरीत होते). असेच अनेक नाग, मांडुळ व धामन तेव्हा निघाल्या. काहीना सोडुन दिले (धामन), काहींना मारले (नाग). खरे तर ते घर सोडुन जाता आले असते पण आम्ही सर्व एकत्र राहात होतो ती मजा जास्त होती. आईन आम्हा सर्वांना आस्तीक ऋषींचा मंत्र शिकवला होता. ( असा समज, अंधश्रद्धा आहे की आस्तीक ऋषी हे सर्प जातीच गूरु आहेत व त्यांचे नाव सापा समोर घेतले की ते शांत होतात.)


Supermom
Wednesday, February 28, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"यानंतर आणखी एक प्रसंग डोळ्यांपुढे आला. मी तेव्हा मुलींच्या वसतीगृहात रहात होते. सकाळी आंघोळीच्या वेळा ठरलेल्या असत. पाच वाजता मुलींची पहिली तुकडी स्नानाला जाई. सगळी स्नानगृहे एकाला एक लागून असत. पहिल्याच मुलीने दार उघडल्याबरोबर तिला पाणी वाहून जायच्या मोरीत प्रचंड मोठा साप दिसला. खूप आरडाओरड झाली. ते जनावर इतके मोठे होते की रखवालदाराने भाल्याने ते मारले.

माझी आई अहेरीला असतानाही असाच प्रसंग घडला. सकाळी पाच वाजता वडील फ़िरायला जात. त्यांना तोंड धुवायला गरम पाणी द्यावे म्हणून ती उठली. आंघोळीच्या पाटाजवळ तिला काळसर अशी काहीतरी वस्तू दिसली. मोलकरणीची मुलगी लहान होती. ती रिकाम्या मातीच्या पणत्या घेऊन खेळत असे. त्या पणत्या गोळा करून ठेवलेल्या दिसतात असे म्हणत ती ते उचलायला वाकली मात्र, ते वेटोळे हलले.
नोकराने येऊन तो साप मारला.
या सर्वावर कडी करणारा एक चित्त्तथरारक प्रसंग मी आयुष्यात अनुभवलेला आहे.

तेव्हा मी अमरावतीला मधल्या बहिणीकडे रहात असे. आमचे घर डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या मागे होते. सकाळी दहा वाजता मी व माझी बहीण कॉलेजमधे जायला निघालो होतो. तेव्हा बहिणीच्या सासर्‍यांनी बजावून सांगितले की डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या आवारात पिसाळलेला बैल शिरलेला आहे व तो आवरल्या जात नाही.तुम्ही कॉलेजमधून याल तेव्हा बसमधून उतरताना इकडेतिकडे नीट पाहून ताबडतोब घरच्या गेटमधून आत शिरा.

आम्ही चार वाजता घरी आलो.तेव्हा सर्व सामसूम होते.जेवणे, अभ्यास वगैरे उरकून आम्ही सारे आपापल्या खोल्यात निजलो. रात्री बाराच्या सुमारास खोलीच्या दाराशी बहिणीच्या सासूबाईंचे कुजबुजत्या आवाजातले बोलणे ऐकले. त्या सांगत होत्या की बैल आपल्याच आवारात शिरलाय. कोणीही दार उघडू नका. सावध पण शांत रहा. (पिसाळलेला बैल आवाजाने अधिकच बिथरतो.)

आमची पाचावर धारण बसली.त्या काळी सर्व घरे सिमेंटची नसत. भिंती मातीच्या असल्याने इतक्या पक्क्याही नसत. त्या घराची रचनाच अशी होती की प्रत्येक खोलीचे दार बाहेरच उघडत असे.

माझ्या खोलीत मी, माझी मधली बहीण व तिचा दोन वर्षांचा मुलगा असे तिघेच होतो. बहिणीच्या पतींचे काही काळापूर्वीच निधन झालेले. त्यामुळे त्या मुलावर सर्वांचा विशेष जीव. बहिणीचे वृद्ध सासूसासरे दुसर्‍या खोलीत.

आमच्या खोलीला लागूनच एक बोरीचे झाड होते. बैलाने त्या झाडाला व आमच्या खोलीच्या भिंतीला धडका देणे सुरू केले. तो आळीपाळीने भिंत व झाडाशी टक्कर घेत होता.त्याच्या धडका अतिशय जबरदस्त होत्या. भिंत पडायची आम्हाला अत्यंत भीती वाटू लागली. आजुबाजूचे लोकही खिडकीतून बघत होते. पण सारेच विलक्षण घाबरलेले. सकाळी चार पर्यंत हा प्रकार सुरु होता. अन आम्ही दोघी बाळाला घट्ट मिठीत घेऊन धडधडत्या ह्रदयाने बसलो होतो.

पहाटे पहाटे केव्हा तरी धडका हळूहळू कमी होत पूर्ण थांबल्या. बसल्याजागीच आम्हा तिघांना डुलकी लागली. नंतर दारावर जोराने थापा वाजल्या. बहिणीच्या सासूबाई बैल मरून पडल्याचे सांगत होत्या. आम्ही मागच्या अंगणात धावलो. पाहतो तर काय, बैल व त्याच्या शेजारी मोठ्ठा नाग मरून पडला होता. हा काय प्रकार आहे ते कळेनाच.

मग बहिणीचे सासरे व इतर लोकांनी डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट सांगितली.
बोरीच्या झाडामागे कडब्याचा ढिगारा होता. बैलाच्या धडकांनंतर त्यातून एक भलाथोरला नाग सळसळत बाहेर आला व त्याने त्या बैलाला दंश केला. बैलाने त्याला पायाखाली तुडवून मारले.या जीवघेण्या झुंजीत दोघेही ठार झाले. खरेतर तो बैलही अतिशय धिप्पाड व मजबूत होता. पण नियतीचा योगायोग किती विचित्र असतो याचेच हे उदाहरण होते."



Sas
Wednesday, February 28, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Supermom वाचता वाचता मनात धस्स झाल. लहानपणी लाईट गेली की आमच्या बिल्डिंगची सारी मुल-मुली एकत्र येत व गप्पामारत मग हळुच आमच्यातल कोणितरी वयाने मोठ अशेच प्रसंग सागायला सुरु करायच; जिव मुठित घेवुन आम्ही एकायचो तोच अनुभव झाला वाचतांना.

Zakasrao
Wednesday, February 28, 2007 - 10:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुपरमॉम! लहानपणीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. आम्ही रहायचो तो भाग असाच निसर्गरम्य होता. सिमेंटच्या जंगलाच वातावरण नव्हत. त्यावेळी मी सुधा अनेक असेच साप याची देही याची डोळी पाहीलेत. कित्येक वेळा ते घरी आले होते तर कधी खेळताना पाहिलेले तर कधी गावी शेतात गुरे चारताना. मला तर अजुनही फ़क्त साप व कुत्रा यांची भीती वाटते. मी सातवीत असताना विज्ञानच्या पुस्तकात नाग, घोणस,पट्टेरि मण्यार आणखी एक असे चार विषारी साप जे भारतात आढळतात त्यांचे फोटो होते. त्यातील नागाच चित्र पाहुनदेखील भीति वाटायची.

Maku
Wednesday, February 28, 2007 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे मला पण सापाची फ़ार भिती वाटते मला जर कळाले की साप आहे तर मी मरुनच जाईल.

Maku
Wednesday, February 28, 2007 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या भितीने मरुन जाईल.

Bsk
Wednesday, February 28, 2007 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैलाचा प्रसंग वाचून काटा आला!!

Psg
Thursday, March 01, 2007 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच सुपरमॉम, साप म्हणजे नुसतं नाव काढलच की भिती वाटते. बैलाचा प्रसंग फ़ारच विचित्र!

एक विचारू, तुझं नाव काय आहे? :-)


Princess
Thursday, March 01, 2007 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, काय एक एक प्रसंग आहेत. बैलाचा प्रसंग तर सगळ्यात भयानक वाटला मला.

Rupali_rahul
Thursday, March 01, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम तुझे वरचे सगळे प्रसंग वाचुन जाम भिति वाटलि. पण तुला आलेला सापाचा अनुभव काहिसा माझ्या अनुभवाशी मिळता जुळाता आहे. आम्ही गावाला मे महिन्याच्या सुट्टीत गेलेलो. ८-९ वर्षापुर्वी आमच पुर्ण तावडे कुटुंब गावाला गेलो होतो कारण घरी नवीन घर बांधल म्हणुन वास्तुशांती आणि पुजा होती. पुजा वैगरे सगळ होवुन २ दिवस झाले होते आणि दुप्Zरी ४.३० च्या वेळेला मी मागच्या दारी चहाची भांडी घासत होते. मस्त थट्टा मस्करि चालली होती तेवढ्या मोठ्या काकांच्या मुलाने चहाचा कप आणुन दिला. त्याच्या मस्करीला मी काही उत्तर देत नाही म्हणुन तो परत बोलु लागला मी त्याल ईशार्‍यानेच गप्प रहायची खुण केली तर तो अजुन चिडवायला लागल शेवटी मी खालच्या पायरीवरुन जात असलेला मोठा साप दाखवला तेव्हा भितीने अजुन जोरात ओरडत तो घरात सगाळ्यांना सांगायल गेला आणि मी मात्र तिथेच तो तिकडुन दुर जाईपर्यंत त्याला बघत बसुन राहिलि होती. तुझ्यासारखच मंत्रमुग्ध होण्याचा अनुभव मी घेतला होता. ईकडे सगाळे घरातले धावत माझ्याजवळ आले आणि विचारु लागले कुठे गेला, कसा होता, तुला काही केल तर नाही ना??? आजीने तर लगेच घाबरुन मला जवळ घेतल माझ्या हातुन देवाला नारळ ठेवुन गाराणा घातला वैगरे... पण खरच खुप मोट्ठ जनावर होत ते आणि खुप छानही होत... पहिल्यांदाच इतक्या जवळुन मुक्तसंचार करत असलेला साप पाहिला मी...

Supermom
Thursday, March 01, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या प्रिय सख्यांनो,

तुम्ही वरचे अनुभव नीट वाचले नाहीत ग.

हे अनुभव माझे नसून माझ्या आईच्या तरुणपणातले आहेत


Jayavi
Thursday, March 01, 2007 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, सगळेच अनुभव भयानक आहेत गं!
आपण आपल्या लहानपणी इतके असे प्राणी बघितले आहेत ना.....पण आपल्या मुलांना मात्र काहीच बघायला मिळत नाही..त्यासाठी त्यांना झू मधेच जावं लागतं. माझा छोटा मुलगा कळायला लागल्यावर जेव्हा भारतात गेला ना.......तेव्हा पावसाळा होता. तेव्हा गांडुळं, पाली, झुरळं, माशा, कोळी ह्या सगळ्यांना बघून तो इतका excite झाला होता ना...! शिवाय दारासमोर गायी, म्हशी, बकर्‍या, गाढवं..... ह्या सगळ्या प्राण्यांना बघून तो माझ्या सासर्‍यांना म्हणाला," आबा, तुमच्याकडे कित्ती animals आहेत हो.... आमच्या घरी तर एक पण नाही :-(" :-)


Chinnu
Thursday, March 01, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... ... बापरे! पळा पळा!! :-)

Abcd
Thursday, March 01, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच अनुभव सुपर आई,

काही माझे अनुभव
आमच घर पुण्यात तळजाइच्या पायथ्याशी आहे.पुर्वी पसुन आमच्याकडे खूप साप येतत डोन्गरावरुन.मी लहान असतना बाहेर वाळुच्या ढिगात खेळत होते.माझ लक्ष भोगदा निट होतो कि नाहि तिकडे होत. आई जेव्हा बाहेर आली तेव्हा माझ्या खूप जवळ काळा कोब्रा उभा होता.१० अकड्याचा फणा काढुन. आई खूप धिट होती तिनी पटकन काम्बेरु (काम्बेरु साप मारण्यासाठी असतो,त्रिशुळा सारखा दिसतो फ़क्त त्याचे दात जवळ असतात) आणला आणि तिनी त्या सापात रुतवायचा प्रयत्न केला. नेमका तो शेपटी जवळ रुतला.तो नाग एतका खवळला कि अगदी आइच्या हातच्या जवळ काडी सारखा उभा राहिला.माझी तर वाट लागली होती घाबरुन. थान्कफ़ुली माझे अजोबा पटकन काठी घेउन आले आणि त्यानी त्याच्या डोक्यावर मार्ली. आइच्या छातीत अजुन धडधडत आठवुन कारण मी इतकी जवळ होते.
थोड मोठ झाल्यावर बाबान्नी मला साप्पन्च्या विषारी आणि बिनविषारी सापान्नबद्दल सगळी माहिती दिली. त्यामुळे धामण असेल तर तिला मारु नका असा त्यान्चा हेतु होता.मी पण फ़्रेन्ड्स ओफ़ अएनिमल नवच्या ग्रुप बरोबर ट्रेकिन्गला जायचे तेव्हा सापाला कसे पकडायच आम्हाला शिकवल होत.विषारी साप ओळखायला शिकवल.तेव्हा पासुन आम्ही बिनविषारी साप पकडुन कात्रज उद्यनला फोन करत असू.
आसच एकदा आम्च्याकडे केळवण होत नन्डेच. त्यावेळी एक झाडाला खूप छान लाल फ़ुल आली होती. ती कुन्डी घरात ठेवुयात म्हनुन मी बागेत गेले.जुन महिना असल्यामुळे एक दोन पाउस झाले होते.मी कुन्डी बाहेरुन साफ़ केली आणी उचलायला गेले दोन कडाना धरुन.तोच हाताला बुळबूळीत काही लागल. ई गोगल्गाय असेल म्हणुन ती कुन्डी मी तिथेच शेजारी असलेल्या झोपळ्यावर ठेवली.
पान हलवून पाहते ते काय हिरवा जर्द साप होता.त्याच्या खवल्यान्वरुन तो नक्की विषारी होता याची खात्री झाली. हळुच आइला हाक मार्ली आणि काम्बेरु मगितला. आई तो देतच होती तेवढयात तो साप कुन्डीतुन बाहेर येउ लगला आणि माझ्या कुत्र्याच्या घराकडे जाउ लगला.मी पटकन काम्बेरु खुपसला आणि तो सप त्यात अडकला पण माझे दोन्ही हात आता अडकले होते. आई पण काठी शोधत होती.तशीच दोन मिनट उभी होते.त्याच्या डोळ्यात पहिल आणि काय झाल कोणास ठाउक.एकदम पहातच रहिले,तन्द्रि लागल्या सारख. आई बाहेर आली आणि मग त्याला आम्ही मारल.पण ती दोन मिन्ट मला काय झाल ते अजुन कळत नाही. मी त्याला नक्की मारल नसत पण विषारी असल्यामुळे मला माझ्या कुत्र्याची जास्त काळजी होती.त्याचे डोळे मात्र अजुन स्पष्ट अठवतात.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators