Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
गावाकडच्या गोष्टी ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » ललित » गावाकडच्या गोष्टी « Previous Next »

Patilchintaman
Tuesday, February 13, 2007 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावाकडच्या गोष्टी

रामजीच्या पोराचं काय?

रामजीच्या पोराची शाळा त्याच्याच गोठ्यात भरते. पहाटे ज्या गोठ्यात गायी-म्हशींचं शेण गोळा करणं त्याच्या जिवावर येतं त्याच गोठ्यात त्याला दप्तर घेऊन बसावं लागतं. रामजीच्या पोराच्या शाळेत बसायला बेंच नाहीत. त्यामुळे शेण्-मुताचा वास येत असताना सुद्धा पोराना वर्गात बसावं लागतं पावसाळयात तर बर्याचदा गोठ्यात ओल असते. बसायचं कसं प्रश्नचिन्ह पोरांच्या चेहर्यावर असतं. नॉन ग्रैन्टेड शाळेचा मास्तर स्वत्:च्याच अनंत समस्यांशी झगडत असतो त्याला गोठ्यातला शेणामुताचा वास येत नाही. तसच पोरांच्या चेहेर्यावरचं प्रश्नचिन्हही त्याला नाही दिसत.
दोन्-चार हजार वस्तीचं गाव असलं की त्या गावात शिक्शन महर्षी जन्म घेऊ लागलेत. जिल्हापातळीवरचा एखादा पुधारी किंवा अधीकारी पकडून शाळेची नोंदणी केली की भागते. मग गावातल्या लोकांना आपल्या गावात शाळा सुरु होईल, पोरं गावातल्याच शाळेत शिकतील, त्याना शहरात जाऊन अवघड शिक्शन घ्यावं लागणार नाही. वगैरे गोष्टी गावकर्यांना पटवाव्या, म्हणजे गावकरी आपला गोठा शाळेसाठी देतात. ग्राम पंचायतही शाळेसाठी मदत करते.
रात्री ज्या शाळेत गुरं बांधलेली असतात त्या गोठ्यात दिवसा पोरं शिकायला बसतात. ओबड धोबड भिंतीला प्लास्टीकचा काळा फळा लटकवून सर गणितं सोडवितात.
पुढे काही व्र्षांनी चेअरमन शाळेला मान्यता मिळवून आणतो. मग दीड दोन लाख डोनेशन घेऊन षिक्शकांची भरती केली जाते. असं करत करता शाळा आकार घेऊ लागते. पण ग्रैन्ट नसल्याने शिक्श्काना पगार नसतो. ज्याचं अर्ध अयुष्य शिकण्यात जातं त्यांना पुधचे दहा वर्षं अशा शाळेत फुक्कट शिकवावे लागते. बिनपगारे मास्तर " मन लाऊन " शिकवतात. पगार नसूनही चेअरमन्च्या धाकानं गरीब मांजरासारखं रहातात. बिनपगारी मास्तराविषयी गावालाही फार्शी आस्था नसते. खरं तर ते गावासाथी चंगलं काम करीत असतात. पण शेअवटी बिनपगारी मास्तर!!!
अशी अवस्था आहे रामजीचा पोरगा शिकतो त्या शाळेची.

रामजीच्या घरी आता कलर tv आहे. रामजीचा पोरगा नेमाने tv पाहतो. त्यातल्या जगाविषयी त्याला कुतुहल आहे. tv तली शहराची शाळा पाहून त्याला नवलाई वाटते.
(क्रमश:


Princess
Tuesday, February 13, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामण भाउ, खुप छान लिहितात तुम्ही. मी जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातुन आहे(तालुक्याचे गाव आहे पण :-(). त्यामुळे हे सगळे काही वाचताना चित्रच उभे राहते डोळ्यासमोर.
छोट्या गावातल्या लोकाना ज्या समस्याना तोंड द्यावे लागते ते म्हणजे अक्षरश: आणि शब्दश: "जावे त्यांच्या गावा..." असेच असते. तुम्ही लिहलत तर तिथल्या समस्यांचा थोडा तरी अंदाज येइल वाचकाना.
असेच लिहित राहा.


Patilchintaman
Tuesday, February 13, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी शाळा अशी असते असा प्रशही पडला. शहरात्ल्या शाळेत जाणार्या मुलाला गणवेश असतो. पाठीवर बैगेत दप्तर असतं. पाण्यासाठी सुन्दर वॉटरबैग पण असते. पायात मोजे-बुट असतात. उन लागू नये म्हणून डोक्यावर टोपी असते.
आपला मुलगा शाळेत सुखरुप जावा-परत यावा म्हणून 'पप्पा' त्याला मोटारसायकलने नाहीतर कारनी शाळेत नेतात आणि घ्यायलाही जातात. शाळेला कसं मोकळं मैदान असं. हिरवीगार झाडे असतात. मैदानात मुले मनसोक्त खेळतात. मुलाना वर्गात बसायला आरामशीर बेन्च असतात. वर हवेसाठी पंखा अस्तो. समोर छानपैकी फळा असतो. शिकवयला भरपुर पगार घेणारी आणि सुन्दर मैडम असते.
आता शहरातली मुलं फक्त खळूफळ्याचं शिक्शन नाही घेत. तर ते computer शिकतात आणि सहजपणे हाताळतातही.
तर शहरातल्या शाळेत सगळं कसं चकाचक आहे. रामजीचा पोरगा हे सगळं पाहून तोंडात बोट घालतो. अशी नयनरम्य शाळा असू शकते? असा प्रश्न त्याला पडतो. आपली गोठ्यातली बिगर मैदानाची, बिना फळ्याची, बिन computer ची, बिनापगारी मास्तर्ची, चेअरमन्च्या धाकातली शाळा आणी शहरातील चकाचक शाळा यात येवढी तफावत असावी. हा प्रश्नही रामजीच्या पोराला आता सतावू लागला आहे.

तो दहावीत शिकतो मास्तर त्याला पास होण्याची गैर,न्टी देतात. काहीही करुन त्यांना दहावीचा निकाल जास्त लावायचा असतो. तरच शाळेला मान्यता मिळणार असते. तरच मास्तरांचा पगार सुरु होईल. म्हणून तर मास्तर पोरांना कॉप्या पुरवतात. पोरं पास होतात. राम्जीचा पोरगाही पास होणार.

कॉपी करून पास झालेला रमजीचा पोरगा पुढे या जगात टिकेल?


kramasha:

Lopamudraa
Tuesday, February 13, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉपी करून पास झालेला रमजीचा पोरगा पुढे या जगात टिकेल?>>.

mast chintaaman lage raho...

Robeenhood
Tuesday, February 13, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मी म्हणतो स्वताची विषामृत ही कथा अर्धवट पडली असताना माणसाना झोपा तरी कशा येतात कुणास ठाऊक? अन आपलं सदान कदा दुसर्‍याच्या बी बी वर बेल घालीत फिरायचं मेलं!!!


Swaatee_ambole
Tuesday, February 13, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील, तुम्ही नेहेमीच विचारात पाडणारं लिहीता.
आणि ज्या त्रयस्थपणे लिहीता ते आवडतं मला.
कधी कधी वास्तवातल्या गोष्टी, घटना, मुळातच इतक्या ह्रद्य असतात की सांगणार्‍याने त्यात आणखी गळे काढायची गरजच नसते. तश्याच आहेत तुमच्या ह्या गोष्टी.
लिहीत रहा. शुभेच्छा. :-)
ही ' गोष्ट' वाचताना मला ' प्रिय बाईंस'ची आठवण झाली.


Patilchintaman
Wednesday, February 14, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंटरनेटवर चैटिंग करणार्यांच्या पन्गतीत तो बसू शकेल.? व्हिडिओ कॉन्फरसिंग काय प्रकार आहे त्याला कसं समजणार? ई कॉमर्सच्या जगात, ई-मेलच्या या जगात त्याला काय स्थान?
ऊन्हातान्हात राबणार्या रामजीला आपला पोरगा शिकतोय हेच मोठं कौतिक. तो शिकतोय ते त्याला पुरेसे आहे काय? याची जाण रामजीला नाही.

गोठ्यातल्या शाळेची पाहणी करणार्यांची चेअरमनने दिलेल्या बाटल्यांनी आंघोळ केली की त्यांना गोठ्यात त्यांना शेण दिसत नाही. बिनपगारी मास्तरची निस्तेज छबी दिसत नाही. त्यांआ सगळं कसं चकाचक दिसतं.
आता सन्गणकावरच शेताचा उतारा सरकार देऊ लागलं आहे. सरकारचं डोकं मोठं तेज! पण आमच्या रामजीच्या पोराचं काय? तो या घडीला त्याच्या शाळेतलं (गोठ्यातलं) त्याच्याच बैलांचं शेण भरतोय. थोड्या वेळानं याच गोठ्यात त्याची शाळा भरणार आहे. यापुढे जगात सर्वत्र कसं चकाचक राहणार. मात्र आमच्या रामजीच्या पोराचं काय? त्याच्या शाळेचं काय? त्याला शिकविणार्या बिनपगारी मास्तराचं काय?
समाप्त


Srk
Thursday, February 15, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील, हम्म... विचार करायला लावणारे प्रश्न आहेत खरे. पण काहीच नसण्यापेक्षा थोडंतरी शिक्षण रामजीच्या मुलाला मिळेल. निदान लिहुवाचु शकला तरी कुठेतरी ऊपयोग होईल. ज्ञान कधी वाया जात नाही. शहरातसुद्धा कधी शाळा न पाहिलेली मुलं आहेत. मिळालेली संधी कशी वापरली जाते हे महत्वाचं. असो. पुन्हा लिहायला सुरुवात केलीत हे छान केलंत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators