|
Admin
| |
| Monday, January 22, 2007 - 12:29 am: |
| 
|
मी आणि मायबोली जीवनात असंख्य, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाती, नव्याने निर्माण होतात, काही गळुन पडतात तर काही चिरकाल टिकून रहातात. मायबोली या साईटबरोबर जुळलेले माझे भावनिक नातेसंबंध परिस्थितीवश, प्रत्यक्ष रुपात चिरकाळ टिकुन राहील की नाही ते सांगता यायचे नाही पण माझ्या स्मरणात मात्र ही साईट, येथिल व्यक्तिरेखा, येथिल मजकुर, चर्चा, वादविवाद, ललित, स्पर्धा अस बरच काही अखेरपर्यंत लक्षात राहील हे नक्की. "मी आणि मायबोली" मधिल मायबोली सर्वांनाच सुपरिचित आहे पण हा "मी" कोण? शहाण्णव साली प्रथमच संगणक पुर्णवेळ हाती मिळाल्यानंतर अडिचशे एमबी, नंतर झगडून मिळवलेली पाचशे एमबी हार्डडिस्क, आठ एमबी र्~एम पासुन सोळा, बत्तीस, चौसष्ट अशा मारलेल्या उड्या, ड्~ओसच्या अंधारी जगतातुन हळुच कधितरी सत्त्याण्णव साली वेबच्या महाजालात मागिल दाराने झालेला प्रवेश, याहू च्~एट, तेथिल कुणा व्यक्तिरेखेच्या प्रोफाईल मधे असलेला मायबोलीचा उल्लेख वाचुन मायबोलीवर मारलेली चक्कर, पुढे याहूचा कंटाळा आल्यावर मायबोलीचा सभासद होणे अशा अनेकानेक घटना, तसे पहाता जवळपास सारख्याच पद्धतीने पण थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या बाबतीत घडलेल्या असु शकतील. मला तेव्हाही प्रश्न पडायचा, अजुनही पडतो, की केवळ समुहातच नव्हे तर खेड्यातल्या काय किंवा शहरातल्या काय, कुटुंब व्यवस्थेत काय की क्~ओटबेसिस वर रहाणारा काय, दैनंदिन आयुष्यात इतक्या विविध लोकांशी बोलत असतो, व्यवहार करीत असतो, आणि तरीही, संगणकावरील भासमान व्यक्तिरेखांशी (आयडीज) संवाद साधण्या येवढा उत्साह आणि विषय कुठुन मिळत असतील? असा संवाद साधण्यामागे कोणकोणती कारणे असतील? मागिल काही मोजक्या वर्षात, अपरिचित व्यक्तिरेखांशी अंतराचे बंधन न पाळता संवाद साधण्याची संधि उपलब्ध करुन देणार्क्ष्या या साईट्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसुन येते. माझ्यापुरता माझ्यातला "मी" जेव्हा या बाबीचा विचार करतो तेव्हा कुठलाही आडपडदा न ठेवता एक कबुल करावेच लागते की मायबोली सारख्या सुसंस्कृत वातावरण असलेल्या साईटवरील माझा वावर जर केवळ टाईमपास नव्हता, करमणुकी खातर नव्हता, तर मग नक्कीच मी कुणाशी तरी काही तरी बोलु इच्Cइत होतो, काहीतरी सांगु पहात होतो, कदाचित ते असे असेल की माझ्या नित्यसहवासातिल व्यक्तिंशीदेखिल त्यातले काहीच बोलता येत नसेल. कदाचित माझ्या नित्यसहवासात फारशा व्यक्तिच नसतिल किंवा माझे नि त्यांचे संवादाचे विषयच भिन्न असल्याने संवादच होत नसेल. किंवा असे तर नव्हते की मी माझ्यातली अपुरी राहीलेली बौद्धिक भुक भागवुन घेण्याकरीता मायबोलीसारख्या साईटचा आधार घेवु पहात होतो? की उभ्या आयुष्यात एका लग्नाच्या बोहोल्या व्यतिरिक्त कुठलेही व्यासपिठ न मिळाल्यामुळे लोकांसमोर येण्याची अजुन शिल्लक असलेली हौस भागवुन घेत होतो? की संगणक फुक्कट, नेट कनेक्शन पण फुक्कट अन मायबोली साईटदेखिल फुक्कटच! आणि म्हणुन फुक्कट मिळतय तर ओरपा या भावनेतुन तर मी इथे वावरत नव्हतो ना? नाही नाही, तस नसाव, तरीही मी इथे का याची नेमकी कारणमिमांसा मला करता येत नाही. बस्स, ते एक वास्तव आहे की "वाकड्या" नावाची, काटकोन त्रिकोणाच्या कर्णासारखी बर्क्ष्यापैकी तिरकी पण तरीही सरळ व्यक्तिरेखा "मायबोली" साईटची सभासद आहे. बस्स, या उप्पर काही नाही. मायबोलीवरील फार कमी व्यक्तिरेखा मला प्रत्यक्ष ओळखतात, त्यातिल कधिही न बघितलेल्या काही मोजक्या व्यक्तिरेखा तर दूरच्या का होईना, नातेसंबंधातील देखिल आहेत. पण आजवर कधी न भेटलेल्या वेबजालातील काही व्यक्तिरेखा मला याहू पासुन ओळखतात, जेव्हा व्ह्युज आणि क्~ओमेण्स वर लिहिल्या जाणार्क्ष्या मोठ मोठ्या पोस्ट मधिल चर्चा, वादविवाद त्यांनी याहु एटच्या मराठी रुम वरील अनेकानेक पोस्ट मधे अनुभवलेल्या आहेत. तर मग मला असे म्हणता येईल का की वाद विवादाचा कंडु शमविण्यासाठी म्हणुन मला या साईटचा उपयोग झाला? की एका फ्ल्~ओपीत मावणार्क्ष्या वर्डस्टार मधिल मराठी फ्~ओण्टची व देवनागरीत लिहीण्याची खुमखुमी जेव्हा रंगित पडद्यावर वेलणकरांच्या प्~एकेजमुळे सहजसाध्य झाली तेव्हा हात साफ करुन घेतला? बहुधा तसही नसाव! करिअरची सुरुवातच रोजंदारीवर मिळतील ती कामे करीत करिअरचे "उच्च उद्दिष्ट" म्हणुन इंग्रजी टायपिंग शिकण्यापासुन झालेल्या "टायपिस्ट्कडे" मुळात मांडण्या सारखे विचार असतिल याचीच कुणाची अपेक्षा नसताना, त्याला त्याच्या मनातिल विचार, नाही धडाधडा देवनागरीत टाईप करता येत की नाही कागदावर विचारांच्या वेगात लिहुन काढता येत, तेव्हा काहीच न करता आल्याने होणारी मनाची तगमग, ज्या क्षणी देवनागरी, जवळपास विचारांच्या वेगात टाईप करण्याची सुविधा मायबोलीवर प्रथम दिसली तेव्हा स्वर्ग केवळ दोन बोटे शिल्लक असण्या येवढा आनंद झाला. फार पूर्वी कधितरी आपखान्यातील अक्षरांचे मजकुराबरहुकुम खिळे जुळवायचे केलेले काम आणि आता इतक्या सहजसाध्य करता येणारे देवनागरीकरण यात मनातल्या मनात तुलना होणे सहाजिकच होते. मान मोडेस्तोवर अन डोळे दुखेस्तोवर, ट्रेमधला एकेक खिळा वेचित तो लावित जाताना शेवटी शेवटी मजकुर! काय आहे याचेही भान रहात नसे किंवा तो मजकुर काय हे जाणुन घेण्याची इच्Cआ उरलेली नसे. अशा अनुभवातून आलेल्या मला, माहितीच्या महाजालात तोवर उपलब्ध नसलेली देवनागरीत लिहिण्याची सोय बघुन केवढा तरी अत्यानंद झाला आणि तो अजुनही टिकुन आहे हे विशेष. तो आनंद टिकुन रहावा यास जसे देवनागरीकरणाचा कोड लिहिणारे श्री. वेलणकर कारणीभुत आहेत तसेच ही साईट गेली दहा वर्षे सलगपणे, यशस्वीपणे पदरमोड करुन चालविणारे श्री. अजय व त्यांचे सहकारी, हेही कारणीभुत आहेत. पण केवळ देवनागरीत लिहायची, कुणातरी अपरिचित व्यक्तिरेखेशी संवाद साधायची सुविधा येवढ्याच कारणाने मायबोली आवडू लागली का? याहू, एमएसएन वगैरे सारख्या अनेकानेक एटिंगच्या सुविधा व या महाजालातील अक्षरश हजारो लाखो भुलविणार्क्ष्या साईट्स सोडुन मायबोलिवर येत रहाण्यामागे निश्चितच काही भरीव कारणे असावित. माझ्यापुरते सर्वप्रथम आकर्षण म्हणजे देशापासुन दूर गेलेल्या मराठी भाषिकांशी संवाद साधुन त्यांची मनोगते, तेथिल परिस्थिती, त्यांच्या कडील ज्~ज़ानाचे कण काही मिळाले तर वेचावे आणि अशा शैक्षणिक दृष्टीने मला सर्वतोपरी ज्येष्ठ असलेल्यांचे संवाद अभ्यासावेत, कदाचित त्याच्या अनुकरणातुन तरी आपल्यात काही सुधारणा होईल ही आशा! माझ्यात किती सुधारणा झाली की नाही, हे नाही सांगता यायचे पण अनेकानेक नव्या नव्या गोष्टींची उपयुक्त माहिती मिळत गेली हे नक्की. त्याचबरोबर, कौटुंबिक सभासदांव्यतिरिक्त समाजात वावरताना लागणारी संभाषण कौशल्ये, ज्यात संयम अत्यावश्यक, समोरच्या भासमान व्यक्तिरेखेला विषयानुरुप जोखता येणे आवश्यक, सुसंवाद टिकुन रहाण्याकरीता बोलीभाषेवरील सुसंस्कृततेची अत्यावश्यक बंधने, भाषा शैली, भाषेचा बाज अशा अनेकानेक गोष्टी अनुभवता आल्या, समजुन घेता आल्या. आणि तरीही, मूळात अशा पद्धतीने काय किंवा अजुन कशाने काय, संवाद साधण्याची माणसास गरजच का पडते याचे उत्तर शोधताना मात्र जाणवले ते सत्य काही वेगळेच होते. सर्वसाधारण सामान्य माणुस त्याच्या दैनंदिन चौकटीतील आयुष्यक्रमात व्यस्त असतो व रमलेला देखिल असतो. त्यास अगदीच करमणुकीखातर किंवा भावनिक गरज म्हणुन संवाद साधायची इच्Cआ झालीच तर भाजीवालीशी दरावरुन केलेली खिटखिट, किराणावाल्याकडुन सामान आणताना होणारा संवाद, लोकल ट्रेन मधे रंगलेल्या गप्पा किंवा पत्त्याचे अड्डे येवढे पुरेसे असते. आणि पुरेशी असते, स्व^अस्तित्वाचा अहं सुखावणारी विचारणा जी येताजाता कोपर्क्ष्यावरचा पानपट्टीवाला किंवा केशकर्तनालयातील मालक कम कारागिर करतो. या व्यतिरिक्त काही बौद्धिक गरज असेल तर ती भागवायला रोजची वर्तमान पत्रे किंवा टिव्ही च्~एनेल्स पुरेशी असतात. अगदीच खवचटपणे ग्~ओसिपची इcCआ झालीच तर रोजची क्~एंटीन किंवा ट्~ओयलेटमधि! ल फेरी पुरेशी असते. बाकी सहकार्क्ष्यांशी काय? रोजच्याच त्याच त्याच वाढीव कामाबद्दलच्या किंवा न होणार्क्ष्या पगारवाढीच्या चर्चा! त्यातुनही कधि कमीपणाची भावना, न्युनगंड निर्माण झालाच तर त्यावरही हमखास औषधी उपाययोजना म्हणजे कुटुंबव्यवस्थेतला पैसे कमावुन आणणारा महत्वाचा घटक म्हणुन मिळणारा मान ही असतेच! घरात चिल्ली पिल्ली असतिल तर आपली चप्पल त्यांच्या पायास येइस्तोवरची बरीच वर्षे आई किंवा बाप म्हणुन मिळणारा अधिकृत आदर असतोच असतो. मग सगळे असे सुरळीत असताना, पुन्हा वेबजालात मायबोलीसारख्या साईट्स वर का बरे येतो आम्ही? उत्तर एकदम सोप्प आहे. माझ्यासारख्याचा अपवाद सोडला तर इथे येणारे सर्वसामान्य नसतातच मुळी! अनेकानेक विषयातील तज्~ज़, भगिरथ प्रयत्नातुन आत्यंतिक कष्टाद्वारे मिळवलेले उच्च शिक्षण, शिक्षणातुनच आलेली नम्रता, आणि किचकट शिक्षण घेवुनही असंख्य अन्य विषयातील पारंगतता ही येथे येणार्क्ष्यांची वैशिष्ठे आहेत व अशांकरीता मातृभाषेच्या प्रेमापोटी मायबोली ही साईट उपलब्ध करुन दिली त्याबद्दल श्री. अजय हे अभिनंदनास पात्र आहेत. मायबोलिने मला काय दिले याचा विचार करता मला केवळ एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बाह्य जगाकडे बघण्यास विशाल दृष्टी मिळवुन दिली आणि त्याचबरोबर माझा साडेसातीचा असह्य भावनिक कुचंबणा करणारा कालखंड पार पाडण्यास एकापरीने सहाय्यच केले. मायबोली अशीच बहरत फुलत राहो व भविष्यात वेबजाल आणि मराठी साहित्यविश्वाचा इतिहास कोणि लिहिला तर त्यातिल मैलाची खूण ठरो. -जयंत नित्सुरे, पुणे
|
Saee
| |
| Tuesday, February 13, 2007 - 1:05 pm: |
| 
|
चांगला ऊहापोह केलायत, जयंत. यातले बरेचसे प्रश्न बर्याच सभासदांना नित्य पडत असतील, पण त्याची अगदी नेमकी मांडणी मात्र तुम्ही करू शकलात. शेवटचं तुमचं वाक्यही खुप महत्वाचं आहे. आणि तुम्ही वरती म्हटल्याप्रमाणे खरंच आमच्याही कित्येकांचा प्रवास असाच क्रमाक्रमाने झालाय आणि मायबोली हा आता आयुष्याचाच एक अविभाज्य भाग बनुन गेला आहे. मायबोलीकरांच्या जीवनावश्यक वस्तूंची यादी अशी असेल - अन्न, वस्त्र, निवारा आणि मायबोलीही!
|
|
|