|
Admin
| |
| Monday, January 22, 2007 - 12:18 am: |
| 
|
मी आणि मायबोली टीशर्ट्स्: "ए आपण मायबोलीचे टीशर्ट्स तयार करूया?" मृच्या गूगलीनी आम्ही सगळेच काही सेकंद स्तंभित झालो, आणि नंतरच्या काही क्षणात लगेच excite ही झालो "ए मस्त आयडीया, पण करता येईल आपल्याला?" "हो, माझ्या ओळखीची एक printer आहे, ती टीशर्ट्स करून देते.." "मग आजच ही आयडीया टाकूया का मायबोलीवर?" "चालेल, सर्व बीबीवर मेसेज टाकू आणि response पाहू.." या चार वाक्यात मायबोलीच्या टीशर्ट्स चे काम प्रथम सुरु झाले, साल होते २००१. यात आम्हाला मायबोली टीशर्ट प्रिंट करायला मुळात admin ची परवानगी घ्यावी लागेल, ते कदाचित नाही म्हणू शकतील, टीशर्टची किंमत किती येईल, त्याचे डिझाईन कसे असावे, आपल्याला जे डिझाईन पसंत पडेल तेच लोकांना आवडेल का, रंगीत का पांढरा, ते परदेशात आणि भारतातही कसे आणि कोण पोचवेल, त्याच्या खर्चाचे काय हे असले 'गौण' प्रश्न तेव्हा उत्साहाच्या भरात मुळीच पडले नाहीत इतकंच काय, पण हे टीशर्ट्स कोणी विकत घेईल का असा बेसिक प्रश्नही पडला नाही!! मायबोली आपली आहे, त्यामुळे लोकांना त्याच्या हरेक उपक्रमात उत्साह आणि सहभाग असणारच असं साधं गृहीतक होतं! मुळात हा टीशर्ट्सचा किडा मृच्या डोक्यात का वळवळला हे तीच जाणे, पण आम्हीही त्याचे स्वागत कोणताही किंतू न बाळगता केले. का? कारण मायबोलीच्या माध्यमातून भेटलेले आम्ही काही लोक फ़ार चांगले मित्र झालो होतो. दर वीकेंडला भेटायचेच, गप्पा मारायच्या हे ठरलेलं. सगळेच नोकरीला लागलो होतो, ते कॉलेजचं atmosphere परत आणायचा प्रयत्न होता हा कदाचित.. कारणा कारणानी जुने मित्र / मैत्रिणी भेटत नव्हत्या, भेटले तरी गप्पा रंगत नव्हत्या. मायबोलीनी हे जे नवे मित्र दिले होते, ते खूपच जवळचे, जुने पुराणे वाटायला लागले होते. जे प्रत्यक्ष भेटत होते तेही आणि जे फ़क्त मायबोलीच्या website वर भेटत होते तेही. शिक्षण / नोकरीच्या निमित्तानी जगाच्या पाठीवर विखुरलेले लोक आणि त्यांना जोडणारा समान धागा म्हणजे आपली मायबोली मराठी भाषा. मायबोली चटकन आकर्षून घेते कारण इथे साधता येणारा 'मराठीतून संवाद'. तर, आपल्या घरच्या किंवा जवळच्या मित्राकडच्या कार्यक्रमात आपण जसे मनापासून सहभागी होतो, तसेच अनेक मायबोलीकरांनी या टीशर्ट च्या उपक्रमाला प्रतिसाद दिला.. अगदी अनपेक्षित असा.. अनपेक्षित म्हणजे ऑर्डर काही कोणी द्यायला तयार नाही हो, सगळे नुसते प्रश्नं विचारताहेत! आणि प्रश्नं तरी साधेसुधे नाहीत्- US ला पाठवणार का, कोणते साईझ उपलब्ध आहेत, कधी मिळणार, किंमत काय, टीशर्ट कसा दिसतो!! आम्ही तरी काय उत्तर देणार? कारण आम्हालाच याची उत्तरं माहित नव्हती ना!! आम्ही आपले site वर घोषणा करून मोकळे. मात्र इतक्या प्रश्नांच्या फ़ैरी आल्यानंतर काम करणे भाग होते. अशी माघार घ्यायची नाही हे ठरवले आणि कामाला लागलो. सर्वप्रथम admin ची परवानगी घेतली. त्यांनीही ती आनंदानी दिली, आणि सूचनाही दिल्या (सोडतात काय! ). मग प्रश्नं आला डिझाईनचा. तेव्हा फ़क्त 'मायबोली'चा लोगो होता. ही टीशर्टची आयडीया इतकी click झाली की एका अनाम मायबोलीकराने 'हितगुज'चा लोगोही तातडीनी करून दिला. तो सर्वांना आवडलाही आणि सर्वानुमते टीशर्ट्सचे एक डीझाईन final केले गेले. theory संपली आता practical !! आता खर्या गोष्टी सुरु झाल्या. सर्वात आधी आला sample टीशर्ट! तो सगळ्यांच्या पसंतीस उतरला. side by side ऑर्डर्स येत होत्याच. त्यांचे वर्गीकरण, कोणाचे पैसे कोण देणार (त्यावेळी online payment चा ऑप्शन नव्हता, असलाच तर आमची कुवत तो जाणून घ्यायची नव्हती! ), कोण घेऊन जाणार ते टीशर्ट, अशी कामं वाढायला लागली. US मधे जाताजाता टिशर्टांनी UK चाही स्टॉप घेतला. अनेक मित्र, मायबोलीकरांचे मित्र, नातेवाईक अश्या लोकांनी काहीही संबंध आणि गरज नसताना टीशर्टची आवक-जावक पाहिली. खुद्द मायबोली त्यावेळी 'पेटली' होती. तसं मायबोली पेटायला कारण लागत नाहीच, आणि आता तर हा hot topic होता. अनेक चर्चा, वादविवाद, गोंधळ, उत्कंठा या नंतर एकदाचे ते टीशर्ट निश्चित स्थळी जाऊन पोचले. तिथेही आपल्या मायबोलीकरांनी सिंहाचा वाटा उचलला. ते टीशर्ट पूर्णं US भर त्यांनीच पाठवले. काय शिकवलं आम्हाला या अनुभवानी? आयडीयाच्या कल्पना आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात येत असतात, पण त्या पूर्णत्वास नेता येणे, संकल्पना जरी एकाची असली तरी त्याची पूर्ती ही अनेक लोकांच्या मदतीशिवाय होऊ शकली नसती ह्याची जाणीव होणे, मुख्य म्हणजे विरोधी मतांचा स्वीकर करणे, त्याचा योग्य तो मान राखून त्यावर विचारही करणे, अनेक गोंधळ चालू असताना डोकं शांत ठेवणे, उलट त्याचा आनंद घेणे आणि अजून बरच काही. आम्ही कोणीच management students नव्हतो आणि mature ही नव्हतो. मुळात आपण ज्याला हात घातलाय त्याचा आवाका किती मोठा आहे त्याची जाणीवच आम्हाला नव्हती. सर्वच अर्थानी raw म्हणता येईल असे होतो आम्ही. पण आम्हाला मदत, प्रेरणा, उत्साह हे सर्व मिळाले- मायबोलीचे आणि असंख्य मायबोलीकरांचे. पुढे याच टीशर्ट्सचे अनेक लॉट निघाले आणि सर्वदूर पोचले. केवळ या टीशर्ट्स साठी मायबोलीचे सभासद झालेले लोक आम्हाला माहित आहेत! कोणत्या अश्या प्रकारच्या website नी अशी टीशर्ट्सची मोहीम काढली आहे की नाही मला काही कल्पना नाही, पण आपण ही कल्पना लढवली आणि यशस्वीही केली आज पाच वर्ष झाली तरी हा अनुभव अगदी जिवंत, काल-परवा झाल्यासारखा मनात ताजा आहे. आज विचार केला तर का म्हणून आम्ही हा 'उपद्व्याप' केला? मायबोली 'आपली' वाटायची कारणं तरी काय आहेत? याचं कारण म्हणजे ही अनेक कोट्यावधी websites पैकी एक अशी वाटतच नाही, मुळात ही इतकी परकी वाटत नाही, हे एका मोठ्या घरासारख वाटतं. इथे कोण, कुठून लोक येतात! जगाच्या पाठीवरून कोणाशीही अगदी गप्पा मारल्यासारखा संवाद साधता येतो, वाद घालता येतात, आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं सहज सापडतात, (कधी कधी 'नको ते प्रश्नं' अशी वेळही येते, पण तो भाग वेगळा ) आपणही फ़ुकट सल्ले कोणालाही, कधीही देऊ शकतो या टीशर्टच्या माध्यमातून मायबोलीकरांचे चेहरेही ठाऊक झाले आणि खूप छान मित्र, मैत्रिणी मायबोलीनीच मिळवून दिल्या. माझी आणि मिलिंदची (मिल्या) मैत्री या काळातच दृढ झाली. नियतीच्या मनात आम्ही एकत्र यायचं होतच, पण तिनीही माध्यम निवडलं ते मायबोलीचं आणि मायबोलीच्या टीशर्ट्सचं! यामुळेच मायबोलीच स्थान माझ्या मनात फ़ार वेगळं आहे. तिची कायमच भरभराट होत राहो! -पूनम छत्रे, पुणे
|
Meenu
| |
| Monday, January 22, 2007 - 3:32 am: |
| 
|
आपणही फ़ुकट सल्ले कोणालाही, कधीही देऊ शकतो>>> हे म्हणताना चेहरा कसला खुल्लाय अगदी .. चला काम करायची सवयही लागली तर मायबोलीमुळे :P (दिवे नकोच असतील तुला) छान लिहीलस गं पुनम
|
Runi
| |
| Monday, January 22, 2007 - 5:12 pm: |
| 
|
पूनम आहेत का गं टी-शर्ट आमच्या सारख्या निवोदितांसाठी? असतील तर नक्की सांग मला हवाय
|
Lajo
| |
| Monday, January 22, 2007 - 9:59 pm: |
| 
|
हो गं पूनम, असतील Tshirts तर नक्कि कळव...
|
Jhuluuk
| |
| Monday, January 22, 2007 - 11:28 pm: |
| 
|
छान कल्पना होती, टि-शर्टसची! ओहो, २००१ तर फार पुर्वी निघुन गेले, आता पण आहेत का टि-शर्ट उपलब्ध? २००७ मध्ये
|
Himscool
| |
| Monday, January 22, 2007 - 11:57 pm: |
| 
|
मला पण टी - शर्ट हवा आहे पुनम आणि त्यासाठी मी मदत करायला ही तयार आहे...
|
Maazya kade aahe ajun to Maayboli cha T-Shirt... havaay ka konala >? ;)
|
Neelu_n
| |
| Tuesday, January 23, 2007 - 7:55 am: |
| 
|
>>तसं मायबोली पेटायला कारण लागत नाहीच पूनम छान लिहलयस ग.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 23, 2007 - 12:04 pm: |
| 
|
पूनम, मायबोलि शी असलेले नाते, ही अशीच अभिमानाने मिरवायची गोष्ट आहे. मला, गिर्याला ला भरबाजारात, तुम्ही मायबोलि वरचे अमुकतमुक ना, असे प्रश्ण विचारण्यात आले होते.
|
Psg
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:22 am: |
| 
|
आपल्या टीशर्ट्सचा अजून एक महिमा.. काही महिन्यांपुर्वी इथे 'जाहिरात' विभागात एक जाहिरात होती.. एका मुलीनी एका 'मायबोली टिशर्ट' घातलेल्या मुलाला पाहिलं, तिला तो (मुलगा आणि टीशर्ट दोन्ही) आवडले आणि ती त्याला शोधत चक्क या साईटवर आली होती!!! (ते भेटले की नाही ते माहित नाही) आपण गेल्या वर्षीच्या वर्षाविहाराला पुन्हा टीशर्ट्स करून घेतले होते, पण ते पुणे-मुंबई मधे असलेल्या मायबोलीकरांपुरतेच मर्यादित होते. सध्या वेळेअभावी नवीन लॉट काढायचे काही ठरले नाहीये. पुरेश्या लोकांनी उत्साह दाखवला आणि तितक्या ऑर्डर्स आल्या, तर पुन्हा नवीन लॉटही काढू.. आपल्याकडे इथे वेगळा 'मायबोली टीशर्ट्स' बीबी आहे तिथे त्यावेळी माहिती देऊ.. सर्व वाचकांचे धन्यवाद..
|
>>>> काय शिकवलं आम्हाला या अनुभवानी? आयडीयाच्या कल्पना आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात येत असतात, पण त्या पूर्णत्वास नेता येणे, संकल्पना जरी एकाची असली तरी त्याची पूर्ती ही अनेक लोकांच्या मदतीशिवाय होऊ शकली नसती ह्याची जाणीव होणे, मुख्य म्हणजे विरोधी मतांचा स्वीकर करणे, त्याचा योग्य तो मान राखून त्यावर विचारही करणे, अनेक गोंधळ चालू असताना डोकं शांत ठेवणे, उलट त्याचा आनंद घेणे आणि अजून बरच काही. अरे, मी हे पाहिलंच नव्हतं. छान लिहीलंयस पूनम. एकदम अकृत्रिम शैली आहे तुझी.
|
Mankya
| |
| Tuesday, February 06, 2007 - 11:59 am: |
| 
|
पुनम, अगदी समोर बसून सांगतेस असं वाटतय ! आहेत का T Shirts अजुन, असेल तर जरूर सांगा हो ! माणिक !
|
|
|