Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 21, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » झुळूक » Archive through December 21, 2006 « Previous Next »

Sakhi_d
Tuesday, December 19, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान चारोळ्या आहेत........






Yogi050181
Tuesday, December 19, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एकटेपणा मज का आवडे..
"तिच" नसण्यानेच फुरसत मिळे..
स्वत्:ला जेवढे धन्य मानीन ते थोडे,
मग कशाला हवे ते प्रेमाचे जाळे
:-)

Shree_tirthe
Tuesday, December 19, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति, रुप एकदम झकास.

अरे आसवांनो तिच्यावर
दया करा, तिला माफ करा.
कोणीतरी तिचे नाजूक डोळे
मखमली वस्त्राने साफ करा.

श्री


Rupali_rahul
Tuesday, December 19, 2006 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाचे जाळे पांघरण्यासही
लागते हिंम्मत
ज्यांना प्रेमाचे वावडे
त्यांना कशी कळेल गंम्मत

रुप

योगी, उत्तर दे रे...
श्री मस्तच.


Bhramar_vihar
Tuesday, December 19, 2006 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम म्हणजे गम्मत
प्रेम करणे गम्मत
प्रेमाला गमवुन सुद्धा
हसत जगणे गम्मत!


Vidyasawant
Wednesday, December 20, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री, लोपा, देव्दत्त, रुपाली मस्तच आहेत.
योगी तुझ काही खर नाही.
भ्रमा तु सुद्धा!!!

कधीतरी बोलेन म्हणत
बोलायचे राहुन गेले
कधीतरी सांगेन म्हणत
सांगायचे राहुन गेले
कधीतरी जाता जाता भेटेन म्हणत
भेटणेही राहुन गेले
मनातले सर्व सांगायचे म्हणत...
ते सांगणेही राहुन गेले.

विद्या.










Rupali_rahul
Wednesday, December 20, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाला गमवुनसुद्धा
हसत रहाणार्‍याला मान आहे
काटेरी मुकुट घालुन
जगण्यातही शान आहे

रुप

भ्रम मस्तच, अजुन येउ देत..
विद्या, धन्स सहीच आहे ही झुळुक...


Jo_s
Wednesday, December 20, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम बीम सगळ खोटं
खोटीच ती बरसात
स्वत्:पुरतं जगणारे सुखी
बाकी सारे त्रासात


R_joshi
Wednesday, December 20, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप,विद्या,श्री छान :-)
भ्रमा बरेच दिवसांनी. झुळुक अप्रतिम :-)
योगी जरा सुधर. हि चारोळी तुझ्यासाठी

प्रेमाचे जाळे कशाला म्हणताना
तो स्वत:च प्रेमात पडला
प्रेयसिच्या शॉपिंगचा खर्च परवडेना
म्हणुन बहुतेक हात आखडता घेतला

प्रिति:-)


Shree_tirthe
Wednesday, December 20, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति चारोळी छान आहे.
श्री


R_joshi
Wednesday, December 20, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नाहि म्हणत
माझ्यावर प्रेम कर
ते कधी जमेल तुला
अशी आस हि नाही
मलाच श्वासागणिक
तुझा भास होई

प्रिति:-)


R_joshi
Wednesday, December 20, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाच्या तुझ्या मला त्रास होतो
हे मी स्वत:लाच बजावतो
अन एकटेपणाच्या समयी
तुझ्या प्रेमाचा ध्यास घेतो

प्रिति:-)


Shree_tirthe
Wednesday, December 20, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति चारोळ्या मस्त आहेत.

तु जवळ असल्याचे
नेहमी होतात भास
तूला भेटण्याची लागली
ह्या वेड्या मनाला आस.

श्री


Shree_tirthe
Wednesday, December 20, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू कितीही नाही म्हणालीस
तरी, तुझं माझ्यावर प्रेम आहे.
जशी नदी समुद्राला
भेटण्यासाठी आतुर आहे.

श्री


Ganesh_kulkarni
Wednesday, December 20, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

application/pdf" Ek Magane "
MAGANE.pdf (25.7 k)


Yogi050181
Thursday, December 21, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप, विद्या, भ्रमर.. :-)
प्रिती.. नही सुधरेगा.. :-)
श्री.. छान

प्रेमात पडायचे म्हणजे
स्वत्:ला बांधुन घ्यायचे..
एकमेकांच्या आठवणींनी तळमळायचे..
एकमेकांचे रुसवेफुगवे पहायचे..
एकमेकांना मनवायचे..
वेळात वेळ काढुन भेटायचे.
दिवसरात्र फोनवर तेच तेच बोलायचे..
इतरांना दाखवायचे, घरतल्यांपासुन लपवायचे..
प्रसंगी खोटे बोलायचे..
मित्रांना विसरायचे..
अरे काय काय म्हणुन करायचे..
कशाला म्हणुन सोसायचे..
त्यापेक्षा प्रेमापासुन दुरच रहायचे..
टेन्शन्फ्री लाइफ मस्तपैकी जगायचे..
:-)





Shree_tirthe
Thursday, December 21, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी मी तुझ्याशी सहमत आहे.

मुलींना प्रियकर फक्त
पैसे खर्च करण्यासाठी हवा असतो
बिचारा प्रियकर त्यांच्या
खोट्या प्रेमात फसत असतो.

श्री


Bhramar_vihar
Thursday, December 21, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ठरवलेलं
प्रेमाच्या जाळ्यात नाही अडाकायचं
आता मात्र वाटतय..
यातून कधीच नाही सुटायचं....






Bhramar_vihar
Thursday, December 21, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय म्हणतोस योगि??
प्रेमाच आलय tension ??
अरे प्रेमात पड एकदा
experience the sensation!


R_joshi
Thursday, December 21, 2006 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमर छान दिलस उतर:-)

जी माणस पैसे पाहुन
प्रेमात पडतात ते प्रेम करीत नाहित
अन मित्रांनो..
खरे प्रेम कधीच पैशांनी
विकत घेता येत नाहि

प्रिति:-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators