Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 19, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » झुळूक » Archive through December 19, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टपोरा थेंब..
थेंबात तुफ़ान
गालावर सुकलय
सार आपल गुमान..
थोड वादळ..
थोडा गोंधळ..
झाला शांत..
उद्वस्त मी, आता
बसलिये निवांत..!!!



Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गड गड ढग वाजु लागले
सरसर आभाळ भरुन आले
झर झर सरी झरु लागल्यात
मी स्तब्धच..
त्या अचानक आलेल्या
पावसाने गोंधळुन उभी..
मग लक्षात येते..
दारात तु आला आहेस..!!!


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप दिवसांनी शब्द रांगले..
नागमोडी वळणे घेत..
हुंदडु लागले..
मीही खळालुन हसले..
खुप दिवसांनी..!!!


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टपोरा थेंब
त्या थेंबामागे
कितीक स्वप्ने.. निजलेली..
मला रात्र रात्र जागवुन सजलेली.!!!


चला मैत्रिणिंनो निघाले भेटु परत कधीतरी..
तुम्ही सगळ्या खुप छान लिहिता लिहित रहा..!!!


Patilchintaman
Friday, December 15, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, गुलमोहरवरील तुमच्या प्रतिभेची मराठी साहित्य जगत दखल घे ईल?

Patilchintaman
Friday, December 15, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तथाकथीत साहित्यिकांना मायबोलीवर काय छापून येतय ते दाखवायला हवं

R_joshi
Saturday, December 16, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा चारोळ्या छानच आहेत:-)

तुझ अचानक निघुन जाण
मला नेहमीच असह्य होत
एकटेपणाच्या रात्री जागवण
एवढच का माझ्या हातात असत

प्रिति:-)


Vidyasawant
Saturday, December 16, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा छानच लिहल आहेस.

प्रिती सुरेखच.




R_joshi
Saturday, December 16, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टपो-या थेंबात
निजलेली स्वप्ने
बरसणा-या डोळ्यांनी
ती पाहत राहणे

बरसणा-या डोळ्यांनी
पाहता पाहता
ती स्वप्ने ही
वाहुन जाणे

प्रिति:-)


Yogi050181
Saturday, December 16, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, प्रिती.. चारोळ्या सुपर्ब आहेत.. :-)

Devdattag
Saturday, December 16, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजवरी आम्हास कोणी
ओळखले ऐसे नव्हे
ओळखले स्वत:स ज्यांनी
ते भेटले ऐसे नव्हे


Devdattag
Saturday, December 16, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणे का फुकटात वेड्या
तू जींदगी हि वेचली
दाखवा त्यांना जरा
ही भीड आम्ही खेचली


Devdattag
Saturday, December 16, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण म्हणतो आज अमुचे
जाणे खाली हाथ आहे
वाहिले त्यांनी मजला ज्या
त्या आसवांची साथ आहे


Devdattag
Saturday, December 16, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होईल प्रतिवर्शी घरी ह्या
हा दिन वेगळा साजरा
अनोळखी येतील म्हणतील
वागण्यास हा होता बरा


Shree_tirthe
Saturday, December 16, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, प्रिति, देवदत्त तुमच्या चारोळ्या मस्तं आहेत.

मज न कळे
काय जाहले
मम आयुष्य
तुझंवर का वाहले?

श्री


Shree_tirthe
Saturday, December 16, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू येशील!!!

माझ्या स्वप्नात तू येतेस
पण बोलत का नाहीस?
सत्यात शोधताना
मग, दिसत का नाहीस?

कुठे शोधू तूला
काहीच कळत नाही
हे वेडं मन तूझ्याशिवाय
कुठेच वळत नाही.

आता अंत नको पाहू सखे
तूझं रूप मला दावं
ह्या बाजीरावाची मस्तानी होऊन
शनिवारवाड्यात मला पावं.

उद्या रविवारचा
दिवस आहे तूझ्याकडे
तूझी वाट पाहीन
मी शनिवारवाड्याकडे

माझी खात्री आहे
तू उद्या शनिवारवाड्यात येशील
अन् माझ्या आसुसलेल्या डोळ्यांना,
तहानलेल्या काळजाला दर्शन देशील!!!!

श्री


R_joshi
Monday, December 18, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा चारोळ्या अप्रतिम
श्री कविता छान आहे कवितेच्या बीबीवर टाका:-)


R_joshi
Monday, December 18, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळख स्वत:ची स्वत:ला
कधी मी करुन दिली नाहि
एकटे जीवन जगताना ही
कधी मी एकटि राहिली नाहि

प्रिति:-)


R_joshi
Tuesday, December 19, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले कोठे सर्वजण झुळुकेवरुन :-(

मी एकटिच होते
अन श्रावण बरसत होता
तुझ्या आठवणि घेऊन जाताना
मला तो रिता करत होता

प्रिति:-)


Rupali_rahul
Tuesday, December 19, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकट्याने जगताना
सगळ सहन कराव लागतं

मनात अनेक दु:ख
चेहर्‍यावर समाधान असाव लागतं

असंख्य यातना सहन करुन
सतत हसरं रहाव लागतं

सगळ्या वादळांन्S न घाबरता
एकट्यानेच तोंड द्याव लागत्सं

सगळ्यांना एकत्र ठेवुन
त्यांच्याबरोबरच रहाव लागतं

सगळ्यांबरोबर मिसळुन देखील
स्वत: एकटच रहाव लागतं....
स्वत: एकटच रहाव लागतं....

रुप





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators