Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 15, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » झुळूक » Archive through December 15, 2006 « Previous Next »

R_joshi
Monday, December 11, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री छान चाललय:-)

मज ना बनायचे राधा
मज ना बनायचे मीरा
प्रेमातुर तुझी भक्त मी
मज बनव तुझी बासरी आता

प्रिति:-)


Phatrya
Monday, December 11, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति छान चाललंय.

राधा आणि मीराशिवाय
मी कसा जगणार?
बासरी कोणासाठी
वाजवणार?

श्री


Phatrya
Monday, December 11, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा तूलाच बनायचे
आहे माझ्यासाठी
मीराही तुलाच बनायचे
आहे माझ्यासाठी
माझ्या बासरीत स्वर तुझेच आहेत
मग हा हट्ट कशासाठी?

श्री


R_joshi
Monday, December 11, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीच राधा,मीच मीरा
मग बासरीचे स्वर भुलवि कोणाला
हट्ट हा मिलनाचा आहे
मिलन ना राधेशी,ना मीरेशी आहे

प्रिति:-)


Phatrya
Tuesday, December 12, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं बासरी फक्त राधा आणि मीरासाठी
वाजवली तर, इतरांचे काय हाल होणार?
मिलन हे एक सत्य आहे
माझ्या गुलालाने तुझी वेनी लाल होणार.

श्री


R_joshi
Tuesday, December 12, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलाल तु उधळलास
एकटिच कशी त्या रंगात रंगेन
नभ तु बरसणारा झालास
एकटिच का मी भिजेन?

प्रिति:-)

श्री आता काहितरी वेगळ येऊ देत ना झुळुकेवर.:-)


Phatrya
Tuesday, December 12, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति खूप वैतागलीस वाटतं? असो.
काहीतरी वेगळं.

प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत
मग, हे विषय वेगळे का नसावेत?
मन समजून घेण्यासाठी
मित्रत्वाचे नाते असावेत.

श्री.


Badbadi
Wednesday, December 13, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चूक नसतानाही
मनविरुद्ध वेगळं व्हावं लागतं
काय करणार???
परिस्थितिसमोर कधी कधी
असं झुकावं लागत!!!


R_joshi
Wednesday, December 13, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री वैतागली नाहि,पण मला वाटल संदर्भ एकाच दिशेने जात आहे.

मानलि तर मैत्री
मानल तर सर्वस्व
मैत्रिचे नाते हे
असच जगावेगळ

प्रिति:-)


R_joshi
Wednesday, December 13, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडि :-)

सुरुवात कोणी करावी
हा प्रश्नच आपल्यात येत नाहि
तुझे आणि माझे विचार
परस्परांहुन काहि वेगळे नाहित

प्रिति:-)


Phatrya
Wednesday, December 13, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे.
आणि हो, चारोळी खूप छान आहे.
बडबडी चारोळी छान आहे.
श्री


Phatrya
Wednesday, December 13, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे अशी काय परिस्थिती होती
कि, तू माझं मन तोडलं?
ती म्हणाली, "घरच्या दहा जणांसाठी
मी एकाला सोडलं.

श्री


Vidyasawant
Friday, December 15, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सर्वांच्या चारोळ्या खुपच छान आहेत. तरीही मझ्याकडुन ही-

स्वप्नात माझ्या येउन जा
मनातील प्रीत फ़ुलवुन जा
माझ्या रात्री जागवुन जा
प्रीतीची फ़ुले वेचुन जा

प्राजक्ताचे सडे उडवित जा
हळुच मनातील गंध उधळीत जा
वार्‍याच्या झुळकेबरोबर
हळुच मनाला स्पर्शुन जा

विद्या


Yogi050181
Friday, December 15, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझीच स्वप्ने पाहुनी,
दिवसही जातोय झोपुनी
!!
मनही थकलेय तुला शोधुनी,
संपव आता ही भटकंती..
सामोरे तु येउनी..


R_joshi
Friday, December 15, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या छानच.
योगी कोणाच्या स्वप्नामध्ये असतोस,जो दिवसहि झोपेत काढतोस:-)

सत्यात कधी बघितले नाहिस
स्वप्नात मात्र नेहमी बघतोस
माझी स्वप्ने बघुन ही
माझाच कसा रे तु शोध घेतोस...??

प्रिति:-)

योगी माझि म्हणजे कोणति गुलाबो कि कोणती :-)


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा तुझा ध्यास घेउनी
दिवस सुरु झाला..
सपंतांना उजेड...
भास जागा झाला.
किती छळणार अजुन..
हा श्वास ओला झाला..!!!


Rupali_rahul
Friday, December 15, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सपंतांना उजेड...
भास जागा झाला.
किती छळणार अजुन..
हा श्वास ओला झाला..!!! एकदम मस्तच…मनाला भिडलं ग लोपा…

Shree_tirthe
Friday, December 15, 2006 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या, प्रिति, योगी, मनिशा, लोपा एकदम मस्तं.

कोण आहेस तू
का छळतेस मला?
माझी राख पाहून
आनंद होईल का तूला?

श्री


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तुझ्या आठवणीनींचे
माझे सुरेख लेणे..
प्रजक्ताचा गंध लेवुन
अबोलीचे उगाच हळवे होणे..!!!


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनही थकलेय तुला शोधुनी,
संपव आता ही भटकंती..>>>>योगी कोणाच्या स्वप्नामध्ये असतोस,जो दिवसहि झोपेत काढ>>>प्रिति त्याला असे म्हणायचय की आता सपु दे हे कंद्यापोह्य्चे कर्यक्रम आनी उडौन टाकु आता बार..!!!
योगी हो की नाही?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators