Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 14, 2006 « Previous Next »

Peshawa
Tuesday, December 12, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा ! नाही रे.. आणि तु शनी विसरलास ...


Sarang23
Tuesday, December 12, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा, गुरू खास! आणि लिंबू... गुरू १० व्या स्थानावर आहे ११ व्या नाही... :-)

जयश्री... क्या बात है भाई?! class !

झाड... भीती! वा!!

स्मी सगळ्याच छान आहेत...!

मृ... पिंपळपान...!!!


Phatrya
Wednesday, December 13, 2006 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिंपळपान

तुझ्या घराच्या अंगणात
पिंपळाचं झाड आहे.
तुझ्याकडे येण्याचा
तो एक बहाणा आहे.

रोज येईन तुझ्याकडे
पिंपळाचं पान घ्यायला.
विसरू नकोस तुझा हात
माझ्या हातात द्यायला.

वहित ठेवलेलं आहे
तू दिलेलं पिंपळाचं पान.
त्याच्या जाळीतून तूझं रूप
खूपच दिसतं छान.

श्री


Vaibhav_joshi
Wednesday, December 13, 2006 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !!! सही कविता आहेत सगळ्याच

Kanchangandha
Wednesday, December 13, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका...

एक दिवस उगवला
आशेचे किरण घेउन
निराशेच्या गर्तेला
क्षणार्धात उजळून
पाहिले सभोवार
दिसले त्या किरणाच्या तेजात
एक दिवा विझलेला
तेल होते त्यात वातही होती
काजळीचा थर थोडा दूर केला
तो वाट पहात होता शलाकेची
त्याच्यातल्या स्फुलिंगाला पेटविण्याची
तो पेटला तेजाने झगमगला
क्षणात सारे झगमगले
सभोवताल तेजाने उजळला
ती शलाकाही हसली खुदकन
आपल्यातल्या सामर्थ्याच्या
जाणिवेने रोम रोमी फुलली
दिव्याची ज्योत पेटती ठेवायला
काळजी घेऊ लागली


Giriraj
Wednesday, December 13, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज हिच्यसाठी वेळ भेटलाय :-)
सवती

विसरलोय तुला असं तुला वाटतंय का?
खरंच तसं नाहीये
पण तुला रोज रोज वेळ देणही
पूर्वीसारखं जमत नाहीये

तसं तुला पूर्ण वेळ देणं
मला जमलेलंच नाही
पण तुझं विस्मरणही
कधी होणार नाही

खरं सांगायचं तर
मला आता 'ती' भेटलिये
कळतंय मला, तुलादेखील
तिच्यासारखीच खोल कळ उठलिये

आता नीटसे आठवत नाहीये
तिची वाट पाहतांना तू आवडलीस
की तुझ्या रुपातूनच मला
तिची वाट भेटली

आता एकदा दोघींची
छान ओळख करून देतो
तिला तू आवडतेसच
तुलाही आवडेलच ती

मला मात्र वाटतेय
तुमचे दोघींचे जमेल छान
आणि नाहीच जमले तर करत बसा,
'मी लहान की तू लहान!'

गिरिराज


Phatrya
Wednesday, December 13, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज मस्तं.
एक तरफ़ घर्-वाली, एक तरफ़ बाहरवाली.

श्री


Sarang23
Wednesday, December 13, 2006 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या... लै खास रे! ती आणि कविता... आहाहा!!

आणि श्री, घराच्या अंगणात पिंपळ काही झेपलं नाही...



Krishnag
Wednesday, December 13, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, बर्‍याच दिवासात तिची आठवण आली!!!
ती पण खुश आणि आम्हीपण!!


Shyamli
Wednesday, December 13, 2006 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उंच माझा झोका ग!

उघडच असतं दार पिंजर्‍याचं
अन पंखही नसतात छाटलेले
येतं पाखरू बाहेर
मस्त झेप घेतं आकाशात
पींजर्‍याभोवती फेरी मारत एक छानशी
आणि येऊन बसत परत
पींजर्‍यातल्याच झोक्यावर,
बाजूलाच बहरलेल्या उंच गुलमोहराकडे बघतं
गुणगुणतं मजेत,
उंच माझा झोका गं.............!

श्यामली


Sarang23
Wednesday, December 13, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! श्यामली.... खासच!    

Meenu
Wednesday, December 13, 2006 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं श्यामले आलीस का ..?

Smi_dod
Thursday, December 14, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली...... सुंदर!!.. .. ..:-)

गिरीराज.... ती आणि कविता...झकास...आवडली!!!!!


Sarang23
Thursday, December 14, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

    नीज

दाही दिशा झाल्या
अंधाराने ओल्या
डोळ्यांत रंगले
स्वप्नांचे बंगले
अंगणात आले
चांदण्यांचे झुले
अंगभर धूर
मनात काहूर
पापण्यांचे गूज
डोळ्यांवर नीज

(जाती: जीवनलहरी)

सारंग


Darshetkarsmita
Thursday, December 14, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"सर्वत्र तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुनि--------"

हे गाण जर कुणाला माहित असेल तर नक्कि पोस्ट करा


Giriraj
Thursday, December 14, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगराव,मस्तच!... .. .. -- -- --

Vaibhav_joshi
Thursday, December 14, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ! गिरी सारंग श्यामली ... सही !!

सारंग ... सध्या कुसुमाग्रज एके कुसुमाग्रज का ? पण छान वेड आहे ते ..

स्मिता ...
ते गाणं

" सर्वस्व तुजला वाहुनी
माझ्या घरी मी पाहुणी " असं आहे .. अं .. सुधीर मोघेच नक्की ...

टाकतो लवकरच ... पण इथे नव्हे .. त्या साठी वेगळी जागा आहे



Kiru
Thursday, December 14, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा.. सारंग!!

गिर्‍या.. झक्कास..
कुठेतरी वाचलं होतं..
'मस्तानी सर्वांच्या'च' मनांत असते
बाजीराव एखाद्याला'च' होता येतं.'

तुला शुभेच्छा..
बाजीराव होण्याकरता.


Krishnag
Thursday, December 14, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरु, तू जसा दुर्लभ तशी प्रतिक्रियाही!!

पण आज ती प्रतिक्रियाही अगदी पेशवाई थाटात!

श्यामली छान!!



Kanchangandha
Thursday, December 14, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधीतरी..........

कधी तरी....
शब्दात मांडावे मनी उमगलेले
शब्दात सांगावे स्पर्शात जाणलेले
कधी तरी...
माळ शब्द फुले अनुरागात उमललेली
निशब्द होउ नको असु दे भाव शब्दांनाही
कधी तरी...
प्रसव सारे काव्य मनीचे साहुनी वेदनांना
ही वेदना सुखाची सुखातिशयाची
अतीव सुखाच्या वेदनेत या शब्दही मौन होती..
कधी तरी.....
उमटु दे सुर त्या सुरेल बासरीतले..
घुमव नाद ते अंतरी घुमलेले
जुळव स्वर ते स्पंदनी उमटलेले
कधीतरी...
...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators