Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 11, 2006 « Previous Next »

Mrudgandha6
Friday, December 08, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


विद्या.. छान

मीनू.. दोन्ही कविता अप्रतिम!!!.. मस्त...
अशा अवेळी त्याने तरी कुठे जायचं???ही कविता आधी कुठे post केली होतीस का?वाचल्यासारखी वाटतेय..

स्वाती.. speechless काय कविता आहे :-)


Smi_dod
Friday, December 08, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेडी!!!

शहाणी झालीये माझी बाबी
आई.. मी अन शहाणी?
होतेच तशी वेडी लहानपणी
वार्‍यासारखी अवखळ आणि भाबडी
लाटेने मोडलेल्या खोप्या साठी रडणारी
ढगांचे वेगवेगळे आकार बघुन टाळ्या पिटणारी
फ़ुलांचे जसेच्या तसे रंग हवेत म्हणुन हट्ट करणारी
भातुकलीच्या खेळात मन हरवुन रमणारी
रडता रडता हसणारी,हसता हसता रडणारी
निरागस,निखळ.......
पण आताशा मी
उगाचच कशासाठी ही रडत नाही
फ़ुलांचे रंग जसेच्या तसे मिळत नाही
हे मला कळलय...
शेवटी भातुकलीचा खेळच असतो
हे मला उमगलय.....
ढगांचे आकार क्षणाक्षणाला बदलतात
हे मी स्विकारलय.....
हट्ट करणं तर मी सोडुनच दिलय
म्हणुन मी शहाणी झालेय
खरं सांगु आई
हे सगळ शहाणपण नाही गं
शहाणपणाची पांघरलेली झुल आहे
अजुनही आतुन मी तशीच आहे
भाबडी,मनस्वी,निरागस
हट्टी आणि....वेडी

स्मि


Kanchangandha
Saturday, December 09, 2006 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



मागणं..........

आज माझ्याकडे कोणी तरी
माझ्याच सुखाचं मागण मागितलं
ईतक निर्व्याज मागणं
हे माझं आणि हे तुझं
ही सीमारेषा पुसुन टाकणारं
एकात्म आणि सुंदर...
सर्वस्व दिल असताना
फ़क़्त माझं सुख मागीतलस...
ओतप्रोत भरलेल्या डोहासारखं
काळीज हललं
डोळ्यावाटे झरझर वहायला लागल.....
नखशिखांत थरथरले
माझ्या सुखात स्वःताचं सुख मानणारं
ते मन बघुन गदगदले...
पुढच्याच क्षणी आहे आपले कोणी जे
फ़क़्त माझा विचार करते
म्हणुन गर्वाने फ़ुलुन गेले
द्यायचच हे मागणं म्हणुन
निश्चयाने उठले..
आता शब्दांच्या वचनाला
कृतीचा अर्थ द्यायचाय
त्या अमुर्त मागण्याला
मुर्त करायचय....




Dineshvs
Saturday, December 09, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांचन काहितरी वेगळं आणि छान.
सारंग, शंकर हुसेन नावाच्या एका सिनेमात, रफ़ीनी गायलेले एक सुंदर गाणे आहे. संगीत जयदेवचे आहे.
कहि एक सुंदर नाजुकसी लडकी
बहुत सुंदर मगर सावलीसी
मेरी याद दिलमे लाती तो होगी

जरा दुर्मिळ आहे, पण अवश्य ऐक. तुझ्या मुरणीने, ते गाणे आठवले.


Vaibhav_joshi
Saturday, December 09, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती ......

जबरदस्त .... खावरचा शेर आठवला

त्यांना कसे कळाले मी ताज बांधल्याचे ?
मी बोललोच नाही मुमताज वारल्याचे


सलाम ( खावरला ! (तुला तर रोजच करतो) )

स्वतःला वेड्यात काढण्याचा हा dilemma खूप मस्त आहे .
गुलज़ार म्हणतो तसं ...

" आपके जाने के बाद हर लम्हा आपके साथ गुज़ारा है "


" जाणे " ह्या शब्दाचा फार सुंदर वापर करून घेतला आहेस आणि किती कमी शब्दांत प्रभावी कविता उतरलीय ... एका शब्दाचा असा वेगवेगळ्या अर्थाने वापर आणखी एका ठिकाणी खूप आवडला होता मला . मीर तकी मीर वाचला आहेस ना ?


गम रहा जब तक की दम में दम रहा
दिल के जाने का निहायत गम रहा


ह्या गज़ल मध्ये अजून एक अप्रतिम शेर आहे

मेरे रोने की हकीकत जिसमें थी
एक मुद्दत तक वो कागज़ नम रहा

असो .

मीनू
सूर्यास्तानंतर ... जास्त आवडली

स्मि ... कविता छान आहे ...



Swaatee_ambole
Saturday, December 09, 2006 - 8:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स. :-)
वैभव, सगळेच संदर्भ खास आहेत!
तुझा व्यासंग बघून थक्क झाले खरंच. :-)


Mrudgandha6
Sunday, December 10, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभवचे संदर्भ खूप छान आहेत,पण त्यावरून मला एक संदर्भ आठवला,..
विरह झाल्यानंतर काय होऊ शकते हे किती सुंदररित्या मांडता येते याचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे हा शेर आहे,जो मला खूप आवडतो..

"अभी अभी जो मै सोचा तो कुछ ना याद आया
अभी अभी तो हम एक दुसरेसे बिछडे थे"

ती गेल्यानंतर जणू आयुष्य थांबलेय त्याचं


Dineshvs
Sunday, December 10, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, या गाण्याबद्दल आभार वैगरे मानुन, उगाचच औपचारिकपणा करत नाही. पण भावना तीच.

Mrudgandha6
Sunday, December 10, 2006 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


केवळ याचसाठी..


या रणरणत्या उन्हात,
रखरखत्या वाळवंटात
मी केव्हाची धावतेय...
चमकत्या पाण्याच्या मागे..
कुठुनसे आवाज येताहेत..
"धावू नकोस,हे मृगजळ आहे"
मृगजळ..
असेल.. मृगजळच असेल..
नसेलही माझी तृष्णा भागवणारे..
पण मला पर्वाच नाही..
ते खरे आहे की नाही याची..
मी धावतेय ते केवळ याच साठी..
की उद्या मी व्याकुळतेने,
कोसळलेच खाली तर,
जिचा आधार घ्यावा..
ती जमिन तरी खरी आहे का?
हेच पहायचेय मला..


Dineshvs
Sunday, December 10, 2006 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृद्गंधा छान आहे. मला तितकेसे कळत नाही, पण जिचा आधार घ्यावा च्या जागी, जिचा आधार वाटतोय, असे असते तर ?

Devdattag
Sunday, December 10, 2006 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, स्वाती, स्मिता, मृदगंधा, कांचनगंधा सुरेख आहेत कविता सगळ्यांच्या..:-)

Vaibhav_joshi
Sunday, December 10, 2006 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मान

क्रेडिट कार्ड डिक्लाईन झाल्यावर येताना
कारमध्ये किती भयाण शांतता होती .....
अचानक पिल्लू म्हणाला
" डॅडी, एखादी कविता ऐकव ना "
तेव्हा .....
तू मान फिरवून बाहेर बघू लागलीस ...
अन मी ताठ मानेने समोर ...


Devdattag
Sunday, December 10, 2006 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है वैभव..:-)
सहिये..:-)


Meenu
Sunday, December 10, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपरीहार्य

ऋतु बदल ..
शिशिर, वसंत
पुन्हा बहर ...
बहराचं कारणही,
अपरीहार्य असावं ..?
तु नसताना बहर ..?
अपराधी मन,
गुन्ह्याचा सल,
वसंतात पानगळ ..


Meenu
Sunday, December 10, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद ..

मृ मी आधी कुठे post नाहीये केलेली ती

archieve throught december 08 मला पुर्ण दिसत नाहीये बाकी लोकांना दिसतय का .. सारंगची मुरणीची post आहे तीथपर्यंतच दिसतय


Kanchangandha
Monday, December 11, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपले नाते...

आपले नाते काय आहे?
ते शब्दात सांगणे अवघड आहे
जे शब्दांच्या पलिकडले आहे
आपले नाते सुरु होते
जिथे नात्यांचा सीमा पुसट होत जातात
माझ्यातला मी अन तुझ्यातला तू
रहातच नाही अस्तीत्वात तिथे
काय संबोधणार त्या नात्याला
जिथे तू, मी ही सर्वनामे येतात तिथे नाते येते
इथेतर तेही संपलेय!!
हा केवळ एक अविष्कार भावनांचा
त्यात काही देणे न घेणे केवळ
एक होउन रहाणे.... विचारांनी मनानी
अपेक्षा काय आहेत एकमेकांविषयी?
ज्या आहेत त्या ज्ञात न मागताही आत्मसात
न देताही दिल्या जातात न मागताही पुर्ण होतात
काय हवे मनाला ह्याहून वेगळे
एका मनाला विचारणे अन दुसर्‍याने सांगणे
मनाचे एकरुप होणे ह्यालाच म्हणणे
काय हवे अजून जर एवढे सारे आहे
जगणे मरणे हे नियतीचे खेळणे आहे
अधिकार मनाचा केवळ मनावरच असतो
मने एकरुप झाली की त्यात नियतीलाही मज्जाव असतो
नात्यांची संबोधनेही तिथे थिटी पडत असतात
केवळ निर्व्याज, निरपेक्ष मनाची बंधने दृढ होतात



Jayavi
Monday, December 11, 2006 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, पुन्हा एकदा कहर रे!
मीनू....... अपरिहार्य........खूप खूप छान गं! गुन्ह्याचा सल...... अपराधी मन.... अगदी अगदी!


Phatrya
Monday, December 11, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या सर्वांच्या कविता छान आहेत.

चिऊ-ताई

बाबा ताईला म्हणाले, "अहो चिऊताई
दार उघडा सकाळ झाली,
कोवळ्या सुर्याची सोनेरी किरणे
अंगणात आली."

ताई म्हणाली,
" सुर्याला सांगा थोड्या वेळानी ये
रोज येण्यापूर्वी माझी परवानगी घे."

बाबा म्हणाले,
"अहो चिऊताई तुमच्या आईने केला आहे
साजुक तूपातला शिरा
आता तुम्हीच सांगा मला
सुर्य येईल का उशिरा?"

ताई म्हणाली, "आई रोज अशीच करते
पहीला घास दादालाच भरते."

" साजुक तूपातला शिरा त्याच्यासाठी
रविवारची झोपपण नाही माझ्यासाठी."

बाबा म्हणाले,
"अहो चिऊताई तुमच्यासाठीपण आईने केला आहे खाऊ
काय केलं असेल ओळखा पाहु?"

ताई म्हणाली,
" थालपीट केलं असणार आईने."
बाबा म्हणाले,
"अगदी बरोबर ओळखलं आमच्या चिऊताईने."

चिऊताई उठली घाईने
कुशीत घेतले आईने.

हळदीची रांगोळी
ताटाखाली आली
वाढदिवसाची आठवण
ताईला झाली.

श्री




Smi_dod
Monday, December 11, 2006 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री.... सुंदर आहे कविता...
वैभव,कन्चन,मृ... नेहमी प्रमाणेच छान..:-)


Sarang23
Monday, December 11, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री... भा. रा. तांब्यांची आठवण करून दिलीत... सुंदर आहे कविता!
वैभव, कांचन, मिनू, मृ छान!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators