Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
उमाळा

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » उमाळा « Previous Next »

Vidyasawant
Friday, December 08, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणीतल्या आठवणींना
उमाळा आला एकदा
सारेच आठवु लागले
जणु आताच घडत आहे

पण सार्‍या आठवणीत
तुझी आठवण ताजी आहे
कितीही विसराविशी वाटली
तरी तीव्रताच तिची जास्त आहे

स्मरण होताच तुझ
शरीर शहारत...
मग फ़क्त तुझच स्मरण होत
सार पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतं
प्रत्येक वेळी वाटत
आता नाही तुला आठवायच...
अस म्हणता म्हणता..
परत तुझ्याच आठवणीत
मन माझ जात
अस का रे घडत...
मन माझ तुझ्याचपाशी का येउन थांबतं!
आणि..
नकळत डोळ्यात पाणी दाटतं
ह्या क्षणी...
तु जवळ हवा हवासा वाटतो
...पण ते शक्य नाही
तुझ्या माझ्यात बरच आहे अंतरही..

माझ्या भावना तुला कळणार नाहीत
जेव्हा समजायच्या होत्या
तेव्हा समजलासच नाहीस...
तुला स्व:तहुन सांगण मला देखिल जमल नाही

तु स्व:तहुन कधी कधी जवळ यायचास
तेव्हा सार सांगायच... मी ठरवायची मनातल्या मनात
पण सांगण्याआधीच दुरही जायचास तु
अचानक न सांगताच
मी मात्र सैरभैर व्हायची
तुझ्यापासुन मग लांब रहायची
मग तुही रागवायचास
माझ्याशी अबोला धरायचास

पण काही दिवसांनी परत तु यायचास
माझी मात्र घालमेल व्हायची
परत त्याच विचारात जायची

.... असाच तु जातानाही आला होतास
मीही कबुल करावयाची ठरविले
पण.... परत तु गेलास
आणि आलास तो जाण्यासाठी
पुन्हा परत न येण्यासाठी
मला न सांगताच..
न बोलताच तु गेलास
जाताना फ़क्त बघत राहीलास

मी मात्र तिथेच राहीले.... एक स्वप्न विसरण्यासाठी!!

विद्या


Rupali_rahul
Friday, December 08, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या, सही जमलीय गं...

Manishalimaye
Thursday, December 14, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओय विद्या!!!!!!! ... ... ... ...

Neelu_n
Friday, December 15, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या छान उतरलीय ग...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators