Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 07, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 07, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Tuesday, December 05, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो

खूप दिवस इकडे फिरकलो नाही .. गडबडीत गझल पोस्ट करून निघून गेलो .. दिलगीर आहे ...

मस्त चाललंय सर्वांचच ... पण आत्ता निघताना ह्या पानावरच्या रेंगाळणार्‍या ओळी म्हणाल तर ...

तुझ्या स्पर्शानं झंकारत असते
माझी देहवीणा
तू मात्र मैफिलीपासून
शेकडो मैल दूर असतोस

एक शेर आठवला

ह्या सतारीची अशी तक्रार आहे
छेडणारा दूर क्षितिजापार आहे

शुभेच्छा


Smi_dod
Wednesday, December 06, 2006 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नझुला!!!

कधी एकदम आकाशी
तर कधी धरेवर
झोका असा चढतो
उंच उंच घेउन जातो
वर वर अजून वर म्हणता
पार आकाशी टेकतो
डोळे मिटता हळुच
धरे वर आणुन सोडतो
प्रत्येक वेळी
धडधड हुरहुर
नविन अनुभुती देउन जाते
लय त्याची भिनते
श्वासात आणि नसा नसात
थांबला तरी मन
झुलते त्याच्या तालात
असते धुंदी मग त्याचीच
विश्व सारे माझे व्यापणारी
कोणीच नसते तिथे
असतो फ़क़्त मी
आणि माझा स्वप्नझुला

स्मि


Vaibhav_joshi
Wednesday, December 06, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे स्मि ...
surprisingly मला तो जीवनाचा paradox वाटत गेला सुरुवातीला ...

असतो फ़क़्त मी
आणि माझा जीवनझुला

असंच आलं वाचताना .. मज्जा आली .. धन्यवाद


Smi_dod
Wednesday, December 06, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव धन्स रे..:-)
हल्ली बिजलास का तु दिसत नाहीस फ़ारसा?..तुझ्या कवितांची वाट बघत असतो आम्ही.....


Mrudgandha6
Wednesday, December 06, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद,सर्वांना :-)

अस्मानी.. मी काल अन्वधानाने तुझी कविता वचलीच नाही.
तुझ्या स्पर्शानं झंकारत असते
माझी देहवीणा
तू मात्र मैफिलीपासून
शेकडो मैल दूर असतोस
.. वा!! खरेच खूप सुरेख आहे.

क्रिश, वा!जगण्याची तर्‍हा मस्तच.

स्मि,विश्व सारे व्यापणारी धुंदी.. स्वप्नझुला मस्तच.


Smi_dod
Wednesday, December 06, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ...धन्स
तुझ्या सगळ्याच कविता लाजबाब असतात.. मेल ला री केला नाहीस..


Asmaani
Wednesday, December 06, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चन्द्रकोर, वैभव आणि मृ, मनापासून धन्यवाद! तुमच्यासारख्यांची दाद मिळाली की खरंच हुरुप येतो.

Asmaani
Wednesday, December 06, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि, स्वप्नझुला खूप आवडली

Smi_dod
Thursday, December 07, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स अस्मानी!!! ... .. :-)

Smi_dod
Thursday, December 07, 2006 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिरशांती!!!

सगळे क्षण पोरके झाले
नेणिवा शुन्य झाल्या
खूप दुर दुर गेल्या
जाणिवांच्या देशात
एक शुन्य पोकळी
व्यापुन राहीलेली व्योमाला
एखादी अस्फ़ुट चाहुल,
थरथर काहीच नाही
नीरव शांतता गच्च दाटलीये
किरण झेपावतोय यायला
पण नकोच..
गोंगाट त्या भावनांचा
कोलाहाल तो विचारांचा
आता हवीये फ़क़्त चिरशांती

स्मि


Princess
Thursday, December 07, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि, सध्या बहरलीयेस एकदम.... छान छान कविता लिहितीय...सगळ्याच छान. मृ, इंद्रधनु मस्तच :-). तसेही तुझ्या सगळ्याच कविता सुरेख असतात.

Kanchangandha
Thursday, December 07, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रातराणी...

गंधभरली रातराणी
बहरली....
सांडली कुपी अत्तराची
सुगंधाच्या त्या वादळात
उघडले दुमडलेले कोपरे
फ़ेर धरला आठवांनी
प्रत्येक बहराचे
मोती ओघळले.. अन विखुरले
आठवले ते धुंद चांदणे
त्यात फ़ुललेल्या
नक्षत्रकळ्या.....
मादक त्या गंधाने
भारली देहवेल
लकेर सुगंधाची
उमटली.....
बहरात त्या विरून गेली


Vaibhav_joshi
Thursday, December 07, 2006 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनर्जन्म ...


बरं केलंस ...
नाहीतरी लोक हसू लागलेच होते
मी पूर्वीसारखा वागत नाही म्हणून
त्यांची चूक नव्हती खरंच ...
तू भेटण्याआधीचा अन नंतरचा मी
ह्यात एका जन्माचा होता फरक ...
आजकाल मी गुलजार वगैरे बडबडायचो
" सलोना सा सजन " ऐकून तर ...
चक्क रात्र रात्र रडायचो .
सांगत फिरायचो जगाला
" दगडाचा माणूस होऊ शकतो "
कळलंच नाही .....
तो तुझा फक्त विरंगुळा असू शकतो
आज तू छिन्नी फेकून निघून गेलीस
अन जाणवलं ...
प्रत्येक दगडातून शिल्प - बिल्प घडत नसतं ....
आज मी जगाला सांगू शकतो
" दो SS स्त्स , पुनर्जन्म वगैरे बिल्कुल बकवास असतं "!!!


Smi_dod
Thursday, December 07, 2006 - 2:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" दगडाचा माणूस होऊ शकतो "
कळलंच नाही .....
तो तुझा फक्त विरंगुळा असू शकतो
आज तू छिन्नी फेकून निघून गेलीस
अन जाणवलं ...
प्रत्येक दगडातून शिल्प - बिल्प घडत नसतं .... >>>
वैभव...!!!!.. ... .. लिहायला शब्द नाहीत...

Badbadi
Thursday, December 07, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, जितका नियमित इथे लिहितोस तितकाच नियमित blog वर का नाही लिहित???????

Psg
Thursday, December 07, 2006 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, कसलं लिहिलस रे.. मस्त!

Sarang23
Thursday, December 07, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो तुझा फक्त विरंगुळा असू शकतो
आज तू छिन्नी फेकून निघून गेलीस
अन जाणवलं ...

वा! छान आहेत या ओळी!


Kmayuresh2002
Thursday, December 07, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा, काय सही लिहीलयस रे..

Krishnag
Thursday, December 07, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सय!!!

ती येते तेंव्हा..
पावसाची सर येते
मनाच्या मृदेला भिजवूनी जाते
ती येते तेंव्हा...
तिरीप उन्हाची मेघातुन येते
गारठल्या तनमना उब देउनिया जाते
ती येते तेंव्हा...
स्वर संवादिनी गाते
गाण्याला जीवनाच्या सूर देउनिया जाते
ती येते तेंव्हा...
हास्य पानोपानी फुलते
शिशिरी शाखांना वसंत देऊनिया जाते
ती येते तेंव्हा...
डोळे बोलके आणते
जाणिवांना अंतरीच्या मुग्ध करुनिया जाते
ती येते तेंव्हा...
शद्ब फुलांचे आणते
गाभार्‍यात हृदयीच्या गंध भरुनिया जाते
ती येते तेंव्हा...
स्पर्श असंख्य आणिते
पापण्यांना नकळत ओलावून जाते


किशोर



Amruta_w
Thursday, December 07, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशा

दरवळ या क्षणांचा
मंद सुगंध
प्रेमाच्या वर्षावात
न्हाऊन बेधुंद

वळव्याच्या सरीत
चातक दंग
स्पर्शाने मनी
वाजला मृदंग

पहाट कोवळी
दवबिंदुत चिंब
नशा तृप्ततेची
झिंगणारी धुंद धुंद





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators