Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृति - चित्रे' » Archive through December 06, 2006 « Previous Next »

Bee
Tuesday, December 05, 2006 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेत असताना शिक्षक मुलामुलींना उभे करुन पुस्तकातील एक एक परिच्छेद वाचायला देत त्यामुळे वर्गात एकमेकांमधे interactive वातावरण निर्माण होत असे. मग तो विषय रसाळ भाषेचा असो वा शुष्क वाटणार्‍या नागरिकशास्त्राचा असो, मुलांकडून वाचन करुन घेणारे शिक्षक आणि त्यांचे तास मला खूप आवडायचे. त्यातून कोण कसे वाचतो, वर्गात कुणाचे किती लक्ष आहे, उच्चार बरोबर आहेत की नाही हे सर्वांना कळत असे. ऐरवी बोलताना जी व्यक्ती अस्खलित बोलायची ती वाचताना अधेमधे सारखी ऊ ऊ करायची. जिथे चुका घडायच्या तिथे शिक्षक अनेक संदर्भ देऊन ते वाक्य समजवून सांगत आणि त्या निमित्ताने अवांतर ज्ञान देखील प्राप्त होत असे.

मला अंगणवाडीचे वर्ग आणि रात्रपाळी चालणार्‍या शाळांबद्दल खूप आपुलकी आहे. अशा ठिकाणी येणार्‍या व्यक्ती आणि तिथे काम करणार्‍या व्यक्ती गरजू असतात खेरीज त्यांना ज्ञान संपादन करण्याची आणि आपले ज्ञान इतरांना देण्याची उत्सुक्ता असते हे मी आत्याच्या मुलीकडून ऐकले होते. ती अंगणवाडीमधे शिकवायची तर तिचा नवरा रात्रपाळीच्या शाळेमधे शिकवायचा तेंव्हा त्यांचे अनुभव मला इतर चारचौघांपेक्षा वेगळे वाटायचे. एकदा नववीमधे शाळेचे एक शिबिर अंध विद्यालयामधे भरले. ते शिबिर अजूनही माझ्या लक्षात आहे. डोळ्यानी अधू असलेली मुले ब्रेलचा वापर करुन साहित्य वाचताना पाहून माझे मन भरून आले होते. मग 'स्पर्श' सारखे चित्रपट बघुन तर तनामनाची व्यथा काहीतरी निराळीच झाली होती.

ह्या वर्षी रखरखीत मे मधे मी भारतात गेलो तेंव्हा सर्वांना सुट्याचसुट्या होत्या. माझ्याकडे स्व. लक्ष्मीबाई टिळकांचे ४ खंड होते. घरात आई आणि आजूबाजूला तिच्या निरक्षर बहिणाबाई होत्या. ह्या सर्वांची दुपारी जी मैफ़ील भरायची की ह्या वेळेतून आपण काहीतरी वेगळे साध्य करायला पाहिजे असे मला वाटायला लागले. बाईन्चे चार खंड, वया - अनुभवाला शोभेल असा श्रोतावर्ग आणि तीन आठवड्यांचे गणित इतके छान जमेल असे वाटले नव्हते.

मी पहिला खंड हातात घेतला त्या आधी लक्ष्मीबाईंबद्दल मला जी काही माहिती होती ती मनात साठवून सर्व मुलांना, जगरहाटीचं जीन जगून आता पुर्णपणे थकलेल्या आज्या पणज्यांना सांगितली. त्यावेळी आम्ही एकून १०-१५ जण होतो. बदाम, बुच, पेरू, कडूनिंब ही झाडे एकमेकांत गुंफ़ून त्यांची अंगणात दाट सावली पडायची. त्या सावलीत बसून दुपारचे हे हलकेफ़ुलके वाचन शेवटी इतके रंगेल असे वाटले नव्हते. शेवटी तिथे एक शाळाच तयार झाल्यासारखे मला भासले. ही किमया वाचनाची होती की लक्ष्मीबाई टिळकांच्या गोष्टीवेल्हाळ आत्मचरित्राची की दोन्हीची माहिती नाही. सर्वात शेवटच्या वाचनाला एकून ३५ वृद्ध स्त्रिया आल्या होत्या आणि वाचून दाखविणार्‍यांमधे २० मुलेमुली होती. रोज ह्या पुस्तकाचे ३ किंवा ४ प्रकरण वाचून होत असतं आणि चारी खंड वाचून पुर्ण होवोत म्हणून आम्ही आणखी एक तास वाढवला. असे करुनही शेवटचे ६ प्रकरण माझ्याकडुन पुर्ण झाले नाही. पण माझ्या सुट्या संपल्यानंतर त्या इच्छुक वाचकांनी आणि श्रोत्यांनी ते प्रकरण पुर्ण केलेत आणि जेंव्हा चारी खंड संपलेत तेंव्हा म्हणे सर्व जण खूप रडलेत. साहजिकच आहे, लक्ष्मीबाई इतक्या थोर व्यक्तींसाठी अश्रू उसणे आणावे लागत नाही.

जेंव्हा मी हा छोटासा उपक्रम हाती घेतला त्यावेळी माझा उद्देश फ़क्त इतकाच होता की भाच्यांना वाचनाची गोडी लावावी, त्यांचे शब्दोच्चार कसे आहेत ते मला कळावे आणि खास म्हणजे माझ्या आईला आणि तिच्यामुळे लाभलेल्या मावश्यांना स्मृती चित्रांची कथा वाचवून दाखवावी जेणेकरुन त्यांचेही दुःख हलके होईल. शेवटी लक्ष्मीबाई टिळक ही त्या तमान स्त्रियांचे प्रतिनिधिक रूप आहे ज्यांनी अनेक हाल अपेष्टा, मान अपमान झेलून शेवटी आपला संसार पुर्ण केलेला आहे. आजकाल असे अनेक प्रकार दिसतात जिथे भांड्याला भांड लागलं की सहचरांच्या वाटा दुभंगतात. आईच्या पिढीतील बर्‍याचशा बायका लक्ष्मीबाईंच्या कुळातल्या वाटतात. म्हणून हे चार खंड मी नेमानी वाचून दाखवण्याचा उपक्रम हाती घेतला.

हे वाचन करताना मला ह्या वृद्ध स्त्रियांकडून त्यांच्याच शैलीत जात्यावरील जुन्या ओव्या, हिंदू संस्कृतीतील वेगवेगळ्या प्रथा, आपली मिथके ह्यांची उत्तम माहिती मिळाली. त्या ओव्या कुठे साहित्यात आढळतील की नाही माहिती नाही पण एकेक ओळ अर्थपुर्ण होती. एका आजीनी मधेच एक हकीकत सांगितली. म्हणाली "अरे माझी एक बहिणा तिच्या मुलाचे लग्न व्हावे म्हणून बिचारी आयुष्यभर तिने तगादा लावला. शेवटी ती गेली अन तिच्या मुलाने लग्न केले". अगदी जिवाला चुटपुट लावणार्‍या हकीकती, भर उन्हाळ्यात भरलेले ते वर्ग, मुलांचा दंगा, चहा शरबताचा सरंजाम सर्वच काही मागे सोडून इथल्या रुक्ष जीवनात प्रवेश करावा लागला. आज अंतर्नाद मधे 'स्व'ची लख्ख जाणिव असणार्‍या लक्ष्मीबाई टिळकांबद्दल पुष्पा भावेंचा एक लेख वाचला तेंव्हा हा अनुभव पुन्हा एकदा ताजा झाला.


Asami
Tuesday, December 05, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासच रे लेका... मस्त एकदम

Asmaani
Tuesday, December 05, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, तुमचा उपक्रमही स्तुत्य होता आणि तुम्ही लिहिलं देखिल छान आहे.

Paragkan
Tuesday, December 05, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya baat hai !!

Ashwini
Tuesday, December 05, 2006 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, छान लिहीलं आहेस. चालू ठेव.

Saee
Tuesday, December 05, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काहीतरी छानच आहे!! अत्यंत कौतुकास्पद. मांडलयसपण अगदी साधेपणाने. जीयो!!

Kalandar77
Tuesday, December 05, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, स्तुत्य उपक्रम!

Sashal
Tuesday, December 05, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे, आवडलं ..

Manuswini
Tuesday, December 05, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
तुझी ही आपल्या लोकांसाठी काहीतरी करायची जाणीव, ओढ हीच स्तुत्य प्रिय आहे.

छान वाटले


Bee
Tuesday, December 05, 2006 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार.

Lampan
Wednesday, December 06, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास !!! भारी काम केलंस

Nalini
Wednesday, December 06, 2006 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी कौतुकास्पद उपक्रम आहे. ह्या पुढेही चालायला हवा.

Anilbhai
Wednesday, December 06, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है.. क्या बात है..

Divya
Wednesday, December 06, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलेस आणि खरच स्तुत्य उपक्रम.

Ldhule
Wednesday, December 06, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, छान वाटल वाचून. keep it up.

Savani
Wednesday, December 06, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, चांगला उपक्रम. असा उपक्रम पुढे पण चालावा ह्यासाठी अनेक शुभेच्छा!

Robeenhood
Wednesday, December 06, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे व्वा बी. हे तुझे नवे रूप खूपच सुखद आहे रे! फारच छान लिहिले आहेस. लगे रहो. तुझ्यात खूपच पोटेन्शियल आहे....

Kedarjoshi
Wednesday, December 06, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है बी. भारतातील मोजक्या वेळेचा एवढा सुंदर उपयोग. लगे रहो.
हुड अनुमोदन.


Maitreyee
Wednesday, December 06, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, छानच आहे कल्पना..

Chinnu
Wednesday, December 06, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... ... स्तुत्य उपक्रम बी!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators