Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
GaavakaDachyaa goShTee

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » GaavakaDachyaa goShTee « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 07, 200620 12-07-06  11:45 am

Ldhule
Thursday, December 07, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोष्ट क्र. 1 सुरेख. गोष्ट क्र. 2 लवकर येवुदेत.

Patilchintaman
Friday, December 08, 2006 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो ह्या कथेचा भावार्थ काढायचा झाल्यास, मी पण विसरता आले तर कुठेही प्रेमाचा झरा झुळुझुळू वाहू लागतो. शेतीतून भरघोस पीक काढायचे झाल्यास मातीत माती व्हावे लागते. भारतातील मुसलमान येथल्या संस्क्रुतीशी एकरुप झाले तर सध्याचे सगळे वाद संपतील. दुसरी कथा लवकरच. नमस्कार.

Patilchintaman
Friday, December 08, 2006 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो रॉबीन हे V&C चे आग्यावेताळ काय भानगळ आहे. जरा सविस्तर सांगाल काय? }

Deemdu
Friday, December 08, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रे चिंतामण सहीच मांडलयस.

Hawa_hawai
Friday, December 08, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान गोष्ट आहे हो चिंतामणपाटील.

Radhadeshpande
Friday, December 08, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान जमलीय गोष्ट! जे सांगायचे होते, समजावयाचे होते ते मनाला जाउन भिडते. लिहित रहा.

Swaatee_ambole
Friday, December 08, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामणराव, छान लिहीलंय तुम्ही.

Avdhut
Friday, December 08, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील छान लिहिलेय. बस हीच आशा की मुसलमानांन मधे अश्या अरमान ची संख्या वाढावी.

Savani
Friday, December 08, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामण, छान आहे गोष्ट.

Bhramar_vihar
Saturday, December 09, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या कोकणातही काही पालख्याना मुसलमानांचा मान आसतो. हे लोक ४ दिवस सेवेकरी असतात!

Patilchintaman
Monday, December 11, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावाकडची गोष्ट २
लगीन
.......तेव्हा ती गोठ्यातच गोवर्या थापीत होती. पाव्हणे आल्याचं कळलं तशी कावरीबावरी होऊन पोरीनं गोवर्या थांबवलं. धुतलेले हात परकराला पुशीत पोरगी घराकडे परतली. लहानी बहीण मोठ्या कौतुकाने तिच्याकडे टक लावून पहात होती. आपल्या ताईच्याबाबतीत काहीतरी नवलाईचं घडतय याचं कुतूहल तिच्या चेहेर्यावर दिसत होतं ताई नि ती, दोघी मागच्या दारानं घरात गेल्या. चुलीत घातलेल्या लाकडामुळे घरभर धूर भरलेला. पोरीची आई चुल्हा फुकीत, डोळे-नाक पुशीत बसलेली. चुलीवर चहाच पातेलं ठेवलेलं. पोरी घरात आल्याबरोबर
(क्रमश:-)(kramash:-)

Laalbhai
Monday, December 11, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटिल,
चांगले लिहिले आहेत.


Patilchintaman
Monday, December 11, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोरी घरात आल्याबरोबर धुरामुळे डबडबलेल्या आईच्या डोळ्यातही आनंदाचे हसू चमकले. चहाच्या पातेल्यात पाणी, चहापावडर टाकता टाकता पोरींची आई मुलीला लुगडं नेसायला सांगते. एवढ्यात शेजारची काकू घरात येवून दाखल होते. पाव्हणे आल्याची वार्ता तिच्या कानावर पोहोचलेलीच असते. ती पोरीला लुगड नेसायला मदत करते. तोवर चहा तयार होतो. रामजी दाराआडून बायकोवर खेकसून चहा झाला का? विचारतो. पोरीला चहा घेऊन पाठव असे सांगून तो पुन्हा पाव्हण्यांकडे वळतो.
गरीब रामजीकडे घरात धड कपबशा नाहीत. म्हणून मग शेजरच्यांकडून पव्हण्यापुरत्या कपबशा येतात. पोरीला नेसायला शेजारच्याच काकूच लुगडं येत. त्या काकूच लुगड तिला सावरत येत नाही. पण रामजी नी त्याची बायको आपल्या पोरीला लुगड्यात पहून हरखून जातात. लुगडं साव्रीत, थरथरत्या हातात कपबशा घेऊन पोरगी पाव्हण्यांसमोर येऊन उभी राहते.
चहापाणी झाल्यावर पाव्हणे पोरीला दोनचार आडवेतिडवे प्रश्न विचारतात. घाबर्गुंडी उडालेली पोरगी हलक्या आवाजात कसेबसे उत्तरे देते. पोरीच्या हातात पाव्हणे दहा-पाच रुपयांची दक्शिणा कोंबतात. पाव्हण्यात एक पोरगही असतो. त्याच मुलासाठी पाव्हणे रामजीची पोरगी पसंत करायला आलेले असतात. पोरचं वय असतं सतरा नि पोरीचं असत तेरा. दहावी नापास, धोरं चारणार्या पोराल रामजीनं आपली सातवी पास, कोवळी, अल्पवईन पोरगी देण्याचं पक्क केलं होतं. गावात आपल्या पोरीच्या वयाच्या पोरींची लग्ने उरकली होती. त्याचा घोर त्यच्या जिवाला लागला होता. आठरा वर्षाच्या आत पोरीचं लग्न म्हणजे गुन्हा, हे माहीत असूनही रामजीनं आपल्या कोवळ्या पोरीला ऊजवायच ठरवलं होत. त्यासाठी त्याला दोन बिघे जमीन विकावं लागलं. आणखी दोन यत्ता शिकाव्यात ही पोरीची ईच्छ. पण ती रामजीन मारून टाकली.
गल्लीतल्या आपल्या मैत्रिंन्मध्ये कडब्याच्या काडीला लाल पिवळ्या चिंध्या बांधून नवरा-नवरीचा खेळ खेळणार्या पोरीच्या अंगावर आज हळद चढत होती. खेळायच्या वयात पोरगी मयबापाला सोडून सासरी जाणार होती. जे चाललय ते तिचा पचनी पडत नव्हत. बावरलेल्या वासरासारखी पोरगी कावरीबावरी होऊन मय नि बापाकडे पहात होती.
ना नवर्या मुलाचं लग्नाच वय होतं ना मुलीचं (क्रमश:-)


Nandini2911
Monday, December 11, 2006 - 8:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ.. डोळ्यात पाणी आलं, आज या शतकात सुद्धा अशा घटना घडतात हे माहित असूनसुद्धा...
पाटिल.. मस्तच लिहिताय तुम्ही...


Ganeshbehere
Tuesday, December 12, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामन नाना, खरच मस्त लिहितात तुम्हि, अगदि डोळ्या समोर चित्र उभं राहत........

Patilchintaman
Friday, December 15, 2006 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल परवापर्यंत वार्याबरोबर वारा होणारी झुल्यावर बसून झुला होणारी, फुलांच्या वेलीवर फुल होऊन सुगन्ध देणारी. या फुलावरून त्या फुलावर फुलपाखरू होऊन बागडणार्या कोवळ्या पोरीला आता संसाराच्या रामरगाड्यात जुपलं जाणार होतं.
सगळे सोपस्कार झाले लग्न लागलं रामजीनं आपल्या कोवळ्या पोरीच्या पदराची गाठ नवर्या मुलाच्या उपरण्याला बांअध्ली. आपल्या पाडसाला आपन शिकार्याच्या हवाली करतोय ह्याची पुसट भावना त्याला शिवून गेली. मान खाली घालून पोरगी आसवे ढाळीत ऊभा होती. घरादारात बागडणारी आपली पोरगी आता आपलं घर सुनं सुनं करुन जाणार हे सत्य रामजीला नि त्याच्या बायकोला असह्य करीत होतं. आजपासून पोरगी आपल्याला परकी होणार म्हणून रामजीच्या डोळ्यातून आसवे ओघळत होती. तरी पोरीचं लगीन ऊरकल्याच समाधान त्या बापाच्या चेहर्यावर दिसत होतं. पण हा बाप हे सपशेल विसरला होता की, आपल्या पोरीला आता कुठे
तेरावं सरून चौदावं लागलं होतं....!


Patilchintaman
Friday, December 15, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समाप्त..........! समाप्त
समाप्त
समाप्त
समाप्त
समाप्त
समाप्त
समाप्त
!!!!!!!!!!!!


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे भो.. आजही हे घडत आणी शहर आणि खेडं even तालुका आणि पुणे मुम्बई यात आजही खुप फ़रक आहे हे मी खुपदा सांगितलय.. पण जे कधी पाहिलेच नाही त्यावर तरी विश्वास कसा बसणार.

Jhuluuk
Friday, December 15, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच, अजुन details पण आवडतिल. गोष्ट क्र. ३ रुपातील पण आवडेल.
छान लिहित आहात. :-)


Srk
Monday, December 18, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील,झ्याक चालल व्हत की. थांबताइसा कशापाइ? अजुन लै गोष्टी हाइत. जत्रा हाय झालच त उत्सव हाय, शेती,जमीनदारी,मरिआय. चला फुडे थांबु नगासा. होउन जाउ देत.

Patilchintaman
Monday, December 18, 2006 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं मंडळी लवकर सुरु करतो.

Radhe
Thursday, December 21, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील साहेब तुमंच लिखानं लई चांगल बघा. वाचता बरूबर माज़्या मनाने गावाकडं धाव घेतली. लईच बेसं हाय माज़ा गाव. पण त्या गावाची मांड्णी करनारा तुमच्या सारखा लेखक नाही हो आमच्याकडे.

Lopamudraa
Thursday, December 21, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधे त्या गावाकडे तु बोलतेय की बोलतोय?? तशी भाषा नाही कोणी बोलत... एव्हढ नक्कि की तुम्ही जळागवचे नाहित.!!!
पाटील पुढची गोष्ट येउ द्या..


Radhe
Saturday, December 23, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा मी मुळ्चा जळगावचाच. चिंतामन पाटीलसाहेंबांसोबत काम करतो. तरुण भारत पेपरमध्ये आहोत.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators