|
मयूर, अप्रतिम लिहतोस... मीनू,उंबरठ्यावर.. वा!! प्रिती.. मस्तच चाललय.
|
दाद,अश्रूंत न विरघळणारा मुखवटा.. वा!! आणि सुधीर..ते मुखवटे कुठे मिळतात हो?
|
Princess
| |
| Friday, December 01, 2006 - 1:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मृत्युशय्येवर पडुन मी तुझेच स्वप्न पाहिले, म्हणुनच मरतानाही माझे डोळे उघडेच राहिले
|
पहाट जागू लागली तुझा गंध आला मला भास उगाच मोगरा दरवळला
|
Devdattag
| |
| Friday, December 01, 2006 - 1:58 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वडाच्या फंदीवर जाईचे पान सुटला वारा शहारलं रान
|
शहारलं रान विखुरलं पान उधळलेला वारा सैरभैर मन
|
Princess
| |
| Friday, December 01, 2006 - 2:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सैरभैर मन, शहारलेले तन, लिहितोय आपण, पण वाचतय कोण?
|
वा! हा प्रश्न कसा पडला बुवा तुम्हाला वाचणारे चिक्कार आहेत.. दाद देणारे खूप आहेत. आवडलं असं म्हणणारे ही खूप असतील.. फ़ार कमी असतात फ़क्त शब्दावर जान कुर्बान करणारे वेडे.. तुझ्या माझ्यासारखे..
|
आपणच लिहू, आपणच वाचू, शब्दांच्या कोंदणातले अर्थाचे पाचू!
|
अर्थ असू दे वेडासा, अन डोळ्यात गुलाबी भाव. तळ्याकाठी मनाच्या उतरू दे शब्दांची नाव!
|
Princess
| |
| Friday, December 01, 2006 - 4:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मृ, शब्दांचे पाचु.. मस्तच ग मयुर, छान लिहिता तुम्ही... नंदिनी धन्यवाद. आज प्रिति नाही आली का... ती नसली तर झुळुकेवर आल्यासारखे वाटतच नाही
|
अग,पुनम शब्दांचे पाचू मी नाही मयुरने लिहलय.. प्रिती नसलि तर झुळूकेत आल्यासारखे वाटत नाही.. हे खरेच ग.. मयूर मस्तच शब्दांचे पाचू.
|
Princess
| |
| Friday, December 01, 2006 - 5:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे... sorry मयुर तुम्हीच लिहिलय शब्दांचे पाचु. मला वाटले मृने लिहिलय. छानय कल्पना.
|
दरीत अलगद ढग उतरले मन पिस बनून अभाळभर फ़िरले
|
Jo_s
| |
| Friday, December 01, 2006 - 6:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लोपा धन्यवाद मृदगंधा, ते मुखवटे आसपास सर्वत्र दिसतील. फक्त आपला मुखवटा उतरवायला हवा.![](/hitguj/clipart/diva2.gif)
|
आभाळातून फ़िरतानाही विसरू नकोस मातीला, एकटेपणातही येईल इथलेच वादळ सोबतीला.
|
Jo_s
| |
| Friday, December 01, 2006 - 6:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वादळाची सोबत म्हणजे असंगाशी संग एकटेपणा बरा होरपळण्यापेक्षा अंग
|
मयुर अगदी सुंदर लिहिलय... मृ, पुनम, सुधीर मस्तच...
|
सुधीर..तुम्ही तर क्षणातच वादळाचा कायमचा निकाल लावलात!!!
|
होरपळण्याच्या भीतीने वादळाशी दुरावा??? असह्य एकटेपणापेक्षा त्याचा संग धरावा रुप
|
|
|