Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 30, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » झुळूक » Archive through November 30, 2006 « Previous Next »

R_joshi
Sunday, November 26, 2006 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो, शलाका फार छान:-)
मिलिंद तु कसलि टेस्ट घेतो आहेस?

तुझ्या डोळ्यात पाहिले
मला मी न दिसले
अश्रुंच्या संतत धारेत
बहुतेक मी ही वाहुन गेले.

प्रिति:-)


Daad
Monday, November 27, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा!!

हो रे....
हसराच होता माझाही!
पण अश्रूंत न विरघळणारा
मुखवटा तुला कुठे मिळाला?
-- शलाका


Daad
Monday, November 27, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या खिडकीतून
पाहिलेत खूप पावसाळे
यावेळी मात्र...
खिडकीच वाहून गेली...
-- शलाका


Jo_s
Monday, November 27, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सगळीच मनं,डोळे
इतके आटलेत म्हणूनतर
अश्रूस्पेशल मुखवटे
आम्ही बनवलेत

घेता का घेता?
पाहीजे तो मिळेल
प्रसंगानुरूप, हवेतेवढेच,
अश्रू तो ढाळेल

हो, हल्ली त्यालाही
पैसे पडतात
फायदा नसेल तर तिथे
अश्रूही अडतात

सगळ्या प्रकारचे अश्रू
आमचेकडे मिळतील
त्याच्या साठी त्यांचे
रिमोटही मिळतील

वैयक्तीक दु:खासाठी
घळाघळा
आसपासच्यांसठी
थोडे कमी ढाळा

सामाजीक प्रश्ण?
फक्त डोळे पाणावतील
लुच्चे असाल तर
मगरीचेही मिळतील

अजूनही आहे
बरीच व्हरायटी
फक्त तुम्ही
मागायची खोटी

बालकांच्या डोळ्यांतून म्हणे
पडतात निर्मळ मोती
अशीही एक डिमांड
पुर्वी आली होती

माफ करा, आमचेकडे
तेवढीच कमी आहे
हां पण खात्री बाळगा
बाकी साऱ्या्ची मात्र हमी आहे
बाकी साऱ्या्ची मात्र हमी आहे


सुधीर





R_joshi
Monday, November 27, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर अश्रुंचे अप्रतिम वर्णन केलेस. फारच छान.:-)
शलाका तु ही छान लिहिलेस.


R_joshi
Monday, November 27, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुखवट्यांचे काय
भावनांन प्रमाणे ते हि बदलता येता
अश्रु जरि कधी प्रामाणिक असले
तरी मुखवट्यांमुळे ते 'नकलि' वाटतात.

एखादा मुखवटा कधी
खरही बोलत असतो
पण सर्वांनाच पटत नाही
मुखवट्यांच्या दुनियेत
हे असेच घडत असते.

प्रामाणिकपणा ही इथे
खोटा ठरत असतो
मुखवट्यामुळे प्रत्येकजण
'नकलि' वाटत असतो.

प्रिति:-)


Rupali_rahul
Monday, November 27, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुखवट्यांमागील सत्य
कोणी जाणिले???
अंतर्मनातील दु:ख
कोणी जाणीले???

रुप...



Daad
Monday, November 27, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर, 'अश्रूस्पेशल मुखवटे ' छानच. कवितेच्या BB मध्ये टाका ना!
प्रिती, रूप मस्त!


Jo_s
Monday, November 27, 2006 - 11:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद प्रिती आणि दाद
सुरुवातीला फक्त पहील्या ४ ओळी लिहीणार होतो. पण मग एकदम लिहीतच सुटलो.

R_joshi
Tuesday, November 28, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी सावली ही
मज न ओळखे
का मानते मी
स्वत:इतके परके मानते


R_joshi
Tuesday, November 28, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अबोल शब्दांचे अर्थ
ओठांनाही उलगडत नाही
धुंद एकांत रात्रित
मनाला आवरल जात नाहि

जवळ तु नाहिस
हे जरी सत्य असल
तुझ्या आठवणिंपासुन
मनाला आवरल जात नाहि

इतकी दुर जाशिल
अस स्वप्नातही वाटल नव्हत
एकटा मी या जगति
मनाला हे पटत नाहि

मन माझे तुझ्याशिवाय
आता राहत नाहि
विलिन तुझ्यात होण्यापासुना
मनाला आवरल जात नाहि

प्रिति:-)


Lopamudraa
Tuesday, November 28, 2006 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैयक्तीक दु:खासाठी
घळाघळा
आसपासच्यांसठी
थोडे कमी ढाळा>>... khup chaan ..
priti tu pan chaan lihileyas...
shalaakaa tar prashnach naahii..


Mayurlankeshwar
Wednesday, November 29, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सापेक्षतेच्या झाकणाखालून ते थुंकतात
माझ्या चेह-यावर मुसळधार..
कारण चेह्-यावर मुखवटे लावून मी
फ़िरत नाही त्यांच्यासारखा नागडा!
---मयूर

Meenu
Wednesday, November 29, 2006 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुनही त्याची वाट पहात ..
ओठंगुन ती, उभी उंबर्‍याशी ..
अजुन, उंबरा ओलांडायचे,
धैर्य कुठे तिच्यापाशी ...?


R_joshi
Wednesday, November 29, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वत: पालवायचे ठरवल्यावर
आत्मविश्वास जागा होणारच
पलवित नव्या पालविसम
तो बहरत जाणारच.

प्रिति:-)


R_joshi
Wednesday, November 29, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकटी उभी उंब-यापाशी
अन वाट हि दुर जाते
अनोळखि ह्या वाटेवरुनी
येईल कधि ओळखिचे नाते...

प्रिति:-)


Mayurlankeshwar
Thursday, November 30, 2006 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

....
अनोळखि ह्या वाटेवरुनी
येईल कधि ओळखिचे नाते...
केवळ अप्रतिम...

Mayurlankeshwar
Thursday, November 30, 2006 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोमात गेलेल्या पापणीखालून
अश्रुंचा जन्म व्हावा...
तसं तुझं जिवंतपण,

आणि जिवंत डोळ्यात
विस्तव भडकावा..
तसं माझं मरण...
-मयूर.

R_joshi
Thursday, November 30, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यातुन विस्तव भडकला
तर तो आगिला जन्म देतो
मरणाच्या वाटेवर असतानाही
माणुस नव जन्माचे स्वप्न पाहतो.

प्रिति:-)


Mayurlankeshwar
Thursday, November 30, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गर्भस्थांच्या स्वप्नामध्ये
माझा जन्म झाला होता,
वास्तवाच्या वाटेवरून
अंत जवळ आला होता.
----मयूर





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators