Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 30, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through November 30, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Tuesday, November 28, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा वा वा.. काय लिहु ग.. किती छान लिहिते आहेस..?
वैभवची कविता त्याला उत्तर केवळ.. अप्रतीम.. !!!
मीनु, स्मिता... निवडु,ब्ग पण आवडली...


R_joshi
Tuesday, November 28, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सर्वजण फार सुंदर कविता करताता. हा माझा पहिला प्रयत्न.... जरा संभाळुन घ्या.

सारथि

रथ आपल्या संसाराचा
सारथि तु होशिल का
चुकणा-या या पार्थाला
गीता तु सांगशिल का?

मी नेहमी त्रागा करावा
संयमाचा नेम तु पाळावा
ढासळणारा तोल माझा
असाच तु सावरशिल का?

सारथि तु होशिल का...

कोप होता संकटांचा
धीर माझा खचताना
संकटांचा गोवर्धन
करांगुळी तु धरशिल का?

सारथि तु होशिल का...

एकटा मी पडता
तोल माझा जाता
संगिणि तु माझी
सारथ्य माझ्या रथाचे
करशिल का?

सारथि तु माझ्या जीवनाचि होशिल का....

प्रिति:-)


Swaatee_ambole
Tuesday, November 28, 2006 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव..
' कविता लिहायला बसलं की ते माणूस सुचायला हवं..'
ते माणूस.... सुचायला हवं?!! व्वा!!

मनिषा, तुझं निःशब्द उत्तर पण आवडलं.
स्मिता, निवडुंग छान आहे.


Niru_kul
Tuesday, November 28, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरता कामातून गेलोय मी.....

तुझं उत्तर न देण्याचं कारण मला सांगशील का?
कारण......
कारण, आता माझा संयम पराकोटीला पोहोचला आहे...

तुझ्या भावना मला समजत नाहीत, असंही नाही....
पण... आता माझा खरंच नाईलाज झाला आहे....
तुला कळत कसं नाही गं ???
जळतो माझा जीव तुझ्यासाठी....
रात्रभर मी तुझाच विचार करत बसतो....
दिवसाही डोळ्यात तुझीच स्वप्नं तरळत असतात....
तुझ्याशिवाय आता कुठंही माझं मन जडत नाही....
इतका एकलकोंडा झालोय, की वेळेचे भानच उरत नाही....
मित्रही म्हणतात सगळे " पुरता कामातून गेलाय "....
अभ्यासातही लक्ष लागत नाही....
स्वतःचं असं अस्तित्वच उरलं नाहिये माझं....
एकरूप झालोय तुझ्याशी...तुझ्यापेक्षा दूर राहूनही....
आता तू आणि फक्त तूच मला सावरू शकतेस....
नाहीतर मला साफ धुळीला मिळवू शकतेस....
करून टाक घाव... होऊन जाऊ देत दोन तुकडे....
एकतर मी पुर्णपणे उध्वस्त होऊन जाईन....
नाहीतर कायमचा उजळून निघेन....
पण किमान या असहाय्य स्थितीतून तरी बाहेर पडेन....
बघ, तुझं तू ठरव....
मला तारयचं की मारायचं ते....

Jayavi
Tuesday, November 28, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं वैभव..... तू ना अशक्य आहेस अगदी! तुझ्या लेखणीत जादू आहे रे!

मनिषा...... निशब्द उत्तर सुरेख..... अशीच लिहित रहा गं...... थांबू नकोस.

प्रीती, निरु...... सुरेख!

स्मि..... वा........ मस्तच गं!


Krishnag
Wednesday, November 29, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरप्राईज!!!!!

ए आज सरप्राईज आहे तुझ्या साठी!
सरप्राईज?......
ते तर तु रोजच असतेस
कधी खट्याळ वार्‍यासारखी
कधी अवखळ लाटेसारखी
कधी झाकळलेल्या आसमंता सारखी
कधी बरसणार्‍या मेघासारखी
कधी चमकत्या चपले सारखी
कधी मुग्ध कलिके सारखी
प्रत्येक दिवस घेऊन येतो
सरप्राईजची नविन किरणे
रोजची मावळती रात्र
देऊन जाते एक नविन सरप्राईज
कधी अनावर आवेगाचे
तर कधी अचानक विरक्तीचे
कधी शहाण्या झुळकेचे
तर कधी वेड्या वादळाचे
कधी खळाळत्या सरीतेचे
तर कधी शांत पुष्करणीचे
तुझ्या सानिध्यात फ़ुललेली नक्षत्रे
तुझ्या श्वासांनी सुगंधीत झालेले चांदणे
सगळे सगळे सरप्राईजच
अचानक भेटलीस ते पण सरप्राईजच होते माझ्यासाठी
रोजची भेटही सरप्राईज
भेटल्यावरचे ते मधूर हसणे जसे सरप्राईज
तसेच ते लटके रुसणेही सरप्राईज
सरप्राईज चे तुझे वेड, तुझा हट्ट
मी पुरवत नाही हे ही एक सरप्राईज तुझ्यासाठी

किशोर



Mayurlankeshwar
Wednesday, November 29, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

---------गणित---------
---------------------
हवामान खात्याच्या यंत्राने
मिलीमीटर आणि इंचात पाऊस मोजावा...
तसं स्वतःचं वय मोजत गेलो
आभाळातून मातीत कोसळताना.

हल्ल्क होत चालंलेल्या आयुष्याची
क्षुल्लक गणिते 'चूक-भूल देणे घेणे'
ह्याच एकमेव मथळ्याखाली करत राहीलो
--कफ़ल्ल्क 'रीझल्ट्'ची चिंता न करता.

स्वतःच्या शून्यत्वाशी इतक्या अंकांचा
व्यभिचार करूनही उमजलीच नाहीत काही गणितं--
ज्यात तू माझ्या नकळत पेरायचीस
इन्फिनीटीच्या अनाकलनिय चिन्हासारखं
तूझं अनादी-अनंत हास्य!!
-------------मयूर

Kanchangandha
Wednesday, November 29, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोकळी....

शरीरापासुन वेगळे होउन बघावे म्हटल
मस्त हलके होउन बाहेर पडले
अथान्ग पोकळी....
फ़ेरफ़टका मारला जरासा
तिथे कोणी मला ओळखतच नव्ह्ते
त्यामुळे आपण कोण हे ही नाही जाणवले
मनाची फ़ाळणीच झालेली नाही
सगळे कसे एकसंध.....
निर्लेप मनाने बघत चालले
अरे ईथेहि तेच सारे...
कोणी आपल्या भळभळत्या जखमांसाठी
अश्वत्थामा झालाय...
कोणी विजयाच्या उन्मादात,जग विसरलाय
कोणी स्वप्नाळु डोळ्यानी अजूनही बसलाय
कोणी धुमसतोय रागाने,कोणी टाहो फ़ोडतोय दुःखाने
तीच घुसमट,तीच अस्वस्थता
या पोकळीत ही जाणवली
मग या अथांग काळोखाचा एक भाग होण्यापेक्ष्या
एकरूप व्हावे आपल्याच जगाशी
आले परत मग फ़िरून या मुक्कामाशी


Sarang23
Wednesday, November 29, 2006 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे तसे

मनाची ओळख
अंधार काळोख
फांदीवर पक्षी
धडधड वक्षी
खळाळते पाणी
कडू गोड गाणी
संध्याकाळ सुस्त
खारुताई मस्त
कधी नवसाचे
कधी पावसाचे


वेडे वेडे मन
ढगातले ऊन
माणसांची वस्ती
भुतावळ नुस्ती
वार्‍याचा सोसाटा
गावात बोभाटा
आपलेसे सख्खे
नवखेच अख्खे
कधी मागणारे
कधी त्यागणारे

(जाती: जीवनलहरी)

सारंग



R_joshi
Wednesday, November 29, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किशोर, सारंग,मयुर फारच छान लिहिल्यात कविता तुम्ही. :-)

Vaibhav_joshi
Wednesday, November 29, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो

क्रिश .. सध्या काय ऐकत नाही ...
:-)
मयुर .. स्वागत आहे ..
कांचन .. सही
रुपाली .. पहिला प्रयत्न कसला ? झुळुका लिहीतेसच की छन छान
सारंगा .. असे तसे मस्त आहे ..
आपलेसे सख्खे
नवखेच अख्खे
कधी मागणारे
कधी त्यागणारे

खास


Mayurlankeshwar
Wednesday, November 29, 2006 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

------------रिकामेपण----------------
-----------------------------------
भरगच्च गर्दीच्या पाठीवर वाहून चाललेलं
भरगच्च काळोखाचं ओझं..
भरगच्च नसानसांतून सळसळणारं
'माणूस'पणाचं रक्त...
रक्तातून ठिबकत ठिबकत
विस्तारणारं एकटेपणं..
आणि भरून आलेली
आपल्यातल्या रिकामेपणाची जाणीव..
..तीही भरगच्च!!
-----------मयुर---------------

Meenu
Wednesday, November 29, 2006 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हळुवार भावनांना,
जागवुन गेला
फट बंद कवाडाला,
वारा करुन गेला

चव मधुर अमृताची,
चाखवुन गेला
हाती परंतु अंती,
दिधला रिताच पेला

आता न गारवा तो,
ना मधुर नशा आता
आशेचा किरण एक
मालवुन गेला


R_joshi
Wednesday, November 29, 2006 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, मयुर अप्रतिम काव्य करता.
वैभव धन्यवाद:-)


Devdattag
Wednesday, November 29, 2006 - 11:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मांडला त्याने असा का आगळा हा डाव आहे
जिंकणे नाही कुणाचे हारण्याला वाव आहे

शोधतो आप्तास कोणी मोकळ्या या रानामध्ये
पाहिला त्यांनी नसे का कालचा तो दाव आहे

जाणल्या सांगा कुणी नीयतिच्या खाणाखुणा
आज फुलांच्या बाजारात का कळ्यांना भाव आहे

जोखले त्यांनी मला आसवांच्या का शरांनी
आणला ऐसा कधी मी प्रेशिताचा आव आहे

जात मातिची करोनी मोडले त्यांनी घडे
आज यमुनेच्या किनारी वाहलेला गाव आहे


R_joshi
Wednesday, November 29, 2006 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत काय लिउ तुमच्यासाठी... शब्दच सुचत नाहित. खरच भावनाचे अप्रतिम वर्णन.

Smi_dod
Thursday, November 30, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यसन!!!!

व्यसनच लागलय हल्ली
शब्दांना निरखायचं
माणसे निरखता निरखता
आताशा शब्द पण निरखायला लागले
त्यांचे रूप,रस,गंध,स्पर्श.....
अनुभवायला लागले
बघता बघता त्यांच्याच जवळ गेले
त्यांच्या मनात काय चालू असेल आता
हा विचार करायला लागले..
त्या शब्दांच्या धाग्यात अडकले
सगळ्या सुख दुःखाच्या रेषा
शब्दातच बघत बसले
शब्दातच शोधते हरवलेले
सगळे क्षण...
स्वप्न पण बघते शब्दांचेच
सैरभैर होते मी शब्दांशिवाय
निशब्द अगदि.....
शब्दांच्या लाटा मग
अश्या आदळतात माझ्यावर.....
आणि विस्कटुन टाकतात मला
अस्ताव्यस्त.....
बसते मग विचार करत शब्दातच
शब्दांचा.......
शब्दांचे व्यसनमुक्तिकेंद्र
असेल का कुठे हे शोधत

स्मि






Mayurlankeshwar
Thursday, November 30, 2006 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!काय रीअलीस्टीक शब्दात मांडलय
शब्दांच व्यसन

Krishnag
Thursday, November 30, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव

आपणा सारख्या काव्य प्रतिभावंतासमोर माझी आपली ही मध्येच लुडबुड चालू असते.
असे करणे म्हणजे भरजरी रेशमी वस्त्रे ल्यालेल्या सृजनांच्या मैफिलीत आपली साधी भरड वस्त्रे लेवून आल्या सारखे वाटते.
इथली बरीच मंडळी येवढे सुरेख लिहतात मग त्यांचे पाहून काही आपणही लिहावे अशी
इच्छा होते मग सरसावतो आपल्या तुटपुंज्या शब्दभांडाराला घेऊन. काही उसने काही मनाचे अवसान आणून चार ओळी शब्दात मांडायचा प्रयत्न करतो. आपणा सारख्यांनी गौरविला तर मूठभर मांस चढते आणि पुन्हा काही लिहावे ही उर्मी दाटून येते. त्यात कधी यशस्वी झालोच तर ही इथल्या प्रतिथयश सृजनशील कलावंतानी दिलेल्या प्रोत्साहनाची परिणीती समजावी त्यात माझे काहीच नाही!!


Kmayuresh2002
Thursday, November 30, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रिश सुटला आहात एकदम.. :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators