Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 25, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through November 25, 2006 « Previous Next »

Shyamli
Wednesday, November 22, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा,अश्विनी धन्यवाद...

अश्विनि,....
काय अग काहि बोलताच येत नाहिये मला........!!!!
दिलसे वाह..........!!!!



Dineshvs
Wednesday, November 22, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मार्गशीर्ष महिन्यात थोरल्या लेकाचे लग्न करायचा प्रघात आहे. तुझ्या वरच्या गझलेच्या तिसर्‍या कडव्यात मला आणखी एका गझलेची शक्यता दिसली. पहिल्या ओळीतला शब्दच दुसर्‍या ओळीत, त्यातलाच एखादा पुढच्या कडव्यात, अशी छान मालिका गुंफु शकशील तु.

Jayavi
Wednesday, November 22, 2006 - 11:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा..... प्रीती सागरात विहरताहेत सारे......!

अश्विनी....... फ़ार फ़ार सुरेख आहे गं तुझी कल्पना! वा!


Sarang23
Wednesday, November 22, 2006 - 11:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! अश्वीनी, शेवटचे कडवे खास आहे!

Meenu
Thursday, November 23, 2006 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहचरीणी

लहान मुल रडुन रडुन झोपी जावं,
तसाच दिसतोस तुही झोपल्यावर ...
चेहर्‍यावर थकवा स्पष्ट दिसतोय,
उरणारच रे खुणा लढाई संपल्यावर ...
मधुनच त्यावर उमटली वेदना,
उमटणारच तीही अन्याय झाल्यावर ...
प्रेमभंगातुन सावरणं सोपं नाहीये,
एवढी खोल गुंतवणुक झाल्यावर ...
खरं म्हणजे तीही होतीच की तशी,
कुणीही प्रेमच करावं जिच्यावर ...
प्रेमभंगाच्या दुःखाची जाण आहे मलाही,
माणुसपण का संपतं कधी बायको झाल्यावर ..?


Smi_dod
Thursday, November 23, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बोलु!!!!

काय बोलु...
शब्द ही अबोल जाहले
मुग्ध त्या शब्दातले
अर्थ तू जाणुन घे

काय बोलु...
गायचे गीत जे भावनांचे
मुक त्या गीतातले
भाव तू समजून घे

काय बोलु...
जाणीवा स्तब्ध सार्‍या जाहल्या
स्तब्ध त्या जाणिवातील
कल्लोळ तू शमवुन दे

काय बोलु
स्पंदने गोठुन सारी थांबली
गोठल्या त्या स्पंदनातील
धगीस तू जागृती दे

कायबोलु
तव सहवासाचा ध्यास
वेड मनासी लावितो
वेडातले त्या शहाणपण तू उमगुन घे

काय बोलु
माझी नसे आता मी राहिले
विसरलेल्या त्या स्वत्वाला
रूप तु मिळवूनी दे

काय बोलु
जपणे असे या सुंदर क्षणा
हरवले स्थान त्यांचे
तू तया शोधुन दे

काय बोलु....
दिशाहीन नक्षत्रे,दिशाहीन तारे
भरकटलेल्या मम नभाला
माग तू काढुन दे

काय बोलु
कोण मी अन कोण तू
वेगवेगळ्या या सुरांना
तादात्म्य आता पावु दे


काय बोलु
बोलायचे सारेच राहुन गेले
मौनातल्या या बोलण्यातले
बोल तू समजुन घे

स्मि


Psg
Thursday, November 23, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, पॉश, लईच खास गं!

मीनू, मस्त! काय शेवट केलायेस.. हंऽऽऽऽऽ

स्मि, तू सुटली आहेस.. एकसे एक येताहेत, अजून येऊदे :-)


Kmayuresh2002
Thursday, November 23, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु,शेवटचं वाक्य सहीच...:-)

स्मि,काय बोलु मस्तच.. एकदम भिडली मनाला:-)


Mrudgandha6
Thursday, November 23, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद.. जया,चिन्नु,लोपा,वैभव,सारंग,अश्विनी. अस्मानी,श्यामली,


वैभव,
......
"सारेच स्तब्ध केवळ श्वासांत हालचाली"
..कठिण आहेरे तुझ्या उत्तुंग शिखराच्या पायथ्याशी पोहचणे मला कठिण आहे.


अश्विनी....
खूप सुंदर..मलाही शेवटच्या ओळीतली कल्पना आवडली.

सुमतीतई.. खासच.

मीनू..
शेवट कहर आहे.

स्मि..
काय बोलू?.. :-)
क्षण अतृप्त..कण तृप्त घे अथवा कण अतृप्त क्षण तृप्त दोन्ही खास आहेत.


Sumati_wankhede
Thursday, November 23, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज़या, शामली, सारंग, मृदगन्धा, निल्या, आस्मानी.......
कुणी सुटलंय का.............
सगळ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार


Devdattag
Thursday, November 23, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>कुणी सुटलंय का.............
सुमतिजी.. सगळेच सुटलेत..:-)
बर्‍याच दिवसांनी आलो इथे.. मागचा महिना अजून राहिलाय वाचायचा..
महान चालु आहे..:-)


Krishnag
Thursday, November 23, 2006 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मार्गशिर्षात जणू मृगशिर्ष अवतरले
काव्याचे हे दालन शब्दगंधाने भरुनी गेले
कसे वर्णावे आपुल्या प्रतिभेला सारे उत्तुंग लिहू लागले
शब्दप्रभु आहा आपण सारे श्रोत्र चक्षु कृतार्थ झाले

सर्वांनीच सुरेख लिहलय!!!


Lopamudraa
Thursday, November 23, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेवा.. कृष्णाजी तुमची प्रतीक्रियाही... छाने.. सुमती.. अश्विनी.. काय दाद द्यावी आता... best ...!!!

Sarang23
Thursday, November 23, 2006 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, जरा
इकडेही नजर टाका!

Kanchangandha
Friday, November 24, 2006 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहजीवन....

आपल सहजीवन..
साहचर्याशिवाय फ़ुललेल
दोन ध्रृवातल अंतर
कधीच पार केलेल
कुड्याचे बंधन न मानणार
तनाने एक नाही हे
पण एकमनानं पुजिलेलं
आगळवेगळ जगावेगळं
सर्वांगाने डवरलेलं
नविन रोपट्या वाचुन अधुरलेलं..
पण अपुर्णातही पुर्णत्व पावलेलं
प्रश्न पडतो मनाला
खरच का हे सहजीवन
नव्हे हे तर एकजीव झालेलं....
कसले हि द्वैत नसलेलं
अधुर अधुर वाटलं तरी
आयुष्य व्यापून दशांगुळे राहिलेलं
वेगवेगळ्या घरट्यात राहुन
एकाच खोप्यात जपलेलं


Sumati_wankhede
Friday, November 24, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण जाणे...

कोण जाणे... आज का खूप उदास वाटत आहे
अन गावाकडच्या नदीची आठवणही येत आहे
जाणवतंय आसुसून मला साद ती घालते आहे
मी सुद्धा तिच्या कुशीत शिरण्यास तितकीच उत्सुक आहे
आता... मागच्या पांदीनं जायची गरज नाहीये लपूनछपून
गढीखालच्या चावडीतली आजोबांची जागा आता दटावणार नाहीये,
'नदीवर जास्त काळ रेंगाळायचं नाही' म्हणून.
मी अगदी निवांत होऊन जाऊ शकते नदीकडे
स्वतःशीच रमतगमत... एकेक पाऊल मोजत
तेच बोरीचं झाड.... जाता जाता लागणारं
ओंजळीत गोळा होण्यास आतूर... ओणवं होणारं
तेच दगड...... त्याच ठेचा.....
तेच झाड......... त्याच चिंचा.....
रस्त्यामध्ये येणारा तोच पाटलिणीचा वाडा
त्या घरातली... माझ्या धाकट्या काकाला भावलेली
ती मुलगी.... दिसत नाहीये
कुठे दडून बसलीये... माहीत नाहीये.
तिला खूप बघावंसं वाटतंय....
पण आता ती दिसणार नाही
अन पल्याडचं ते घर.....
कितीही आपलेपणा दाखवत असलं तरी....
आता आपलंसं वाटणार नाही.
वळणावरचा सवयीचा रस्ता....
पावलांना सांभाळून घेणारा
मध्येच चढ.... मध्येच उतार....
जसा आयुष्यात डोकावणारा.
आता पायाला लागतेय वाळू... भुरभुरणारी... मऊशार
अन मला मिठीत घ्यायला उत्सुक.... नदीतलं पाणी... गारेगार
लहानपणी घातलेला फ्राॅक... फ्राॅकचा ओचा...
ओच्यात भरलेले शंखशिंपले....
काही वाटायचं नाही...
आता गुडघ्यापर्यन्त साडी वर करताना...
उघड्या पडलेल्या पोटर्‍या.....
कुणी बघणार तर नाही...
माझं गाव... माझी नदी... माझं पाणी
सापडतील का शिंपल्यात.... मोत्यांची दाणी
कधीतरी पाण्याच्या प्रवाहानं दाटलेलं
गोमुख बघताना खूप भीती वाटायची
'खूप जवळ जायचं नाही, वाहून जायला होतं'
लहानपणी आजी सांगायची.
कधीतरी.... गच्च दाटलेलं
बाजूचं ते बाभळीचं बन
आता विरक्ती आल्यासारखं
भरभरून ओंजळीत येणार्‍या शंखशिंपल्यांना...
मन झालंय पारखं
आता ओसंडून वाहणारी माया नाही.....
सवंगड्यांची छाया नाही....
म्हणूनच.... आज खूप उदास वाटत आहे
अन गावाकडच्या नदीची आठवणही येत आहे.


Nandini2911
Friday, November 24, 2006 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेच दगड...... त्याच ठेचा.....
तेच झाड......... त्याच चिंचा.....

सुन्दर कल्पना..


Sarang23
Friday, November 24, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! सुमती... छान... छान!

Mrudgandha6
Saturday, November 25, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


हृदयशून्य

लाटेचे मनोगत..

मी बेफ़ाम पणे जाते त्याच्याकडे
असंख्य स्वप्नांचे तरंग घेऊन,
उढळायचे मुक्तपणे स्वपण
आणि समर्पित व्हायचे म्हणून
पण, तो अगदीच निर्विकार..
माझ्या येण्याची,जाण्याची
फ़ारशी पर्वाही नसणारा,
विखरून देते मग मी स्वतःला
परत फ़िरावच लागतं मला..

"तो हृदयशून्य,त्याला काहीच फ़रक पडत नाही,"

किनार्‍याचे मनोगत..

मी रात्रंदिवस तिची वाट बघत बसतो
त्याशिवाय मला दुसरा उद्योगच नसतो
ती लहर होइल तेव्हा येते,खेळते,
अन मर्जीने स्वतच्या निघून जाते.
मी मात्र बसतो मग..
तिच्या आठवणींचे शंख्-शिंपले स्वतःच्या हृदयतळी साठवून
अन तिच्या येण्याकडे डोळे लावून..

"ती हृदयशून्य तिला काहीच फ़रक पडत नाही."





Smi_dod
Saturday, November 25, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्स पूनम,मयुर,मृ...

वाह.... मस्त...सुमतिजी कोणजाणे सुन्दर.... घेउन गेले फ़िरून त्या दिवसात

कांचनगन्ध..... सहजीवन सुरेख

मृ...काय लिहु..मनोगत भिडले जाउन





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators