Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
मराठी गझल

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » मराठी गझल « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 28, 200620 11-28-06  6:10 am
Archive through December 01, 200620 12-01-06  6:23 am
Archive through December 04, 200620 12-04-06  2:18 am
Archive through December 11, 200620 12-11-06  9:24 am
Archive through December 14, 200620 12-14-06  10:18 am

Vaibhav_joshi
Thursday, December 14, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, मित्रांनो.

किरण, अशी ' रहावलं नाही' म्हणून येते तीच खरी दाद रे! :-) भेटू नक्की.

गिर्‍या, गज़ल वाचायला इथपर्यंत आल्याबद्दल विशेष धन्यवाद.
शेर inspired नाहीये. असता तर मूळ शेर नक्की उधृत केला असता.
मुळात तू कुठला शेर म्हणतोयस ते माझ्या लक्षात आलं नाही. ऐकायला आवडेल.


Saurabh
Thursday, December 14, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे वैभव! छान आहे गजल. आणि गिरी म्हणतो तसा मलाही तो शेर आठवलाच... कहीसा असा आहे..

कूचेंको तेरे छोडकर जोगीही बन जाए मगर
जंगल तेरे पर्बत तेरे बस्ती तेरी सेहेरा तेरा..

शब्दात काही गडबड असेल तर गिरी दुरुस्त करेलच.


Asmaani
Thursday, December 14, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, "सापळे " खूप सुंदर! किरु म्हणतो तसं शब्द सुचत नाहीत रे प्रत्येक वेळी प्रतिक्रिया द्यायला!

Zaad
Thursday, December 14, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरुभाई धन्यवाद!
वैभव, सहीच!!!


Sarang23
Thursday, December 14, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरू... धन्यवाद.
सौरभ, तो शेर बरोबर आहे, पण वैभवचा शेर अनेकपदरी आहे असं मला पुनर्वाचनावरून जाणवलं...
शेवटी दोन भिन्न शायर एकसारखा विचार करू शकतातच की!:-)

आणि सगळ्यात महत्त्वाचं, तसा तो शेर inspired असता, तर वैभवने तळटीप नक्की टाकली असती...

वैभव मक्त्यासाठी परत एकदा... लै खास आहे!!!


Meenu
Thursday, December 14, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरु धन्यवाद .. .. ..

Giriraj
Friday, December 15, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सौरभ,मला अपेक्षित असलेला शेर हाच तो.. आणि तू बरोबरच लिहिला आहेस...

वैभव,सहज विचारले... एकच कल्पना अनेकांना वेगवेगळ्या वेळी सुचू शकतेच की... आणि एकदा बसायचे आहे ते तसेच राहून जातेय बघ! :-)


Sarang23
Friday, December 15, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

         गार्‍हाणे

विसरुन गेलो जे जे झाले पुन्हा नव्याने
सुकून गेले डोळे ओले पुन्हा नव्याने

तुझे लाघवी गोड बोलणे झेलुन घेण्या
अश्रुंना मी तयार केले पुन्हा नव्याने

रडवेले क्षण आले जेंव्हा फिरून दारी
थोडे हसले निघून गेले पुन्हा नव्याने

जे आले ते "बरेच झाले! " म्हणून गेले!
दैवाचे देऊन हवाले पुन्हा नव्याने

रडायचे नाहीच कधीही म्हणे म्हणेतो
अलगद डोळे भरून आले पुन्हा नव्याने

पापण्यांतले पाणी जेंव्हा संपत आले;
तुझ्याकडे गार्‍हाणे नेले पुन्हा नव्याने

सारंग


Yog
Friday, December 15, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,
सापळे उत्कृष्ट. थेट आरपार भिडते बघ...
असच काहीसं हव आहे.
;)
saranga,
तिसरा शेर खूप मस्त.. चौथ्या शेरात meter थोड अडखळतय का..?
अश्रु, झेलुन, म्हणुन, हे सर्व "दीर्घ" असतात ना रे? का इथे मुद्दामून ह्रस्व वापरले आहेस?
पण एकन्दरीत गझलेचा mood भिडतो.


Prasad_shir
Friday, December 15, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सारंग... छान गझल...

शेवटचे तीन शेर विशेष आवडले... सहज सुंदर झाले आहेत..

(मात्र तू वापरले आहेस तसे गैर-अलामती काफिये कदाचित नियमांत बसत असतील, पण कानांना खटकतात असं मला वाटतं...)


Giriraj
Friday, December 15, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म... प्रसाद म्हणतो तसेच शेवटचे तीन शेर आवडले.. चवथा आणि पाचवा विषेश आवडले..!

अलामत सगळेच जण पाळतात की नाही माहीत नाही पण नाही पाळली तर खटकतात हे मात्र खरंच!


Lopamudraa
Friday, December 15, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकाहुन एक सुंदर प्रसाद्ची गझल खुप आवडली..
वैभव आणि सांरन्ग फ़ार सुंदर... !!!
इथे गझलपेक्षा प्रतीक्रियाच जास्त आहेत यावरुन्च लक्षात येते.. सगळ्या गझल किती सुंदर आहेत.


Sarang23
Friday, December 15, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो... धन्यवाद.
योग... नुस्तं अश्रू दिर्घ असतं... पण ते अश्रुंना आहे... म्हणून!
म्हणून ची णू दुसरीच! पण मला काहीतरी problem येतोय... मी बरहा मध्ये टाईप करून इथे post करतो तेंव्हा सगळंच बरोबर येत नाही... मग खूप इथेच परत retype कराव लागतं :-( म्हणून ची णु पहिली केली तर एक मात्रा कमी पडतेय... बरं झालं लक्षात आणून दिलत ते, नाहीतर मी समजत होतो की ते बरोबर जसं च्या तसं आलय... म्हणूनच चौथ्या शेरात मीटर थोड गडबडत होतं...
झेलुन... ची लू पण दुसरीच कारण ऊन आणि हून प्रत्यय नेहमी दिर्घ असतात पण ते झेलुन मीटरसाठी र्‍हस्व ठेवले आहे...

गिरी... पहिल्या शेरात जर अलामतीपासून सुटका करून घेतली, तर ते नक्की चालतं... पण पहिल्या शेरात अलामत आहे आणि पुढे नाही हे मात्र गझलेच्या व्याकरणात चालत नाही...
मनोगतवर कुमारने दिलेले उदाहरण परत इथे देतो...

कै. सुरेश भटांची गझल-
हा असा चंद्र अशी रात्र फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी

यात फिरायासाठी आणि धरायासाठी हे काफ़ियाचे शब्द झाले.

जर मतल्यात 'अलामत' पाळली नाही, तर पुढेही अलामतच्या नियमातून मुक्तता मिळते (हा कै. भटांनी 'गझलची बाराखडी'त लिहिलेला 'उपाय' आहे. हा मराठी, उर्दू गझलेतही प्रचलित आहे). उदा. वरचीच भटांची गझल. 'फिराया..' आणि 'धराया...' मुळे पुढे 'झुराया...', 'चिराया...' इ. चालू शकतं.





Prasad_shir
Friday, December 15, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलामती संबंधी

सारंग, आपल्या दुपारच्या चर्चेनंतर मी या क्षेत्रातल्या दोन तीन जाणकारांना अलामतीसंबंधी प्रश्न विचारला आणि भटांची गझलेची बाराखडीही परत वाचली... मला या सगळ्यामधून सापडलं ते असं

गझलेची बाराखडी:

तू भटांनी अलामतीपासून 'सुटका' करून घ्यायचा जो उपाय सांगितला असं म्हणत आहेस ते मला बाराखडीत कुठेही दिसलं नाही.... बाराखडीत फक्त एवढाच उल्लेख सापडतो की अलामतीमधे क्वचित 'अ' ऐवजी 'इ' अथवा 'उ' चालू शकेल... (याचं उदाहरण तूच दिलेल्या भटांच्या शेरामधे आहे). मात्र दीर्घ स्वरांची अदलाबदल झालेली चालेल अथवा त्या पासून सुटका करून घेता येईल असं मला निदान गझलेच्या बारखडीमधे (माझ्या कडच्या एल्गारच्या आवृत्तीमध्ये) कुठेही सापडलं नाही...

जाणकारांची मतं:

मला एकूण चार जाणकारांची मतं ऐकता आली. त्यातला दोघांचं ठाम मत आहे की अशा प्रकारे दीर्घ स्वरांची अदला बदल करत काफिया वापरणं हे गझलेच्या व्याकरणाच्या नियमांना धरून नाही. एका जाणकाराचं मत आहे की गैर अलामती काफिया चालू शकेल पण शक्यतो वापरू नये आणि एकाचं मत आहे की मतल्यात सूट घेतली असेल तर चालू शकेल....

माझं मत:

मुळात अलामत अथवा स्वरचिन्ह म्हणजे काफिया मधल्या न बदलणार्‍या अक्षरांआधीचा न बदलणारा स्वर... हा नियम नीट पाळायचा ठरवलं तर वेगवेगळ्या शेरांमधल्या काफियांत वेगवेगळे स्वर वापरणं योग्य नाही. त्यातल्या त्यात जर अपवाद करायचाच असेल तर तो र्‍हस्व स्वरांच्या बाबतीत करावा दीर्घ स्वरांच्या बाबतीत निश्चित करू नये... (म्हणजे फिरायला, धरायला, उरायला चालेल पण ओली, गेली, चाली, थैली नको)

असो... हे झालं माझं संशोधन आणि मत... दीर्घ स्वरांची अलामतीत अदला बदल असलेले काही मातब्बर गझलकारांचे शेर कोणाला माहित असतील आणि ते इथे सांगू शकलं तर कदाचित माझं मत आणि निष्कर्ष बदलू शकतील....

प्रसाद...


Vaibhav_joshi
Friday, December 15, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग ... गझल छान आहे ... शेवटचे तीन शेर विशेष ...

आता प्रसाद म्हणतो त्याबद्दल ..
प्रसाद ... एकतर मी खरोखर दिलगीर आहे .. तुझा फोन आला तेव्हा मी दिल्लीला मीटींग मध्ये असल्याने नीट चर्चा , विचार न करताच मी मतल्यात सूट घेतली तर चालते असं म्हटलं .. ते म्हणताना तू ऐकवत असलेली अलामत दीर्घ आहे आणि ती भंग होतेय इकडे लक्ष दिलं गेलं नाही ... अर्थात तू वरती " जाणकार " म्हटल्याने त्यात तुझा आणि माझा उल्लेख नाहीये हे नक्की त्यामुळे चूक तितकी गंभीर नव्हती असे समजतो
:-)
असो jokes apart

माझं मत :-

दीर्घ अक्षराची अलामत असेल तर अलामत भंग केलेली चालू शकते असं मला वाटत नाही ... जर आपण सुरेश भटांचेच दाखले देतोय तर त्यांनी फक्त र्‍हस्व अलामत भंग बद्दल लिहीलेलं आहे .. जर दीर्घ सुध्द्दा चाललं असतं तर त्यांनी तिथे नक्की लिहीलं असतं ... ह्याला दुसरी argument अशी होवु शकते की पण मग असा लिखीत नियमच नाहीये ... माझ्यामते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .. उदा :- मी अतिशय विनम्रपणे हे नमूद करू इच्छितो की मी स्वतः अजून एकही कुठल्याच प्रकारे अलामत भंग होणारी गझल लिहीलेली मला आठवत नाहीये .. मला तसं लिहायला आवडत नाही .. ही शेखी मिरवणे नाहीये हा स्वभाव आहे .. पुढे मागे एखादा खूपच अर्थपूर्ण शेर / मतला तसा सुचला तर मी कदाचित विचार करेनही कारण शेवटी काव्याचा आत्मा महत्त्वाचा .. पण ... टाळता येत असेल .. प्रतिभा असेल तर का नाही हा माझा नेहेमीच सगळ्यांना प्रश्न असतो ...

आधी झालेल्या चर्चेप्रमाणे ज्या काव्यप्रकाराचे अस्तित्वच नियमांवर आधारित आहे तिथे र्‍हस्व वगैरे सुध्दा compromises " मला " नको वाटतात ..

हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .. शेवटी प्रत्येक माणूस आधी स्वतःसाठी लिहीतो , त्याला खटकत नसेल तर आणि तसा ठोस नियम नसेल तर this becoems a subjective matter

पण प्रसादने म्हटल्याप्रमाणे असं आणखी एखादं उदाहरण असेल तर वाचायला नक्कीच आवडेल

वरती नमूद केलेली सगळी माझी स्वतःची मतं आहेत .. कुणाला दुखवण्याचा हेतू कधीच नव्हता ... पुढेही नसेल .. चर्चा छान चालते म्हणून सहभागी होत असतो

सारंगा ... शेवटचे तीन शेर विशेष हे परत सांगतो पण चर्चेवर तुझी मतं जाणून घ्यायला आवडेल कारण मी गझल लिहायला लागण्याआधीपासून तुझा ह्या क्षेत्रात गाढा अभ्यास आहे.

तळटीप : नंतर लक्षात आलं की मनोगतावर नुकतीच मिलिंद फणसे यांची अशी गज़ल वाचनात आली होती, ज्यात दीर्घ स्वराची अलामत मतल्यात भंग केलेली दिसली. मी वेळ मिळताच त्यांनाही ही शंका विचारेन. तोवर इथे तज्ञांनी मत द्यावे.


Chinnu
Friday, December 15, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा गार्‍हाणे मस्त. वैभवा काही काही सापळे आवडले!

Swaatee_ambole
Friday, December 15, 2006 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, गार्‍हाणे आवडली.
अलामतीबाबतचा नियम मला नीट माहीत नाहीये, त्यामुळे त्यावर मत देऊ शकत नाही. र्‍हस्व अलामतीबाबत सूट घेतलेली चालते हे वाचल्याचं आठवतंय. या चर्चेतून काय निष्कर्ष निघतो त्याबाबत मीही उत्सुक आहे.


Ashwini
Friday, December 15, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, शेवटचे दोन शेर खूप आवडले.

Kmayuresh2002
Saturday, December 16, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,सापळे झक्कास रे.. सही जमुन आली आहे गझल.. भिडतेय मनाला एकदम.

सारंग,गार्‍हाणे सुरेखच.


Chandifandi
Tuesday, December 19, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sarang....
plz dont mind but ..
"virasun gelo je je zale punha navyane
suklele dole ole zale punha navyane"
he aasa asata tar kasa watla aasata jara jast parinaam karak hoil aasa watatay

baki gazal zakaaas aahe
khup chan lihita tumhi sagle

Devdattag
Friday, December 22, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथमच इथे काही टाकायचं धाडस करतोय.. चु.भु. द्या. घ्या.

आहे थोडे इथेही बोलायचे मला
आहे शब्दात काहि तोलायचे मला
काहि अधूरे नाही सोडायचे मला

शब्दात बंद केले कुणी त्यांना असे
आहे मुक्त भावां पाहायचे मला

माळले होते बंधन म्हणून कोणी
आहे पुन्हा मणी ते ओवायचे मला

होते ओले जरासे ते शब्द जीवघेणे
'आहे तुझ्या विनाच राहायचे मला'

ओशाळेल अखेरी मृत्यु इथे जरा
आहे कुठे तसेही थांबायचे मला


Sarang23
Friday, December 22, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मस्त रे देवा...!
खूप वाट पाहायला लावलीस...
चौथा शेर class आहे!

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही


महाकवी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या या ओळी आठवल्या!

आता थोडं तंत्र... खरं तर आपण सगळेच शिकतो आहोत, पण तरी हे धाडस...

आहे थोडे इथेही बोलायचे मला
गागा गागा लगागा गागालगा लगा
आहे शब्दात काहि तोलायचे मला
गागा गागाल गा गागालगा लगा
इथे तो हि कशाला? सरळ ही कर म्हणजे पहिला शेर prefect !
आणि असंच पुढे पाहा...
आणि ते बसवायचा प्रयत्न केला की झाली गझल!

दुसरा मुद्दा हा की पहिल्या शेरात बोलायचे आणि तोलायचे आलय...
म्हणजे बो आणि तो (ब + ओ आणि त + ओ) असे काफिये आले आहेत, तर ओ ही झाली अलामत आणि बो/तोलायचे हा झाला काफिया...
मग पुढे पाहायचे यायला नको... सोलायचे, खोलायचे वगैरे चालतील...

पण देवा लिहीत राहा रे इथे... खरंच! आणि इतरांनाही सांग इथे टाका म्हणाव तुमच्या गझल सदृश कविता!

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!


Devdattag
Friday, December 22, 2006 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग.. धन्स रे.. ऍक्च्युली मतल्याचा शेर आधी वेगळा होता..
त्यात यचे हा काफ़िया होता आणि आ ही अलामत होती..

बाकी मात्रांच गणित फार अवघड आहे..:-)


Kmayuresh2002
Friday, December 22, 2006 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,मस्तच रे... सारंग म्हणतोय तसं मलाही कुसुमाग्रजांच्या त्या ओळींची आठवण झाली.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators