|
Shonoo
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:00 pm: |
| 
|
एका वर्षाची गोष्ट शम्भर टक्के खरं नव्हे हे शीर्षक. कोणाच्या आयुष्यातलं कुठलंही एक वर्ष असं इतर वर्षांपासून तोडून वेगळं कसं सांगता येईल? काही ना काही मागले सन्दर्भ लागणारच. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर वागवले नाही तरी इतिहास तोडूनही टाकता येत नाही. पण तरिही प्रामुख्याने एका वर्षात झालेल्या घडामोडींची, उलथा पालाथीची गोष्ट आहे ही. मला बर्याचशा निरर्थक गोष्टी लक्षात ठेवायची खोडच आहे. त्यामुळे जवळपास सर्व मित्र मैत्रिणींशी पहिल्यांदा भेट झाली तो दिवस, त्यांनी कुठले कपडे घातले होते, कधी, कुठल्या रेस्टॉरंट मधे कोण कोण मिळून गेलो होतो, कोणी काय काय खाल्लं इतकच काय बरेचदा कोण कोणाच्या शेजारी बसले होते हे ही मला चांगलंच आठवत असतं. लोकांचे वाढदिवस, लग्नाच्या तारखा, त्यांच्या मुलाबाळांचे वाढदिवस हे तर ओघाने आलंच. किती मित्र मैत्रिणी फ़क्त माझ्या रिमाइंडर वर विसंबून असतात. पण जुलिया शी पहिली भेट कधी झाली हे काही केल्या आठवत नाही. पहिल्या सेमिस्टर च्या शेवटी शेवटी ती आणि मी एकत्र कॉफीच्या टपरीवर जायचो एवढं नक्की. अन्डर ग्रॅजुएट शिक्षण सम्पायच्या बेतात होतं तिचं आणि आमच्याच डिपार्टमेन्ट मधे पी एच. डी ला प्रवेश घेतला होता पुढच्या वर्षासाठी.
|
Shonoo
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:30 pm: |
| 
|
कधी नुसता हात हलवून तर कधी 'हाउयुडूइंग' असे जवळ जवळ मोनोसिलॅबिक वाटणारे अभिवादन करत असे. हळू हळू एखाद्या वाक्याची देवाणघेवाण होऊ लागली. मी जिथे लॅब शिकवत असे तिथेच ती नोकरी करत होती. त्या लॅब मधल्या कामाला नोकरी म्हणणं अतिशयोक्तीचं होतं. पण कायद्याप्रमाने ती युनिव्हर्सिटी ची एम्प्लॉयी होती. तिला आणि तिच्या सारख्या इतर डझनावारी विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी मधे अशा नोकर्या होत्या. तासाला सरकारी नियमांनुसार किमान वेतन. सलग चार तासांपेक्षा जास्त काम केलं तर पन्धरा मिनिटांची पगारी सुटी आणि आठवड्याने पगार. आमच्या सारख्या असिस्टंटशिप मिळणार्या विद्यार्थ्यांना ही मुलं मुली का अशी कामं करतात असं वाटत असे. अमेरिकेत सगळेच सुखवस्तू असणार, Harry Met Sally किंवा Love Story तल्या सारखे सगळे जण असणार अशा गोड गैरसमजूती लवकर दूर होत असल्या तरी भल्या घरची वाटणारी मुलं मुली पडेल ते काम करताना पाहिलं की वाईट वाटत असे. हळू हळू कळलं की जुलिया ला तरी या नोकरीची खरंच गरज आहे. विभक्त कुटुम्ब म्हणजे काय याचा आदर्श नमुना होतं तिचं घर.जुलियाची आई, क्वचित ख्रिसमसला कार्ड पाठवणारे biological वडील, तिच्या लहानपणच्या आठवणीतले तिचे डॅड, त्यान्ची सध्याची बायको ( my second step mom, sort of ) आईचा करंट बॉयफ़्रेन्ड, अशा अनेक लोकांबद्दल तिच्या कडून ऐकायला मिळत असे. आजोबांनी कर्जाऊ दिलेल्या पैशातून फी भरत असे. राहण्या जेवण्याच्या खर्चाची सोय म्हणून ती अशा अनेक फुटकळ नोकर्या करत असे. आमच्या लॅब मधली नोकरी तिच्या आवडीची. कोणाला काही अडचण आली तर मदत करावी नाही तर गपचूप आपला अभ्यास करवा. जर लॅब च्या बॉस ने काही काम नेमून दिलं असेल तर ते करावे लागे. पण एकंदरीत अभ्यासाला बराच वाव होता.
|
Shonoo
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:31 pm: |
| 
|
क्रमश: आणि काल्पनिक सुद्धा
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 1:49 am: |
| 
|
अरे वा लिहि म्हणून विनवण्या करायची वेळ आली नाही वाचकांवर. छान छान.. लिही जमेल तसे..
|
Asmaani
| |
| Friday, August 25, 2006 - 4:20 pm: |
| 
|
hmmmm... interesting वाटतेय. लवकर येऊदेत पुढचं.
|
पुढच कधी लिहीणार मी वाचायला उत्सुक आहे प्ढची वाट पहात्ये फार वाट पहायला लाऊ नका छान आहे.
|
Shonoo
| |
| Saturday, August 26, 2006 - 10:46 pm: |
| 
|
जुलिया शी झालेल्या ओळखीचं मैत्रीत रुपांतर इतक्या झटकन झालं याला कारण आमची लॅब. ती बरेच वेळा संध्याकाळची तिथे असायची. माझे शिकायचे,शिकवायचे तास संपले तरी मी पण त्या लॅब मधे बसून अभ्यास करत असे. लॅब मधे आलेले नवनवीन सॉफ़्टवेअर इन्स्टॉल करणे, ते वापरण्याकरता माहितीपत्रके तयार करणे अशी कामे ती आवडीने करत असे. नेटवर्क नावाचा प्रकार नवाच होता तेंव्हा. पण टेबल खुर्च्यांच्या खालून, कपाटांच्या मागून वायरी जोडायचं काम पण ती आपणहून करायची. एकदा मला म्हणाली सुद्धा ' ज्याने कोणि नेटवर्किन्ग चे सात लेयर अशी मांडणी केली तो जगातला सर्वात बुद्धिवान!' तिच्या नेहेमीच्या मित्र मैत्रिणींना, जवळच्या नातेवाईकांना Macintosh म्हणजे सफरचंदाची जात, windows म्हणजे घराच्या, गाड्यांच्या खिडक्या आणि unix म्हणजे काहीतरी new age शिवी असं वाटतंय म्हणायची ती. ती जेंव्हा graduate होऊन आमच्या बरोबर आली तेंव्हा तिची गुणवत्ता बघून तिला लगेचच teaching assistantship मिळाली. पण तिने ती लॅब मधली नोकरी काही सोडली नाही. वर्गात शिकवतात त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त इथे शिकायला मिळतं असा तिचा सिद्धांत होता. हिन्दी चित्रपटात दाखवत असंत तशी कॅलेंडर ची पाने उलटत गेली आणि आम्ही दोघींनी पाठोपाठ डिग्र्या मिळवल्या. तो पर्यंत ती तिच्या लॅब मधे बर्याच वरच्या पदाला पोचली होती. आमच्या डीन ने युनिव्हर्सिटी मधे तिच्या करता शब्द टाकल आणि सी.टी.ओ. हे पदाचे नाव जन्माला येण्यापूर्वी ती युनिव्हर्सिटी ची सी.टी.ओ. झाली.
|
Bee
| |
| Tuesday, August 29, 2006 - 3:57 am: |
| 
|
शोनू छान लिहीत आहेस.
|
Shonoo
| |
| Tuesday, August 29, 2006 - 10:33 pm: |
| 
|
तिच्या अगोदर चार सहा महिने मी पण माझ्याच युनिव्हर्सिटी मधे, माझ्याच डिपार्टमेन्ट मधे प्रोफ़ेसर म्हणून नोकरीवर लागले होते. जिथून पी एच डी केलं तिथेच शिकवायची नोकरी करणे म्हणजे कमी पणाचं असतं. पहिली काही वर्षे तरी दुसया ठिकाणी नोकरी करावी अशा मित्र मैत्रिणींच्या विरोधाला न जुमानता मी ही नोकरी घेतली होती. जुलिया ला भयंकर आनंद झाला होता तेंव्हा. मला म्हणाली होती 'मला पण ही युनिव्हर्सिटी सोडायची नाहीये. पण मला प्रोफ़ेसरकी नाही करायची. कुठल्या तरी कंपनी मधे सूट घालून मीटिंग घेत बसायला लागणार आहे मला'. पण तिच्या आणि माझ्या ही सुदैवाने तिला आमच्या युनिव्हर्सिटी मधेच नोकरी मिळाली. जरी आता तिचे ऑफ़िस डीन, रजिस्ट्रार, प्रोव्होस्ट या लोकांच्या इमारतीत, त्यांच्यात मजल्या वर होते तरी तिने कधी स्वत:ला ' Business suit' ( तिचीच टर्म ही) होऊ दिले नाही. तिच्या लेखी तिचे कामातील प्राविण्य आणि काम करायची क्षमता या दोन गोष्टी महत्वाच्या असत. विद्यार्थ्यांशी, इतर प्राध्यापकांशी आणि युनिव्हर्सिटी शी संलगन अशा शेकडो organizations मधल्या टेक्निकल लोकांशी तिचे चांगले सम्बन्ध होते. युनिवर्सिटी मधल्या कुठल्याही प्राध्यापकाला technology च्या संदर्भात काही अडचण, शंका असल्यास तिच्याशी थेट बोलून आपला प्रॉब्लेम सोडवता येई. या निमित्ताने तिच्या ज्ञानाच्या कक्षा पी एच डी पेक्षा ही जास्त विस्तारतात असे म्हणे. मागच्या वर्षी फ़ॉल सेमिस्टर च्या सुरुवातीच्या अगोदर, मी जरा नवीन अभ्यासक्रमाची जुळनी करावी, ऑफ़िस थोदे साफसूफ करावे या उद्देशाने कॅम्पस वर आले होते. हा उन्हाळी सुटीचा शेवटचा काळ मला नेहेमी वादळापूर्वीच्या शांतते सारखा वाटतो उन्हाळी सुटीतले वर्ग संपलेले असतात. लायब्ररी बंद असते. बर्याच डिपार्टमेन्ट मधे अगदी सेक्रेटरीण बाया पण रजेवर असतात. डॉर्म्स मधून डागडुजी, रंगरंगोटी ची कामे जोरात चालू असतात. तो आवाज आणि थोडे फार ग्रॅजुएट स्टूडन्ट सोडले तर बाकी सारं कसं शान्त शान्त! चार पाच तास मान मोडून काम झाल्यावर कॉफ़ी ची तलफ़ आली. या दिवसात फकत जो ची टपरी उघडी असणार. असो तिथपर्यंत मोकळ्या हवेत चालल्याने मरगळ तरी जाईल या विचाराने मी जरा झप झप पाउले टाकू लागले. तेव्हढ्यात माझ्या मागनं कोणी तरी धावत येतंय असा भास झाला. वळून बघते तर जुलिया. 'अगं तू तर सुट्टीवर वर जाणार होतीस ना या आठवड्यात. मग आज इथे कशी?' मला म्हणाली ' जो कडेच चालली आहेस ना? मी पाहिलं तुला आमच्या मजल्याच्या लाउंज मधून. तू आज इथे आहे हे माहित नव्हतं मला नाहीतर आधीच आले असते. कॉफ़ी घेऊन परत तुझ्या ऑफ़िस मधे जाउया माग काय ते सान्गते.' कॉफ़ी घेऊन परत येईपर्यंत काही बोलली नाही. निमूटपणे माझ्या बरोबर आली. ऑफ़िस मधे आल्या आल्या धप्पकन खुर्चीत बसली आणि टेबलवर डोकं टेकून रडायला सुरुवात.
|
Bee
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:30 am: |
| 
|
कथा रंगते आहे शोनू.. परिक्षा आटोपल्यानंतर खरच विद्यापिठात किंवा कॉलेजच्या कॅ.म्पस मध्ये गेलो तर कसे अगदी भकास वाटते. तू छान रंगवते आहेस वातावरण..
|
Kaarta
| |
| Wednesday, August 30, 2006 - 4:05 am: |
| 
|
changli insight milte ahey about univ life in US, very interesting narrative as well, waiting for what happens next 
|
Shonoo
| |
| Wednesday, August 30, 2006 - 10:30 pm: |
| 
|
परिक्षेच्या वेळी, घरच्या अनंत अडचणी सोडवण्याच्या वेळी कधी ही तिला भावना विवश सुद्धा झालेली पहिली नव्हती. कितीही दु:ख असो, कष्ट असोत, कोणाशी भांडण झालेलं असो ती कधी डोळ्यातून पाणि काढत नसे. वैतागे, शिव्या देई, क्वचित प्रसंगी दारे धाडकन लाथेने बंद करत असे. बॉयफ़्रेन्डस शी ब्रेक अप सुद्धा काय कमी झाले होते? मला माहीत असलेलेच कितीतरी, मग माझ्या लक्षात न आलेले आणखीन किती असतील? पण असं रडणं कधी नाही, एकाशी तर अगदी एंगेजमेन्ट होता होता नातं तुटलं होतं. तो अगदी तडकाफडकी इथून सर्व काही सोडून पीस कोअर मधे गेला होता. तेव्हा देखील रडली नाही. त्यांचा दोघांचा फोटो नन्तर सुद्धा बरेच दिवस तिच्या टेबलवर असायचा. मला कळत नव्हतं की आत्त्ता या घटकेला मी काय करू? शेवटी मी उठून तिच्या बाजूच्या खुर्चीत बसले आणि नुसतं पाठी वर थोपटत राहिले. काय बोलावे तेही सुचत नव्हतं मला. हळू हळू रडण्याचा भर ओसरला तशी उठून सावरून बसली. क्लीनेक्स घेऊन नाक डोळे पुसले आणि मला म्हणाली ' त्याला असा धडा शिकवला पाहिजे ना की जन्मात कधी पुन्हा असं काही करणार नाही 'पुरुषांचं काही कळत नाही मला. क्शावर विश्वास ठेवावा तेच कळेनासं झालंय मला' आता यातून मला काय अर्थबोध होणार. कदाचित तिच्या बरोबर काम करणार्या कोणावर तरी वैतागली असावी असा मी विचार केला. पण मी काही बोलायच्या आतच ती म्हणाली ' I better begin at the begnning. ' मग थाम्बत थाम्बत, मधे मधे शिव्यांची खैरात करत आणि टेबलावर मुठी आपटत तिने जे सांगितलं त्याचा सारांश असा- तिचा नवरा जेफ़ एका नामांकित इन्व्हेस्टमेन्ट बॅंकेमधे उच्च पदावर होता. गलेलट्ठ पगार, भला थोरला expense account ; त्या करता सणकून काम करावे लगे. दर क्वार्टरचे टार्गेट, रिझल्ट इत्यान्दींची तलवार डोक्यावर कायम टांगती असे. पण एकंदरीत तो कम्पनी वर आणि कम्पनी त्याच्या वर, त्याच्या कामावर खुश. या सर्व happy happy परिस्थिती मधे मागच्या आठवड्यात जेफ़ ला तडकाफडकी कामावरून काढून टाकलं होतं. वरकणी कार्ण सांगितलं होतं "inappropriate use of company resources" मला कळेना की ऑफ़िसच्या ब्लॅकबेरी वरनं मुलांच्या फ़ूटबॉल बेसबॉल इत्यादी लीगचे अख्खे सीझन मॅनेज करतात लोकं आजकाल. मग हे inappropriate use म्हणजे नक्की काय? माझ्या अज्ञानाची कीव करत जुलिया म्हणालि ' अगं म्हणजे तो "तसल्या" वेबसाइट बघत होता म्हणून' आता तर मी अगदीच गोंधळून गेले. 'तसल्या' म्हणजे काय ते लक्षात आलं पण आता या देशात ' तसल्या साइट सुद्धा किती तर्हेच्या असू शकतात याची बातम्यांवरनं कल्पना येतच असते की. मला वाटलें की असेल बाबा त्याला कोणी तरी चीअरलीडर ची लिन्क पाठवली आणि याने केलं असेल क्लिक तर म्हणाली नाही असं कधी चुकीने झालं तर तेव्हढ्या करता कामाव्रून काढणार नाहीत. मग माझ्या मनात अगदी नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. तर म्हणाली No, he is not joining McGreevey's club' मागच्या वर्षी न्यु जर्सी च्या राज्यपालाने विवाहित असूनही एका परपुरुषाशी आपलं अफ़ेअर असल्याची कबुली देऊन राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.
|
Bee
| |
| Wednesday, August 30, 2006 - 11:12 pm: |
| 
|
अगदी कादंबरीचा घाट आहे लिहीण्याचा. आवडत आहे..
|
शोनु लवकर लिही खूप उत्सुक्ता लागली आहे वाचायची!!
|
shonoo, busy aahes ka ga sadhya... aamhi vat pahatoy pudhachya bhagachi
|
Shonoo
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:23 pm: |
| 
|
गव्हर्नर सारखं नाही म्हटल्या वर जरासं हुश्श वाटतंय तोच आणखीन एक शंका आली. कसं विचारावं ते कळेना. मी नुसतीच ' umm, umm, I mean ' करत अडखळत होते तोवर तीच म्हणाली There is no underage stuff either. आता खरंच जीव भांड्यात पडला माझा. म्हणजे निदान illegal तरी काही नसावं. तेव्हढीच जरा कमी नालस्ती. असा विचार मनात येता येताच तो तिला कळला असावा. मला म्हणाली " first degree murder पेक्षा homicide परवडलं असा विचार करू नकोस. 'तसल्या' साइट वर ऑफ़िसच्याच काय, घरच्या कम्प्युटर वरून सुद्धा जाणे चुकीचे आहे. ह्यासाठी कायद्याचा आधार कशाला हवा. लग्नात ' to honor, to cherish ' वगैरे जे म्हटलं होतं त्यामधे काय असं स्पष्ट हेही हवं होतं का? परस्त्री कडे न बघणे याची व्याप्ती काय त्याला कळत नाही?" बराच वेळ त्याला शिव्या देऊन झाल्या. एकन्दरीत पुरुष जातीला ही सोडलं नाही. मधेच माझ्यावर दया म्हणून माझा नवरा अखिल पुरुष जाती पेक्षा वेगळा आहे याची ग्वाही दिली. आतापर्यंत तिला भडकलेली, वैतागलेली, दु:खी, अपमानित, अनेक personal and professional crisis मधे पाहिलं होतं. मला गाठून माझ्या समोर आपलं गार्हाणं मांडलं की तिला बरं वाटत असे. बरेचदा काही बारिक सारिक प्रॉब्लेम्स असे नुसते vent केल्याने तिचे तिलाच उत्तर मिळत असे. पण त्यादिवशीचा रंग काही निराळाच होता. काही केल्या तिच्या जिवाची तगमग कमी होत नव्हती. संध्याकाळ होत आली होती. जो सुद्धा टपरी बंद करुन घरी जायच्या तयारीत असेल. म्हणून तिला म्हटलं ' एक कॉफी घेऊया जो कडून आणि मग दोघी माझ्या घरी जाऊ. तुला चालणार असेल तर जेफ़ला पण बोलव. मला त्याच्याशी पण बोलू दे आणि त्याची बाजू ऐकू दे. माझ्या नवर्याशी पण तुला बोलता येइल.' म्हणाली 'नकू. आपण कॉफी घेऊ आणी आपण दोघीच बाहेर जाउ जेवायला. जेफ़ला मी सांगितलंय माझी वाट पाहू नकोस म्हणून.'
|
Shonoo
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:49 pm: |
| 
|
जेवायला जाईपर्यंत दु:खाचा कढ ओसरला थोडा. तेंव्हा म्हणाली की जेफ़च्या ऑफ़िस मधे काही नवे बोर्ड मेम्बर्स आले होते. त्यांना जेफ़ची, जेफ़च्या बॉसची कामाची पद्धत पसंत पडत नव्हती. कामाच्या बाबतीत, त्यान्च्या रिझल्ट्सच्या बाबतीत नावं ठेवायला जागा नव्हती. पण त्यांचं म्हणणं असं होतं की जेफ़चा बॉस आणि त्याच्या हाताखालचे जेफ़ सारख्या लोकांची strategy चुकीची आहे. खरं तर इन्व्हेस्टमेन्ट बॅंकिन्ग म्हणजे माझ्या लेखी थर्मोडायनामिक्स इतकाच सोप्पा विषय! त्यामुळे या विषयावर कोणी काही बोललं की मी ' हो का?, खरं की काय?, I see या पलिकडे काही बोलायला जात नाही. जुलिआ ला पण माहित आहे माझ्या अगाध अज्ञानाबद्दल. पण ती जी बोलत सुटली होती की मला ' हो का?' वगैरे सुद्धा म्हणायची वेळ आली नाही. जेवता जेवता मग मी विचारले की 'जेफ़ आता काय करणार?' त्यांच्या क्षेत्रात अश्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही. आणि असली 'किर्ती' पसरली की दुसरी कडे नोकरी मिळणे कठीण. ' अजून तरी काही ठरवलं नाहीये. तो त्याच्या वकिलाशी बोलतोय मग ठरवेल.' मी जर या जन्मी थोडे जरी पुण्य मिळवले असेल तर देवाकडे हेच मागणं मागेन की पुढच्या जन्मी मला एखादा थेरपिस्ट आणि एखादा वकील परवडेल इतकी ऐपत दे. माझ्या ओळखीत ' माय थेरपिस्ट आणि माय लॉयर' असं म्हणू शकतील असे एखाद दोघेच असतील. जुलिआ म्हणाली ' त्याचा वकील म्हणजे तू समजतेस तसा नव्हे. बेकायदेशीर रित्या कामावरून काढून टाकल्याची तक्रार अनेक लोक करत असतात. अशा केसेस घेणारे काही प्रसिद्ध वकील आहेत. त्यातल्या एकाकडे जेफ़च्या बॉसने शब्द टाकला आहे. त्याच्याशी जेफ़ बोलतोय सध्या.'
|
Bee
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:31 am: |
| 
|
शोनू, सुरेख गुंफ़त चालेली आहे कथा..
|
Raina
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:48 am: |
| 
|
शोनू- कथा छान रंगते आहे. मी नियमीतपणे वाचते आहे- पूर्ण झाल्यावर प्रतिक्रिया द्यावी म्हणून थांबले होते.. पण आताचा भाग वाचून रहावले नाही म्हणून... काही वर्षापूर्वी एका मुलाला client site वरुन अशोभनीय चित्र print केलं म्हणून बडतर्फ करायची मिटींग चालली होती. मुलगा चेह-यावरून अतिशय गरीब.. काकुळतीला आला होता.. साहेबाला म्हणत होता की घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही- मला नोकरीची फार गरज आहे- माझ्या हातून चूक झाली पुन्हा असे करणार नाही.. साहेब जाम भडकला होता कारण client ने त्याला जाम झापले होते. तो या मुलाला म्हणाला गाढवा पण तू असे केलेसच का? मुलगा डोळ्यात पाणी आणून म्हणाला- माझ चुकलं, मला प्रिंट करायच नव्हत- चुकुन प्रिंट केल्या गेलं.. घ्या आता! म्हणजे एवढ रामायण झालं तरी भाउसाहेबांना आपण चुकीचं वागल्याची खंत नव्हतीच... किस्सा खरा आहे- आणि पुढे काय झालं तेवढं मात्र विचारु नका.
|
Shonoo
| |
| Friday, September 08, 2006 - 9:57 pm: |
| 
|
जुलिआ च्या बोलण्यावरून एकंदरीत त्या वकिलाला ही केस घेण्यात फारसा इन्टरेस्ट नाही असे वाटत होते. असल्या केस मधे भक्कम पुरावा असल्या खेरीज कंपनी कामावरून काढून टाकणार नाही. त्यामुळे ' तात्विक मतभेदांसाठी काढले' ही तक्रार कोणी ऐकून घेणार नाही असे त्या वकिलाचे मत होते. मी सहज म्हटले ' अगं कदाचित त्याला असल्या माणसाची केस चालवायची नसेल. किती नाही म्हटले तरी त्याचे प्रतिष्ठेला धक्का लागेल त्याची प्रतिमा डागाळेल असली केस तो का घेईल? तो काही criminal lawyer नाही की त्याने प्रसिद्धीच्या आशेने कोणाचीही केस घ्यावी'. जरा वेळ विचारात पडली अन मग म्हणाली ' तसं ही असेल कदाचित, पण त्याला पाहून, त्याच्याशी जे बोलणं झालंय त्यावरून मला तरी तसं वाटत नाही' जेवण संपलं तरिही तिचा बोलण्याचा भर संपत नव्हता. शेवटी वेटर तिसर्यांदा "Is there anything I can get you?" म्हणला तेव्हा बाइसाहेबांच्या लक्षात आले की इथे अजून फार काळ रेंगाळता येणार नाही. 'इतक्यात युनिव्हर्सिटीमधे कोणाला सांगू नकोस. आम्ही त्या वकिलाशी बोलून काय ते नक्की ठरवू. मगच कोणाला, कसं आणि कितपत सांगायचं ते ठरवता येइल. एक दोन दिवसात परत आपण बाहेरच कुठे तरी भेटू या. आता तू तुझ्या नवर्या कडे पळ. जमल्यास त्यालाही इतक्यात फारसं काही सांगू नकोस.' अस. म्हणून मला श्वास कोन्डेपर्यंत hug करून झटकन निघून गेली. ती गेल्या वरही मी दोन्-चार मिनिटे तिथेच बसून होते. तिच्या पुढे आता दैवाने काय वाढून ठेवलंय कोण जाणे.
|
|
|